दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. शॉपिंगला सुरुवात झालीच असेल. दिवाळीचे पाच दिवस वेगवेगळा लुक कॅरी करणे ओघाने आलेच. या सणासुदीच्या दिवसांसाठी कपडय़ांचे कोणते नवनवीन ट्रेण्ड्स सध्या बाजारात आले आहेत याबद्दल.

दिवाळीसारखे सण सगळ्यांचे आवडते. त्यातच काय ते छान तयार होऊन मिरवता येते, परंतु या वेळी केवळ आपण कपडे कोणते घालतोय यापेक्षाही आपण घातलेले कपडे कसे बरोबर टीमअप करतोय आणि कसे कॅरी करतोय हेही खूप महत्त्वाचे आहे. पाहू या कोणते हटके आऊटफिट्स आपण वापरू शकतो आणि कसे स्टाइल करू शकतो.

आऊटफिट्स

अनारकली विथ पँट्स

नेहमीचाच तोच तोच अनारकली सूट घालून घालून खूप बोअर झाला असाल तर अनारकली विथ पँट्स नक्की वापरून बघा. गेल्या एखाद्या वर्षांतला हा ट्रेण्ड आहे. अत्यंत क्लासी आणि सिम्पल पद्धतीने डिझायनर्सनी ही कॉन्सेप्ट रॅम्पवर उतरवली. यामध्ये नेहमीच्या अनारकलीप्रमाणेच घेरदार कुर्ती असते आणि ती नॅरो बोटम पँट्सबरोबर टीमअप केली जाते. वर एखादा सुंदर दुपट्टा घालून हा लुक तयार होतो. स्लीव्हलेस, ऑफ शोल्डर, फुल स्लीव्स किंवा थ्री फोर्थ स्लीव्हस या कुर्तीमध्ये खूप छान दिसतात. शिवून घेणार असाल तर स्पेसिफिक अशाच स्लीव्हस बनवून घ्या. केवळ शिफॉन, जॉर्जेट यामध्ये बंदिस्त न राहता, कॉटन, लिनन, मल, सिल्क, कॉटन सिल्क अशा फॅब्रिक्ससुद्धा या आऊटफिट्समध्ये वापरल्या जातात.

स्टायलिंग कसं कराल?

  • अनारकली म्हटलं की भरजरी कुर्ती डोळ्यासमोर येते; परंतु अनारकली विथ पँट्स वावरताना जास्त डिझाईन नसेल तरीही त्या आऊ टफिटलाच एक वेगळा आणि हटके पॅटर्न आहे. त्यामुळे तो खुलून दिसतो.
  • अनारकली कुर्ती आणि जोडीला सटल पँट्स वापरू शकता.
  • कधी कधी हेवी पँट्स आणि त्याला शोभून दिसणारी अनारकली कुर्ती वापरू शकता.
  • लुक कॅरी करताना त्याबरोबर एखादी ओढणी नक्की वापरा.
  • प्लेन अनारकली कुर्ती आणि पँट्स असतील तर हेवी दुपट्टा वापरून लुक पूर्ण करता येईल.
  • ओव्हर द टॉप ज्वेलरी वापरण्यापेक्षा हेवी कुंदन इयरिंग्स, भरपूर बांगडय़ा आणि टिकली लावून लुक कम्प्लीट करता येईल.
  • सोबतीला असलेला साजेसा मेकअप लुक उठावदार दिसण्यासाठी मदत करेल.

पलाझो पँट्स

सणासाठी पलाझो पँट्स घालताना तुम्ही लॉन्ग स्ट्रेट कुर्ती, अनारकली कुर्ती, क्रॉप टॉप्स किंवा चोलीबरोबर टीमअप करू शकता. हल्ली नेटच्या आत लायनिंग असलेल्या पलाझो पँट्स खूप ट्रेण्ड इन आहेत. नेट पलाझो वापरायला आवडत नसेल तर कॉटन सिल्क, लिनन, सिल्क या फॅब्रिक्समध्येही पलाझो पँट्स उपलब्ध असतात. दिवाळीतील पाच दिवसांपैकी दोन दिवस कार्यक्रमांसाठी बाहेर जाताना अनारकली कुर्ती विथ पलाझो, चोली विथ पलाझो खूप मस्त दिसेल. आऊट ऑफ द बॉक्स लुक तुम्हाला मिळेल. इतर दिवशी स्ट्रेट कट लॉन्ग लेन्थ कुर्ती विथ पलाझो, शॉर्ट कुर्तीबरोबर पलाझो अस कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता. पलाझो निवडताना त्याचा घेर किती असावा हे तुमच्या सोयीनुसार ठरवा.

स्टायलिंग कसं कराल ?

  • पलाझो आणि बरोबरीची कुर्ती किंवा चोली वापरताना त्यांचे कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित असू द्यावे.
  • दोन्हीही भडक किंवा दोन्हीही अति लाइट कॉम्बिनेशन झाले तर त्या लुकचा उठाव निघून जाईल.
  • हेअर बन किंवा हेयर प्लेट्स तुम्ही या लुकवर ट्रे करू शकता.
  • चोली फ्लॉन्ट करायची असेल तर दुपट्टा वापरायची गरज नाही. त्यासाठी चोलीचा पॅटर्न सिम्पल आणि तरीही युनिक निवडा. चोली किंवा एखादा हेवी क्रॉप टॉपसुद्धा चोलीची जागा घेऊ  शकेल.
  • हेवी इयरिंग्स वापरणार असाल तर शक्यतो गळ्यातले वापरू नका. त्याऐवजी हातात बांगडय़ा किंवा हेवी कडा वापरा.
  • माथा पट्टी किंवा हेवी मांगटिका या लुकला उठाव द्यायला मदत करेल अशा वेळी सिम्पल लहान इअर स्टड्स घाला.
  • चेन-नथनी सध्या खूप ट्रेण्ड इन आहे. ती या लुकला साजेशी दिसेल. चेन-नथनी वापरणार असाल तर इयरिंग्सऐवजी गळ्यात नेकलेस घाला.
  • कोणती हेयरस्टाइल करताय त्यानुसार माथा पट्टी किंवा मांगटिका वापरा.

केप जॅकेट्स आणि केप कुर्तीज

केप जॅकेट्स सध्या खूपच ट्रेण्ड इन आहेत. केप जॅकेट्स वापरायला अतिशय सुटसुटीत आणि तरीही दिसायला अत्यंत क्लासी दिसतात. दिवाळीला ओढणीऐवजी केप जॅकेट्स तुम्ही टीमअप करू शकता. लेयरिंग केल्यामुळे लुक काहीसा भरीव दिसेल आणि अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही उठावदार दिसाल. केप जॅकेट्स बरोबरीने केप कुर्तीजसुद्धा सध्या ट्रेण्ड इन आहेत. शक्यतो या कुर्तीजमध्ये मध्ये स्लिट असते. त्यामुळे नॅरो बोटम पँट्स, पलाझो, लाँग स्कर्ट्स त्याबरोबर टीमअप करू शकता. केप कुर्तीज या साधारणत: हाय कट असलेल्या असतात. दिसायला एलिगंट आणि वापरायला सोप्या अशा कुर्तीज एक युनिक ऑप्शन ठरू शकेल.

स्टायलिंग कसे कराल?

  • केप जॅकेट्स
  • केप जॅकेट्स कॉटन, लिनन, शिफॉन या फॅब्रिक्समध्ये मिळतील.
  • सणासुदीला शक्यतो शिफॉन केप जॅकेट्स वापरा.
  • एखादा प्लेन डीप स्लीव्हलेस टॉप, सिंगल स्ट्राइप टॉप किंवा कुर्तीबरोबर वर्क केलेले शिफॉन केप जॅकेट अत्यंत उठावदार दिसेल.
  • अनारकली कुर्तीबरोबरही तुम्ही केप जॅकेट वापरू शकता.
  • तुम्ही ते कशावर टीम करणार आहेत त्यानुसार कॉलर, स्लीव्हलेस, फुल स्लीव्ह असे पॅटर्न ठरवा.
  • रंगसंगती विचारात घेऊनच केप जॅकेट्स वापरा.
  • शिफॉन व्यतिरिक्त केप जॅकेट वापरणार असाल तर शक्यतो आतील कुर्ती प्लेन ठेवून त्यावर प्रिंटेड जॅकेट घाला.

केप कुर्तीज

  • केप कुर्तीज तुम्ही कशावर टीमअप करणार ते पॅटर्न बघून ठरवा.
  • मिड स्लिट कुर्ती टाइट्स बरोबर टीमअप करू नका. ते वाईट दिसू शकतं.
  • हाय वेस्ट कट कुर्ती टाइट्स बरोबर वापरू शकता.
  • हेवी फ्लेयर्ड स्कर्ट, लेहेंगा किंवा पलाझो पॅण्ट, हाय वेस्ट कट केप कुर्तीजबरोबर छान दिसतात.
  • नॅरो बॉटम अँकल लेंथ पँट्स आणि केप कुर्ती अत्यंत उठावदार दिसतात.
  • ओढणी वापरणार असाल तर व्यवस्थित टीमअप करा.
  • केप जॅकेट्स किंवा कुर्तीजवर ज्वेलरी ओव्हर साइझ इयर स्टडस् वापरा. खूप क्लासी लुक मिळेल. बरोबरीने हेडचेन्स वापरायला हरकत नाही. टिकली लावून लुक कम्प्लिट करा.

कॉलर ब्लाऊज

कॉलर ब्लाऊज सध्या खूप ट्रेण्ड इन आहे. नेहमीच्या ब्लाऊजपासून ते अगदी कमरेपर्यंत त्यांची लांबी असते. साडी, पलाझो, लेहेंगा याबरोबर कॉलर ब्लाऊज टीमअप करा. हल्ली लांबीला जास्त असलेला ब्लाऊज आणि साडी ट्रेण्ड इन आहे. ओढणी आणि लेहंगा शॉर्ट कॉलर ब्लाऊजबरोबर टीमअप करून मस्त लुक मिळवता येईल. तसेच पलाझो घालताना शॉर्ट ब्लाऊज किंवा लाँग ब्लाऊजबरोबर नक्कीच टीमअप करू शकता.

कसे स्टाइल कराल?

  • मधे भांग पाडून केसांचा छान बन बांधा आणि गजरा घाला. तो या लुकला खूपच शोभून दिसेल.
  • ब्लाऊजला कॉलर असल्यामुळे लांब कानातले घालणे टाळा.
  • कॉलरभोवती मस्त नेकपीस घाला.
  • कमरबंध खूप छान दिसेल.
  • चेक्स प्रिंट असलेले कॉलर ब्लाऊज आणि प्लेन साडी खूप उठावदार दिसेल.
  • छान टिकली लावा. स्मोकी आइज करा. तुमचा लुक परफेक्ट बनेल.

असे काही आऊटफिट्स तुम्ही नेहमीच्या अनारकली किंवा साडय़ांना पर्याय म्हणून तुम्ही वापरू शकता. खूपच एलिगंट आणि तरीही क्लासी असे हे आऊटफिट्स तुम्हाला नक्कीच वाहवा मिळवून देतील. सोबतीला व्यवस्थित आणि प्रमाणात मेकअप करा. तुम्हाला आवडेल आणि शोभून दिसेल अशा प्रकारे लुक स्टाइल केलं तर तुम्ही नक्कीच उठावदार दिसाल.
प्राची परांजपे – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader