बदलत्या जीवनशैलीचा अपरिहार्य भाग म्हणजे वाढतं हॉटेलिंग. त्यामुळे शेफचं करियर करण्यासाठी खूप वाव आहे. म्हणूनच या क्षेत्रात करियरच्या कोणकोणत्या संधी आहेत, ते समजून घ्यायला हवं.

प्रत्येक जण शिक्षणाच्या विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर करिअर करण्याचं क्षेत्र पक्कं करतो. त्यानुसार पावलं टाकली जातात. इतर आव्हानात्मक आणि क्रिएटिव्ह क्षेत्रांपैकीच एक म्हणजे किचनमधलं करिअर अर्थात शेफ करिअर. हे क्षेत्र वेगळ्या पद्धतीचं आहे. या क्षेत्रात काम करण्याचा छंद असेल किंवा आवड असेल; काहीही म्हणा; पण ती एक वेगळी क्रेझ आहे. ही क्रेझ जपत त्यात करिअर घडवता आलं पाहिजे. मनोरंजन क्षेत्राप्रमाणेच हे क्षेत्रही खूप ग्लॅमरस आहे.

Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
paneer makana tikki recipe
पनीरची नवी रेसिपी ट्राय करायचीय? अवघ्या काही मिनिटांत करा ‘पनीर मखाना टिक्की’
pune vada pav crime news
पुणे: गार वडापाव देताच डोके गरम झाले, ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण
Pune Burglary attempted, Sadashiv Peth Burglary,
पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !
loksatta satire article sujay vikhe patil
उलटा चष्म: पातेले कलंडलेच..
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी

काहींना वेगवेगळे पदार्थ बनवण्याची आवड असते, तर काहींना खाण्याची आवड असते. प्रत्येकाची आवडनिवड वेगवेगळी असू शकते. प्रत्येक घरात महिला विविध पाककृती बनवत असतात. त्या पदार्थाचा आस्वाद घेण्याचं काम घरातील इतर सदस्य करत असतात, पण आता हा प्रांत केवळ महिलांपुरता मर्यादित राहिला नाही; तर आता स्वयंपाकघराकडे पुरुषांचीही पावलं वळू लागली आहेत. त्यामुळे हे क्षेत्र सगळ्यांसाठीच करिअरचा उत्तम पर्याय म्हणून बनलं आहे. करिअर करताना निवडलेल्या क्षेत्रात आर्थिक स्थैय कितपत आहे याचाही विचार होत असतो. किचन करिअर या क्षेत्रात आर्थिक स्थैर्यही आहे. शिवाय या क्षेत्रातील नोकरीच्या संधी वाढत आहेत.

किचनमधील कोर्सेस करताना किंवा कॅटिरग कॉलेजमध्ये शिकताना यामध्ये वेगवेगळ्या शाखा आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. इंडिअन, कॉन्टिनेंटल, चायनीज, बेकरी, पेस्ट्री, चॉकलेट्स असे अनेक विषयांमध्ये याविषयीचं शिक्षण घेता येतं. त्यामुळे एखाद्याला विशिष्ट प्रकारच्या पदार्थामध्ये रस असेल तर त्याच्यासाठी हे सोयीचं आहे. प्रत्येकाने ज्याच्या-त्याच्या आवडीनुसार कोर्सेस निवडावे. इंडियन किचनमध्ये वेगवेगळ्या राज्यांतले पारंपरिक पदार्थ, ते करण्याची पद्धत हे सर्व शिकवले जातील. भारतीय खाद्यपदार्थाना परदेशात बरीच मागणी असते. भारतीय शेफनाही परदेशात नोकरीची संधी मिळाल्यामुळे त्यांना या क्षेत्रात करिअर करायला वाव आहे. कॉन्टिनेंटल फूडमध्ये युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांचे पारंपरिक फूड व पद्धत प्रेझेंट करण्याची स्टाइल शिकवली जाते. या शेफना भारतात त्या प्रकारचे जेवण बनविण्याची संधी वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये मिळते.

चायनीज फूड तर अख्ख्या जगात प्रचलित असल्यामुळे जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात या शेफना करिअर करायची संधी मिळते. बेकरी पेस्ट्री आणि चॉकलेट हे तर प्रत्येकाचे आवडते क्षेत्र. मग तो ऑफिसर असो किंवा इंजिनीअर असो किंवा बँक मॅनेजर असो; प्रत्येक वाढदिवसाला, फेस्टिव्हलला, समारंभप्रसंगी केक हा असलाच पाहिजे. या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केक्स, पेस्ट्रीज, डेझर्ट, तुमच्या आवडीप्रमाणे शेफ केक हे सर्व शिकवले जाते. मुलांपेक्षा मुलींचा हात बारीक डेकोरेशन करण्यास खूप स्थिर असतो, म्हणून मुलींचा कल या पेस्ट्री आणि किचनमध्ये जास्त आहे. या किचनचा फायदा मुलींना आयुष्यभर होत असतो. काही महिला घरातूनसुद्धा केक, डेझर्ट, चॉकलेट्स तयार करताना आढळतात. त्याचं कौतुकही होतं. या किचनचा अनुभव घेतल्यानंतर त्यांच्यापुढे बरेच मार्ग मोकळे होतात. त्यांना बिस्किट्स, चॉकलेट, आइस्क्रीम कंपनीमध्ये नोकरी मिळू शकते. हे तर किचनचे झाले, पण आता किचनमधून मॅनेजमेंटमध्येसुद्धा याचा उपयोग होतो.

फूड स्टायलिस्ट : आज आपण जेवढय़ा खाद्यपदार्थाच्या जाहिराती बघतो त्यामध्ये पदार्थाबरोबर त्याचे प्रेझेंटेशन व त्याची आकर्षक मांडणी खूप महत्त्वाची असते.

फूड समीक्षक : तुम्ही बघत असलेल्या प्रत्येक नियतकालिकामध्ये किंवा वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या पदार्थाच्या कृती येत असतात. त्या लिहिण्याची कला व त्यातून त्या कृतींचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे हीदेखील एक कलाच आहे.

फूड फोटोग्राफी : आज आपल्याला फोटोग्राफर तर बरेच पाहायला मिळतात. पण फूड फोटोग्राफी ही एक वेगळी कला आहे. जर आइसक्रीमचा फोटो काढायचा असेल तर फोटो काढताना स्टुडिओ लाइटमध्ये १५ सेकंदांत ते आइसक्रीम वितळायला सुरुवात होते. पण, जर त्या फोटोग्राफरने किचन कोर्स केला असेल तर तो परफेक्ट सांगू शकेल की या आइसक्रीमचा कसा फोटो काढायचा ते. यासाठी खाद्यपदार्थाचं नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे.

फूड न्यूट्रिशिअन : किचनच्या कोर्समध्ये कोणाला कुठच्या पद्धतीचे पदार्थ खाण्यास योग्य आहेत, हे शिकवलं जातं. हॉस्पिटलमध्ये आजारानुसार प्रत्येकाचे वेगवेगळे डाएट असल्यामुळे असं शिक्षण घेतलेल्यांची तिथे खूप गरज असते.

क्वालिटी कंट्रोल : प्रत्येक पदार्थ व त्याचा वापर याला खूप महत्त्व आहे. प्रत्येक पदार्थ व त्याचा वापर कसा करावा हेसुद्धा किचन कोर्सेसमध्ये शिकवले जातात. उकळलेले दूध व चिकन, मटण एकत्र ठेवल्यामुळे त्यावर काय काय परिणाम होतो. तसेच कोणते पदार्थ किती टेम्परेचरला स्टोअर करावे व किती टेम्परेचरला उकळावे की ज्यामुळे बॅक्टेरिआ वाढणार नाही. हे सर्व नियंत्रित करण्यासाठी क्वालिटी कंट्रोल हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

अनेकांना वाटत असते बेकरी पदार्थ घरी बनवता यावेत. फक्त केक्स पेस्ट्रीजचे कोर्सेससुद्धा कॉलेजमधून शिकवले जातात. बेकिंगचा कोर्स हा थोडा दिसायला सोपा असला तरी तो कठीण आहे. बेकिंगच्या अभ्यासक्रमात व कुकिंगच्या अभ्यासक्रमामध्ये मोठा फरक म्हणजे बेकिंग करताना एखादा पदार्थ तुम्ही टाकायला विसरलात किंवा राहिला तर पदार्थ दुरुस्त करता येत नाही. त्याउलट इतर प्रकारच्या कुकिंगमध्ये साधारणत: हे शक्य असतं. उदाहरणार्थ भाजी बनविताना मीठ जास्त किंवा कमी पडले तर नंतर पुन्हा घालून त्या पदार्थाला नीट करू शकता. पण केकच्या बाबतीत अशी दुरुस्ती करता येत नाही. केक डिझायनिंग आर्ट सध्या खूप प्रचलित आहे. कार्टून कॅरेक्टर्स व फोटो केक्सची फॅशन चालू आहे.

इथे शिकताना तुम्ही वेगवेगळ्या डिशेस बनवण्याचा प्रयत्न करू शकता, पण हेच कुकिंगचे तंत्र वापरून आपल्या पारंपरिक डिशेस सर्व लोकांपर्यंतही पोहोचवता आल्या पाहिजेत. प्रत्येक डिशसाठीचे मसाले तयार करता यायला पाहिजेत व त्यात आपली पारंपरिकताही असायला पाहिजे. आपल्या आजीने शिकवलेलं आईकडे आलं, आईने शिकवलेलं आपल्यात आलं आणि आपल्याकडून ते आपल्या पुढच्या पिढीने शिकायला पाहिजे.

आपल्याकडे फार पूर्वीपासून मसाले तयार केले जातात. फरक फक्त हाच की, पूर्वी सर्व मसाले घरी केले जात; तर आता तयार मसाले वापरले जातात. कारण आताच्या धावपळीच्या जीवनात नोकरी करणाऱ्या स्त्रीला मसाले घरी करणं शक्य नाही. म्हणूनच या सर्व क्षेत्रांत जाण्यासाठी आज सर्व तऱ्हेचे कोर्सेस शिकवले जातात. (रिझवी कॉलेज, दादर कॅटिरग कॉलेज, इंडियन इन्स्टिटय़ूट मॅनेजमेंट कॉलेज, ओशिवरा, कामत कॅटिरग कॉलेज, शिरोडकर कॅटिरग कॉलेज, विवेकानंद कॅटिरग कॉलेज, कोहिनूर कॅटरिंग कॉलेज, एस.व्ही.टी. कॉलेज, एसएनडीटी कॉलेज). काही कॉलेजमध्ये अकरावी, बारावीसुद्धा बेकरी कन्फेक्शनरी आणि कुकिंगचे कोर्सेस मुंबईच्या अभ्यासक्रमातूनसुद्धा शिकवले जातात. त्याचप्रमाणे काही गृहिणीसुद्धा घरातून बेकरी, कन्फेक्शनरी, मेक्सिकन, चायनीज, गुजराती, साउथ इंडिअन पदार्थ शिकवणारे लहान कोर्सेस घेतात. रिअ‍ॅलिटी शोसुद्धा कुकिंग बेकिंगमुळे प्रचलित झालेत. सर्व वयांतील गृहिणीसुद्धा त्यात भाग घेऊन स्वत:ची कला दाखवू शकतात. हे करिअर कठीण आहे. पण, आवड असेल तर याच्यासारखे कुठलेच ग्लॅमरस करिअर नाही.
विवेक ताम्हाणे – response.lokprabha@expressindia.com