मोबाइलपासून सिटीपर्यंत सगळंच स्मार्ट असण्याच्या आजच्या काळात करिअरचा विचार करतानाही स्मार्ट पर्यायांचा विचार करणं अपरिहार्य होऊन बसतं. म्हणूनच या स्मार्ट अभ्यासक्रमांची माहिती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गेल्या काही वर्षांत देशातील काही नामवंत संस्थांनी वेगळे व नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू केले आहेत. वेगळ्या वाटेने जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या पर्यायांचा विचार करण्यास हरकत नसावी.
नर्सी मोन्जी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज युनिव्हर्सिटी
(१) या संस्थेच्या मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अॅण्ड इंजिनीअिरग या संस्थेत २०१७ च्या शैक्षणिक वर्षांपासून वतीने बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन डाटा सायन्स हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. अर्हता- १२वी विज्ञान शाखा, भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र या विषयासह उत्तीर्ण
(२) या संस्थेने मुंबई कॅम्पस येथे १०वी नंतरचे सहा वष्रे कालावधीचे पुढील अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू केले आहेत- बी. टेक इन कॉम्प्युटर इंजिनीअिरग, बी. टेक इन सिव्हिल इंजिनीअिरग, बी. टेक इन इलेक्ट्रानिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअिरग, बी. टेक इन मेकॅनिकल इंजिनीअिरग. अर्ज करण्याची शेवटची तारीख- ७ जून २०१७
(३) या संस्थेच्या फार्मसी म्हणजेच औषधी निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला एमबीएची जोड देण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम एमबीए इन फार्मास्युटिकल टेक्नालॉजी यानावे ओळखला जातो. या इन्टिग्रेटेड अभ्यासक्रमाचा कालावधी पाच वष्रे आहे. हा अभ्यासक्रम संस्थेच्या मुंबईस्थित स्कूल ऑफ फार्मसी एॅण्ड टेक्नालॉजी मॅनेजमेंट आणि शिरपूर (जिल्हा धुळे) येथे चालविला जातो.
(४) संस्थेच्या मुंबई कॅम्पसमध्ये इन्टिग्रेटेड एमबीए इन टेक्नालॉजी या अभ्यासक्रमांतर्गत एमबीए इन टेक्नालॉजी इन इन्फम्रेशन टेक्नालॉजी, एमबीए इन टेक्नालॉजी इन सिव्हिल इंजिनीअिरग, एमबीए इन टेक्नालॉजी इन केमिकल इंजिनीअिरग, एमबीए इन टेक्नालॉजी इन मेकॅनिकल इंजिनीअिरग आणि एमबीए इन टेक्नालॉजी इन इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअिरग या विषयांचा समावेश आहे.
(५) संस्थेच्या शिरपूर कॅम्पसमध्ये एमबीए इन टेक्नालॉजी इन इन्फर्मेशन टेक्नालॉजी, एमबीए इन टेक्नालॉजी इन सिव्हिल इंजिनीअिरग एमबीए इन टेक्नालॉजी इन मेकॅनिकल इंजिनीअिरग, एमबीए इन टेक्नालॉजी इन कॉम्प्युटर इंजिनीअिरग आणि एमबीए इन इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअिरग, हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
(६) संस्थेच्या मुंबई कॅम्पसमध्ये बी. टेक इन मेकॅट्रॉनिक्स हा अभ्यसाक्रम करता येतो.
नर्सी मोंजी अॅप्टिटय़ूड टेस्ट
या संस्थेतील इन्टिग्रेटेड एमबीए इन टेक्नालॉजी या अभ्यासक्रमांसाठी मुंबई कॅम्पसमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना १२ वी विज्ञान परीक्षेत केमेस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये सरासरीने किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. शिरपूर कॅम्पसमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना १२ वी विज्ञान परीक्षेत फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये सरासरीने किमान ४५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.
या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नर्सी मोंजी अॅप्टिटय़ूड टेस्ट घेतली जाते. ही ऑनलाइन टेस्ट आहे. या ऑनलाइन टेस्टसाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, शिरपूर, नाशिक आणि नागपूर ही केंद्रे आहेत. २०१७ च्या शैक्षणिक वर्षांसाठी ही चाळणी परीक्षा १४ व १५ मे २०१७ रोजी घेतली जाणार आहे. यासाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०१७ आहे.
पत्ता : नर्सी मोंजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज, व्ही. एल. मेहता रोड, विलेपाल्रे(प) मुंबई – ४०००५६
संकेतस्थळ http://www.nmims.edu वर ऑनलाइन टेस्टसाठी रजिस्ट्रेशन करता येते.
दूरध्वनी – ०२२-४२३३२०००, ईमेल- enquiry@nmims.edu
मोदी युनिव्हर्सटिी ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी-
(१) बी. टेक इन कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअिरग वुईथ स्पेशलायझेशन इन बिग डाटा अॅनॅलिटिक
(२) बीटेक अॅण्ड इन इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअिरग वुईथ स्पेशलायझेशन इन इंटरनेट ऑफ िथग्ज
(३) इंटिग्रेटेड बीटेक अॅण्ड एमटेक इन कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअिरग,
(४) इंटिग्रेटेड बीटेक अॅण्ड एमटेक इन इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअिरग,
(५) इंटिग्रेटेड बीटेक अॅण्ड एमबीए इन कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअिरग,
(४) इंटिग्रेटेड बीटेक अॅण्ड एमटेक इन इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअिरग
पत्ता : मोदी युनिव्हर्सटिी ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी, एन एच- ११, लक्ष्मणगड- ३३२३११, जिल्हा-सिकर, राजस्थान,
दूरध्वनी – ०१५७३-२२५००१, फॅक्स- २२५०४२,
संकेतस्थळ- http://www.modyuniversity.ac.in
वेल्स युनिव्हर्सटिी
या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
(१) बी. टेक इन नॅव्हल आíकटेक्चर अॅण्ड ओशन इंजिनीअिरग,
(२) बी. टेक इन कोस्टल अॅण्ड ओशन इंजिनीअिरग
(३) डिप्लोमा इन नॅव्हल आíकटेक्चर अॅण्ड ऑफशोअर इंजिनीअिरग,
(४) बी. टेक इन मरिन इंजिनीअिरग
इंटिग्रेटेड
पत्ता : वेल्स युनिव्हर्सटिी, युनिव्हर्सटिी कॅम्पस, वेलन नगर, पी. व्ही वैथियािलगम रोड, पल्लावरम,
चेन्नई-६००११७.
दूरध्वनी- ०४४- २२६६२५०० फॅक्स- २४३१५५४२
संकेतस्थळ- http://www.velsuniv.ac.in, ईमेल- admission@velsuniv.ac.in
डून युनिव्हर्सिटी
१) इंटिग्रेटेड बीए (ऑनर्स) /एम ए इन चायनिज, २) इंटिग्रेटेड बीए (ऑनर्स) /एम ए इन स्पॅनिश, ३) इंटिग्रेटेड बीए (ऑनर्स) /एम ए जर्मन, ४) इंटिग्रेटेड बीए (ऑनर्स) /एम ए जॅपनिज, ५) इंटिग्रेटेड बीए (ऑनर्स) /एम ए इन अरेबिक लँग्वेजेस, ६) इंटिग्रेटेड बीए (ऑनर्स) /एम ए इन फ्रेंच, ७) इंटिग्रेटेड बीए (ऑनर्स) /एम ए इन इकॉनॉमिक्स, ८) इंटिग्रेटेड बीए (ऑनर्स) /एम ए इन मास कम्युनिकेशन, ९) इंटिग्रेटेड बीबीए / एमबीए, अर्हता- कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह १२ वी. १०) इंटिग्रेटेड बीसीए / एमसीए. अर्हता- गणित विषयासह ५० टक्के गुणांसह १२वी. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते.
पत्ता- डून युनिव्हसिर्टी, मोथ्रोवाला रोड, अजाबपूर, देहरादून-२४८००१, दूरध्वनी- ०१३५-२५३३१०५, संकेतस्थळ : http://www.doonuniversity.ac.in,
ईमेल- ar@doonuniversity.gmail.com
गांधीग्राम रुरल युनिव्हर्सिटी-
(१) बीबीए इन रुरल इंडस्ट्रिज अॅण्ड मॅनेजमेंट, (२) बॅचलर ऑफ व्हाकेशन इन फार्म इक्विपमेंट अॅण्ड मेंटनंन्स, (३) बॅचलर ऑफ व्हाकेशन इन फूटवेअर डिझाइन अॅण्ड अॅक्सेसरिज, (४) इंटिग्रेटेड एम ए इन डेव्हलपमेंट एॅडमिनिस्ट्रेशन. (५) डिप्लोमा इन टू व्हिलर मेकॅनिझ्म अॅण्ड मेंटेनन्स
पत्ता : गांधीग्राम रुरल युनिव्हर्सटिी, गांधीग्राम – ६२४३०२, िदडीगूल डिस्ट्रिक्ट, तामिळनाडू,
संकेतस्थळ- http://www.ruraluniv.ac.in,
ईमेल- academic@ruraluniv.ac.in,
फॅक्स- ०४५१-२४५४४६६, दूरध्वनी-२४५२३२३
फूटवेअर डिझाइन अॅण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट
बिझिनेस एॅडमिनिस्ट्रेशन अॅण्ड मास्टर ऑफ बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए – एमबीए )
पत्ता : फूटवेअर डिझाइन अॅण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिटयूट, नॉयडा, ए-१०, नॉयडा डिस्ट्रिक्ट, सेक्टर २४ पिन – २०१३०१.
दूरध्वनी- ०१२०-४५००००, फॅक्स-२४१२५५६,
वेबसाइट : www.fddiindia.com,
ई-मेल- admission@fddindia.com
हिंदुस्थान इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड सायन्स-
(१) बी. टेक इन अॅरोनॉटिकल इंजिनीअिरग (२) बी. टेक इन एरोस्पेस इंजिनीअिरग (३) बी. टेक इन अॅव्हिओनिक्स, (४) बी. टेक इन मोटर स्पोर्टस इंजिनीअिरग (५) बी. टेक इन ऑटोट्रॉनिक्स (६) बीटेक – एमटीएम (मास्टर ऑफ मॅनेजमेंट) इन ऑटोमोबाइल इंजिनीअिरग . या अभ्यासक्रमाचा कालावधी हा साडेपाच वर्षांचा आहे.
इंटिग्रेटेड एम टेक इन सिव्हिल इंजिनीअिरग (कन्स्ट्रक्शन इंजिनीअिरग अॅण्ड मॅनेजमेंट) पत्ता- नंबर ४०, जीएसटी, रोड, सेंट थॉमस माऊंट, चेन्नई-६०००१६, दूरध्वनी-०४४-२२३४१३८९, फॅक्स-२२३४२१७०, संकेतस्थळ -www.hindustanuniv.ac.in,, ई-मेल- hetc@vsnl.com
वेल्लोर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी
(१) इंटिग्रेटेड मास्टर ऑफ सायन्स इन बायोटेक्नॉलॉजी (हा अभ्यासक्रम वेल्लोर कॅम्पसमध्ये शिकवला जातो.), (२) इंटिग्रेटेड मास्टर ऑफ सायन्स इन सॉफ्टवेअर इंजिनीअिरग (हा अभ्यासक्रम वेल्लोर आणि चेन्नई कॅम्पसमध्ये शिकवला जातो.) बी. टेक इन कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी वुईथ स्पेशलायझ्ेशन इन इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी
पत्ता : अॅडमिशन ऑफिसर, वीआयटी युनिव्हर्सटिी, वेल्लोर-०४१६-२२४३०९१, फॅक्स- २२४ ०४११, संकेतस्थळ- http://www.vit.ac.in, ईमेल- admission@vit.ac.in
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सटिी- एम. टेक इंटिग्रेटेड बायोटेक्नॉलॉजी.
पत्ता : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सटिी, प्लॉट ५०, १५ सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-४००६१४, दूरध्वनी-०२२- २७५६३६०० वेबसाइट- http://www.dypatil.ac.in
अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान
गेल्या काही काही वर्षांत देशातील अन्न प्रक्रिया उद्योगाची वाढ दरवर्षी १५ टक्के वेगानं होत आहे. ही बाब लक्षात घेऊनच पुढील संस्थांचे अभ्यासक्रम करणे उपयुक्त ठरू शकतात.
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ क्रॉप प्रोसेसिंग टेक्नालॉजी
ही संस्था भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने स्थापन केली आहे. या संस्थेने बॅचलर ऑफ टेक्नालॉजी इन फूड प्रोसेसिंग इंजिनीयिरग हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. प्रवेशासाठी अर्हता-गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रासह १२ वी उत्तीर्ण. या अभ्यासक्रमाचा कालावधी -४ र्वष. खुल्या आणि इतर मागासवर्ग संवर्गातील विद्यार्थ्यांना ५० टक्के गुण मिळणं आवश्यक आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांसाठी ही अट लागू नाही. या अभ्यासक्रमाला ४० विद्यार्थ्यांना प्रवेश जातो. हा प्रवेश १२ वी विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयातील सरासरी गुणांवर आधारित दिला जातो.
प्रवेश कसा मिळेल? : या अभ्यासक्रमाला JEE- MAIN मध्ये मिळालेल्या गुणांवर प्रवेश दिला जातो. हा प्रवेश देताना १२वीच्या गुणांना ४० टक्के वेटेज आणि जेइइ-मेनच्या गुणांना ६० टक्के वेटेज दिला जाईल. जेइइ-मेन परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना या संस्थेचा अर्ज स्वतंत्रपणे भरावा लागतो. ही संस्था प्रवेश प्रक्रिया स्वतंत्रपणे राबवते. ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासाठी अर्ज केला असेल त्यांना जेइइ-मेनमध्ये मिळालेल्या गुणांवर व १२वीच्या गुणांवर आधारित प्रवेश निश्चित केला जातो.
पत्ता : इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ क्रॉप प्रोसेसिंग टेक्नालॉजी, पुदूकोट्टल रोड, तंजावूर-६१३ ००५, तामीळनाडू, दूरध्वनी-०४३६२-२२८१५५, फॅक्स-२२७९ ७१ मेल- academic@iicpt.edu.in संकेतस्थळ – http://www.iicpt.edu.in
फूड टेक्नॉलॉजी एन्टरप्रिन्युरशीप अॅण्ड मॅनेजमेन्ट
भारत सरकारने नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी एन्टरप्रिन्युरशीप अॅण्ड मॅनेजमेन्ट या संस्थेची स्थापना केली. ही संस्था अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत आहे. या संस्थेमार्फत बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन फूड प्रोसेसिंग इंजिनीयिरग हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमाचा कालावधी हा चार र्वष आहे.
अर्हता : या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र आणि गणित या दोन विषयांसह पुढीलपकी कोणत्याही एका विषयात १२वी विज्ञान परीक्षेत ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. हे विषय आहेत- बायलॉजी किंवा बायोटेक्नालॉजी किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा केमेस्ट्री. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इतर अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेइइ-मेन या परीक्षेत मिळालेले गुण ग्राह्य़ धरले जातात.
करियरच्या संधी : हा अभ्यासक्रम केल्यानंतर करीयरच्या पुढील संधी उपलब्ध होऊ शकतात-
(१) प्रॉडक्ट डेव्हलपमेन्ट सायन्टिस्ट, (२) सेन्सरी सायन्टिस्ट , (३) फूड मायक्रोबॉयलॉजिस्ट , (४) फूड अनॉलिस्ट, (५) क्वोलिटी कन्ट्रोल सुपरवायझर, (६) फूड प्रोसेस इंजिनीअर, (७) फूड इन्टेलिजन्ट मॅनेजर, (८) फूड रेग्युलेटरी अफेअर्स स्पेश्ॉलिस्ट, (९) न्युट्रिशन स्पेश्ॉलिस्ट, (१०) फूड फम्रेन्टेशन स्पेश्ॉलिस्ट, (११) फूड सíव्हस सेक्टर-सप्लाय चन, पोस्ट हार्वेस्ट, फूड रिटेिलग, फूड रेग्यूलेशन, हेल्थ एॅण्ड वेल्थ वेलनेस सíव्हस प्रोव्हायडर, (१२) फूड प्रोसेसिंग सेक्टर-स्नॅक फूड, बिव्हरजेस, मिट, वायनेरी, डेअरी.
या संस्थेच्या बीटेक अभ्यासक्रमाचा अर्ज http://www.niftem.ac.in या संकेतस्थळावर ठेवण्यात येतो.
पत्ता : अॅडमिशन सेल, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी एन्टरप्रिन्युरशीप अॅण्ड मॅनेजमेन्ट, प्लॉट नंबर ९७, सेक्टर ५६, एचएसआयआडीसी , इन्डस्ट्रिअल इस्टेट, कुन्डली -१३१०२८, जिल्हा-सोनपत, हरयाणा, दूरध्वनी- ०१३०-२२८११०१
मत्स्य व्यवसाय तंत्रज्ञान
सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरिज नॉटिकल अँड इंजिनीयिरग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेच्या वतीने बॅचलर ऑफ फिशरी सायन्स (नॉटिकल सायन्स) हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षांचा आहे. या अभ्यासक्रमामध्ये समुद्रातील फििशग व्हेसल्सबाबत जहाजावर प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम कोचीन युनिव्हसिर्टी ऑफ सायन्स अँड टेक्नालॉजीशी संलग्न आहे. या अभ्यासक्रमाला डायरेक्टारेट जनरल ऑफ शििपग यांची मान्यता मिळाली आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांला १२वीमध्ये गणित आणि इंग्रजी विषयात किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. विज्ञानाच्या इतर विषयांमध्ये सरासरीने ५० टक्के गुण मिळायला हवेत. या संस्थेच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा कोची, चेन्नई आणि विशाखापट्टणम येथे होईल.
पत्ता : सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरिज नॉटिकल अँड इंजिनीयिरग ट्रेिनग, फाइन आर्ट अव्हेन्यू, कोची-६८२ ०१६, दूरध्वनी-०४८४-२३५४९३, फॅक्स-२३७ ०८७९, मेल- cifnet@nic.in, संकेतस्थळ- http://www.cifnet.gov.in
दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी
विविध प्रकारचं अपंगत्व असलेल्या व्यक्तींना शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यासाठी स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम भारत सरकारने सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमांमध्ये पदवी, पदविका, प्रमाणपत्र आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या संस्थांमधील काही अभ्यासक्रमांना थेट प्रवेश दिला जातो, तर काही अभ्यासक्रमांना चाळणी परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो.
अली यावर जंग नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हिअिरग हँडिकॅप्ड
या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत-
(१) बॅचलर ऑफ ऑडिऑलॉजी अॅण्ड स्पीच लॅग्वेज पॅथॉलॉजी, (१२वी विज्ञान, फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स किंवा बायोलॉजी. हा अभ्यासक्रम संस्थेच्या मुंबई, कोलकता, सिकंदराबाद, नवी दिल्ली या कॅम्पसमध्ये चालविला जातो. कालावधी – ४ वष्रे)
(२) बॅचलर ऑफ एज्युकेशन इन हिअरिंग इम्प्लांटिंग (कोणत्याही विषयातील १२वी. खुल्या आणि इतर मागासवर्ग संवर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्के आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या संवर्गातील विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण मिळायला हवेत. हा अभ्यासक्रम संस्थेच्या भूवनेश्वर, कोलकता, सिकंदराबाद, नवी दिल्ली या कॅम्पसमध्ये चालविला जातो. प्रत्येक कॅम्पसमध्ये ३१ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.)
(३) डिप्लोमा इन हिअिरग लँग्वेज अँड स्पीच, अर्हता- १२वी विज्ञान, फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स किंवा बायोलॉजी. हा अभ्यासक्रम संस्थेच्या भुवनेश्वर, कोलकता, सिकंदराबाद, नवी दिल्ली या कॅम्पसमध्ये चालविला जातो. प्रत्येक कॅम्पसमध्ये ३१ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
(४) डिप्लोमा इन हिअिरग लँग्वेज अँड स्पीच, (५) डिप्लोमा इन साईन लँग्वेज इंटरप्रिटर कोर्स- अर्हता- कोणत्याही शाखेतील १२वी उच्च अर्हता असल्यास उत्तम. १२वी परीक्षेत ५० टक्के किंवा त्याहून अधिक गुण असल्यास दरमहा २००० रुपये स्टायपेंड दिलं जातं. हा अभ्यासक्रम संस्थेच्या कोलकता, मुंबई, नवी दिल्ली या कॅम्पसमध्ये चालविला जातो. कालावधी एक वर्ष.
(६) बॅचलर ऑफ एज्युकेशन इन हिअरिंग इम्प्लांटिंग, अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी, हा अभ्यासक्रम संस्थेच्या मुंबई, कोलकता, सिकंदराबाद या कॅम्पसमध्ये चालविला जातो. या अभ्यासक्रमाच्या मुंबई आणि कोलकता कॅम्पस येथील प्रवेशासाठी मुंबई येथील कॅम्पसमध्ये चाळणी परीक्षा घेतली जाते. कालावधी- एक वर्ष. मुंबई कॅम्पसमध्ये ३९ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
पत्ता : अली यावर जंग नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हिअिरग हँडिकॅप्ड वांद्रा रिक्लेमेशन वांद्रा वेस्ट,
मुंबई-४०००५०,
दूरध्वनी- ०२२-२६४००२१५, फॅक्स- २६४० ४१७०
मेल- ayjnihh-mum@nic.in,
संकेतस्थळ : ayjnihh.nic.in
ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ स्पीच अॅण्ड हिअिरग
या संस्थेमध्ये बॅचलर ऑफ सायन्स इन स्पीच अँण्ड हिअिरग हा अभ्यासक्रम चालविला जातो. या अभ्यासक्रमाला अखिल भारतीय प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षे आहे. हा अभ्यासक्रम ६ सत्रांचा आहे. १ वर्ष इन्टर्नशीपचे आहे. अर्हता-१२वी विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये सरासरी ५० टक्के गुण मिळायला हवेत.
परीक्षेचा पॅटर्न : चाळणी परीक्षेच्या पेपरमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित विषयांवरील प्रश्न विचारले जातील. यापकी कोणत्याही तीन विषयातील प्रश्न सोडवावे लागतील. हा अभ्यासक्रम ११ वी आणि १२ वीच्या केंद्रीय बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित राहील. अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची निवड या परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित केली जाते. या परीक्षेची केंद्रे- मुंबई, म्हैसूर, कोलकता, दिल्ली, चन्नई, गौहाटी
अल्प कालावधीचे अभ्यासक्रम
(१) सर्टििफकेट कोर्स ऑन कम्युनिकेशन डिसऑर्डर, अर्हता- १०वी उत्तीर्ण/ कालावधी- १४ आठवडे. २० ते २५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
(२) डिप्लोमा इन हिअिरग एड अॅण्ड इअरमोल्ड टेक्नालॉजी, अर्हता-इलेक्ट्रॉनिक्स विषयासह आयटीआय. / कालावधी-१ वर्ष. २० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
(३) डिप्लोमा इन हिअिरग लँग्वेज अॅण्ड स्पीच थ्रू क्वासी डिस्टन्स मोड, अर्हता-१२वी / कालावधी-१ र्वष. २० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
(४) डिप्लोमा इन यंग (डीफ अॅण्ड हिअिरग), अर्हता- १२वी (भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र/ गणित) / कालावधी-१ वर्ष. २५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
(५) बॅचरल ऑफ सायन्स इन एज्युकेशन इन हिअिरग इम्पेरमेन्ट, या अभ्यासक्रमाला चाळणी परीक्षा न घेता थेट प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमाला २० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अर्हता- बीएड. या अभ्यासक्रमाचा कालावधी-१ वर्ष. या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांस ४०० रुपये स्टायपेन्ड दिलं जातं.
पत्ता : ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ स्पीच अॅण्ड हिअिरग, नमिशाम कॅम्पस, मानसगंगोत्री,
म्हैसूर-५७०००६,
दूरध्वनी- ०८२१-२५१२०००, फॅक्स-२५१०५१५,
संकेतस्थळ- http://www.aiishmysore.in ईमेल- admissions@aiishmysore.in
सागरावर स्वारी
सागरावरील प्रवासी व मालवाहतूक, जहाज बांधणी, डिझाइन, निर्मिती, जहाज दुरुस्ती व देखभाल, बंदर निर्मिती डिझाइन आणि सागरी क्षेत्राशी निगडित करियर करण्यासाठी उपयुक्त ठरतील असे अभ्यासक्रम.
इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सटिी
संस्थेच्या स्कूल ऑफ नॉटिकल स्टडीजतर्फे पुढील अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. १) बॅचलर ऑफ सायन्स इन नॉटिकल सायन्स. हा अभ्यासक्रम चेन्नई, मुंबई, कोलकता, कोचिन कांडला पोर्ट येथे शिकवला जातो. अर्हता- १२वी विज्ञान शाखेत फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये सरासरी ६० टक्के, इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळायला हवेत. या अभ्यासक्रमांना केवळ अविवाहित उमेदवारच अर्ज करू शकतात.
२) बॅचलर ऑफ सायन्स इन नॉटिकल सायन्स. हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम चेन्नई, मुंबई या कॅम्पसमध्ये शिकविला जातो. अर्हता- १२वी विज्ञान शाखेत फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये सरासरीने ६० टक्के, इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळायला हवे. या अभ्यासक्रमांना केवळ अविवाहित उमेदवारच अर्ज करू शकतात. दोन्ही अभ्यासक्रम निवासी स्वरूपाचे आहेत.
स्कूल ऑफ नॉटिकल स्टडीज
बॅचलर ऑफ सायन्स इन मेरिटाइम सायन्स हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. हा तीन वर्षे कालावधीचा असून तो मुंबई कॅम्पसमध्ये शिकविला जातो. अर्हता-१२वी विज्ञान शाखेत फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये सरासरीने ६० टक्के, इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळायला हवे. हा अभ्यासक्रम निवासी स्वरूपाचा आहे.
स्कूल ऑफ मरीन इंजिनीअिरग
बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन मरीन इंजिनीअिरग हा चार र्वष कालावधीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम मुंबई आणि चेन्नई कॅम्पसमध्ये शिकविला जातो. अर्हता- १२वी विज्ञान शाखेत फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये सरासरी ६० टक्के, इंग्रजीत ५० टक्के गुण मिळायला हवे. हा निवासी अभ्यासक्रम आहे.
स्कूल ऑफ नेवल आíकटेक्चर अॅण्ड ओशन इजिनीअिरग
बॅचलर ऑफ सायन्स इन शिप बििल्डग अँण्ड रिपेअर हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम कोचिन कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आला आहे. अर्हता-१२वी विज्ञान शाखेत फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये सरासरी ६० टक्के, इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळायला हवे. हा अभ्यासक्रम अनिवासी स्वरूपाचा आहे.

बॅचलर ऑफ टेक्नालॉजी इन नेवल आíकटेक्चर अॅण्ड ओशन इंजिनीअिरग अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षे. हा अभ्यासक्रम विशाखापट्टणम कॅम्पसमध्ये शिकविला जातो. अर्हता- १२वी विज्ञान शाखेत फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये सरासरी ६० टक्के, इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळायला हवे. हा निवासी अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम अनिवासी स्वरूपाचा आहे.
प्रवेश प्रकिया
या अभ्यासक्रमांना अखिल भारतीय चाळणी परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. महाराष्ट्रातील या परीक्षेची केंद्रे- मुंबई, पुणे, नागपूर. परीक्षेसाठी अर्ज ऑनलाइनच करावा लागेल. या अभ्यासक्रमांसाठी http://www.imu.edu.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येतो. पत्ता- इस्ट कोस्ट रोड, उत्थांडी, चेन्नई, तामिळनाडू – ६००११९, दूरध्वनी-०४४-२४५३०३४३
लष्करी सेवा
कम्बाइन्ड डिफेन्स सíव्हस परीक्षा
लष्करामध्ये जाण्यासाठी कम्बाइन्ड डिफेन्स सíव्हस परीक्षा हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. या परीक्षेद्वारे देहरादूनस्थित इंडियन मिलिटरी अॅकेडमी, एजिमालास्थित इंडियन नेव्हल अॅकेडमी, हैद्राबादस्थित एअरफोर्स अॅकेडमी, चेन्नईस्थित ऑफिसर्स ट्रेिनग अॅकेडमीमध्ये प्रवेश दिला जातो. विशेषत: ज्या तरुणींना लष्करात जाऊन साहस गाजवायचं आहे, त्यांच्यासाठी ही परीक्षा उत्तम संधी प्रदान करतं. तरुणींना चेन्नईस्थित ऑफिसर्स ट्रेिनग अॅकेडमी येथील अतांत्रिक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.
इंडियन मिलिटरी अॅकेडमीमधील काही जागा एनसीसी प्रमाणपत्र (आर्मी) धारकांसाठी राखीव असतात. इंडियन नॅव्हल अॅकेडमीमधील काही जागा एनसीसी सी प्रमाणपत्र (नेव्ही) धारकांसाठी राखीव असतात. या अकॅडेमित कार्यकारी-सामान्य सेवेसाठीचा अभ्यासक्रम चालविला जातो. एअरफोर्स अॅकेडमीमध्ये प्री-फ्लाईंग अभ्यासक्रम चालविला जातो. चेन्नईस्थित ऑफिसर्स ट्रेिनग अॅकेडमीमध्ये महिला आणि पुरुषांसाठी शार्ट सव्र्हिस कमिशन अभ्यासक्रम चालविला जातो.
शैक्षणिक अर्हता-
इंडियन नेव्हल अॅकेडमी- मान्यताप्राप्त विद्यापीठातील अभियांत्रिकी पदवी. एअर फोर्स अॅकेडमी- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. मात्र १२ वीमध्ये फिजिक्स आणि गणित या विषयांचा अभ्यास केलेला असावा किंवा अभियांत्रिकी पदवी. ऑफिसर्स ट्रेिनग अॅकेडमी-कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठात कोणत्याही विषयातील पदवी. इंडियन मिलिटरी अॅकेडमी- कोणत्याही विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
परीक्षा प्रक्रिया
ही परीक्षा दरवर्षी दोनदा देशातील विविध शहरांमध्ये घेतली जाईल. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूर या शहरांचा समावेश आहे.
इंडियन मिलिटरी अॅकेडमी, इंडियन नेव्हॅल अॅकेडमी आणि एअर फोर्स अॅकेडमीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारया परीक्षेत इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि मूलमूत अंकगणित या तीन विषयांचे प्रत्येकी दोन तासांचे आणि प्रत्येकी १०० गुणांचे तीन पेपर्स असतात.
ऑफिसर्स ट्रेिनग अॅकेडमीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत इंग्रजी आणि सामान्य ज्ञान या दोन विषयांचे प्रत्येकी दोन तासांचे आणि प्रत्येकी १०० गुणांचे दोन पेपर्स असतात. प्रश्न वस्तुनिष्ठ पद्धतीचे म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह असतात व ते इंग्रजी आणि िहदी या दोन भाषेत असतात. निगेटिव्ह माìकग आहे. प्रत्येक चुकलेल्या प्रश्नासाठी ०.३३ गुण वजा केले जातात. एकापेक्षा जास्त उत्तरे नोंदवल्यास ०.३३ गुण वजा केले जातात. प्रश्नाचे उत्तर लिहिले नाही तर कोणत्याही प्रकारे गुण वजा केले जात नाही.
या पेपरमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुणांचे निर्धारण कमिशनच्या वतीनं केलं जातं. मूलभूत गणिताच्या पेपरचा दर्जा हा दहावी स्तराचा आणि इंग्रजी व सामान्य अध्ययन पेपरचा दर्जा पदवी स्तराचा असतो. इंग्रजीच्या पेपरमध्ये उमेदवाराचं या भाषेवरचं सर्वसाधारण प्रभुत्व आणि शब्दांची उपयोगीता तपासली जाते. सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये चालू घडामोडी, दैनंदिन जीवनाशी निगडित सामान्य विज्ञान, भारताचा इतिहास आणि भूगोल इत्यादी.
मुलाखतीचे गुण : इंडियन मिलिटरी अॅकेडमी, इंडियन नेव्हॅल अॅकेडमी आणि एअर फोर्स अॅकेडमीच्या मुलाखतीसाठी ३०० गुण आणि ऑफिसर्स ट्रेिनग अॅकेडमीच्या प्रवेशासाठीच्या मुलाखतीसाठी २००गुण असतात.
बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्व चाचणी : ही चाचणी दोनस्तरीय असते. पहिल्या टप्प्यात ऑफिसर्स इंटेलिजन्स टेस्टचा समावेश आहे. यामध्ये पिक्चर पस्रेप्शन टेस्ट, डिस्क्रिप्शन टेस्टचा समावेश होतो. या टेस्टच्या गुणांवर आधारित दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारांची निवड केली जाते. या टप्प्यात मुलाखत, ग्रुप टेिस्टग ऑफिसर टास्क, मानसशास्त्रीय चाचणी आणि चर्चा यांचा समावेश आहे. ही संपूर्ण प्रक्रिया चार दिवस चालते. उमेदवार मानसिक आणि बौद्धिकदृष्टय़ा लष्करी सेवा करण्यासाठी सक्षम आहे किंवा नाही याची सखोल तपासणी या चाळण्यांद्वारे केली जाते.
या परीक्षेला अर्ज करू इच्छिणारा उमेदवार शारीरिकदृष्टय़ा सक्षम असणं गरजेचं आहे. उंची, वजन, डोळे याविषयीचे मानके (स्टँडर्डस) निर्धारित करण्यात आले आहेत. अशाच पात्र उमेदवारांची निवड होऊ शकते.
विद्यावेतन आणि पदोन्नती
आर्मी आणि नेव्हीसेवांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण काळात २१ हजार रुपये विद्यावेतन दिलं जातं. प्रशिक्षणाचा कालावधी-१८ महिने. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर पर्मनंट कमिशनद्वारे सेवेत सामावून घेतले जाते. या सेवेत येणारया उमेदवारांना २ वर्षांत लेफ्टनंट , ६ वर्षांनंतर मेजर आणि १३ वर्षांनंतर लेफ्टनंट कर्नल, २६ वर्षांनंतर कर्नल या पदावर पदोन्नतीची संधी मिळू शकते . निवड पद्धतीने उमेदवारांना १५ वर्षांत कर्नल, २३ वर्षांत ब्रिगेडियर आणि २५ वर्षांत मेजर जनरल, २८ वर्षांत लेफ्टनंट जनरल या पदावर नियुक्तीची संधी मिळू शकते.
एअर फोर्स ट्रेिनग अॅकेडमीमध्ये ७४ आठवडय़ांचे प्रशिक्षण दिलं जातं. यशस्वी प्रशिक्षणानंतर उमेदवारांना फ्लाईंग ऑफिसर म्हणून सामावून घेतले जातं. त्यानंतर कालबद्धरीत्या फ्लाइट लेफ्टनंट, स्क्वार्डन लिडर, िवग कंमाडर, ग्रुप कॅप्टन अशी पदान्नती अनुक्रम २, ६, १३ आणि २६ वर्षांनंतर दिली जाते. निवड पद्धतीने एअर कमोडोर, एअर व्हाइस मार्शल, एअर मार्शल या पदांवर नियुक्ती होण्याचीही संधी मिळू शकत
ऑफिसर्स ट्रेिनग अॅकेडमी मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना १० हजार महिना विद्यावेतन दिलं जातं. हे प्रशिक्षण ४९ आठवडय़ांचं असतं. हे प्रशिक्षण संपलं की लघु सेवा कमिशनद्वारे लेफ्टनंटच्या रँकमध्ये सामावून घेतलं जातं. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर मद्रास विद्यापीठाची डिफेन्स मॅनेजमेंट अॅण्ड स्ट्रेटेजिक स्टडीज ही पदविका प्रदान केली जाते. प्रशिक्षणानंतर प्रारंभी १० वर्षांसाठी सामावून घेतलं जातं. त्यानंतर उमेदवारांची कार्यक्षमता बघून ४ वर्षांसाठी ही सेवा वाढवली जाऊ शकते. या सेवेत येणाऱ्या उमेदवारांना २ वर्षांत कॅप्टन , ६ वर्षांनंतर मेजर आणि १३ वर्षांनंतर लेफ्टनंट या पदावर पदोन्नतीची संधी मिळू शकते.
फी आणि संपर्क
महिला आणि अनूसुचित जाती व जमाती संवर्गातील उमेदवारांना या परीक्षेची फी भरावी लागत नाही. खुल्या आणि इतर मागासवर्ग संवर्गातील उमेदवारांना २०० रुपये फी आहे. ही फी नेटबँकिंगद्वारे भरता येते.
उमेदवारांनी http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा. उमेदवारांनी एकदाच अर्ज करण आवश्यक आहे. अन्यथा अर्ज रद्द केला जातो. शासकीय सेवेत वा खाजगी सेवेत असणारे उमेदवार थेट अर्ज करु शकतात. मात्र त्यांनी असा अर्ज केल्याची माहिती आपल्या सध्याच्या कंपनीला वा आस्थापनेला देणे गरजेचं आहे. मुलाखतीच्यावेळी संबंधितांचं ना हरकत प्रमाणपत्र सादर करावं लागतं.
परीक्षेच्या तीन आठवडे आधी ई-अॅडमिट कार्ड पाठवलं जातं. हे प्रवेशपत्र यूपीएस्सीच्या http://www.upsc.gov.in या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येतं.
संपर्क : (१) फॅसिलेशन कांऊटर, दूरध्वनी-०११-२३३८११२५/२३३८५२७१ ,
(२) इंडियन मिलिटरी अॅकेडमीसाठी- joinidianarmy.nic.in
(३) रिक्रुटमेंट डायरेक्टोरेट- ०११-२६१७३२१५, फॅक्स-२६१९६२०५,
(४) एअर फोर्ससाठी- पीओ३ -ए/एअर हेडक्वार्टर्स, जे ब्लॉक, रूम नंबर-१७, अपोजिट वायू भवन, मोतिलाल नेहरू मार्ग , नवी दिल्ली-११००११,
(५) नेव्हीसाठी- रुम नंबर-२०४, सी िवग, सेना भवन नवी दिल्ली- ११००११, नेव्हीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी त्याचे नियुक्तीपत्र http://www.nausena-bhati.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करावे.
एनडीए एक्झामिनेशन
नॅशनल डिफेन्स अॅकेडमी आणि इंडियन नॅव्हल अॅकेडमीसाठी दरवर्षी दोनदा संघ लोकसेवा आयोग म्हणजेच युनियन पब्लिक सíव्हस कमिशनमार्फत अखिल भारतीय स्तरावर स्पर्धा परीक्षा घेतली जाते. या परीक्षेद्वारे नॅशनल डिफेन्स अॅकेडमीसाठी निवडले गेलेल्या उमेदवारांना चार र्वष कालावधीच्या बॅचलर ऑफ टेक्नालॉजी चा अभ्यासक्रम करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येते. त्यानंतर जागेच्या उपलब्धतेनुसार नौदलाच्या कार्यकारी आणि तांत्रिकी शाखेत थेट अधिकारी म्हणून सामावून घेतले जाते.
या परीक्षेद्वारे लष्कर, नौदल, आणि वायुदल आणि कार्यकारी शाखेतील सर्वसाधारणपणे ३०० हून अधिक जागा भरल्या जातात. शैक्षणिक अर्हता : १) आर्मी (लष्कर): १२वी उत्तीर्ण (२) वायुदल आणि नौदल शाखा: १२वी. विद्यार्थ्यांने भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचा अभ्यास केलेला असावा. यंदा १२ वीला असलेल्या विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.
या परीक्षेला अविवाहित मुलेच बसू शकतात.
पत्ता : सेक्रेटरी, युनियन पब्लिक सव्र्हिस कमिशन, धोलपूर, नवी दिल्ली-११००६९, लेखी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची बुध्दिमत्ता आणि व्यक्तिमत्त्व चाचणी घेतली जाते. त्यानंतरच अंतिम निवड केली जाते. दूरध्वनी: ०११-२३३८५२७१/ २३३८११२५/ २३०९८५४३
संकेतस्थळ- http://www.upsconline.nic.in आणि http://www.upsc.gov.in
परीक्षा पध्दती
एनडीए परीक्षेसाठी गणित आणि सामान्य क्षमता चाचणी (जनरल अॅबिलिटी टेस्ट) असे दोन पेपर्स घेण्यात येतील. दोन्ही पेपरचा कालावधी प्रत्येकी अडीच तास आहे. गणिताचा पेपर तीनशे गुणांचा तर अॅबिलिटी टेस्टचे गुण सहाशे आहेत. ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल. निगेटिव्ह माìकग पद्धतीचा अवलंब केला जातो.
जनरल अॅबिलिटी टेस्ट : या पेपरमध्ये इंग्रजीवर दोनशे गुणांचे प्रश्न विचारले जातील. या पेपर मध्ये व्याकरण आणि त्याचे उपयोग, शब्दसंग्रह, उताऱ्यावरील प्रश्न अशासारख्या प्रश्नांचा समावेश असेल. उमेदवारांच्या इंग्रजीवरील प्रभुत्वाची चाचणी करण्यासाठी या पेपर घेण्यात येतो. सामान्य ज्ञानावर ४०० गुणांचे प्रश्न विचारले जातील. या पेपर मध्ये भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र, सामान्य विज्ञान, सामाजिक शाष्टद्धr(२२९ो, भूगोल, दैनंदिन घडामोडी यावर प्रश्न विचारले जातील. बुद्धिमापन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी मध्ये विद्यार्थ्यांची सर्वसाधारण स्वरूपाची बुद्धिमत्ता तपसली जाते. ग्रुप डिस्कशन, ग्रुप प्लािनग, आउटडोर ग्रुप टास्क अशासारख्या चाळणीनासुद्धा विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागते. या विषयावर त्यांना व्याखान(लेक्चर) द्यावे लागते. उमेदवारांची मानसिक क्षमता, दैनंदिन घडामोडीविषयी त्याचे आकलन, त्याची सामाजिक जाणीव यांची चाचपणी करण्यासाठी या चाळणींचा उपयोग होतो.
शारीरिक क्षमता : एनडीएची परीक्षा देऊ इच्छिणारा विद्यार्थी शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा सक्षम असावा. त्याला कोणत्याही स्वरूपाचा गंभीर स्वरूपाचा आजार नसावा. उंचीनुसारच त्याचं वजन असावं. कमी अथवा जास्त वजन नसावं.
एअरमॅन टेक्निकल ट्रेड
१२ वी नंतर वायुदलात करियर करण्यासाठी एअरमन हा एक चांगला पर्याय आहे. एअरमॅन होण्यासाठी नित्यनेमाने इच्छुक उमेदवारांची निवड केली जाते. कोणत्याही अविवाहित मुलास या पदासाठी नियुक्ती मिळू शकते.
कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एअरमॅन होण्याची संधी मिळू शकते. या विद्यार्थ्यांना १२ वीमध्ये सरासरीने ५० टक्के गुण आणि इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. ही अर्हता नसल्यास ज्या विद्यार्थ्यांनी + २ स्तरावरील व्होकेशनल अभ्यासक्रम पूर्ण केला असेल, असेही विद्यार्थीही एअरमन पदासाठी अर्ज करू शकतात. हा अभ्यासक्रम १२ वीशी समकक्ष असणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना सरासरीनं ५० टक्के गुण मिळणं आवश्यक आहे. इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळायला हवे. व्होकशनल अभ्यासक्रमात इंग्रजी विषय नसल्यास मॅट्रिक परीक्षेत इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळायला हवेत.
अर्हता : एअरमॅन ग्रुप टेन टेक्निकल ट्रेड पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा २१ वर्षांपेक्षा अधिक नसावा. किमान उंची १५२.५ सेमी असावी. छाती किमान ५ सेमीने फुगवता आली पाहिजे. उंची आणि वयाच्या प्रमाणात वजन असावे. उमेदवारांना ६ मीटरवरील कुजबूज दोन्ही कानांनी स्पष्टपणे ऐकायला यायला हवा. दंत आरोग्य उत्तम हवे. त्वचेचा आजार नको. संसर्ग आजार नको. जगातील कोणत्याही देशातील कोणत्याही हवामान आणि वातावरणात कार्यरत राहण्यासाठी मानसिक आणि शारीरिक क्षमता हवी. दृष्टीबाबतही विशिष्ट मानके निर्धारित करण्यात आली आहेत. दृष्टिदोषासाठी शस्त्रक्रिया झालेली नसावी. उमेदवार शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त असावा आणि कोणतीही शस्त्रक्रिया झालेली नसावी.
निवडीचे टप्पे
एअरमॅन ग्रुप टेन टेक्निकल ट्रेडनिवडीसाठी लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी, मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी या चार टप्प्यांना उमेदवारांना सामोरे जावे लागते.
१) लेखी चाळणी : ही परीक्षा वस्तुनिष्ठ पद्धतीची असते. पेपर इंग्रजी आणि िहदी या दोन्ही भाषेत असतो. पेपरचा कालावधी ६० मिनिटे असतो. इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित या विषयांवर प्रश्न विचारले जातील. अभ्यासक्रम सीबीएसईचा असेल. इंग्रजी सोडून इतर विषयांचे प्रश्न दोन्ही भाषेत असतात. उमेदवारांना सर्व सेक्शनमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक असते. लेखीपरीक्षेचा निकाला त्याच दिवशी लावला जातो.
२) शारीरिक क्षमता चाचणी : लेखी परीक्षेत उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांना शारीरिक क्षमता चाचणी द्यावी लागते. ही चाचणी दुसरया दिवशी होते. यामध्ये ८ मिनिटांमध्ये १.६ किलोमीटर धावणे या क्षमता चाचणीचा समावेश आहे. साडे सात मिनिटात हे किलोमीटर पूर्ण केल्यास संबंधित उमेदवारांना अतिरिक्त गुण दिले जातात. याचाळणीसाठी उमेदवारांनी त्यांचे स्पोर्ट्स शू आणणे आवश्यक आहे.
३) मुलाखती : जे उमेदवार लेखी परीक्षा आणि शारीरिक क्षमता उत्तीर्ण होतील त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखत इंग्रजीमध्ये होत असल्याने इंग्रजीचं ज्ञान आवश्यक ठरतं.
४) वैद्यकीय चाळणी : भारतीय वायु सेनेने निर्धारित केलेल्या प्रमाणकांनुसार वैद्यकीय चाळणी जानेवारी २०१५ मध्ये घेतली जाईल. जे उमेदवार या वैद्यकीय चाळणीत अयोग्य घोषित केले जातात, त्यांना अपील मेडिकल बोर्डाकडे जाऊन पुनर्चाळणीची संधी घेता येऊ शकते.
उमेदवारांना प्रारंभी २० वर्षांपर्यंत नियुक्ती दिली जाते. ही नियुक्ती वयाच्या ५७ व्यावर्षांपर्यंत वाढू शकते. प्रारंभी बेळगाव (कर्नाटक ) येथे असणारया प्रशिक्षण संस्थेत मूलभूत प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यावर विशिष्ट ट्रेडसाठी निवड केली जाऊन त्याचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नियुक्तीच्या जागी पाठवले जाते.
निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एअरमॅन सिलेक्शन सेंटर मुंबई येथे अखिल भारतीय निवड यादी जाहीर केली जाते. ही यादी http://www.indiarforce.nic.in संकेतस्थळावरही घोषित केली जाते.
पत्ता : कमांिडग ऑफिसर ६, एअरमॅन सिलेक्शन सेन्टर, एअर फोर्स स्टेशन कॉटन ग्रीन, मुंबई-४०००३३,
दूरध्वनी-२३७१४९८२,
विस्तार- २५१
स्मार्ट लोकांसाठी कूल करिअर
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी ही संस्था भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या संस्थेमार्फत फॅशन डिझाइन उद्योगाशी निगडित पुढील अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
बॅचलर ऑफ डिझाइन इन अॅक्सेसरी डिझाइन
या अभ्यासक्रमाचा कालावधी-चार वर्ष, हा अभ्यासक्रम गांधीनगर, बेंगलुरु, नवी दिल्ली, भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, कोलकता, रायबलेरी, मुंबई, जोधपूर, कानपूर, भोपाळ, आणि शिलाँग येथील कॅम्पसमध्ये चालविण्यात येतो.
बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन कम्युनिकेशन
या अभ्यासक्रमाचा कालावधी-चार वर्ष, हा अभ्यासक्रम बेंगलुरु, नवी दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कोलकता, मुंबई, कानपूर , कांग्रा आणि गांधीनगर येथील कॅम्पसमध्ये चालविण्यात येतो.
बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन डिझाइन
या अभ्यासक्रमाचा कालावधी-चार वर्ष, हा अभ्यासक्रम गांधीनगर, बेंगलुरु, नवी दिल्ली, भूवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, कोलकता, रायबलेरी, मुंबई, पाटणा, कानपूर, कांग्रा, आणि शिलाँग येथील कॅम्पसमध्ये चालविण्यात येतो.
बॅचलर ऑफ डिझाइन इन निटवेअर डिझाइन
या अभ्यासक्रमाचा कालावधी-चार वर्ष. हा अभ्यासक्रम बेंगलुरु, नवी दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कोलकता, मुंबई, कानपूर येथील कॅम्पसमध्ये चालविण्यात येतो.
बॅचलर ऑफ डिझाइन इन लेदर डिझाइन
या अभ्यासक्रमाचा कालावधी-चार वर्ष, हा अभ्यासक्रम नवी दिल्ली, चेन्नई, कोलकता, रायबलेरी, येथील कॅम्पसमध्ये चालविण्यात येतो.
या अभ्यासक्रमाचा कालावधी-दोन वर्ष, हा अभ्यासक्रम गांधीनगर, बेंगलुरु, नवी दिल्ली, भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, कोलकता, पाटणा, रायबलेरी, मुंबई, जोधपूर, कानपूर आणि शिलाँग येथील कॅम्पसमध्ये चालविण्यात येतो.
बॅचलर ऑफ डिझाइन इन टेक्सटाइल डिझाइन
या अभ्यासक्रमाचा कालावधी-चार वर्ष, हा अभ्यासक्रम बेंगलुरु, भुवनेश्वर, भोपाळ, गोधीनगर नवी दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कोलकता, मुंबई, कांग्रा, कानपूर, जोधपूर आणि पाटणा येथील कॅम्पस मध्ये चालविण्यात येतो.
(अर्हता : उपरोक्त नमूद १ ते ६ अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही शाखेतील १२वीची परीक्षा उत्तीर्ण)
बॅचलर ऑफ फॅशन टेक्नालॉजी इन अपॅरेल प्रॉडक्शन
अर्हता : फिजिक्स, केमेस्ट्री, मॅथेमॅटिक्स या विषयांसह १२वीची परीक्षा उत्तीर्ण) या अभ्यासक्रमाचा कालावधी-चार वर्ष, हा अभ्यासक्रम गांधीनगर, बेंगलुरु, नवी दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कोलकता, पाटणा, मुंबई, कानपूर, काँग्रा येथील कॅम्पसमध्ये चालविण्यात येतो.
या अभ्यासक्रमांना चाळणी परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. ही परीक्षा देशभरातील विविध शहरांमध्ये घेतली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांची अंतिम निवड मुलाखत आणि समूह चच्रेनंतर केली जाते.
पत्ता :
१) नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी
प्लॉट क्र १५, सेक्टर चार, खारघर, नवी मुंबई ४१०२१० दूरध्वनी: ०२२-२७५६५३८६ फॅक्स:२७५६३७५८
२) नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी कॅम्पस, हौज खास , गुलमोहर पार्कजवळ, नवी दिल्ली ११००१६,
दूरध्वनी: ०११-२६५४२१०० फॅक्स: २६५४५२१५१
संकेतस्थळ – http://www.nift.ac.in
अंतरिक्षाचे आव्हान
इंडियन इंस्टिटय़ूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नालॉजी ही संस्था भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ स्पेस अंतर्गत कार्यरत असणारी संस्था होय. वालीमाला-तरुवनंतपूरम येथे स्थित या संस्थेत अवकाशशास्त्र आणि तंत्रज्ञानातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविले जातात. या संस्थेत जागतिक संशोधनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या संस्थेत प्रवेश मिळालेल्या प्रत्येक उमेदवाराला शैक्षणिक शुल्क, निवास, भोजन यासाठी साहाय्य दिले जाते. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन
येथे अभियंते किंवा शास्त्रज्ञ म्हणून सामावून घेतले जाते.
या संस्थेत बॅचलर ऑफ टेक्नोलॉजी इन एरोस्पेसेस, एव्हीओनिक्स आणि फिजिकल सायन्स या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जेइइ अॅडव्हान्स्ड मधील गुण ग्राह्य़ धरले जातात.
अर्हता : उमेदवारांना १२वी परीक्षेत भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्रात ७० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. एससी, एसटी आणि शारीरिकदृष्टय़ा अपंगांसाठी ६० टक्के गुण हवेत. त्याशिवाय दहावीच्या परीक्षेत ७० टक्के गुण मिळायला हवेत. (एससी, एसटी आणि शारीरिकदृष्टय़ा अपंगांसाठी ६० टक्के गुण हवेत.) उमेदवारांनी दहावी आणि बारावीची परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
संपर्क : द चेअरमन, इंडियन इंस्टिटय़ूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नोलॉजी, वालीयामाला, तिरुवनंतपूरम ६९५ ५४७ केरळ. दूरध्वनी-०४७१-२५६८ ४५२ फॅक्स- २५६८४६२,
संकेतस्थळ – http://www.iist.ac.in, ईमेल- admin@iist.ac.in
सेवा आदरातिथ्याची
भारत सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत कायर्रत असणारी
नॅशनल कौंसिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटिरग टेक्नालॉजी ही संस्था आणि इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ (ओपन युनिव्र्हसिटी)
मार्फत बॅचरल ऑफ सायन्स इन हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल अॅडमिनिस्ट्रेशन या विषयाच्या प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा घेण्यात येते. हा अभ्यासक्रम केल्यानंतर फूड प्रॉडक्शन, फूड अँड बिव्हरेजेस सíव्हस, फ्रंट ऑफिस ऑपरेशन, हाऊस कीिपग, हॉटेल अकौंटंसी, फूड सेफ्टी अँड क्वालिटी, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, फायनान्शिएल प्लानिंग, फायनान्शिएल मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, टुरिझम मार्केटिंग आणि टुरिझम मॅनेजमेंट या सारख्या संस्थांमध्ये करीयरची संधी मिळू शकते.
या परीक्षेद्वारे तीन वर्षे कालावधीच्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षांसाठी प्रवेश दिला जातो. भारत सरकारच्या अखत्यारीत असलेल्या २१ आणि राज्य सरकारांच्या अखत्यारीत असलेल्या २१ संस्था १५ खासगी संस्था आणि ७ फूडक्राफ्ट इन्स्टिटय़ूटमध्ये प्रवेश दिला जातो.
अर्हता : या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांने विज्ञान, कला किंवा वाणिज्य शाखेतील १२वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. मात्र प्रत्येक शाखेतील विद्यार्थ्यांनी १२वीला इंग्रजी हा विषय घेतलेला असावा. १२वीची परीक्षा देणारे विद्यार्थी ही प्रवेश परीक्षा देऊ शकतात. ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा २२ वर्षे. एसटी आणि एससीसाठी कमाल वयोमर्यादा २५ वर्षे.
१५ टक्के जागा एसस्सीसाठी, ७.५ टक्के जागा एसटी आणि ३ टक्के जागा अपंगांसाठी राखीव आहेत.
स्पर्धा परीक्षा देशभरातील विविध शहरांमध्ये घेण्यात येते. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूरचा समावेश आहे.
परीक्षा पद्धती : या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जॉइन्ट एन्ट्रन्स टेस्ट घेतली जाते. परीक्षेचा कालावधी ३ तास. या परीक्षेत ऑबजेक्टिव्ह प्रकारातील प्रश्न विचारले जातील. यामध्ये
१) न्यूमरिकल अँड सायंटिफिक अॅप्टिटय़ूड, २) रिझिनग, लॉजिकल डिडक्शन ३) जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स ४) अॅप्टिटय़ूड फॉर सíव्हस सेक्टर या चार घटकांवर प्रत्येकी ३० गुणांचे प्रश्न विचारले जातील, तर ५) इंग्रजी या घटकांवर ८० गुणांचे प्रश्न विचारले जातील.
पत्ता : नॅशनल कौंसिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट, हेड क्वार्टर- प्लॉट नंबर ए-३४, सेक्टर-६२, नॉयडा. उत्तरप्रदेश २०१३०९,
दूरध्वनी : ०१२०- २५९०६०४, संकेतस्थळ – http://www.nchm.nic.in
या परीक्षेद्वारे महाराष्ट्रातील इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटिरग टेक्नोलॉजी या शासकीय संस्थेत प्रवेश मिळू शकतो. पत्ता- वीर सावरकर मार्ग, दादर (प), मुंबई ४०००२८.
दूरध्वनी- ०२२-२४४५७२४१
डिझाइनर्सचे जग
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन
वेगवेगळ्या विषयांमध्ये डिझाइनचे अभ्यासक्रम चालविणारी ही आपल्या देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील एकमेव संस्था होय. या संस्थेमार्फत पदवी आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम चालविले जातात.
पदवी अभ्यासक्रम
(बॅचलर ऑफ डिझाइन)
या अभ्यासक्रमांना १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या विद्यार्थ्यांचे वय २० वष्रे असावे. या अभ्यासक्रमांचा कालावधी चार वष्रे. हा अभ्यासक्रमांतर्गत पुढील शांखामध्ये स्पेशलायझेशन करता येतो-अॅनिमेशन फिल्म डिझाइन/ सेरॅमिक अँड ग्लॉस डिझाइन /एक्झिबिशन डिझाइन /फिल्म अँड व्हीडीयो कम्युनिकेशन /फíनचर डिझाइन / ग्रॉफिक डिझाइन /प्रॉडक्ट डिझाइन /टेक्सटाइल डिझाइन.
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम
सिरॅमिक अँड ग्लॉस डिझाइन (एकूण जागा-१५), अॅपेरेल डिझाइन (एकूण जागा-१५) , डिझाइन अँड रिटेल एक्सपिरीयन्स (एकूण जागा-१५), लाइफ स्टाइल अॅक्सेसरिज डिझाइन (एकूण जागा-१०) , न्यू मीडिया डिझाइन (एकूण जागा-१५) , फोटोग्रॅफी डिझाइन, प्रॉडक्ट डिझाइन (एकूण जागा-१५) , स्ट्रेटेजिक डिझाइन मॅनेजमेंट (एकूण जागा-१५) , टेक्सटाइल डिझाइन, टॉय अँड गेम डिझाइन (एकूण जागा-१५) ,
ट्रान्स्पोर्टेशन अॅण्ड ऑटोमोबाइल डिझाइन (एकूण जागा-१०) , युनिव्हर्सल डिझाइन या शांखामध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमांचा कालावधी अडिच वर्ष. संबधित शाखेच्या अनुषंगाने आवश्यक असणारी पदवी ही शैक्षणिक अर्हता समजली जाते. विद्यार्थ्यांचं वय २७ वर्षांपेक्षा अधिक नसावं. राखीव जागांसाठी ३ वष्रे वयात सूट. उमेदवारांना कोणत्याही दोन विषयांसाठी अर्ज करता येईल. मात्र त्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल.
प्रवेश कसा मिळेल?
या संस्थेच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा अहमदाबाद, बंगलोर, मुंबई, नागपूर , कानपूर, कोची , दिल्ली या केंद्रांवर होईल. या परीक्षेमधून निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना अहमदाबाद येथे स्टुडियो टेस्ट आणि मुलाखतीसाठी एप्रिल/मे मध्ये बोलावले जाते. जूनच्या मध्यापासून प्रत्यक्ष अभ्यासक्रमास प्रारंभ होतो.
पत्ता: एनआयडी, पालडी, अहमदाबाद: ३८०००७ गुजरात.
दूरध्वनी : ०७९-२६६२ ३६९२/२६६२ ३४६२,
फॅक्स: २६६२११६७,
संकेतस्थळ : http://www.nid.edu
सुरेश वांदिले – response.lokprabha@expressindia.com