स्लेजिंग म्हटल्यावर डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त एकच नाव येते ऑस्ट्रेलिया. खेळातील कौशल्य, प्रोफेशनल अॅप्रोच आणि सगळ्यात महत्त्वाचे अस्त्र ‘स्लेजिंग.’ या त्रयींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजविले आहे. पण हा स्लेजिंगचा वसा किंवा खूळ आले कोठून? कसे आणि केव्हा?
महाभारतातील विराट पर्वात साधारण असाच प्रसंग आहे. संजय शिष्टाई नावाने हा प्रसंग ओळखला जातो. धृतराष्ट्राचा दूत म्हणून, धृतराष्ट्राचा संदेश घेऊन, व्यास शिष्य संजय, पांडवांकडे आला होता. पांडवांना युद्धापासून परावृत्त करण्यासाठी! कौरव या अनीतीच्या युद्धात विजयी होण्याची शक्यताच नसल्याने धृतराष्ट्राने कूट नीतीने आणखीन एक प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. पांडवांची युयुत्सा क्षीण करण्यासाठी, त्यांना संभ्रमात पाडण्यासाठी धृतराष्ट्राने हा जो प्रयोग केला त्याला त्या काळी ‘मंत्रयुद्ध’ असा शब्द प्रचलित होता. मंत्रयुद्ध म्हणजे प्रतिस्पध्र्याच्या मनात विपरीत विचार पेरणे. आपल्या वाक्बाणांनी! म्हणजे स्लेजिंगच. नाही का?
ऐन समरप्रसंगी धृतराष्ट्राने संजयमार्फत जो संदेश पाठविला होता त्यातील नमुनादाखल काही वाक्यं।
‘‘पांडवांनो, तुम्ही सुशीलच आहात. तुम्हाला युद्ध शोभत नाही. दुयरेधन दुष्टच आहे. तेव्हा विचार तुम्हीच करायला हवा. शुभ्र वस्त्रावर छोटासाही डाग चटकन नजरेत भरतो. तुमच्या धवल चारित्र्यावर कुलक्षयाचे डाग पडू नयेत. आपलेच बंधू, गुरू, आप्त यांना ठार करून हे रक्तलांच्छित राज्य तुम्हाला कोणतेही सुख देणार नाही. तुमच्यासारख्या विवेकी लोकांनी युद्ध टाळलेले बरे. त्यापेक्षा भिक्षा मागणे काय वाईट?’’
‘‘न चेद भागं कुरवो ऽन्यत्रयुद्धात प्रयच्छेरंस्तुभ्य मजातशचो।
भैक्षचर्याम न्धक वृशणीराज्ये (५१४२ँल्ल्र १ं्न८ी ) श्रेयो मन्ये न तू युद्धेन राज्यम’’
असे कोणते सुख आहे जे या सगळ्यांना मारून तुम्ही मिळवू इच्छिता?
खरं तर पांडव पाच गावं मिळाली असती तरीही ते खूश होणार होते. युद्धाची खुमखुमी
दुयरेधन, कौरवांनाच होती.
धर्म, अधर्म जाणणाऱ्या युधिष्ठिरावर या प्रयोगाचा परिणाम होणार नव्हताच.
तसेच विचार करण्याच्या भानगडीतच न पडणाऱ्या भीमावरही या तथाकथित ‘स्लेजिंगचा’ काडीमात्र परिणाम होणार नाही हे कौरव, धृतराष्ट्र जाणून होते. इतकेही करून पांडव युद्धापासून परावृत्त झाले नाहीतच. आणि कौरवांनाही पराभव टाळता आला नाहीच, पण ऐन युद्धभूमीवर अर्जुनाला ‘सीदन्ति मम गात्राणि’ म्हणण्याची वेळ आणण्यात हे ‘मंत्र युद्ध’ किंवा ‘स्लेजिंग’ काही प्रमाणात कारणीभूत ठरलेच, नाही का?
मंत्र युद्ध हा शब्द त्या काळी प्रचलित होता असे म्हणतात, परंतु प्रत्यक्ष महाभारतात कोठेही हा शब्द वापरला गेल्याचे निदर्शनात येत नाही. कौटिल्याचे अर्थ शास्त्रात मात्र मंत्र युद्ध शब्दांचा उल्लेख सापडतो. साधारण अशाच अर्थाने वापरण्यात आलेला कौटिल्याचा सर्वात प्राचीन उल्लेख ‘पंचतंत्रात’ येतो. म्हणजे साधारणपणे इ. स. पूर्व तिसरे शतक किंवा त्याआधीचा थोडा काळ. त्यावेळेपर्यंत कौटिल्य बऱ्यापैकी ‘फेमस’ झाला होता. समकालीन साहित्यात विशेष उल्लेख होण्याइतका! आणि त्याने वापरलेला शब्द
त्याआधीच रूढ झालेला असणार हेही निर्विवाद !