प्रश्न : रेडिओ, टीव्हीवरून सरकार आयोडिनयुक्त मिठाची जाहिरात करत असते. बाजारात मिळणाऱ्या मिठात ‘पोटॅशिअम आयोडेट’ हा क्षार वापरून मीठ आयोडिनयुक्त केलेले असते. साधारण २० वर्षांपूर्वी वृत्तपत्रात यासंबंधी झालेल्या चर्चेत असे पुढे आले होते की, आयोडेट हे क्षार मानवी शरीरासाठी विषारी आहेत. आयोडाइड हेच क्षार खाण्याच्या पदार्थात तसेच औषधात वापरायला हवेत. रेनोलेन आय ड्रॉप्स या औषधाचा फॉम्र्यूला मी मुद्दाम नीट वाचला. त्यात पोटॅशिअम आयोडाइड हाच क्षार आहे. मग पोटॅशिअम आयोडेट मिठात का मिसळले जाते? ‘सायन्स रिपोर्टर’ या सरकार प्रसिद्ध करीत असलेल्या मासिकाच्या डिसेंबर २०१४च्या अंकात पोटॅशिअम आयोडेट हा क्षार किरणोत्सारबाधित रुग्णावर औषध म्हणून वापरतात अशी माहिती आहे. मग गलगंड आणि मेंदूची वाढ होण्यासाठी किरणोत्सारावरचे औषध मिठातून का दिले जाते?
किरणोत्सारावरचे औषध म्हणजे पोटॅशिअम आयोडेट आणि गलगंडावरचे औषध म्हणजे पोटॅशिअम आयोडाइड हे खरे आहे का?
– अ. गो. कानेटकर.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डॉ. अविनाश सुपे :
गेल्या काही वर्षांमध्ये थायरॉइडचे आजार कमी करण्यासाठी मिठामध्ये आयोडिन मिसळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी मिठामध्ये आयोडिनचे क्षार मिसळले जातात. आयोडाईड (क्िरीि) किंवा आयोडेट (किं३ी) ह्यापैकी कुठल्याही क्षाराचा वापर केला जातो. अमेरिकेत आयोडाईड (क्िरीि) वापरले जाते. तेथे आयोडेट वापरू नये असे त्या देशातील एफडीएचे आदेश आहेत. परंतु इतर सर्व देशांत आयोडेट वापरले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे आयोडेटचा स्थिरपणा. आयोडाइड हे अस्थिर असून त्याचे उष्णतेने विघटन होते. त्या मानाने आयोडेट हे स्थिर असून आपल्यासारख्या देशात ते वापरणे हे जास्त सोयीचे आहे. हे खरे आहे की आयोडेट हे किरणोत्सारबाधित रुग्णावर औषध म्हणून वापरतात. परंतु मिठामध्ये वापरलेले आयोडेटचे प्रमाण अत्यंत कमी असते व त्यापासून काही धोका नसतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१४ मध्ये प्रकाशित झालेल्या व २००६ च्या आपल्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ह्यची शिफारस केली आहे. औषधांमध्येही जिथे शक्य आहे तेथे आयोडाइड वापरले जाते.

प्रश्न : माझे वय सध्या ६२ वर्षे आहे. मागील अनेक वर्षे अ४२३१ं’्रं अल्ल३्रॠील्ल (ऌु२ अॠ) हा रक्तदूषित आजार मला आहे. मला या आजारापासून काहीही त्रास होत नाही. पण पुढील वार्धक्यात यापासून मला काही त्रास होऊ शकतो का? २००५ साली माझा पाय फॅ्रक्चर झाला होता, त्यावेळी केईएम हॉस्पिटलमधील डॉ. मोहन म. देसाई यांनी माझे ऑपरेशन केले. त्यावेळी त्यांनी मला याची कल्पना दिली व माझे ऑपरेशन सर्वात शेवटी केले होते.
मागील फेब्रुवारी महिन्यात माझे डाव्या डोळ्याचे एक ऑपरेशन झाले त्यावेळी सुद्धा वरील आजारामुळे माझे ऑपरेशन दोन दिवस उशिरा झाले.
मला डॉक्टरांनी कोणालाही रक्त न देण्याची सूचना केली आहे.
कृपया आपण याबद्दल मार्गदर्शन करावे, ही विनंती.
– रा. स. पाटे.

डॉ. अविनाश सुपे :
अ४२३१ं’्रं अल्ल३्रॠील्ल (ऌीस्र्ं३्र३्र२ इ) हा एका व्हायरसमुळे झालेला यकृताचा आजार आहे. ज्या रुग्णाचे रक्त दूषित झाले आहे अशा रुग्णाच्या रक्ताचा संपर्क आलेल्या इंजेक्शनच्या सुया वा उपकरणाचा पुनर्वापर, दूषित रक्ताचे केलेले दान किंवा अशा व्यक्तींशी केलेले शारीरिक संबंध याने हा आजार पसरू शकतो. आपल्याला याचा काही त्रास नाही याचा अर्थ, आपण कॅरिअर स्टेज (ूं११्री१ २३ंॠी) मध्ये आहात. या अवस्थेत तुमच्या शरीरात दूषित व्हायरस वास करीत असतात. परंतु त्यांचा शरीरावर घातक असा परिणाम होत नसतो. परंतु काही काळानंतर हे व्हायरस यकृतावर सूज आणून त्याला इजा करू शकतात. यासाठी आपण दर चार ते सहा महिन्यांनी त्यावर तपासण्या करून लक्ष देणे आवश्यक असते. दर चार-सहा महिन्यांनंतर यकृताच्या रक्त तपासण्या व प्लेटलेट्स मोजणी करावी. जर प्लेटलेट्स दोन लाखांपेक्षा कमी असतील वा रक्त तपासण्यात बदल आढळून आल्यास पुढच्या तपासण्या कराव्यात. यामध्ये सोनोग्राफी, अल्फा फिटो प्रोटीन व डीएनए क्वान्टिफिकेशन करावे लागते. या टेस्टमध्ये जर यकृताचा आजार वाढला असून त्यास सूज आली असेल तर महागडय़ा औषधांचा पूर्ण कोर्स करावा लागतो. आजार पुढे गेल्यास सिरोसीस व यकृताचा कर्करोगही होऊ शकतो. कॅरिअर स्टेजमध्ये आजार वर्षांनुवर्षे राहू शकतो. रक्तदानाने हा आजार दुसऱ्यांना होऊ शकतो म्हणूनच रक्तदान करू नये असा सल्ला दिला जातो. तसेच इतर रुग्णांना हा आजार होऊ नये म्हणून दिवसातील शेवटचे ऑपरेशन करून उपकरणे र्निजतुक केली जातात. आपण दर चार ते सहा महिन्यांनी रक्त तपासण्या करून डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य होईल.
आपणदेखील डॉक्टरांशी संवाद साधून त्यांना आपले प्रश्न विचारू शकता.. त्यासाठी ‘लोकप्रभा’ देत आहे व्यासपीठ.. संपादकीय विभाग पत्रव्यवहार : लोकप्रभा, प्लॉट नं. ईएल/१३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४००७१०.
डॉ. अविनाश सुपे – response.lokprabha@expressindia.com