कलांकडे आपण सृजनात्मक आनंद मिळवण्याचं माध्यम म्हणून बघत असलो तरी आता कला त्यापलीकडे जाऊन विविध प्रकारच्या उपचार पद्धतींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावायला लागल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नृत्य, संगीत, नाटय़, चित्रकला, काव्य इत्यादी सर्व कला मनोरंजन क्षेत्राचा अविभाज्य भाग आहेतच आणि मनोरंजन क्षेत्रातील सर्वच माध्यमांतील कार्यक्रमांमध्ये या कलांवर आधारित विविध कलाकृती आपण कायमच बघत असतो. परंतु या सर्व कलांमध्ये अनोखी ताकद आहे ती- उपचार पद्धतींमध्ये त्यांचा योग्य वापर करण्याची!  मानसिक, शारीरिक, भावनिक, सामाजिक अशा अनेक समस्यांसाठी आपण अनेकविध उपचार पद्धतींचा उपयोग करत असतो. वैद्यानिक, शास्त्रीय, वैद्यकीय उपचार पद्धतींप्रमाणेच आजकाल ‘कलोपचार’ पद्धतीचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललंय. या क्षेत्रातील प्रयोग, संशोधन मोठय़ा प्रमाणात जागतिक पातळीवर घडत आहे आणि त्यामुळे संशोधनावर आधारित असलेल्या अशा कल्पक, कलेवर आधारित उपचार पद्धतींमधील करिअरच्या संधीदेखील दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातीलच नृत्य, संगीत आणि नाटय़ उपचार पद्धतींचा आढावा आज आपण या लेखामध्ये घेणार आहोत.

कलाकाराला कला सादर करताना मिळणारा आत्मिक आनंद आणि रसिकाला कलाकृती बघताना मिळणारा रसास्वाद, तल्लीन होऊन कलाकृती बघण्याचा आनंद हा कलेचा आविष्कार आपण अनेक युगांपासून बघत, करत, अनुभवत आलो आहोत. परंतु अगदी प्राचीन काळापासून कलेच्या उगमाचा विचार करायचा झाला तर, कलेचा उगम मनोरंजनाच्या आधी ‘व्यक्त होण्याचं माध्यम’ म्हणून झाला. शब्दांच्या पलीकडे जाऊन व्यक्त होण्याची ताकद कलेमध्ये आहे आणि नेमका याच गोष्टीचा वापर कलोपचार पद्धतींमध्ये केला जातो. कधीकधी भावना, विचार शब्दांत मांडणं अवघड जातं; अशा वेळी कलेच्या माध्यमातून, विविध रूपकांचा वापर करून ती गोष्ट व्यक्त करता येते! उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णाच्या, व्यक्तीच्या समस्येप्रमाणे कला पद्धतीच्या विविध प्रकारांचा, खेळांचा वापर केला जातो. कलोपचारासाठी केवळ काही विशिष्ट समस्या असणाऱ्या व्यक्तींनाच लाभ होतो असं नाही; तर जीवन, नातेसंबंध अधिक समृद्ध, सक्षम करण्यासाठी कुणीही या उपचार पद्धतीचा लाभ घेऊ शकतं. वैयक्तिक पातळीवर उपचाराची सत्रं होतात, त्याचबरोबर ‘ग्रुप थेरपी’ म्हणजेच सामूहिक स्तरावरसुद्धा कलोपचार पद्धतींचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. मानसोपचारतज्ज्ञ किंवा मानसशास्त्रज्ञांकडे उपचारांकरिता जाण्यासाठी अजूनही भारतामध्ये बऱ्याच प्रमाणात गरसमज आणि पूर्वग्रह आहेत. पण कलेच्या सत्रासाठी यायला अशा व्यक्तींची हरकत नसते. त्यामुळे उपचाराची गरज असलेल्या व्यक्तींना आकर्षति करून घेण्याची क्षमतासुद्धा कलोपचारामध्ये आहे, असं विधान करता येऊ शकेल. बरेचदा हलक्याफुलक्या प्रकारामधून उपचार केले जाऊ शकतात, याची प्रचीती कला उपचार सत्रामध्ये येते!!  कला उपचार पद्धतींचा वापर शारीरिक, मानसिक तणाव हलका करायला; एकाग्रता, स्मरणशक्ती वाढवायला, स्वत:मधील सुप्त गुणांची ओळख करून घ्यायला, मनातील भावना, विचार व्यक्त करायला; मनातील वाईट, त्रासदायक विचार कमी करायला, नातेसंबंध सुदृढ करायला, टीम बििल्डग (सांघिक भावना वाढवायला) इ. अनेक कारणांसाठी केला जातो. शाळा, महाविद्यालये, व्यावसायिक कंपन्या, हॉस्पिटल, खासगी उपचार केंद्र, पुनर्वसन केंद्र अशा विविध ठिकाणी या उपचार पद्धतींचा गरजेप्रमाणे वापर केला जाऊ शकतो. या उपचार पद्धतींचे शिक्षण घ्यायला मानसशात्राच्या शिक्षणाची जोड असेल व कलेमध्ये रुची, शिक्षण असेल तर निश्चितच जास्त फायदा होतो. भारतामध्ये मात्र मानसशास्त्राच्या पदवीशिवायदेखील या कलाउपचारांचे प्रशिक्षण घेण्यास अनेक ठिकाणी परवानगी आहे.

नृत्योपचारामध्ये (डान्स आणि मूव्हमेंट थेरपी) ‘मन आणि शरीर यामध्ये निकटचा संबंध असतो’ या तत्त्वाचा, उपचार पद्धतीचा पाया म्हणून वापर केला जातो. मानसशास्त्र, योग, विविध नृत्यशैली, विविध कलाप्रकार इत्यादी अनेक क्षेत्रांचा सुंदर मिलाफ नृत्योपचारामध्ये बघायला मिळतो. सत्रामध्ये कधीकधी संगीताचासुद्धा वापर केला जातो. संगीत आणि नृत्य या दोन अविभाज्य गोष्टी आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गाणं चालू झालं की आपोआपच हातपाय त्यावर थिरकायला सुरुवात होते, परंतु नृत्योपचारात गाण्यांपेक्षा केवळ वाद्यांचा वापर केलेले संगीत मुख्यत्वे वापरले जाते, कारण विविध गाण्यांशी नृत्याच्या काही ठरावीक हालचालीच (स्टेप्स) केल्या जातात. मात्र नृत्योपचारामध्ये केवळ गाण्यावर नृत्य करणं अभिप्रेत नसतं, तर संगीताचा वापर सहभागी व्यक्तींच्या अंगभूत हालचाली उद्युक्त करण्यासाठी केला जातो. नृत्योपचारामध्ये नृत्य शिकवणे किंवा रंगमंचावर सादर करणे हे प्रमुख उद्दिष्ट नसते; तर शारीरिक हालचालींद्वारे शरीर व मनाचा कसा समतोल साधला जाऊ शकतो आणि त्यामुळे कसा शारीरिक, मानसिक फायदा होऊ शकतो यावर अधिक भर दिला जातो. नृत्योपचारामध्ये अनेकदा विविध प्रोप्स /साहित्य सामग्रीचासुद्धा अचूक वापर केला जातो. रिबिन्स, फुगे, वर्तमानपत्र, ओढण्या, इत्यादी अनेक वस्तूंचा लहान मुलांबरोबर काम करताना, त्यांची रुची वाढवण्यासाठी तसेच त्यांच्या हालचालींना एक प्रकारची सहजता आणण्यासाठी वापर केला जातो. भारतामध्ये नृत्य उपचार पद्धतीचे प्रशिक्षण खालील ठिकाणी मिळते, त्याबरोबरच त्याच्या संकेत स्थळांची माहिती दिली आहे.

  • ‘पुणे, दिल्ली, बंगलोर’ येथे क्रिएटिव्ह मूव्हमेंट थेरपी असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेमार्फत प्रशिक्षण घेता येऊ शकते. अधिक माहिती त्यांच्या http://cmtai.org/ या संकेतस्थळावर मिळू शकते.
  • ‘मुंबई’मध्ये टीआयएसएस (टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स) या शैक्षणिक संस्थेत नृत्य उपचार पद्धतीमध्ये प्रशिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमाची अधिक माहिती त्यांच्या http://admissions.tiss. edu/view/10/admissions/stp-admissions/diploma-in-dance-movement-therapy या संकेतस्थळावर मिळू शकेल.
  • पुण्यामध्ये सिम्बायोसिस स्कूल ऑफ लिबरल आर्ट्समध्ये नृत्योपचार या विषयाला समाविष्ट केले आहे. https://www.ssla.edu.in/ academics इथे याबद्दलची अधिक माहिती प्राप्त करता येऊ शकते.
  • कलकत्तामध्ये ‘कोलकता संवेद’ ही संस्था प्रशिक्षण देते. अधिक माहिती त्यांच्या ‘http://www. kolkatasanved.org/’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

त्याचबरोबर विविध खासगी संस्था, उपचार केंद्रे विविध कार्यशाळांचे आयोजन करून नृत्योपचार पद्धतीचे प्रशिक्षण देत असतात. नृत्य आणि मानसशास्त्राची आवड आणि अभ्यास असेल, तर ‘नृत्योपचारतज्ज्ञ’ हा पर्याय म्हणून बघायला हरकत नाही!!

नृत्याप्रमाणेच ‘नाटय़’ या कलाप्रकाराचादेखील एक सक्षम उपचार पद्धत म्हणून वापर केला जातो. ‘ड्रामा थेरपी’ असं त्याला संबोधलं जातं. नाटय़शास्त्रातील निरनिराळ्या पद्धतींचा उपयोग हा समस्यानिवारण करणे, भावना व्यक्त करणे, आत्मविश्वास वाढवणे अशा विविध कारणांसाठी केला जातो. ड्रामा आणि आर्ट बेस्ड थेरपिस्ट स्वराली मराठेच्या मते, ‘‘ड्रामाथेरपी शैक्षणिक, मानसिक आणि भावनिक समस्यांचा गुंता सोडवण्यासाठी लहान मुलांबरोवर तसेच प्रौढांबरोबर उपयुक्त ठरते. कथाकथन म्हणजेच स्टोरीटेिलग, संगीत, रोल प्ले, कलाविस्तार (इम्प्रोव्हायझेशन), कविता, पपेटरी (कळसूत्री बाहुल्या), मुखवटे अशा विविध पद्धतींचा वापर ड्रामा थेरपिस्ट करतात. विविध प्रतिमा, रूपके (मेटाफर), अलंकार अशा विविध माध्यमांचा वापर करून नव्या दृष्टिकोनातून आपले आयुष्य पाहण्याची संधी मिळते.. आपल्या आठवणी, अडचणी यांना नाटय़, गोष्ट अथवा कविता रूपात मांडताना आपण त्यांच्याकडे एका नव्या पद्धतीने बघायला शिकतो आणि इम्प्रोव्हायझेशन मुळे अडचणींवर नवे उपाय शोधायची, भावना व्यक्त करायची संधी मिळते. नाटय़ उपचार पद्धतीचा उपयोग करण्यासाठी त्याच्याशी निगडित शिक्षण घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ड्रामा थेरपी शिकण्यासाठी मानसशास्त्राचा अभ्यास असणे उपयुक्त ठरेल. जडणघडणीचे टप्पे, मानसिक आजार, मानवी वर्तनाचा अभ्यास असणे अत्यंत महत्वाचे आहे.’’ भारतात अनेक ठिकाणी ड्रामा थेरपीचे कोस्रेस उपलब्ध आहेत. तुम्ही आर्टस् बेस्ड थेरपीचा कोर्ससुद्धा करू शकता ज्यामध्ये ड्रामा थेरपीबद्दल शिकवले जाते. काही ठिकाणी फक्त ड्रामा थेरपीचे कोस्रेससुद्धा उपलब्ध आहेत. खालील संकेतस्थळावर विविध संस्थेच्या नाटय़ आणि कलोपचार अभ्यासक्रमांची अधिक माहिती मिळवता येऊ शकते.

  • वर्ल्ड सेन्टर फॉर क्रीयेटिव्ह लìनग, पुणे- http://www.HYPERLINK http://www.wcclf.org/,
  • wcclf.org
  • प्रिझम फाऊंडेशन, पुणे- http://www.prism-foundation.in
  • स्नेहधारा फाऊंडेशन, बंगलोर- http://prajnadhara.snehadhara.org
  • कथाकार ट्रस्ट, दिल्ली-  kathakaartrust@gmail.com
  • अनंतरा, मुंबई- http://anantaraa.org
  • द्रिती, गुवाहाटी- manjuribharali@gmail.com
  • आलय, उत्तराखंड- https://goo.gl/hspKVh

संगीताचासुद्धा विविध उपचारांसाठी मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. केवळ संगीत ऐकल्यानेसुद्धा मनावर चांगला परिणाम होतो याचा आपण अनेकदा दैनंदिन आयुष्यात अनुभव घेत असतो. मूड चांगला करायला, मनावरचा तणाव दूर करायला, चांगली झोप लागण्यासाठीसुद्धा संगीताचा आपण अनेकदा वापर करतो. व्यायाम, नृत्य करतानादेखील संगीत आपल्याला पुष्टी आणि प्रोत्साहन देतं. विविध वेळेच्या संगीतामधील विविध रागांचा आपल्या मेंदूवर, मनावर विशिष्ट परिणाम घडत असतो. संगीत उपचारांमध्ये प्रामुख्याने दोन प्रकार आढळून येतात. रिसेप्टिव्ह (स्वीकारण्याची) प्रकारामध्ये संगीत ऐकल्याने विशिष्ट उपचार हेतू साधता येतो तर अ‍ॅक्टिव्ह (सक्रिय) प्रकारामध्ये सभासद संगीत, ठेका, गाणे बनवण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतात. वाद्य वाजवणे, गाणं गाणे अशा सक्रिय संगीत प्रकारात सहभागी झाल्याने मेंदूला चालना मिळते, आवाजाच्या चढउतारांमुळे आवाजावरील उपचार होतात, वाद्य वाजवताना हातांच्या हालचाली ठरावीक पद्धतीने केल्याने हालचालीतील संतुलन वाढते, एकाग्रता, स्मरणशक्ती वाढण्यासदेखील मदत होते. सांघिक भावना वाढण्यास, प्रोत्साहन मिळण्याससुद्धा संगीतोपचाराचा खूप फायदा होतो. संगीत उपचारांमध्ये प्रशिक्षण देणाऱ्या काही संस्था व त्यांची संकेतस्थळ यांची माहिती खाली दिली आहे.

  • सूर संजीवन म्युझिक थेरपी ट्रस्ट, विलेपाल्रे (मुंबई)- http://sursanjeevan.com
  • एमइटी इन्स्टिटय़ूट ऑफ अल्टरनेटीव्ह करिअर्स, मुंबई http://www.met.edu/Institutes/IAC/prg.asp
  • चेन्नई स्कूल ऑफ म्युसिक थेरपी, चेन्नई- http://www. chennaimusictherapy.org
  • म्युझिक थेरपी ट्रस्ट, दिल्ली- http://themusictherapytrust.com
  • कलावर्धन अकादमी, मध्यप्रदेश- http://www.indiasfirst.com
  • इंडिअन इन्स्टिटय़ूट ऑफ म्युझिक थेरपी, दिल्ली (ही संस्था ऑनलाइन कोर्ससुद्धा चालवते)- http://iamt.net.in/course.php

भारतामध्ये अजूनही या कलेवर आधारित उपचार पद्धतींचा प्रचार आणि विकास होत आहे, त्याबरोबर येणाऱ्या करिअरच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत. भविष्यात नक्कीच या पद्धतींचा मोठय़ा प्रमाणात जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त वापर होणार आहे, असे भाकीत अनेक तज्ज्ञ करत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला काहीतरी वेगळं, कल्पक, कलात्मक आणि आनंददायी करिअर करायचे असेल तर या कलाउपचारांच्या करिअरचा विचार नक्कीच करू शकता!!

ध्वनी आणि वाचा उपचारांतील करिअर!

बोलणं आणि ऐकणं या माणसाच्या आयुष्यातल्या दोन अत्यंत महत्त्वाच्या कृती. त्यांच्याबाबत काही कमतरता असेल तर ध्वनी आणि वाचा तज्ज्ञांकडे जावं लागतं. या क्षेत्रातील तज्ज्ञता हा करिअरचा वेगळा मार्ग ठरू शकतो.

मानवाच्या उत्क्रांतीमधील आणि विकासामधील एक महत्त्वाचा घटक म्हणजे – ‘वाचा’ (बोलणे) अगदी लहान वयात शिकवल्या जाणाऱ्या अत्यावश्यक गोष्टींपैकी एक म्हणजे ‘बोलणे’. ध्वनी व वाचेचा विकास योग्य वयांत टप्प्याटप्प्यांनी होण्याला फार महत्त्व आहे. कारण मानवी संभाषणांसाठी आपण सर्वाधिक अवलंबून आपल्या ‘वाचेवरच’ असतो!  संभाषण हे मानवी जीवनाचा, विचार, भावनांच्या देवाणघेवाणीचे प्रभावी आणि मुख्य माध्यम आहे. आवाज व भाषेच्या समस्यांवरील उपचार ‘ध्वनी व वाचा उपचार तज्ज्ञ’ करतात. या क्षेत्राबद्दल आणि त्यातील करिअर बद्दल आज आपण थोडं जाणून घेणार आहोत.

विज्ञान शाखेतून बारावीनंतर अनेक वेगवेगळे मार्ग खुणावू लागतात. मेडिकल आणि इंजिनीयरिंग हे त्यातील सर्वाधिक मान्यता असलेले मार्ग. इंजिनीयरिंगच्या ‘सीईटी’ परीक्षेप्रमाणे सरकारच्या नवीन नियमानुसार मेडिकल(वैद्यकीय) शाखेतील शिक्षणासाठी ‘नीट’ ही प्रवेश परीक्षा देणं आता बंधनकारक आहे. त्याशिवाय विविध खासगी महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या विविध प्रवेश परीक्षा असतात बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी अ‍ॅण्ड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी (BASLP) या अभ्यासक्रमाचा कालावधी बारावीनंतर चार वर्षांचा असतो, तीन वर्षांच्या अभ्यासक्रमानंतर एक वर्षांची इंटर्नशिप करावी लागते. पदव्युत्तर शिक्षणासाठी मास्टर्स ऑफ ऑडिओलॉजी अ‍ॅण्ड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी (MASLP) किंवा पीएचडी करता येऊ  शकते. एमएएसएलपी हा दोन वर्षांचा कोर्स असतो. पूर्वी ही पदवी बीएससी एचएलएस किंवा एएसआर नावाने ओळखली जात असे. पदव्युत्तर शिक्षण ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज मध्ये एकत्रित घेता येऊ  शकतं किंवा वेगवेगळ्या विषयात स्पेशलायझेशन करता येऊ  शकतं. महाविद्यालये आणि विद्यपीठानुरूप यात बदल होतात. ध्वनी व वाचा उपचारतज्ज्ञ पूर्वा करंदीकर या बद्दल माहिती देताना सांगतात की, ‘ध्वनी विशेषतज्ज्ञ, ध्वनी व ऐकण्याच्या क्षमतेचे मोजमाप, परीक्षा करू शकतात व ऐकण्याच्या यंत्रासाठी आवश्यक असलेली तपासणी उपचार करतात. ऐकण्याची समस्या असलेल्यांसाठी मुख्यत्वे ध्वनी विशेषज्ञ काम करतात तर वाचा व भाषा विशेषज्ञ ज्यांना बोलण्यामध्ये समस्या आहे अशा रुग्णांसाठी मुख्यत्वे उपचार देतात. वाचा व भाषेची समस्या अनेकविध आजारांमध्ये आढळून येते. लहान मुलांमध्ये भाषा व वाचा विकासाशी निगडित असलेल्या ‘स्वमग्नता, मतिमंदता, अतिचंचलता, डाऊन सिंड्रोम, सेलेब्रल पॉल्सी, अशा आजारांमध्ये भाषा आणि वाचा उपचार घेणे फायद्याचे ठरते. बोबडेपणा, जीभ जड असणे. अस्पष्ट उच्चार, काही शब्द/अक्षर बोलायला जड जाणं, बोलताना सारखे अडखळणे अशा अनेक वाचेच्या संबंधित समस्यांसाठी वाचा उपचार तज्ज्ञांचे मार्गदर्शन मोलाचे ठरते. प्रामुख्याने लहान वयात अशी कुठली अडचण असेल, तर त्याकडे दुर्लक्ष ना करता वेळेवर त्यावर उपचार घेणे महत्त्वाचे असते, कारण वाचेशी निगडित समस्या असलेल्या मुलांची कधी कधी शाळेत मस्करी केली जाते, टिंगल उडवली जाते ज्यामुळे मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ  शकतो मेंदूच्या विकासाशी निगडित असलेल्या अनेक आजारांच्या प्रत्यक्ष संबंध भाषेशी, वाचेशी असतो व त्यामुळे मेंदूच्या विकारांच्या रुग्णांनादेखील वाचा उपचार घेणे आवश्यक असते.

प्रौढांमध्येसुद्धा मेंदूशी आजार निगडित व्यक्तींमध्ये भाषा, वाचा, ध्वनी या समस्या दिसून येतात. अर्धागवायू, कंपवात, ब्रेन हॅमरेज, ब्रेन टय़ुमर अशा अनेक आजारामध्ये आवाजावर, भाषेवर परिणाम झालेला दिसतो. आवाजातील बदलामुळे या व्यक्ती हळू , अस्पष्ट, अडखळत बोलताना दिसतात. समोरील व्यक्तीला आपण बोललेलं कळत नाही, यामुळे बोलणे टाळतात, चिडचिड करतात, आत्मविश्वाास कमी होतो. संभाषणातील अडथळ्यांवर मात करण्याचे स्पीच थेरपिस्ट उपाय सुचवतात. ऐकण्याच्या समस्येसाठीसुद्धा ध्वनी उपचारतज्ज्ञांकडे जाणे आवश्यक असते.

ध्वनी व वाचा उपचारतजच्ज्ञ इस्पितळे, पुनर्वसन केंद्रप, खासाी उपचार केंद्रात, शाळा महाविद्यालयात काम करू शकतात. रिहॅबिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया (RCI) चे प्रमाणपत्र व परवाना असल्यास, स्पीच थेरपिस्ट स्वत:चे खासगी उपचार केंद्र चालू करू शकतात. शिवाय रुग्णांच्या घरी जाऊन उपचार देऊ  शकतात.

ध्वनी व वाचा उपचाराचे अभ्यासक्रम असणाऱ्या संस्थाखाली दिल्या आहेत

  • नायर हॉस्पिटल, मुंबई
  • अली यावर जंग नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ स्पीच अ‍ॅण्ड हिअरिंग डिसॅबिलिटीज (दिव्यांगजन)
  • भारती विद्यापीठ, पुणे</li>
  • ऑल इंडिया इन्स्टिटय़ुट ऑफ स्पीच आणि हिअरिंग (AIISH).
  • मणिपाल विद्यपीठ , मणिपाल, कर्नाटक
  • डॉ. एस.आर. चंद्रशेखर इन्स्टिटय़ुट ऑफ स्पीच अ‍ॅण्ड हिअरिंग (SRC), चेन्नई.

विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ध्वनी व वाचा तज्ज्ञ हा नक्कीच एक वेगळा, चांगला व आशावादी करिअर पर्याय ठरू शकतो.
तेजाली कुंटे – response.lokprabha@expressindia.com