सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना इच्छाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी डॉक्टर, इंजिनीअर किंवा सॉफ्टवेअर इंजिनीअर होण्याची स्वप्ने पडत असताना एक मराठी तरुण मात्र व्यायामाच्या आवडीवर पोसला गेला, भारतातील उत्तम सायकलिस्ट झाला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियातील वर्ल्ड फिटनेस इन्स्टिटय़ूटमधून व्यायामाचेच वैज्ञानिक शिक्षण घेऊन भारतात परतला. आज ‘फिटनेस गुरू’  म्हणून सुपरिचित असलेल्या या तज्ज्ञाचे नाव शैलेश परुळेकर.

व्यायाम आणि क्रीडा या दोन्ही  क्षेत्रात शैलेश परुळेकर हे नाव आधीही परिचित होते पण सामान्यांना ठाऊक झाले ते नटरंगमध्ये पीळदार शरीरयष्टीचा अतुल कुलकर्णी पाहिल्यानंतर. त्यानंतर तर सिनेमाच्या क्षेत्रातील नामवंतांची त्यांच्याकडे रांग लागली आणि परुळेकर सेलिब्रिटी ट्रेनर म्हणून ओळखले जाऊ लागले. पण त्यांना स्वतला या शब्दाबद्दल जराही आकर्षण नाही, उलट ते म्हणतात मी केवळ एक व्यायाम प्रशिक्षक आहे, सेलिब्रिटी माझ्याकडे येतात म्हणून मी सेलिब्रिटी होत नाही. सेलिब्रिटीच सेलिब्रिटी असतात, आपण नाही, हे  करिअर करताना लक्षात ठेवावे लागते अन्यथा गर्वाचे घर खाली यायला वेळ लागणार नाही.

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Kevin Pietersen is available to become the batting coach of the Team India his post viral on social media
Kevin Pietersen : टीम इंडियाचा फलंदाजी प्रशिक्षक होण्यासाठी इंग्लंडचा ‘हा’ दिग्गज उत्सुक, पोस्ट होतेय व्हायरल
Increase in the number of people obtaining international driving licenses pune news
पुणे: आंतरराष्ट्रीय वाहनचालक परवाने काढणाऱ्यांमध्ये वाढ
PM Modi to dedicate 3 frontline naval combatants to nation
आत्मनिर्भरतेतील आव्हाने!
Rohit sharma starts training ahead of england and Champions Trophy running at the BKC in Mumbai video goes viral
Rohit Sharma : रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सुरु केला सराव, मुंबईतील बीकेसीत धावतानाचा VIDEO व्हायरल
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
magsaysay award sonam wangchuck
खरा ‘रँचो’ कोणता? महावीरचक्र विजेता, की मॅगसेसे विजेता? विकीपीडियाने…

परुळेकरांच्या वडिलांची गुडअर्थ नावाची फाऊंड्री होती, तिथे अनेक व्यायामशाळांसाठी डंबेल्सआदी उपकरणे तयार करण्यासाठी यायची. बहुतांश व्यायामशाळांमध्ये हीच साधनसामग्री वापरली जायची. त्याचे आकर्षण असलेल्या शैलेशना शाळेत असतानाच व्यायामाची आवड लक्षात आली. मिठीबाई कॉलेजला असताना त्यांनी सायकलिंग करण्यास सुरुवात केली होती; एवढेच नव्हे तर राष्ट्रीय स्पर्धामध्ये बाजीही मारली होती. भारतातील सवरेत्कृष्ट सायकलिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरमन फ्रामना यांच्याशी तिथेच परिचय झाला. त्यावेळेस राष्ट्रीय स्तरावरचे प्रशिक्षण पटियालाच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्टस्मध्ये व्हायचे.  शैलेश सांगतात, याच प्रशिक्षणादरम्यान लक्षात आले की,   केवळ व्यायामाची आवड असून उपयोग नाही, करिअर करायचे तर त्यामागचे विज्ञान शिकावे लागेल, समजून घ्यावे लागेल. फिटनेस किंवा व्यायाम हे विज्ञान आहे आणि तो शिकवणे ही कला.

क्रीडा क्षेत्राकडे आता विज्ञान म्हणून पाहिले जाते, त्याला स्पोर्टस् सायन्स असे जगभर म्हटले जाते. त्यामुळे मग हे विज्ञान शिकण्यासाठी त्यांनी ऑस्ट्रेलियातील वर्ल्ड फिटनेस इन्स्टिटय़ूट गाठली. तिथे फिटनेसचा वैज्ञानिक अभ्यासक्रम पूर्ण करून या व्यवसायासाठी लागणारा जागतिक परवाना घेऊन ते परत आले. आपल्याकडे व्यायामशाळा सुरू करण्यासाठी कोणताही परवाना लागत नसला तरी जगभरातील अनेक देशांमध्ये तो गरजेचा असतो. डॉक्टरला ज्याप्रमाणे पदवीशिवाय दवाखाना सुरू करता येत नाही, तसेच काहीसे. स्पोर्टस् सायन्स या विषयातील पदव्युत्तर पदवी घेतलेले, पीएचडीधारक, ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलेले अशा तज्ज्ञांच्या हाताखाली तिथे प्रशिक्षण मिळाले, त्यातून या विषयाकडे विज्ञान म्हणून पाहण्याची दृष्टी विकसित तर झालीच पण त्याहीशिवाय महत्त्वाचे म्हणजे व्यावसायिकताही अंगी बाणवता आली. तुम्हाला हाच व्यवसाय किंवा करिअर म्हणून करायचे तर त्याचे सखोल ज्ञान असलेच पाहिजे. ते तिथे मिळाले. या प्रशिक्षणादरम्यान व्यायामाबद्दल असलेले अनेक गैरसमज गळून पडले, शैलेश सांगतात.

१७ एप्रिल १९९९ साली त्यांनी कांदिवली येथे परुळेकर जिम्सची सुरुवात केली. व्यायाम ही गोष्ट अशी आहे की, पूर्वी करायचो असे सांगून भागत नाही. त्या क्षणाला तुमच्याकडे पाहून समोरच्याला तुमच्या क्षमतेबद्दल विश्वास वाटावा लागतो. त्यामुळे तुम्हाला पहिली मेहनत स्वतच्या शरीरावर घ्यावी लागते. शिवाय इतर सर्वच क्षेत्रांमध्ये जसे सातत्याने बदल होत असतात, तसेच ते याही क्षेत्रात होत असतात. त्यामुळे तुम्हाला जगासोबत अपडेटेड रहावे लागते. व्यायाम म्हणजे केवळ कसरतीचे प्रकार नव्हेत. त्यासाठी तुम्हाला मानवी शरीररचनाशास्त्र कळावे लागते, ते समजून घेऊनच मग काम करावे लागते. या साऱ्या प्रवासात आई- वडिलांनी, पत्नी अश्विनीने आणि नंतरच्या काळात मुलगा अभिषेक यानेही साथ दिल्याचा उल्लेख शैलेश आवर्जुन करतात.

पहिल्यांदा कांदिवली, मग गोरेगाव आता मीरारोड अशा परुळेकर्सच्या शाखा सुरू झाल्या आहेत. खरेतर मुंबईबाहेरही पुणे आदी शहरांतून त्यांच्याकडे शाखा सुरू करण्याची मागणी होते आहे. मात्र आपण किती धावायचे ते आपल्यालाच ठरवावे लागते असे ते सांगतात. केवळ प्रसिद्धी मिळते म्हणून व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न क्षमतेबाहेर केला तर नंतर अपयशही पदरी येऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही माझी आवड आहे, त्यामुळे हे करताना समाधान हेही पैशांइतकेच महत्त्वाचे आहे. क्षमतेबाहेर काम करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पैसे वाढले पण समाधान गेले आणि नंतर अपप्रसिद्धीही झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे आपण आपली क्षमता ओळखायला शिकावे, असे शैलेश सांगतात. प्रामाणिकपणे काम केले तर पैसा आणि प्रसिद्धीही मिळते, त्यासाठी या दोन्हींच्या मागे धावत जाण्याची काहीच गरज नाही. मेहनत आणि संयमच स्वतहून तुम्हाला त्या मार्गावर नेईल, असे शैलेश आवर्जून सांगतात.
शैलेश परुळेकर (छायाचित्र: दिलीप कागडा)
विनायक परब
vinayak.parab@expressindia.com, twitter – @vinayakparab

Story img Loader