01-vachak-lekhak‘रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं और नाम हैं शहेनशाह, ओय’ पाचवी/क च्या वर्गात कलाच्या तासिकेत मला एक अमिताभ बच्चन सापडला. नंदीबैल कविता तालासुरात गाणारा गायकही तिथेच होता. वाट्टेल त्या कवितेवर, वाट्टेल तसे हावभाव व अंगविक्षेप करणारा गमत्या बहुरूपी त्यांच्यातच होता. त्या धिटुकल्या, पिटुकल्या मुलांमध्ये मिसळताना मलाही नित्य उत्साह जाणवायला लागला. मराठी विषयही मी त्या वर्गाला शिकवत असल्याने दुधात खडीसाखर असा योग जुळून आला. आमची मराठीची तासिका म्हणजे नुसती धमाल! खडय़ा आवाजात पाठ केलेल्या सुरेल कविता, गद्य पाठांची केलेली नाटय़ीकरणं, वर्गात घेतलेल्या वाद-विवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, संवाद लेखन, संवाद सादरीकरण, शब्दकोडी, वेळेवर फळ्यावर कवितेची ओळ लिहून काव्यपूर्तीच्या आगळ्यावेगळ्या छटा, कवींशी मोबाइलवरून थेट गाठभेट या आणि अशा अनेक उपक्रमांमधून मायबोलीचे महत्त्व आणि ममत्त्व आम्ही बिंबवले व टिकवूनही ठेवले. 

आमच्या वर्गातल्या शहेनशाह अमिताभला पाहून मला एक भन्नाट कल्पना सुचली. पाठय़पुस्तकावर आधारित ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रम वर्गात घ्यायचा. झाले! मुलांना नुसती कल्पना दिली. हॉट सीटसाठी दोन मुलं आम्ही निवडली. ‘दोन्ही मुलं बाद झाली तर एक-दोन मुलं तयार ठेवली. वर्गात असे काहीतरी घडून यावे म्हणून मुलं आणि मी फार उत्सुक होतो. माझी लहान-लहान चिमुकली मुलं कामाला लागली. आम्ही दोन-तीन जणांनी मिळून १३-१३ प्रश्नांची प्रश्नावली तयार केली. ऑडियन्स पोलसाठी ऑडियन्सचाही अभ्यास महत्त्वाचा असल्याने प्रत्येकाने अभ्यास करून यावा असे आमचे ठरले. मुलं अभ्यासाला लागली. काही प्रश्न आणि कार्यक्रमाचे थेट शब्दांकन वाचकांसाठी देत आहे. वर्गातले चैतन्य टिकवून ठेवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा सहभाग अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत वाढावा यास्तव अशा नव्या संकल्पना शिक्षकांनी निवडाव्यात. बैठक व्यवस्था योग्य पद्धतीने करून कार्यक्रमात रंगत आणावी.

अमिताभ : मैं, अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती में आप सबका स्वागत करता हूं. (मुलांच्या टाळ्या) पंचकोटी महामनी में आपका स्वागत है. आज हमारे साथ है गणेशपूर से आये राजन निनावेजी (दोघांची गळाभेट).

राजन : सर, आज मैं बहोत खूश हूं. भगवान से मुलाकात हुवी ऐसे ही लग रहा हैं सर.

अमिताभ : हां, हाऽऽ हाऽऽ चलो हॉट सीट आपकी राह देख रही है (राजनला खुर्चीवर नेऊन बसवतो.) राजनजी, हमारे इस, प्रोग्राममें आपका बहोत स्वागत हैं.

राजन : नमस्ते सर.

अमिताभ : क्या करते हैं राजनजी आप?

राजन : मैं ५वी में पढम्ता हूं.

अमिताभ : आप भंडारा से आये हो. कहां है ये भंडारा? और क्या महत्त्व रखता है?

राजन : सर, नागपूर से ६० कि.मी. दूरीपर पूरब की ओर हमारा भंडारा शहर हैं. भंडारा डिस्ट्रिक्ट चावल के उत्पादन के लिये फेमस है.

अमिताभ : ओ हो! चावल के लिये? मुझे पुलाव बहोत पसंत है.

राजन : सर, मेरे गाव से मैं ये चावल आपके लिये लाया हूं. सर, प्लीज आप इसे स्विकार करे और घर ले जाइये सर.

अमिताभ : क्यूं नहीं, क्यूं नहीं, मैं आज ही इस चावल का पुलाव बनाने को जयाजी से कहूंगा.

राजन : सर मैं धन्य हो गया.

अमिताभ : हां, तो राजनजी, हम इस खेल को शुरू करते हैं. खेल शुरू करने के पहले मैं इसके नियम बताना चाहूंगा. १३ प्रश्न आपके सामने आएंगे. आप किसी भी प्रश्न पर आपका मनचाहा पडाव लगा सकते हो. ५००० के पहले प्रश्न से हम खेल की शुरुवात करेंगे.

राजन : हां सर, पता हैं. मैं १ लाख साठ हजार पर पडाव लगाना चाहूंगा.

अमिताभ : कम्प्यूटरजी, राजनजी १ लाख साठ हजार पर अपना मनचाहा पडाव लगाना चाहते है. अंकित किया जाए. (टिंग, टिंग) हा! तो खेल को शुरू करे राजनजी? तय्यार हो?

राजन : हां सर, मैं तयार हूं.

अमिताभ : ५००० का ये पहिला प्रश्न आपके स्क्रीन पर ये रहा. ‘वाट वळणाची’ यह कविता किसने लिखी है? और आपके ऑप्शन्स इस तरह हैं.

अ) वि. म. कुलकर्णी बी) सुरेश सावंत

सी) वंदना विटणकर डी) कवी अनिल

राजन- सर, इसका उत्तर है, डी- कवी अनिल.

अमिताभ : लॉक कर दिया जाये?

राजन : हां सर. बिलकुल लॉक कर दिया जाए.

अमिताभ : कम्प्युटरजी डी- कवी अनिल को लॉक कर दिला जाए.. बिलकुल सही. ५००० रुपये जित गये आप.

राजन : धन्यवाद सर.

अमिताभ : १०,००० का ये दुसरा प्रश्न ये रहा आपके सामने.

‘रात्रिंचर बगळे’ को सायन्स में कौन से नाम से पहचाना जाता है?

अ) नाईट रायडर बी) नाईट हेरॉल

सी) नाईट नायक्टीकोरॅक्स डी) नाईट शाईन

राजन : अंऽऽऽ (काय आहे बे लक्षात येऊन नाही राहिलं)

अमिताभ : आपके सामने चार लाइफ लाइन्स है. आप उसको युज कर सकते हो.

राजन : सर. मैं ऑडियन्स पोल लेना चाहूंगा.

अमिताभ : श्रीमती टिकटिकीजी शांत हो जाईये. राजनजी ऑडियन्स पोल लेना चाहते है.

स्मिताजी, आपके स्टुडंट मेरे सामने बैठे है और वो २०,००० रुपये जीत गये है. एक प्रश्न पर आकर वो अड गये है. आपकी मदत मांग रहे है. वो आपको प्रश्न का उत्तर पूछेंगे. आपको ३० सेकन्डस मे उनको जबाब देना है.

राजन जी, आपका समय शुरू होता है अब.

राजन : मॅम, ‘डोक्यात प्रकाश पडणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे?

अ) लाईट लावणे

बी) डोक्यावर बल्ब लावणे

सी) लक्षात येणे

डी) सूर्याचा प्रकाश डोक्यावर पडणे

स्मिताजी : बेटा, मी वर्गात शिकवले तेव्हा ‘डोक्यात प्रकाश पडला’ नाही का रे तुझ्या? आम्ही एवढय़ा तळमळीने शिकवतो तुम्हाला वर्गात, लक्ष का नाही रे देत तुम्ही?

राजन : मॅम, लवकर सांगा नं?

अमिताभ : ओह! समय समाप्त. क्या करना चाहोगे आप राजनजी?

राजन : सर, मॅम के साथ बात करने से मुझे इस प्रश्न का जबाब मिल गया. सर, ‘सी- लक्षात येणे’ को लॉक कर दो सर.

अमिताभ : पक्का! कन्फर्म है आप?

राजन : जी सर. बिलकुल पक्का.

अमिताभ : कम्प्युटरजी ‘सी- लक्षात येणे’ को लॉक कर दिया जाये.

राजनजी.. हा। (दीर्घ श्वास घेऊन) अगर आप ‘लाईट लावणे’ जवाब देते तो.. गलत होता, अगर आप ‘डोक्यावर बल्ब लावणे’ कहते तो.. भी गलत होता.. मगर आपने जबाब दिया ‘सी- लक्षात येणे’ ये बिलकुल सही जवाब है। वेल प्लेड वेल डन! राजन जी. आप जीत गये ४०,००० रुपये. (थोडे थांबून) कैसे लग रहा हैं आपको.

राजन : सर. बहोत अच्छा लग रहा हैं.

अमिताभ : बहोत उमदा खेल रहे हो आप. कौन आया है आपके साथ यहां.

राजन : सर, मेरा भाई आया हैं.

अमिताभ : कहा बैठे हैं वो.

राजन : (वर्गातल्या एखाद्या मुलाकडे पाहून) सर, वो वहां बैठा है.

अमिताभ : नमस्कार. भाईसाहब. क्या नाम हैं आपका?

सुनिल : नमस्कार सर, मेरा नाम सुनिल हैं.

अमिताभ : सुनिलजी आपसे मिलकर बहोत खुशी हुवी.

सुनिल : सर, मुझे भी. आपको मिलने, आपके साथ बात करने का सौभाग्य हमे प्राप्त हुवा, ये हमारे लिये बडम्ी बात हैं सर.

अमिताभ : हमें भी बहोत खुशी हैं.

राजनजी, अगर आप यहांसे कुछ रुपये जीत के जाते है तो क्या करने वाले हो उन रुपयोंका.

राजन : सर, मुझे बहोत पढम्ना है. मेरे भाई को पढमना है. पढमई में खर्च करूंगा सर. पिताजी और माँ मजदूर हैं. उनके लिये कुछ करना चाहता हूं सर.

अमिताभ : बहोत नेक और अच्छे खयालात है आपके. हम कहते हैं की आप यहां से ढेर सारे रुपये लेके जाये और आप उंची पढमई में इन पैसों का यूज करे. राजन जी हमने सुना है की आप अच्छी तरह से गाते है.. कुछ सुनाइये.

राजन : हां सर, मुझे कविता गाने का शौक हैं. मैं मेरे ५वी की ‘नंदीबैल’ कविता सुनाता हूं.

(कविता पाठांतर – नंदीबैल कविता)

अशी संहिता वर्गाध्यापनात वापरली तर वार्षिक परीक्षेच्या आधीची तयारी मुलं या माध्यमातून करतील. स्नेहसंमेलनातही याचे सादरीकरण करता येते. एवढं सारं घडवून आणण्याची ताकद शिक्षकांनी पेलायला हवी. ५०-६० प्रश्नांची प्रश्नावली शिक्षकाने तयार केली तर सोपे जाते. आनंददायी, हसतखेळत शिक्षण नजरेसमोर घडते. मी जेव्हा वर्गात हा प्रयोग केला. हॉटसीटवर बसून उत्तरे देण्यासाठी माझ्यासमोर रांग लागली होती. हजरजवाबी, पटकन उत्तरे देणारी मुले निवडावीत. पण या उपक्रमाचा फायदा असा की उत्सुकतेच्या लाटेवर आरूढ असलेली सारीच मुले अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत सहभागी होतात.

Story img Loader