दागिन्यांमध्ये ब्रेसलेट, अंगठय़ा, चेन हे प्रकार आणि त्यातलं वैविध्य स्त्रियांना मनापासून आवडतं. सोन्याचा हव्यास धरायचा नसेल तर चांदी आणि इतर धातूंमध्ये या दागिन्यांचं हवं तेवढं वैविध्य आहे.

आपल्याकडे गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी अशी सणांची रांगच लागलेली असते. प्रत्येक सणावाराला आपण काही ना काही लहान-मोठी खरेदी करतच असतो. दागिन्यांची खरेदी हे दसऱ्याचं मुख्य आकर्षण असतं. सोन्याच्या दागिन्यांबरोबर हल्ली वेगवेगळे इतर धातूंचे दागिनेही विकत घेतले जातात. दागिने हा स्त्रियांच्या आवडीचा विषय. सणासुदीच्या काळात नवनवीन ट्रेण्ड्स, फॅशन यांमुळे बाजार फुललेला असतो. त्यामुळे गळ्यातलं, अंगठी, ब्रेसलेट यांचे नवनवीन प्रकार सतत बाजारात दिसून येतात.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

केवळ सोन्याचे दागिने खरेदी करण्याऐवजी हल्ली अनेक जण, चांदी, ऑक्सीडाइज दागिने, जर्मन सिल्व्हर, सेमी प्रेशियास स्टोन्स किंवा बोहेमियन दागिने खरेदी करताना दिसून येतात. केवळ सिल्व्हर ज्वेलरी तयार करणारे अनेक ब्रॅण्ड्स सध्या बाजारात आहेत. चांदीच्या दागिन्यांची निरनिराळी डिझाइन्स आपल्याला त्यामुळे मिळतात. मोहा बाय गीतांजली, क्वर्क स्मिथ, आत्मन ज्वेलरी, आद्या ज्वेलरी असे कितीतरी ब्रॅण्ड्स चांदीच्या दागिन्यांची वेगवेगळी रूपं बनवत आहेत.

ब्रेसलेट : हल्ली ब्रेसलेटमध्ये खूप वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. केवळ चेन ब्रेसलेटऐवजी हल्ली कडा ब्रेसलेट बाजारात उपलब्ध आहेत. जर्मन सिल्व्हर हा धातू सध्या दागिन्यांमध्ये खूप चलतीत आहे. मौल्यवान किंवा दुय्यम मौल्यवान हिरे, पाचू, पोवळे, माणिक, नीलम असे स्टोन्स वापरून जर्मन सिल्व्हरचे ब्रेसलेट उपलब्ध असतात. हल्ली बोहेमियन दागिन्यांचाही ट्रेण्ड प्रचलित आहे. पिसे, गोंडे, धागे, कापड, लहान मोठे दगड इत्यादी वापरून तयार केलेली ब्रेसलेट बाजारात उपलब्ध आहेत. याबरोबरीने भरपूर चेन्स असलेली, लेअिरग केलेली ब्रेसलेट हल्ली बाजारात उपलब्ध आहेत. तसेच खोटय़ा नैसर्गिक वस्तू म्हणजेच फुलं, पानं वापरून तयार केलेली ब्रेसलेटसुद्धा हल्ली बाजारात मिळतात. मोत्यांची ब्रेसलेट व त्याला लोंबकळणारे रंगीत गोंडे किंवा लोकर अशी ब्रेसलेटसुद्धा हल्ली ट्रेण्ड इन आहेत.

अंगठी : हल्ली बाजारात अगदी लहान आकारांपासून ते मोठय़ा आकारांपर्यंत अंगठय़ा उपलब्ध आहेत. हल्ली एकाच वेळी सगळ्या बोटांमध्ये अंगठय़ा घालण्याचा ट्रेण्ड आहे. त्यात काही अंगठय़ा या नेहमीच्या अंगठय़ांप्रमाणे घातल्या जातात, तर काही अंगठय़ा या बोटाच्या वरच्या भागात होतील इतक्याच मापाच्या असतात. या अंगठय़ा चांदी, जर्मन सिल्व्हर, तांबे या धातूंपासून बनविलेल्या असतात. त्यांवर एखादी ग्राफिटी, लहान लहान रंगीत खडे, लहान रंगीत दगड जडवलेले असतात. काही वेळा या अंगठय़ा नक्षीविरहित असतात. मोठय़ा अंगठय़ा या ओव्हर साइज असतात. फुलांचे आकार, पानांचे आकार, मोती, ओबडधोबड दगड इत्यादी या अंगठय़ांना जडवलेले असते. अशा अंगठय़ा सध्या ट्रेण्ड इन आहेत. वेगवेगळे भरपूर रंगीत खडे, दगड वापरून तयार केलेल्या अंगठय़ांना कॉकटेल िरग म्हणतात. त्यात प्रामुख्याने निळा, लाल, हिरवा, पिवळा असे रंग वापरले जातात. या कॉकटेल िरग्स आकाराने मोठय़ा आणि काहीशा ओबडधोबड दिसतात. पण व्यवस्थित आऊटफिटबरोबर टीम अप केल्या की खूपच क्लासी आणि एलिगंट दिसतात. या िरग्सना कोणताही विशिष्ट आकार नसतो. खूपच वेगळ्या, पण तरीही क्लासी अशा या िरग्स सध्या ट्रेण्ड इन आहेत. हल्ली बोहेमियन दागिने खूपच चलतीत आहेत. डिझायनर्ससुद्धा ट्रायबल किंवा बोहो दागिन्यांपासून प्रेरणा घेऊन नेहमीच्या कुंदन किंवा मोत्यांच्या दागिन्यांमध्ये बदल करीत आपली डिझाइन्स बनवत आहेत. त्यात अंगठय़ांचेही नाना प्रकार पाहायला मिळतात. भौमितिक आकारांचे डिझाइन असलेल्या अंगठय़ा, ट्रायबल मोटिफ्स असेलेल्या अंगठय़ा त्यात भाला, डमरू, वेगवेगळी फुलं, पानांचे विविध आकार, कमळ अशा प्रकारच्या अंगठय़ा डिझायनर्स बनवताना दिसून येतात. हल्ली केवळ कोणत्याही धातूची प्लेन अंगठी घालण्याचा ट्रेण्ड आहे. सोने, चांदी, जर्मन सिल्व्हर अशा धातूंच्या प्लेन अंगठय़ा तुम्ही वापरू शकता.

हातफुल : अंगठी आणि ब्रेसलेट एका चेनने जोडलेलं असतं, ते दोन्ही एकत्र हातात घातलं जातं. हल्ली हातफुल खूप ट्रेण्ड इन आहे. त्याला वेगवेगळ्या डिझाइन्सनी एकत्र जोडलेलं असतं. हातावर रुळणारी हातफुलांची वेगवेगळी डिझाइन्स आपल्याला पाहायला मिळतात. घुंगरू, मोती, खडे, गोंडे, रंगीत मणी यांचा डिझाइन्समध्ये पुरेपूर वापर होतो. आणि त्या डिझाइन्सला अनुसरून ब्रेसलेट व अंगठीची डिझाइन्स बनवलेली असतात. कधी हाताच्या एकाच बोटात तर कधी पाचही बोटांत हातफुलाच्या अंगठय़ा घातल्या जातात. काही वेळा िरगऐवजी बोटात घालायला लुप्स असतात. प्रत्येक डिझाइननुसार ते बदलतात.

चेन : चेन म्हटलं की ती सोन्याची अशी आपली समजूत आहे; पारंपरिक समजुतीला छेद देत हल्ली विविध धातूंच्या आणि डिझाइन्सच्या चेन्स डिझायनर बनवत आहेत. चांदी, जर्मन सिल्व्हर, तांबं, पितळ अशा धातूंच्या चेन्स हल्ली बाजारात बघायला मिळतात. धातूंमधील विविधतेबरोबरच हल्ली अनेक वेगवेगळी डिझाइन्स चेनमध्ये बघायला मिळतात. लांब चेन आणि ओव्हर साइज पेण्डण्ट सध्या खूप ट्रेण्ड इन आहे. एकच लहान हिरा किंवा रंगीत खडा आणि पातळ चेन ट्रेण्डमध्ये आहे. जर्मन सिल्व्हर या धातूपासून गळ्यालगत, सिंगल चेन किंवा अनेक चेन्सपासून बनलेलं गळ्यातलं, त्यातली वेगवेगळी डिझाइन्स बाजारात दिसून येतात. त्यामध्येही विविध खडय़ांचा, रंगीत दगडांचा, गोंडय़ांचा वापर होतो. हल्ली ग्राफिटी चेन्स खूप गाजतायत. स्वत:चं नाव किंवा आपला आवडता एखादा शब्द असलेलं पेण्डण्ट आणि त्याला असलेली पातळ तांबं किंवा पितळेची चेन तरुणाईचं आकर्षण ठरली आहे.

सणासुदीच्या दिवसांत सोन्याचे दागिने आपण नेहमीच वापरतो. या वेळी अंगठी, ब्रेसलेट, चेन यांची नवीन डिझाइन्स नक्की वापरून बघा. यातील बरीच डिझाइन्स ही युनिसेक्स आहेत. मुलं-मुली दोघांनाही आपल्या आवडीप्रमाणे डिझाइन्स निवडावी. सोन्यापेक्षा स्वस्त आणि तरीही स्टाईलिश असलेली ही डिझाइन्स तुम्हाला नक्कीच वाहवा मिळवून देतील.
प्राची परांजपे
response.lokprabha@expressindia.com

Story img Loader