मोबाइलच्या स्क्रीनवर दिसलेले ते गणपतीचे रूप विलोभनीयच होते.. कलावंताने साकारलेला तो गणपती अचंबित करणारा होता. मुळात गणपतीची मूर्ती, त्याचे रूप, चेहऱ्यावरील भाव अतिशय मोहक होते, पाहताच प्रेमात पडावे असे. चेहऱ्यावरचे भाव बरेचसे बालगणपतीप्रमाणे होते. गणपतीचे वस्त्र, त्याचा रंग, धोतराची किंवा पितांबराची ठेवण हे सारे काही नेहमीपेक्षा वेगळे आहे, हेही लक्षात येत होते. गणपतीच्या शेजारीच असलेली देवी तर भरजरी वस्त्र आणि दागिन्यांची प्रसन्नवदनाच होती. गणपती आणि देवी दोघांच्याही दागिन्यांवर तर पाहणाऱ्याची नजर खिळून राहात होती. एरवी इतर मूर्तीवर दागिनेही असेच मातीचे किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसचेच असतात आणि रंगकाम करून त्याला वेगळा उठाव देण्यात येतो. हे दागिने तसे नाहीत हे पाहताक्षणीच जाणवत होते. मग दागिने नेमके साकारलेयत तरी कसे, असाही प्रश्न मनात डोकावत होता. त्यावर हे सारे दाखवणाऱ्याने दिलेले उत्तर धक्कादायक होते. तो म्हणाला, हे सर्व दागिने चॉकलेट आणि कॅडबरीच्या सोनेरी आवरणाच्या कागदाने तयार केले आहेत. ‘बापरे, म्हणजे किती कागद लागले असतील?’ ‘फार नाही आठ- दहा कॅडबरीज..’ अरे, मूर्तीची उंची किती? त्यावरचे उत्तर होते- ..तिही फार नाही असेल फार तर आठ इंचाची!
सर्व मूर्ती अतिशय नाजूक आहेत. शिवाय त्या ऊन-पाऊस, वाऱ्यापासून जपाव्या लागतात, त्यामुळे त्या खणात ठेवतो, किरण सांगत होता. तो म्हणाला, ‘‘मूर्तीवर खूप मेहनत घेतो, त्यामुळे तिचे विसर्जन करत नाही. ती जपून ठेवतो. मूर्तीचे विसर्जन करणार नाही, असे सांगितले त्या वेळेस अनेक नातेवाईकांनी टीका केली. ते म्हणाले, फार वाईट होईल. त्या वेळेस त्यांना सांगितले की, जो सुखकर्ता आहे, तो वाईट का करेल कुणाचे? आता गेल्या १० वर्षांच्या मूर्ती आमच्याकडे व्यवस्थित सांभाळलेल्या आहेत.’’
बेस्टमधून निवृत्त झालेले वडील, गृहिणी असलेली आई विजया आणि सध्या एमबीए करणारा भाऊ चेतन असे हे छोटेखानी कुटुंब. किरणची आई म्हणाली, ‘‘बालवाडीत असल्यापासून त्याला गणपतीची विलक्षण आवड होती. गणपतीच्या कारखान्याबाहेर तासन्तास उभा राहायचा, सुरू असलेले मूर्तीकाम एकटक पाहायचा.’’ किरण म्हणतो, ‘‘घाटकोपरला पंतनगरला राहायचो तेव्हा बालवाडीत असताना गणेश मंडळाचा मिरवणुकीने नेला जाणारा गणपती पाहिला आणि त्या रूपाच्या प्रेमात पडलो. हा गणपती आहे हेही तेव्हा माहीत नव्हते. काही वेळेस तर शाळेतच गेलो नाही, पण शाळा सुटल्यानंतर मित्रांबरोबर घरी गेलो. एकदा आईच्या लक्षात आले की, मी गणपतीच्या कारखान्याबाहेरच उभा असतो. खूप मार खाल्ला, पण नंतर मग आईच पिठाचा गोळा देऊ लागली. पण त्याच्या केलेल्या गणपतीला दुसऱ्याच दिवशी बुरशी यायची.. मग आईनेच कारखान्याजवळ नेण्यास सुरुवात केली. एकदा तिथल्या कलाकारांनी आत नेले, हाती माती दिली तेव्हा प्रचंड आनंद झाला.’’
घरी गणपती असावा अशी किरणची खूप इच्छा होती. सातवीत असताना केलेली मूर्ती त्याला चांगलीच लक्षात आहे. तो म्हणतो, ‘‘ती पूजली जावी म्हणून आग्रह धरला तेव्हा सांगण्यात आले की, एकाच घरात दोन मूर्ती असू नयेत. पण श्रद्धा होती की, गणपती आपले काहीही वाईट करणार नाही. घरच्यांना वाटायचे की, मुलगा खेळ खेळतो आहे. पण माझ्यासाठी तो खराखुरा गणपतीच होता.’’
परिस्थितीला कलाटणी मिळाली ती, किरण १०वीत असताना. तेव्हा ते कुलाब्याला राहायला होते. त्याने सागरमंथनाच्या सोबत गणपतीची मिनिएचर मूर्ती साकारली. ‘कुलाब्याचा राजा’ गणेश मंडळातर्फे गणेश मूर्तीची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्यासाठी फोटो पाठवला. परीक्षकांनी त्याला पहिला क्रमांक दिला आणि तो जाहीर झाला त्या दिवशी सायंकाळी घरी कुलाब्यातील कोळी बांधवांची दर्शनासाठी रांग लागली. घरचेही भारावले, आईनेही मूर्तीचे विधीवत पूजन केले. त्यानंतर मात्र या घरच्या गणपतीला नवेद्यासह सर्व उपचार व्यवस्थित मिळू लागले. चंदनवाडी मंडळाचे कार्यकत्रे घरी पाहायला आले. ते म्हणाले, ‘‘मूर्ती सुंदर आहे, विसर्जन नका करू.’’ मग मूर्ती टिकवण्याचा निर्णय घेतला. गेल्या १२ वर्षांच्या अप्रतिम मूर्ती किरणच्या संग्रहात आहेत.
त्याच्या या आवडीला वळण मिळाले ते पुण्यामध्ये. दगडूशेठ हलवाई गणपतीतर्फे पुण्यामध्ये वेदाध्ययन करणाऱ्या पाठशाळेला निधीपुरवठा केला जातो. अशाच एका शाळेत सातवी ते नववी या काळात किरणने अध्ययन केले. त्यामुळे आता गणेशमूर्ती साकारताना तो ती शास्त्रोक्त पद्धतीने साकारतो. म्हणजेच या मूर्तीच्या आतमध्ये नियत ठिकाणी गणेशयंत्र, श्रीयंत्र, मूलाधार चक्र, गणेश यंत्र स्थापित केलेले असते. त्याचे विधिवत पूजन करून नंतरच किरण गणेशमूर्ती साकारण्यास सुरुवात करतो.
किरणने आयटी इंजिनीअिरग पूर्ण केले, बीडी सोमाणीमधून फॅशन डिझायिनगही केले. तिथे सहा वष्रे फॅशन डिझायिनगचे अध्यापनही केले. त्यानंतर अध्यात्माच्या क्षेत्रात काही करावे असे ठरवून त्याने नोकरी सोडली आणि त्याच वेळेस कलर्स मराठीवर महेश कोठारे निर्मित गणपतीबाप्पा मोरया या मालिकेच्या संशोधन लेखनासाठी त्याला पाचारण करण्यात आले. सध्या किरण त्यामध्ये गुंतलेला आहे. आता एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्याने हाती घेतला आहे, त्याला गणेश पुराण, मुद्गल पुराण यांवरून गणपतीवर एक मोठा समग्र ग्रंथ लिहायचा आहे. त्यासाठी त्याने गेल्या दसऱ्यालाच सुरुवातही केली आहे.
अलीकडे आता गणेशाच्या मोठय़ा अवाढव्य मूर्ती साकारल्या जातात, त्या पाश्र्वभूमीवर किरण म्हणतो, ‘‘खरे कौशल्य या मिनिएचर मूर्तीमध्येच पणाला लागते. मोठे नजरेत भरणारे असते असे म्हणतात. पण या मिनिएचर गणपतींचा अनुभव सांगतो की, लहान मूर्तीतील बारकावे नजर खिळवून ठेवतात. म्हणून तर म्हणतात, स्मॉल इज ब्युटिफूल!’’
response.lokprabha@expressindia.com