49-lp-fortपूर्वी किल्ल्यांचे जतन-संवर्धन करण्यामागचे हेतू वेगळे होते. आज ते हेतू उरलेले नाहीत. पण आज मोठय़ा संख्येने ट्रेकिंगसाठी किल्ल्यांवर जाणाऱ्या तरुणांनी एकेकाळचं किल्ल्यांचं महत्त्व समजून घ्यायला हवं.

‘संपूर्ण राज्यांचे सार ते दुर्ग. दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येता, प्रजाभग्न होऊन देश उद्ध्वस्त होतो.’ रामचंद्रपंत अमात्यांनी लिहिलेल्या आज्ञापत्रातील ही वाक्ये शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि गडांचे महत्त्व अधोरेखित करतात. आज महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. आजमितीला अनेक संस्था किल्ले संवर्धनाचे कार्य करीत आहेत, पण एखादा तरी किल्ला बांधला तसा परत उभा करावा हे स्वप्न सत्यात उतरणे कठीण गोष्ट आहे. किल्ल्यांचे अनेक प्रकार असले तरी आजमितीला महाराष्ट्रात गिरिदुर्ग (डोंगरी किल्ला), भुईकोट, जलदुर्ग (पाणकोट), नगरकोट, वनदुर्ग आणि गढय़ा पाहायला मिळतात. या किल्ल्यांची जातकुळी वेगवेगळी असली तरी त्यात काही भाग समान आहे. किल्ल्यांच्या प्रकारातील अव्वल किल्ला म्हणजे गिरिदुर्ग, म्हणजेच डोंगरी किल्ले. एखादा आदर्श गिरिदुर्ग आज उभा करायचा आपण ठरवले तर त्यात किल्ल्यातील महत्त्वाचे भाग कोणते असतील ते पाहू या.

Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
Sanjay raut Maharashtra unsafe
Sanjay Raut: “मोदी जेव्हा येतात, तेव्हा महाराष्ट्र असुरक्षित”, संजय राऊत यांची टीका
maharashtra pollution control board to submit report to ngt on noise pollution
सर्वच गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषण! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार ‘एनजीटी’ला अहवाल
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र
Municipal Commissioner Bhushan Gagrani warns Law Department not to delay in court cases
न्यायालयीन प्रकरणांत दिरंगाई नको, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा विधि विभागाला इशारा
शहरापेक्षा नागपूर ग्रामीणमध्ये चुरस अधिक, कुठे बंडखोरी, तर कुठे प्रस्थापितविरोधी लाट

50-lp-fortगिरिदुर्गाचे प्रामुख्याने पुढील चार भाग पडतात-

घेरा : किल्ल्याच्या पायथ्याजवळचे गाव म्हणजे घेरा.

मेट : किल्ला व तळातील गाव यांच्या मधे असणारी मोक्याची किंवा वस्तीची तटबंदीरहित जागा.

माची : किल्ल्याच्या बालेकिल्ल्याखालील लांब पसरलेल्या पठाराला माची म्हणतात. या माचीला तटबंदी केलेली असते. माचीवर गडावरील सन्याची वस्ती असते.

बालेकिल्ला : किल्ल्यातील सर्वात संरक्षित भागाला बालेकिल्ला म्हणतात. किल्ल्याच्या माचीच्या वर एखादा उंच भाग किंवा टेकडी असल्यास त्यास तटबंदी बांधून संरक्षित केले जाते. या बालेकिल्ल्यावर महत्त्वाच्या व्यक्तींची घरे, वाडे असत. पाण्याची सोय व धान्यकोठार इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी बालेकिल्ल्यावर असत. बालेकिल्ला म्हणजे किल्ल्याच्या आतील छोटा, स्वतंत्र किल्ला असे. त्यामुळे किल्ल्याची माची शत्रूच्या हाती गेल्यावरही बालेकिल्ल्यावरूनही लढाई जारी ठेवता येई.

51-lp-fortकिल्ल्याचे इतर महत्त्वाचे भाग :-

प्रवेशद्वार : किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या बुलंद, प्रशस्त प्रवेशद्वाराला महादरवाजा म्हणतात. याच्या संरक्षणासाठी बुरुजांची रचना केलेली असते. काही किल्ल्यांवर एकामागोमाग एक अनेक दरवाजांची मालिका असते, तर काही किल्ल्यांवरील दरवाजांची बांधणी गोमुखी पद्धतीची असते. प्रवेशद्वारावर अणकुचीदार खिळे ठोकलेले असतात. त्यामुळे हत्तींनी धडका देऊन दरवाजा तोडता येत नाही. प्रवेशद्वार केवळ महत्त्वाच्या प्रसंगी पूर्ण उघडतात. इतर वेळी प्रवेशद्वारात असणाऱ्या छोटय़ा ‘िदडी दरवाजाने’ प्रवेश दिला जात असे. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस अडसर (अर्गळा) लावलेला असे. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकऱ्यांना बसण्यासाठी जागा ठेवलेली असे. त्यास ‘देवडी’ म्हणतात.

तटबंदी : किल्ल्याची माची, बालेकिल्ला हे भाग घडीव दगडांची िभत बांधून संरक्षित केलेले असत. या िभतीला तटबंदी म्हणतात. तटबंदी बांधण्यासाठी चुना, शिसे यांचा वापर केला जाई. तोफेच्या गोळ्याचा परिणाम कमी होण्यासाठी तटबंदीची िभत सरळ न बांधता नागमोडी बांधली जाई.

बुरुज : तटबंदीत ठरावीक अंतरावर तटबंदीपासून पुढे आलेले बुरुज बांधले जात. बुरुज अर्धगोलाकार, षटकोनी, त्रिकोणी इत्यादी आकारांचे बांधले जात. बुरुजांवर भरपूर जागा असल्यामुळे त्यावर तोफा ठेवल्या जात असत.

जंग्या : तटबंदी व बुरुजात ठिकठिकाणी गोळीबार करण्यासाठी छिद्रे ठेवलेली असतात, त्यांना जंग्या म्हणतात.

चऱ्या : गडाच्या तटबंदी व बुरुजावर घडीव किंवा पाकळ्यांच्या आकाराचे दगड ठेवलेले असतात त्यांना चऱ्या म्हणतात. या चऱ्यांच्या आड लपून शत्रूवर गोळीबार करता येई.

फांजी : गडाच्या तटबंदीवर पहारेकऱ्यांना गस्त घालण्यासाठी जागा ठेवलेली असते, त्यास फांजी म्हणतात. फांजीवर जाण्यासाठी जिना ठेवलेला असतो.

धान्यकोठार (अंबरखाना) : किल्ल्यावर धान्य साठवण्यासाठी बांधलेली इमारत म्हणजे धान्यकोठार (अंबरखाना). यात गडावरील लोकांना सहा महिने पुरेल इतके धान्य साठवले जाई.

दारूकोठार : गडावर लागणारा दारूगोळा या कोठारात साठवला जाई. दारूकोठार वस्तीपासून दूर बांधले जाई, तसेच शत्रूच्या माऱ्याने दारूकोठार पेटू नये म्हणून बऱ्याचदा जमिनीखाली बांधण्यात येई.

पागा : गडावरील घोडय़ांना बांधून ठेवण्यासाठी पागा बांधलेल्या असत.

चोर दरवाजा : प्रत्येक गडाला मुख्य दरवाजा सोडून एक ते तीन चोर दरवाजे असत. हे चोर दरवाजे तटबंदीत लपवलेले असत. त्यांचा उपयोग गड शत्रूच्या ताब्यात गेल्यास पळून जाण्यासाठी होत असे. तसेच गडाला वेढा पडल्यावर रसद पुरवण्यासाठी होत असे.

नगारखाना : गडाच्या प्रवेशद्वारावर नगारखाना असे. गडाची दारे उघडताना व बंद होताना तसेच महत्त्वाच्या प्रसंगी येथे नगारे वाजवले जात.

पाण्याचे टाक/ तलाव/ विहीर : गडावर पाण्याचा साठा जितका जास्त तितका गड जास्त दिवस लढवता येत असे. यासाठी गडावर कातळात खोदलेली पाण्याची टाकं, तलाव, विहिरी यांची योजना केलेली असे.

इमारती : किल्ल्यावर त्याच्या उपयोगाप्रमाणे राजवाडे, कचेरी, सदर इत्यादी इमारती असतात.

52-lp-fortयाशिवाय भुईकोटाचे संरक्षण करण्यासाठी खंदकखोदलेला असतो. शत्रूला किल्ल्याच्या तटबंदीला भिडता येऊ नये यासाठी किल्ल्याभोवती रुंद व खोल खंदक खणला जात असे. या खंदकात जवळच्या नदीतून किंवा तलावातून पाणी सोडले जात असे. पाण्यात विषारी साप, मगरी, सुसरी सोडून त्याची अभेद्यता वाढवली जाई. खंदकावर काढता-घालता येणारा पूल बसवला जाई. सूर्यास्तानंतर व युद्धप्रसंगी पूल काढून घेतला जाई.

किल्ल्यांची निर्मिती युद्धकाळात शत्रूच्या हल्ल्यापासून सनिकांचे आणि आजूबाजूच्या प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी होत असे. शांततेच्या काळात देशांतर्गत आणि परदेशाशी होणारा व्यापार हा कोणत्याही राजवटीच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असे. त्यामुळे या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी किल्ल्यांचा उपयोग होत असे. महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती पाहता पश्चिमेला अरबी समुद्र त्याला मिळणाऱ्या असंख्य नद्यांची मुखे, खाडय़ा, दलदलीचा प्रदेश, कोकणातली घनदाट जंगले, त्यापुढे खडा सह्यद्री, घाटमाथा आणि मदान अशी साधारणपणे रचना आहे. त्यामुळे किनारपट्टींवरील बंदरात उतरणारा माल वेगवेगळ्या घाटवाटांनी घाटांवरच्या बाजारपेठेत जात असे. या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी बंदर, घाटमार्ग व घाटमाथा अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. इतिहासात राजवटी बदलल्या तशी राजधानींची ठिकाणे बदलली आणि त्याप्रमाणे बंदरांचे, घाटवाटांचे महत्त्व कमी-जास्त होत गेले. काही वाटा नष्ट झाल्या, काही किल्ल्यांचे महत्त्व कमी झाले.

53-lp-fortआज किल्ल्यांवर जाणे तुलनेने सोपे झालेले आहे. मोठय़ा प्रमाणावर तरुण वर्ग आज किल्ल्यांवर जाताना दिसतो. किल्ल्यावर जाण्यापूर्वी किल्ल्याच्या इतिहासाबरोबर त्याच्या भौगोलिक स्थानाचा अभ्यास केल्यास अनेक गोष्टींचा उलगडा होतो. आजमितीला गुगल मॅप प्रत्येकाच्या मोबाइलवर आहे. त्यावरून तिथून जाणाऱ्या घाटवाटा, त्यांच्या संरक्षणासाठी उभी केलेली किल्ल्यांची साखळी याचा अभ्यास करता येईल. किल्ल्यांच्या साखळीचे एक उदाहरण म्हणून शिवाजी महाराजांनी बांधलेल्या प्रतापगडाचे देता येईल. महाबळेश्वरी उगम पावणारी सावित्री नदी अरबी समुद्राला बाणकोटजवळ मिळते. प्राचीन काळापासून महाड गावातून वाहणाऱ्या सावत्री नदीतून व्यापार चालत असे. घाटावर जाणारा माल विविध (वरंधा, आंबेनळी, पार घाट, मढय़ा घाट, ढवळ्या घाट इत्यादी) घाटमार्गानी घाटमाथ्यावरील बाजारपेठेत जात असे. त्यापकी वरंधा घाट (महाड ते भोर) व आंबेनळी घाट (पोलादपूर ते महाबळेश्वर) या मार्गावर रस्ते बनवल्यामुळे आजही वापरात आहेत. या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी बंदर, घाटमार्ग व घाटमाथा अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. सावित्री नदीच्या (खाडीच्या) मुखावर असलेला बाणकोटचा किल्ला, घाटमार्गाचे रक्षण करणारा कावळा, चंद्रगड, मंगळगड, प्रतापगड इत्यादी किल्ले आणि घाटमाथ्यावर असणारे कमळ, केंजळ इत्यादी किल्ले अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे.

किल्ल्याचे भौगोलिक स्थान जेवढे महत्त्वाचे तेवढीच किल्ल्याची बांधणी, त्यासाठी केला गेलेला नसíगक रचनेचा वापर, किल्ला मजबूत आणि लढता येण्यायोग्य करण्यासाठी केलेल्या तरतुदी, त्यावरील पाण्याचे साठे याचा अभ्यास करण्यासारख्या गोष्टी आहेत.
अमित सामंत
response.lokprabha@expressindia.com