हनुमानाची दैवत म्हणून उपासना होत असली, हनुमान जयंती साजरी होत असली तरी हनुमानाबद्दल तपशीलवार माहिती असतेच असं नाही.

हनुमानाला मारुती, महावीर, बजरंगबली, अंजनेय, महारुद्र, पवनपुत्र अशा अनेक नावांनी संबोधिले जाते. या दैवताचा उगम काय, त्याचा विकास कसा झाला, साहित्यात त्याचे काय स्वरूप आहे हे थोडक्यात अभ्यासणे हा या लेखाचा प्रमुख हेतू आहे.

Hashtag Tadev Lagnam
तेजश्री प्रधान-सुबोध भावे पहिल्यांदाच एकत्र झळकणार; ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Gajakesari Yoga
१६ नोव्हेंबरला निर्माण होणार शक्तीशाली गजकेसरी योग! ‘या’ राशींचे लोक जगणार आलिशान आयुष्य, नव्या नोकरीसह होईल धनलाभ
Tilak Varma Statement on Maiden T20I Century Flying Kiss Celebration He Said It is For Suryakumar Yadav Gives credit to him IND vs SA
IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…
Important research Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University shows that mosquitoes are repelled by yellow light of LED
डासांपासून त्रस्त झाले का? हे करून बघा, काय सांगते पिवळ्या दिव्याचे नवे संशोधन
Raigad Chi Waghin | Viral Video
VIDEO : रायगडची वाघीन! शिवप्रेमीची दुचाकी एकदा पाहाच, व्हिडीओ होतोय व्हायरल
Hardik Pandya Trolled For His Behavior and Showing Attitude to Arshdeep Singh in IND vs SA 2nd T20I
IND vs SA: “आता उभा राहून मजा बघ…”, हार्दिक पंड्याला मोठेपणा करणं पडलं भारी, अर्शदीपला बोललेल्या वाक्यानंतर होतोय ट्रोल

व्युत्पत्ती : वैदिक साहित्यात कुठेही हनुमानाचा उल्लेख नाही.

हनुमंत हा शब्द तमिळचे संस्कृत रूप असावे असे पार्जीटर, डॉ. सुनीतीकुमार चतर्जी, शिवशेखर मिश्र इ. अभ्यासकांचे मत आहे. द्रविड शब्दाचे संस्कृत रूप बनविताना बहुतेक प्रारंभी ‘ह’कार जोडण्याची पद्धती आहे. तमिळ आणमंदि (आण= वानर, मंदि= नर) शब्दाचे संस्कृतीकरण म्हणजे हनुमंत होय. तमिळमध्ये अनुमंद असे म्हणतात. म्हणजे संस्कृतातील हाकार इथे लोप पावतो. अनुमान (तमिळ), हनुमंथूडू (तेलगु), अनोमन (इंडोनेशियन), अन्दोमान (मलेशियन) आणि हुंलामान (लाओस) अशी विविध नावे आहेत. परंतु विसाव्या शतकातील भाषाशास्त्री मरे इमानु जे द्राविडी भाषांचे तज्ज्ञ आहेत, त्यांचे असे मत आहे की, संगम साहित्यानुसार मंदि हा शब्द फक्त वानरीला उद्देशून वापरला जातो; वानराला नाही.

26-lp-hanumanकेमिली बुल्के त्यांच्या ‘रामकथा: उत्पत्ती आणि विकास’ या ग्रंथात म्हणतात की मध्य भारताच्या आदिवासी जमातीत हनुमानाचे मूळ सापडते. छोटा नागपूरमध्ये राहणाऱ्या उरांव व मुंड या आदिवासींमध्ये तिग्गा, हलमान, बजरंग व गडी अशी गोत्रे आढळतात. या सर्वाचा अर्थ वानर असा आहे. त्याचप्रमाणे रेद्दी, बरई, बसौर, भना व खुंगार या जातींमध्येही वानरसूचक गोत्रे आहेत. सिंगभूममधले भूईया जातीचे लोक आपण हनुमंताचे वंशज असल्याचे सांगतात. यावरून हनुमान आदिवासी जमातीचा देव असावा असे वाटते.

हनुमानाची विविध नावं : अंजनेय, अंजनीपुत्र, केसरीनंदन, मारुतीनंदन, पवनपुत्र इ.

हनुमानाच्या विविध उपाधी : रामरक्षेत हनुमानाची विविध विशेषणे सांगितली आहेत. ती अशी-मनोजवं, मारुततुल्यवेगम्, जितेन्द्रियं, बुद्धीमतावरिष्ठम्, वानरयुथमुख्यं, श्रीरामदूतं इ.

चरित्र :

वाल्मीकी रामायणात हनुमंताचे चरित्र तीन ठिकाणी आले आहे. (कििष्कधा-कांड ६६-६७, युद्ध-कांड २८ आणि उत्तर-कांड ३५-३६).

कििष्कधा कांडात जाम्बवानाने याचे चरित्र पुढीलप्रमाणे निवेदन केले आहे. पुंजीकस्थला नावाची एक सुंदर व श्रेष्ठ अप्सरा होती. ऋषीच्या शापामुळे ती वानर योनीत जन्माला आली. स्वेच्छेप्रमाणे रूप धारण करण्याचे सामथ्र्य तिच्या ठायी होते. महात्मा कुंजर या वानराची ती मुलगी होती आणि पुढे केसरी वानराची अंजना नामक पत्नी झाली. अंजना एकदा सुंदर स्त्रीचे रूप धारण करून पर्वतावर िहडत असाता वायूने तिला पाहिले आणि तो तिच्यावर आसक्त झाला. अंजनेला तो आिलगन देत असताना गोंधळून गेलेली ती पतिव्रता म्हणाली, ‘माझे पातिव्रत्य भ्रष्ट करण्याची कोण इच्छा करत आहे?’ त्यावर वायू तिला म्हणाला,

‘‘मनसाऽस्मि गतो यत्त्वां परिष्वज्य यशस्विनि

वीर्यवान् बुद्धिसम्पन्नस्तव पुत्रो भविष्यति

महासात्त्वो महातेजा महाबलपराक्रम:

ल.न प्लवने चव भविष्यति मया सम’’

(कििष्कधा ६६.१८-१९)

अर्थ : हे यशस्विनी, तुला आिलगन देऊन ज्या अर्थी मी मानसिक उपाभोगाच्या इच्छेने तुझ्या ठायी आपले तेज ठेवले आहे, त्याअर्थी तुला वीर्यवान व बुद्धिसंपन्न पुत्र होईल. तो पुत्र महाधर्यवान, महातेजस्वी, महाबलाढय़ व महापराक्रमी होऊन, मार्ग उल्लंघून जाण्यात आणि उडी मारण्यात माझी बरोबरी करील.

हा वर मिळाल्यावर संतुष्ट झालेली अंजना एका गुहेमध्ये प्रसूत झाली आणि तिने हनुमंताला जन्म दिला.

पुराणे :

विष्णुपुराण, ब्रह्मपुराण अशा काही पुराणातील चरित्राचा सारांश – ब्रह्मगिरीजवळच्या अंजन पर्वतावर केसरी वानर राहत होता. त्याला अंजनी व अद्रिका नावाच्या दोन बायका होत्या. अंजना वानरमुखी असून, अद्रिका मार्जार्मुखी होती. त्या दोघीही पूर्वजन्मीच्या अप्सरा असून, इंद्राच्या शापामुळे त्यांना पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला होता. एकेदिवशी केसरी वानर तिथे नसताना अगस्त्य ऋषी तिथे आले. त्या दोघींनी त्यांचा चांगला आदरसत्कार करून बळवंत वा सर्वलोकोपापकारक अशा पुत्राच्या प्राप्तीचा वर मागितला. तसा वर त्यांना देऊन अगस्त्य ऋषी दक्षिणेकडे निघून गेल्यावर वायूने अंजनीला आणि निर्ऋतीने अद्रिकेला पाहिले आणि ते त्यांच्याशी रममाण झाले. पुढे अंजनीला हनुमान आणि अद्रिकेला पिशाचराज झाला.

शिवपुराणात थोडी भिन्न कथा आहे – एकदा शिवाने विष्णूचे मोहिनीरूप पाहिले, त्यामुळे शिव कामासक्त झाला आणि त्याचे वीर्यपतन झाले.

सप्तर्षीनी ते वीर्य पानावर घेऊन कर्णद्वारे गौतामिकांया अंजनीच्या ठिकाणी स्थापन केले. त्या वीर्यामुळे अंजनी गर्भवती झाली व तिने हनुमानाला जन्म दिला.

एकनाथी भागवतात महाराष्ट्रात प्रचलित असलेली कथा दिली आहे. दशरथाने पुत्रकामेष्टी केला. त्या वेळी पायसाचा एक भाग घारीने पळवला आणि पर्वतावर ध्यान करत असलेल्या अंजनीची पदरात टाकला. तिने पायस भक्षण केले आणि कालांतराने हनुमानाला जन्म दिला.

जन्मतिथी : साऱ्या भारतभर हनुमान जयंती साजरी होत असली तरी रामायण-महाभारतात हनुमानाच्या जन्मतिथीचा उल्लेख नाही. आनंद रामायणात (आ.रा. १.१३,१६२-१६२) चत्र शुद्ध एकादशीच्या दिवशी मघा नक्षत्रावर हनुमानाचा जन्म झाला असे म्हटले आहे. अगस्त्य संहितेत काíतक वद्य चतुर्दशी, मंगळवारी, स्वाती नक्षत्रावर मेष लग्नावर अंजनीच्या पोटी स्वत: शिवानेच जन्म घेतला असे म्हटले आहे. उत्सव सिंधू, व्रतरत्नाकर या ग्रंथातही हीच तिथी सांगितली आहे. सूर्य संहितेत मात्र काíतक वद्यातील तिथी सांगून वार शनिवार दिला आहे. याच्या जन्मातिथीबद्दल महिना, वार, तिथी वा वेळ यात मतभेद असल्यामुळे भारतात निरनिराळ्या प्रांतात निरनिराळ्या दिवशी हनुमान जयंती साजरी करतात. महाराष्ट्रात चत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी होते.

जन्मस्थान :

  • कर्नाटकातील हम्पी येथील अंजनेय पर्वत.
  • गुमला येथून १८ किमीवरील अंजन नावाचे खेडे
  • नाशिक जिल्ह्य़ातील त्र्यंबकेश्वरपासून सात किमीवरील अंजनेरी पर्वत
  • अंजन्धामानुसार, राजस्थानातील चुरू जिल्ह्य़ातील सुजानगढजवळ लक्षका पर्वत.
  • पुरी धामानुसार, भुवनेश्वरजवळ खुर्द येथील दाट जंगल.

बालपण :

किष्कधा कांड ६६-६७ : अंजना सूर्योदयाच्या वेळी प्रसूत झाली. नंतर नुकत्याच उगवलेल्या सूर्याला पाहून, हे फळ आहे, असे हनुमान समजला व ते घेण्यासाठी त्याने उडी मारली. ते पाहून इंद्र रागावला आणि त्याने त्याला वज्र फेकून मारले. त्यामुळे त्याची डावी हनू मोडली. तेव्हापासून तो हनुमान या नावाने प्रसिद्ध झाला. आपल्या मुलावर वज्रप्रहार झाल्याचे पाहून वायू क्रुद्ध झाला आणि त्याने आपले वाहणे बंद केले. त्यामुळे सर्व देव घाबरून वायूला प्रसन्न करण्यासाठी धडपडू लागले. मग वायू प्रसन्न झाल्यावर ब्रह्मदेवाने हनुमंताला वर दिला की युद्धात शस्त्राने तुझा वध होणार नाही. नंतर इंद्र म्हणाला की हा इच्छामरणी होईल.

27-lp-hanumanयुद्ध-कांड २८ : रामसन्याचा परिचय करून देताना हनुमानाचे लघुचरित्र सांगताना शुक म्हणतात- हा लहान असताना याला भूक लागली. पृथ्वीवरील पदार्थानी आपली भूक भागणार नाही या विचाराने त्याने सूर्याकडे झेप घेतली. परंतु सूर्यासमीप न जाताच तो उदयांचल पर्वतावर पडला आणि त्याची हनूू किंचित दुखावली, म्हणून तो हनुमान या नावाने प्रसिद्ध झाला.

गृहस्थ हनुमान : हनुमान ब्रह्मचारी मानला जात असला तरी तो गृहस्थ असल्याचीही कल्पना केली गेली आहे.

आनंदारामायण सार-कांड अध्याय ११ येथे अशी कथा आहे. लंकादहनानंतर हनुमान समुद्रात स्नान करून परत फिरला असता, त्याचा घाम एका मगरीने गिळला. त्यापासून ती गर्भवती झाली आणि तिला मकरध्वज नावाचा मुलगा झाला. अहिरावण-महिरावण वधाच्या प्रसंगात हनुमानाची आणि मकरध्वजाची भेट झाली.

विदेशी रामकथांमध्येही बव्हंशी हनुमान गृहस्थ म्हणून रंगवला आहे, या रामकथांचा मूलाधार भारतीय रामकथा आहे.

जैन साहित्य : ‘पउमचरिय’ या जैन रामकथेत हनुमंताला एक सहस्र बायका असल्याचा उल्लेख आहे. त्यात वरुणाची मुलगी सत्यवती, चन्द्रनाखाच्या अनाग्कुसुमा, नलनंदिनी, हरिमालिनी वा सुग्रीवकन्या पद्मरागा या प्रमुख होत्या. स्वयंभू देवाच्या पउमचरित हनुमानाच्या बायकांची संख्या ८००० आहे. रविषेणाच्या पद्मपुराणातही अशीच मोठी संख्या आहे.

हनुमानाचे गुणविशेष :

शौर्य /पराक्रम : रामायण आणि महाभारत यात हनुमानाच्या पराक्रमाचे गोडवे गायले आहेत. उत्तरकांड ३५.३-५ येथे हनुमानाच्या पराक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा करताना रामाने म्हटले आहे-

शौर्य दाक्ष्यं बलं ध्रय प्राज्ञता नायासाधानाम्

विक्रमश्च प्रभावश्च हनुमती कृतालाया:

दृष्ट्वैव सागरम वीक्ष्य सीदन्तीं कापिवाहिनीम्

समाश्वास्य महाबाहुर्योजनाना शतं प्लुत:

धश्र्यीत्वा पुरीं लङ्कां रावणान्तपुरं तदा

दृष्टा सम्भाषिता चापि सीता ह्य़ाश्वासिता तथा

या श्लोकात शौर्य, दक्षता, बल, धर्य, बुद्धिमता, राजनीती, राजकीय कृत्य शेवटाला नेण्याची हातोटी, पराक्रम वा प्रभाव या गुणांची प्रशंसा केली आहे.

महाभारतातील वनपर्वात १४७.११ येथेही हनुमंताच्या शौर्याची गाथा वर्णिली आहे.

बुद्धिमत्ता : वा.रा. उत्तरकांड ३६.१४ येथे बालपणाचे वर्णन करताना म्हटले आहे – बाल हनुमंताला आपल्या तेजाचा शंभरावा भाग देताना सूर्याने म्हटले की सर्व शास्त्रांचे अध्ययन करण्याची बुद्धिमत्ता मी याला देतो. त्यामुळे हा श्रेष्ठ वक्ता होईल. वाल्मीकी उत्तराकांडात ३६.४४-४६ येथे म्हणतात व्याकारांचे अध्ययन करण्याच्या उद्देशाने हा उदयाचलापासून अस्ताचलापर्यंत िहडत राहिला. व्याकारांसुत्रे, सुत्रावृत्ती, वाíतक, भाष्य आणि संग्रह या सर्वाचे अध्ययन करून इतर शास्त्रांमध्येही हा प्रवीण झाला आहे. सत्र आणि वेदार्थ निर्णय याविषयी याची बरोबरी करणारा या जगात कुणी नाही.

राजनीतिज्ञ : हनुमंताने स्वत:च मंत्र्याच्या कर्तव्याची जाणीव करून देताना सुग्रीवाला म्हटले आहे –

नियुक्र्तेमत्रिभिर्वाच्यो ‘वश्यं पार्थिवो हितम्

इत एव भयं त्यक्त्वा ब्राविम्यावाधृतम वच:

युद्धकांडातील (युद्ध. ११२) सीतेला शोधून काढण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली होती. अयोध्येत येत असण्याची खबर भरताला सांगण्याची कामगिरी त्याच्यावर होती. (उत्तर ४०.२३) यावरून तो एक कुशल दूत होता हे लक्षात येते.

हनुमंताला संगीतशास्त्राचा एक प्रवर्तक मानतात. संगीत् पारिजात (१.९), संगीत् रत्नाकार (१,१७) इ. ग्रंथांतून प्राचीन संगाचार्याबरोबर अन्जानेयाचा उल्लेख येतो. आंजनेय् संहिता अथवा हनुमानत्संहिता या ग्रंथाचा उल्लेख तंजौरच्या रघुनाथ नामक राजाने आपल्या ‘संगीत् सुधा’ ग्रंथात केला आहे. संत रामदासांनी त्याची गायनी कला ध्यानात घेऊन त्याला संगीतज्ञानमहानता असे संबोधले आहे.

28-lp-hanumanहनुमान आणि रुद्र : हनुमानाला रुद्राचा अवतार मानतात. पुराणकाळात हे नाते विकसित झाले. स्कंद पुराण (अवंतीखंड ८४), ब्रह्मवैवर्त पुराण (कृष्णजन्मखंड ६२), नारदपुराण (पूर्वखंड ७९), शिवपुराण (शातारुद्रसंहिता २०), भविष्यपुराण (प्रतिसर्ग पर्व १३०), महाभागावात्पुरण (३७) इ.ठिकाणी रुद्र व हनुमान हे नाते स्पष्ट केले आहे. हनुमानाची एकादश रुद्रांत गणना होते. भीम हे एकादश रुद्रांतील एक नाव आहे. म्हणूनच समर्थानी त्याला भीमरूपी महारुद्र म्हटले आहे. हनुमानच्या पंचमुखी मूíत रुद्रशिवाच्या पंचमुखी प्रभावातून आली आहे. रुद्रावतारी पंचमुखी हनुमंकॅहा मंत्र असा- ॐ नमो हनुमते रुद्रावताराय पंचवदनाय पूर्वमुखे सकलशत्रुसंहारकाय रामदूताय स्वाहा.

हनुमान आणि शनी : हनुमत्सहस्रनाम स्तोत्रात शनी हे हनुमानाचे एक नाव सांगितले आहे. सूर्य संहितेत हनुमानाचा जन्म शनिवारी झाला असे म्हटले आहे. शनी हा रुद्र आहे. हनुमानही कुठे कुठे शनीप्रमाणे काळ्या रंगाचा असतो. त्यामुळे नकळत शनी व हनुमान यांचे साधम्र्य लोकमानसांत रुजले असावे आणि शनिवारी हनुमानाची पूजा वा शनिवारव्रतात त्याची उपासना सुरू झाली असावी. परंतु शनी व हनुमान यांच्यात भेदही आहेत.-

  • शनी हा सूर्यपुत्र तर हनुमान वायुपुत्र आहे.
  • शनी व सूर्य यांच्यात वितुष्ट आले तर हनुमानाने सूर्याकडून सर्व विद्या ग्रहण केल्या. सूर्याने आपल्या तेजाचा १०० वा भाग हनुमानाला दिला.
  • शनी पापग्रह आहे, तर हनुमान हा लोकप्रिय देव आहे.
  • दोघेही ब्रह्मचारी असले तरी शनी देवाच्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश निषिद्ध तर स्त्रिया हनुमानाची पुत्रप्राप्तीसाठी आराधना करतात.
  • शनिवारी तेलाची खरेदी-विक्री करू नये असा कोकणात संकेत आहे तर हनुमानाला शनिवारीच तेल वाहण्याची रुढी आहे.

हनुमान आणि यक्ष : हनुमानचा यक्षोपासनेशी जवळचा संबंध आहे. वीर हनुमान हे यक्षोपासनेतूनच आला आहे. वीर मारुती युद्धाच्या पावित्र्यात असतो. वीर आणि अद्भुत हे शब्द यक्षवाची आहेत. हनुमान हा महावीर आहे. कपिलऊम्बीर या नावाने हनुमंताची बावन्न वीरात गणना केलेली आहे. महाराष्ट्रात फाल्गुन मासात अनेक ठिकाणी वीर मिरवतात. त्या वेळी हे वीर मारुतीच्या दर्शनाला चाललेले असतात. या परंपरेतून मारुतीचा वा यक्ष परंपरेचा जवळचा संबंध सूचित होतो. मथिली लोकगीतांमध्ये व ब्रज मंडलात अनेक गीतांमध्ये हनुमंतासाठी वीर हाच शब्द वापरतात. याशिवाय यक्ष संस्कृतीची अनेक लक्षणे स्पष्ट करणारे गुणविशेष हनुमंताच्या ठायी आहेत.

यक्षनिवास पाण्याच्या ठायी असतो. राजस्थानातील बहुतेक गावी विहिरीजवळ हनुमंताच्या गढय़ा असतात. हरयाणात विहीर खणायला प्रारंभ करताना तिथे प्रथम मारुतीची गढी उभारतात.

चुरमा हे यक्षांचे विशेष खाद्य आहे आणि राजस्थानात चुरम्याशिवाय हनुमानाचा नवेद्य होऊ शकत नाही.

यक्ष हे रोग, भूतबाधा, वांझपण घालवतात अशी समजूत आहे. हनुमानाची उपासना याचसाठी केली जाते. राजस्थान, पंजाब या प्रदेशात आजारी माणसाला बरे वाटण्यासाठी हनुमानाच्या मंदिरात नेण्याची प्रथा आहे. महाराष्ट्र, गुजरात या प्रदेशात साथीचे रोग सुरू झाले असता ते घालवण्यासाठी हनुमानाची पूजा करतात. रोगमुक्तीसाठी वीर-हनुमान मंत्राचा प्रयोग करतात. भूतबाधा झाली असता त्याला हनुमानाच्या मंदिरात नेतात किंवा हनुमान मंत्र-स्तोत्रे म्हणतात.

स्त्रिया पुत्रप्राप्तीसाठी मारुतीची उपासना करतात. निपुत्रिक स्त्री िभतीवर सिंदुराने मारुतीची आकृती काढून त्याची पूजा करते. त्याच्यापुढे चढते-उतरते, कणकेचे दिवे लावते. शनिवारी त्याच्या गळ्यात रुईच्या पांची किंवा फुलांची माळ घालून त्याला उडीद वा मीठ अर्पण करते.

हनुमान आणि तंत्रोपासना : हनुमानाची तांत्रिक उपासना मनोकामना पूर्ण करणारी आणि लौकिक सिद्धी प्राप्त करून देणारी आहे, असा लोकांचा विश्वास आहे. या तांत्रिक उपासनेत द्वादाशाक्षरी मंत्राला महामंत्रराज म्हणतात –

हौं हृस्फें हूख्फें ह्सौं हनुमते नम:

या मंत्राचा ऋषी राम आहे. छंद जगाती असून, देवता हनुमान आहे. ह्सौं हे त्याचे बीज असून हृस्फें त्याची शक्ति आहे. या मंत्राचा यथाविधी प्रयोग केल्यावर राजभय, शत्रूभय उरत नाही. विषारी पाणी शुद्ध करण्याचे सामथ्र्य या मंत्रात आहे. तसेच जारणमारण, उच्चाटन इ. जीवघेण्या संकटातून माणूस मुक्त होऊन त्याला इच्छित प्राप्ती होते.

हनुमान आणि नाथसंप्रदाय : नाथसंप्रदायाचे बारा उपपंथ असून, हनुमान हा त्यातील ध्वजानाथ पंथाचा प्रवर्तक मानला जातो. या पंथाचे लोक हनुमानाचे परम उपासक आहेत. तांत्रिक मेळ्यातून मत्स्येन्द्रनाथाला गोरक्षाने सोडल्याची कथा प्रसिद्ध हे. त्या वेळी हनुमान आणि गोरक्षनाथ यांचे युद्ध होऊन हनुमानाला गोरक्षनाथांचा प्रभाव मानावा लागला. त्यातूनच हनुमंताच्या पूजेवर नाथसंप्रदायाचा प्रभाव पडला असावा आणि या सांप्रदायिकांनी वीर स्वरूपात त्याला आपलासा केला असावा.

या सर्व विवेचनावरून असे म्हणता येईल की हनुमान उपासनेचे दोन प्रमुख प्रवाह आहेत. रामायणातून नि राम परंपरेतून दिसणारा पराक्रमी, बुद्धिमंत, रामभक्त हनुमान आणि लोकपरंपरेतून दिसणारा रुद्रावतार, शनीशी साधम्र्य दाखवणारा, यक्षोपासनेशी जवळीक साधणारा, तंत्रोपासनेतही असणारा हनुमान. साधारण उत्तर भारतात वैष्णव परंपरेतला दास-हनुमान आणि लोक परंपरेतला वीर हनुमान प्रकर्षांने जाणवतो तर महाराष्ट्रात समर्थ परंपरेतला हनुमानाचा पगडा जाणवतो. असे असले तरीही महाराष्ट्रात लोक परंपरेतला हनुमानही आपले अस्तित्व टिकवून आहे. हनुमान ही लोकमान्य, आपली वाटणारी देवता आहे. त्यामुळे तिची बलोपासना आणि संकटमोचन प्रतिमा आजही तरुण भजतात हे जाणवते.
डॉ. प्राची मोघे – response.lokprabha@expressindia.com