मिलिंद ढमढेरे – response.lokprabha@expressindia.com
फुटबॉलमध्ये आजचे तारे वेगळे असले तरी पेले, मॅराडोना, फ्रँझ बेकेनबाउर यांच्यासारख्या पूर्वीच्या खेळाडूंची लोकप्रियता आजही अबाधित आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
क्रिकेटपेक्षाही जास्त लोकप्रियता लाभलेल्या फुटबॉलचे चाहते जगात सर्वदूर पसरले आहेत. दोनशेहून जास्त देशांमध्ये हा खेळ खेळला जातो हीच या खेळाच्या यशाची पावती आहे. या खेळाच्या विश्वचषक स्पर्धेत पेले, दिएगो मॅराडोना, सर बॉबी चार्लटन आदी ज्येष्ठ खेळाडूंच्या दिमाखदार कामगिरीचा आढावा घेतला गेला नाही तर नवलच. या श्रेष्ठ खेळाडूंनी खेळास अतिउंचीवर नेण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे.
अत्यानुधिक सुविधांचा अभाव, करिअरसाठी केलेला संघर्ष, विश्वचषकासह अनेक महत्त्वपूर्ण स्पर्धामध्ये त्यांनी केलेली अतुलनीय कामगिरी यामुळेच या खेळाडूंची महानता अधोरेखित होते. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (फिफा) आयोजित विश्वचषक स्पर्धा सुरू होऊन ८८ वर्षे झाली आहेत. या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी नेहमीच प्रचंड उत्कंठा निर्माण झालेली असते. त्याचप्रमाणे जेव्हा पेले, मॅराडोना यांच्यासारखे श्रेष्ठ खेळाडू या स्पर्धेच्या वेळी येतात तेव्हा त्यांच्याभोवती हॉलीवूडमधील ख्यातनाम कलाकारांइतकीच चाहत्यांची अलोट गर्दी असते.
पेले – हजार गोलांचा सम्राट!
ब्राझीलने १९५० च्या दशकाच्या उत्तरार्धात फुटबॉल खेळास मोठी देणगी दिली. ती म्हणजे हजार गोलांचा सम्राट म्हणून ओळखले जाणारे पेले. एडिसन अरांतेस दो नासिमेन्टो हे पेले यांचे पूर्ण नाव. मात्र त्यांना पेले याच नावाने लोकप्रियता लाभली. १९५८ मध्ये स्वीडनमध्ये आयोजित केलेल्या विश्वचषक स्पर्धेत पेले यांना पहिल्यांदा ही स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली. त्या वेळी ते अवघे १७ वर्षांचे होते. त्यांनी केलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर ब्राझीलने अंतिम फेरी गाठली. तसेच त्यांनी अंतिम फेरीत दोन गोल करीत संघास अजिंक्यपद मिळवून दिले. १९६२ च्या स्पर्धेत दुखापतीमुळे त्यांना फारसे सामने खेळता आले नाहीत. त्याची कसर त्यांनी १९७० मध्ये भरून काढली. १९७०च्या अंतिम फेरीत त्यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीमुळेच पुन्हा ब्राझीलला विजेतेपद मिळाले. दहा क्रमांकाची जर्सी घालून खेळणाऱ्या पेले यांच्याकडे एकदा चेंडू आला की तो चेंडू गोलातच जाणार अशीच त्यांची ख्याती होती. विश्वचषकाबरोबरच अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये ब्राझील संघास अव्वल यश मिळवून देण्यात पेले यांचा महत्त्वाचा वाटा होता. कारकीर्दीत त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. केवळ फुटबॉल नव्हे तर क्रीडा क्षेत्रातील नवोदित खेळाडूंना ते प्रेरणास्थानीच आहेत.
गॅरिंचा – फुटबॉलचा जादूगार!
पेले यांच्याबरोबरच गॅरिंचा यांनीही ब्राझीलच्या दिमाखदार यशात खूप मौलिक कामगिरी केली. खरे तर त्यांचे दोन्ही गुडघे खेळाच्या दृष्टीने बेढब किंवा बेडौल होते. तरीही त्यांनी या खेळात अतिशय सुरेख कौशल्य दाखविले. १९५८ मध्ये त्यांनी पेले यांच्यासमवेत संघास विश्वविजेतेपद मिळवून दिले. १९६२ मध्ये पेले यांच्या अनुपस्थितीत गॅरिंचा यांनी संघास सर्वोच्च यश मिळवून देण्याची कामगिरी आपल्या खांद्यावर घेतली व शेवटपर्यंत ती पार पाडली. या स्पर्धेनंतर त्यांना गुडघ्याच्या दुखापतींमुळे खेळ सोडावा लागला. बोटाफोगो या संघाकडून खेळताना त्यांनी संघास अनेक वेळा राष्ट्रीय अजिंक्यपद मिळवून दिले. अवघ्या वयाच्या ४९ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
सर बॉबी चार्लटन
इंग्लंडला १९६२ मध्ये विश्वचषक जिंकता आला नाही, मात्र या स्पर्धेने या खेळास एक चतुरस्र खेळाडू दिला. सर बॉबी चार्लटन यांनी १९६२ मध्ये विश्वचषक स्पर्धेतून करिअरला प्रारंभ केला. दोन्ही पायांनी अव्वल चाली करण्यात निष्णात असलेले खेळाडू म्हणून त्यांना लोकप्रियता लाभली. त्यांनी १९६६ मध्ये इंग्लंडला विश्व चषक जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. मँचेस्टर युनायटेड संघाकडून खेळताना त्यांनी संघास युरोपियन स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवून दिले. या स्पर्धेतील सवरेत्कृष्ट खेळाडूसह त्यांना करिअरमध्ये अनेक पुरस्कार लाभले.
मॅराडोना – एकांडा शिलेदार
फुटबॉल हा जरी सांघिक खेळ असला तरी विजेतेपदाचा एकहाती शिलेदार म्हणून दिएगो मॅराडोना हे नेहमीच चाहत्यांच्या हृदयस्थानी वसलेले आहेत. १९८६ च्या स्पर्धेत त्यांनी मुख्य फेरीतील सात सामन्यांमध्ये पाच गोल केले, तर अन्य पाच गोल करण्यात आपल्या सहकाऱ्यांना अचूक साथ दिली होती. त्यामुळेच अर्जेन्टिनास विश्वचषकावर आपले नाव कोरता आले. या स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या लढतीत त्यांनी नोंदविलेला दुसरा गोल हा विश्वचषक स्पर्धेतील आजपर्यंतचा सवरेत्कृष्ट गोल मानला जातो. चेंडूवर नियंत्रण ठेवण्याचे, सहकाऱ्यांना योग्य पास देण्याचे त्यांचे कौशल्य नेहमीच कौतुकास्पद असे. या स्पर्धेतील सवरेत्कृष्ट खेळाडूचा मानही त्यांना मिळाला. १९९०च्या स्पर्धेतही त्यांनी आपल्या शैलीचा ठसा उमटविला.
योहान क्रायुफ – बुद्धिवान खेळाडू
काही खेळाडू आक्रमक शैलीपेक्षाही बुद्धिचातुर्याच्या जोरावर किमयागार ठरतात. नेदरलॅण्ड्सचे श्रेष्ठ खेळाडू योहान क्रायुफ यांनी नावलौकिक मिळविला. त्यांना आपल्या करिअरमध्ये संघास विश्वविजेतेपद मिळवून देण्यात यश मिळाले नाही तरीही १९७४ च्या विश्वचषक स्पर्धेत व्यूहरचना, कल्पक चाली, नियोजनबद्ध खेळ आदीबाबत त्यांची कामगिरी अप्रतिमच ठरली आहे. त्यांना गोल्डन बॉलचा मान मिळाला. अजॅक्स या क्लबला त्यांनी अक्षरश: शून्यातून युरोपियन स्पर्धेतील सर्वोत्तम संघ म्हणून नावलौकिक मिळवून दिला.
पुस्कास – कल्पक खेळाडू
हंगेरीचा शैलीदार व कल्पक खेळाडू म्हणून फेरेंक पुस्कास यांचे नाव झटकन डोळ्यासमोर येते. हंगेरीकडून या स्पर्धेत ८५ सामन्यांमध्ये ८३ गोल ही त्यांची कामगिरीच त्यांच्या शैलीची पोचपावती आहे. त्याचप्रमाणे क्लबस्तरावर त्यांनी ५२९ सामन्यांमध्ये ५१४ गोल करीत आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. १९५४ च्या स्पर्धेतील साखळी सामन्यांमध्ये त्यांच्या कामगिरीच्या जोरावर हंगेरीने पश्चिम जर्मनीवर ८-३ अशी मात केली. विजेतेपदासाठी ते दावेदार होते. अंतिम फेरीपूर्वी पुस्कास यांना दुखापतीमुळे दोन सामन्यांमध्ये भाग घेता आला नाही. अंतिम फेरीत दुखापतीमधून १०० टक्के तंदुरुस्त झाले नाहीत तरीही त्यांनी जिद्दीने भाग घेतला. दुर्दैवाने त्यांच्या संघास विजय मिळविता आला नाही. या सामन्यात त्यांनी गोलही केला. मात्र संघ जिंकला नाही. रेआल माद्रिद संघास दोन वेळा युरोपियन चषक जिंकून देण्यात त्यांची कामगिरी खूप मोलाची ठरली. मुलखावेगळ्या चाली करीत प्रतिस्पर्धी खेळाडूंना संभ्रमात टाकणारी त्यांची शैली होती.
फ्रँझ बेकेनबाउर- महान अष्टपैलू खेळाडू
क्लब स्तरावर व आंतरदेश स्तरावर दोन्हीकडे अव्वल यश मिळविणारे खेळाडू फार थोडे असतात. फ्रँझ बेकेनबाउर या जर्मनीच्या खेळाडूंची शैली अतुलनीय होती. बायर्न म्युनिच संघास तीन वेळा युरोपियन स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले. त्याचप्रमाणे जर्मनीचे कर्णधारपद भूषविताना त्यांनी १९७४ मध्ये विश्वचषकावर आपल्या देशाचे नाव कोरले. पुन्हा १९९० मध्ये त्यांनी जर्मनीचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करताना संघास विश्वचषक जिंकून दिला. प्रभावी खेळाडू व प्रशिक्षक अशा दोन्ही भूमिकांमध्ये अतिशय यशस्वी झालेल्यांमध्ये त्यांना स्थान आहे. कर्णधार व प्रशिक्षक म्हणून सहकारी खेळाडूंना प्रेरणा देण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
रोनाल्डो – ब्राझीलचा किमयागार
आपल्या सुरेख कौशल्याच्या जोरावर चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झालेला खेळाडू म्हणून ब्राझीलच्या रोनाल्डो याची लोकप्रियता आहे. १९९६ मध्ये फिफा सवरेत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याला मान मिळाला. त्या वेळी तो जेमतेम २० वर्षांचा होता. १९९८ मध्ये त्याला गोल्डन बॉलचा मान मिळाला. त्यानंतर दोन वेळा गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे त्याचे करिअर संपुष्टात येण्याची वेळ आली होती, मात्र या संकटांना त्याने धैर्याने सामोरे जात पुन्हा २००२ च्या विश्वचषक स्पर्धेत पुनरागमन केले. एवढेच नव्हे तर कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना त्याने ब्राझीलला आणखी एक विश्वचषक जिंकून दिला. या स्पर्धेत त्याने रिवाल्डो व रोनाल्डिनो यांच्या साथीत उत्कृष्ट सांघिक कौशल्य दाखविले. संघास कोपा अमेरिका स्पर्धेतही त्याने अव्वल यश मिळवून दिले. बार्सिलोना क्लबकडून खेळताना त्याने १९९६-९७ च्या मोसमात ४९ सामन्यांमध्ये ४७ गोल करीत आपल्या शैलीचा ठसा उमटविला. त्यानंतर रेआल माद्रिद क्लबकडूनही अतुलनीय कामगिरी केली. या संघाकडून त्याने पाच वर्षांमध्ये ८३ गोल नोंदविले.
या खेळाडूंप्रमाणेच मायकेल प्लॅटिनी, झिनेदिन झिदान, अल्फ्रेड डीस्टिफानो यांनीही आपल्या शैलीद्वारे चाहत्यांना आपलेसे केले होते. प्लॅटिनी व झिदान यांनी फ्रान्सचे आव्हान सांभाळताना खूपच प्रभावी कामगिरी केली होती. प्लॅटिनी यांना आपल्या संघास विश्वचषक जिंकून देण्यात यश मिळाले नाही, तरीही मातब्बर खेळाडू म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला. प्लॅटिनी यांचे अपुरे राहिलेले स्वप्न झिदान यांनी १९९८ च्या विश्वचषक स्पर्धेत पूर्ण केले. त्यांनी अंतिम सामन्यात दोन गोल करीत फ्रान्सला विश्वचषक जिंकून दिला.
रशियात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत कोण गोल्डन बॉलचा मानकरी होणार याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या स्पर्धेतही काही अनपेक्षित निकाल नोंदविले जाण्याची शक्यता आहे. ही स्पर्धा म्हणजे चाहत्यांसाठी खेळाचा निखळ आनंद मिळवून देणारी मेजवानीच आहे.