– सुहास बसणकर, दादर.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
– सुहास बसणकर, दादर.
गणेश विशेषांक आवडले
‘लोकप्रभा’ने दोन गणेश विशेषांक प्रसिद्ध करून वाचकांना, देशोदेशीच्या गणेशोत्सव सोहळ्याचे सचित्र दर्शन घडविले. विशेषत: अमेरिका, ह्य़ुस्टन, बोस्टन, फ्लोरिडा, कॅनडा, ऑस्ट्रेलिया अशा देशोदेशांतून लेखिकेकडून आलेले गणेशोत्सवाचे सोहळे वाचताना, आपणही त्यात सामील आहोत असा भास होत होता. नीलिमा कुलकर्णी यांचा ‘आम्ही चालवतो टिळकांचा वारसा’ हा लेख उल्लेखनीय वाटला. मी स्वत: अमेरिकेत डेट्राइट– टॉय या ठिकाणी १९८१ ते २००७ च्या दरम्यान जाऊन दोनदा तर येथून गणेशमूर्ती नेऊन मुलाकडे गणेशोत्सव साजरा केलेला आहे. देशोदेशीच्या गणेशोत्सवाचे फोटो पाहून एक आगळेवेगळे समाधान झाले. परदेशात राहूनही आपल्या परंपरा किती मनोभावे जपल्या आहेत, याची प्रचीती आली. इथे जेवढय़ा उत्साहाने, आनंदाने गणेशोत्सव साजरा होतो, त्याहूनही अधिक जोमाने परदेशात हा उत्सव साजरा करण्यात येतो. काही देशांत तर अमराठी भाषिकसुद्धा या जल्लोषात सामील होतात. तेव्हा देशोदेशीच्या गणेशोत्सव सोहळ्याचे सचित्र वर्णन प्रसिद्ध केल्याबद्दल धन्यवाद.
– जयवंत कोरगांवकर, परळ.
गणेशोत्सव विशेषांकाची मेजवानी
– प्रभाकर अमृतराव, नागपूर–२४.
आयुर्वेदाचा विचार करा
थोडे परखड शब्दात सांगायचे म्हटले तर हृदयावर उपचार करताना आधुनिक शैली बायपासपर्यंत नेऊन सोडते. लोक हल्ली अधिक चौकस बनल्याने काहीजण सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन घेताना दिसतात व अनेक व्याधींत त्या त्या विषयातील तज्ज्ञांकडून वेगवेगळे सल्ले पण दिले जातात व उपचार सौम्य व आवाक्यातील असल्याचे आढळते. खरे म्हणजे जर शास्त्र परिपूर्ण आहे, तर तज्ज्ञांमध्ये मतभिन्नता का? आणि मग कोणत्याही शस्त्रक्रियेपूर्वी नातेवाईकांकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र का घेतले जाते? किंवा प्रत्येक प्रिस्क्रिप्शनवर कोपऱ्यात फ७ का लिहिलेले असते? स्वत:चे निदान व उपचारांबाबत खात्री तर असायलाच हवी ना? जसे आर्किटेक्टचे डिझाइन व बिल्डरच्या कामाची गुणवत्ता याबद्दलही खात्री मागितली जातेच ना?
अनेकांच्या उदाहराणातून आयुर्वेद हा निश्चितच उत्तम उपाय व खात्रीशीर पर्याय आहे, हे मला व अनेकांना वाटत आहे. मात्र आयुर्वेदिक, काष्ठौषधी फारच महाग असतात, याचे कारण कदाचित गेली काही शतके आयुर्वेद उपचार पद्धतीची फारच हेळसांड व उपेक्षा झाली आहे, अन्यथा निसर्गाला अधिक जवळ असणारी, प्राचीन ज्ञानावर आधारित आयुर्वेदिक उपचार पद्धती अधिक लोकप्रिय होणे सोपे होईल! शिवाय आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड, त्यांची चूर्णे, भस्मे करणे हा अनेकजणांना एक उत्पन्नाचा स्रोत होऊ शकतो; यासाठी काही शासकीय योजनाही असतीलच! येथे कोणत्याही उपचारांचे उणे अधिक करणे, हा हेतू नसून जनतेच्या आरोग्याचा विषय अधिक डोळसपणे व नि:पक्षपातीपणे पाहिला जावा एवढाच आहे.
श्यामसुंदर गंधे, पुणे.
मला झाला उपयोग!
दि. ११–९–२०१५ च्या लोकप्रभामधील ‘चिलेशन थेरपी– एक भ्रम’ हा आपला लेख वाचण्यात आला. सर्वप्रथम सांगू इच्छितो chelation या ग्रीक शब्दास चिलेशन म्हणत नाहीत. याचा उच्चार ‘किलेशन’ असा आहे. (ke-lay-shun).
किलेशनची प्रॅक्टिस करणारे अनेक डॉक्टर्स एम.बी.बी.एस. आणि एम.डी. झालेले आहेत आणि तेही चांगल्या कॉलेजेसमधून. डॉ. रत्नपारखी यांनी तर त्यांना भोंदूबाबा करून टाकले. अनेक चौकांत आणि एस.टी. स्टॅण्डच्या बाहेर अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी, संबंधित रेटसहित, होर्डिग्ज लावलेली आढळतात. काय अशा जाहिराती लोकांची दिशाभूल करणाऱ्या नसतात? मुख्य म्हणजे बायपास स्टेंट वगैरे सगळे करून मला उपयोग झाला नाही, पण किलेशन थेरपीचा उपयोग मला स्वत:ला झाला.
– सु. य. मर्दे, पुणे.
खा, पण कामे करा
अलीकडेच काही मित्रांच्या आणि पाहुण्यांच्या सोबत गप्पागोष्टी करायचा प्रसंग आला. चर्चेमध्ये ज्या वेळी रस्त्याची दुरवस्था, अशुद्ध पाणी, रस्त्यावरील दिवे इ.बाबत चर्चा निघाली, त्या वेळी कामे तर होत नाहीत परंतु प्रचंड प्रमाणात पैसा मात्र हडप केला जातो, याबाबतीत सर्वाचे एकमत झाले.
मागच्या वर्षी मी साऊथ आफ्रिका आणि केनियाच्या दौऱ्यावर गेलो होतो. तेथील रस्ते मजबूत आणि चकचकीत होते. नळाचे पाणीदेखील पिण्यालायक होते. तसेच रस्त्यावरील दिव्यांचा व्यवस्थित झगमगाट होता. भ्रष्टाचाराबाबतीत तेथील मित्रांशी चर्चा झाली असता असे कळले की, भारतासारखा तेथेदेखील भ्रष्टाचार आहे, परंतु गुणवत्तेमध्ये कशातही तडजोड केली जात नाही. म्हणजेच २५ कोटी रु.च्या रस्त्याच्या कामासाठी भले ५० कोटी खर्च दाखविला जातो, परंतु काम मात्र उत्तम गुणवत्तेचेच केले जाते.
अनुभवावरून असे लक्षात येते की, आपल्या देशातील ग्राहक, मग तो कोणत्याही वर्गाचा असो, आवश्यकेतपेक्षा जादा पैसे देण्यास तयार आहे. जर सोयी आणि सुखसोयी या योग्य दर्जाच्या मिळाल्या तर तो होणाऱ्या भ्रष्टाचाराकडे कानाडोळा करण्यास तयार आहे. याबाबतीत काही उदाहरणे सांगता येतील–
’ शुद्ध पाण्याकरिता १५ रु. प्रति लिटरप्रमाणे बाटलीबंद पाणी सहजरीत्या विकत घेतले जाते.
’ रेस्टॉरंट अगर उपाहारगृह स्वच्छ आणि टापटीप असेल तर तो खाद्यपदार्थासाठी जास्त पैसे आनंदाने मोजतो.
’ चांगल्या प्रतीच्या थिएटरमध्ये सिनेमा पाहण्यासाठी प्रत्येकजण तिप्पट पैसे खर्च करण्यास सदैव तयार आहे.
४) सरकार, शासन, ग्रामपंचायत किंवा कोणतीही महामंडळे यांच्याकडून अपेक्षित असलेली कामे ते करीत नसल्यामुळे अनेक सेवाभावी संस्था स्वखर्चाने तसेच समाजाकडून पैसा गोळा करून ही कामे करीत आहेत.
या सगळ्यांचा मथितार्थ असा निघतो की, लोकांची धारणा अशी झाली आहे– ‘खा, पण कामे करा’. ही धारणा तत्त्वत: नक्की चुकीची आहे, परंतु ती सद्य:स्थिती आहे हे नक्की. याबाबतीत चिंतन, विचारमंथन करण्याची गरज आहे.
– अॅड. किशोर लुल्ला, सांगली.
पावसाबद्दलची मतं आवडली
– पंकज पाटील, पुणे.