हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
झोप केव्हाच झोपत नसते,
नेहमीच जागी असते (झोपण्यासाठी)!
प्रकाशच काळाकुट्ट अंधार
प्रकाशाकडे रोखून तर बघा
अंधारी येते नजरेसमोर
का?
तो काळाकुट्ट असतो म्हणून?
प्रकाशच कदाचित प्रकाशाला
मार्ग दाखवतो
(भावानुवाद- विनायक परब)
समोर दिसणाऱ्या दृश्यप्रतिमांमध्ये काही तरी अनाकलनीय, प्रसंगी गूढ तर काही वेळेस खूप छान, सुंदर भावना जागविणारे असे काही तरी आहे, हे त्या कलादालनात प्रवेश करताच आपल्या लक्षात येते खरे. पण या दृश्यप्रतिमांचा अर्थ लावायचा कसा हा प्रश्न त्याच वेळेस मनात भुंग्याप्रमाणे फिरायला सुरुवात करतो. मग आपण शोधू लागतो प्रदर्शनाची माहिती, कदाचित त्यातून काही हाती लागावे.. त्यावेळेस समोरच्या भिंतीवर लिहिलेल्या या ओळी नजरेस पडतात. प्रदर्शनाचे शीर्षक आणि समोर असलेल्या दृश्यप्रतिमा याची सांगड घालण्याचा एक असफल प्रयत्न त्यापूर्वी आपण करून झालेला असतो. प्रदर्शनाचे शीर्षक असते.. स्वत:च्याच मृत्यूवर मात कशी कराल? या शीर्षकामुळे तर अधिकच बुचकळ्यात पडायला होते. मग शेजारच्या त्या ओळी वाचण्याचा प्रयत्न आपण करतो. एवढेच नव्हे, तर त्या ओळी आपल्याला ही चित्र-छायाचित्र समजून घेण्यासाठी मार्गदर्शनही करू लागतात. हे प्रदर्शन असते कोल्बी काल्डवेलचे आणि त्याला सोबत करणाऱ्या ओळी आहेत प्रसिद्ध कवी बर्नार्ड वेल्ट याच्या ‘हाऊ टू सव्र्हाइव्ह यूवर ओन डेथ?’ अर्थात ‘तुमच्या मृत्यूवर मात कशी कराल?’ असे शीर्षक असलेल्या कवितेच्या. हेच या प्रदर्शनाचेही शीर्षक असल्याचे आपल्या लक्षात येते.
कॅमेरा नजरेला लावून लेन्समधून पाहण्याचा प्रयत्न केला तर ‘आउट फोकस’ असताना गोष्टी अतिशय धूसर दिसतात. हळूहळू फोकस होत जातो त्या वेळेस सुरुवातीस दिसणारे आकार वेगवेगळे रूपाकार धारण करतात. सुरुवातीस धूसर असलेले गोल, मग स्पष्ट रंगांचे गोलाकार होतात. नंतर ते लंबगोल होत जातात त्यावेळेस त्यातील आकार आणि रंग एकाच वेळेस समांतरपणे बदलत असतात आणि अखेरीस ते समोरच्या दृश्यातील आकार धारण करतात; मग समोर माणसे असतील तर माणसे आणि झाडे असतील तर झाडे आपल्याला दिसू लागतात. आताशा मात्र ही प्रक्रिया छायाचित्रकाराला अनुभवताच येत नाही. कारण डिजिटल कॅमेरा वापरात आल्यापासून सारे काही ‘ऑटोमेटिक’ होते. मग तो अदृश्यापासून दृश्यापर्यंतचा प्रवास आपण अनुभवतच नाही. कारण तुम्ही क्लिक करण्याच्या बटनावर केवळ अध्र्यापर्यंत दाब दिला की लगेचंच स्पष्ट प्रतिमा समोर येते. त्यामुळे मधला अनुभवच हरवला आहे. या प्रदर्शनातील त्या दृश्यप्रतिमांमध्ये नेमका हा मधला अनुभवच आपल्याला पाहायला मिळतो.
हा मधला अनुभव आपल्याला आणखी एकदा अनुभवता येऊ शकतो. तो म्हणजे दिलेल्या प्रतिमांच्या छपाईमध्ये यंत्रात काही बिघाड झाल्यास त्या प्रतिमा आपल्याला या रूपामध्येच पाहायला मिळतात. या बिघाड किंवा त्रुटीला काल्डवेलने ‘समोर दिसणाऱ्या दृश्यातील करप्शन’ म्हटले आहे. प्रतिमांकनाच्या क्षेत्रामध्येही याला दृश्य ‘करप्ट’ झाले किंवा संगणकीय युगात ‘फाइल करप्ट’ झाली असे म्हणण्याचीच प्रथा आहे. कलावंत या कलाकृतींतून मग आपल्याला असे विचारण्याचा प्रयत्न करतोय का की, तुमच्या-माझ्या आयुष्यातील दृश्येही अशीच ‘करप्ट’ झाली आहेत आणि ती समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या त्या जाणिवेने कदाचित आपल्याला मृत्यूवरही मात करता येईल.. अमर्त्य होता येईल (?)!
विनायक परब – response.lokprabha@expressindia.com
Twitter: @vinayakparab