भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले कोट् डा अझर्ु म्हणजेच इंग्लिश भाषेतील फ्रेंच रिव्हिएरापैकी एक. व्हिक्टोरिया राणी, सातवा एडवर्ड यांचं हे उन्हाळ्यातलं विश्रांतीचं ठिकाण. रेल्वे आल्यानंतर ते सगळ्याच युरोपियन लोकांचं आवडीचं ठिकाण झालं. आवर्जून पाहिलंच पाहिजे अशा पर्यटनस्थळांमध्ये त्याचा समावेश होतो.

फ्रान्स हा अटलांटिक व भूमध्य समुद्राचा किनारा, डोव्हर चॅनलशी संलग्न, असा देश. या दोन्ही समुद्रांचे सान्निध्य, देशातून वाहणारी ऱ्हाईन नदी यांच्या अस्तित्वामुळे इथे व्यापार तसंच सागरी वाहतूक मोठय़ा प्रमाणात आहे. अशा विविध कारणांमुळे इथे रहदारी जास्त आहे. या सर्व सोयींमुळे पाचव्या ते १७ व्या शतकापर्यंत व्यापारी, धार्मिक, शैक्षणिकबाबतीत पुढारलेले युरोपातील शहर. ह्य काळात बांधलेल्या इमारती ज्या युनेस्कोने जाहीर केलेल्या वास्तू, फॅशन जगत, टुमदार गावं, निसर्गरम्य किनारे अशा अनेक कारणांमुळे फ्रान्स हे सदैव आघाडीवरच राहिले.

Mumbai temperature increase
मुंबईचे तापमान वाढण्याची शक्यता
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
ukraine israel war increase carbon emissions
युक्रेन, इस्रायल युद्धांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वाढ
cop 29 climate change conference in baku capital of azerbaijan
विश्लेषण : ‘कॉप २९’ची एवढी चर्चा का?
Air quality deteriorated in Colaba Deonar Kandivali Mumbai news
कुलाबा, देवनार, कांदिवलीमधील हवा ‘वाईट’
Spain devastating floods Flow of Turia River Heavy rain in Spain
आपण कधी जागे होणार? स्पेनचा विध्वंसक पूर
world environment council lokrang
विळखा काजळमायेचा!
maharashtra Government climate action cell plan to face climate change zws
राज्यातील हवामान कृती कक्ष कसा करणार हवामान बदलांचा सामना?

भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले कोट् डा अझर्ु म्हणजेच इंग्लिश भाषेतील फ्रेंच रिव्हिएरापैकीच एक. ग्रीस, रोम, आफ्रिका ह्य देशांपासून जवळ असल्याने ग्रीक, रोमन, बार्बेरिअन अशा अनेक देशांनी इथे राज्य केले. अनुकूल हवामानामुळे ह्य भागात ऑलीव्ह लागवड, लव्हेंडरसारख्या सुगंधी फुलांच्या बागा, मासेमारी एवढेच उद्योग होते. १९व्या शतकात प्लेग वगैरेंसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे इंग्लंडमधील उच्चभ्रू नागरिक बचाव म्हणून दूर अशा ठिकाणी आले. येथील हवामान, सुबत्ता हे पसंतीस येऊन तिथे दीर्घकाळ राहिले. व्हिक्टोरिआ राणी, सातवा एडवर्ड, यांचे हे उन्हाळ्यातील विश्रांतीचे ठिकाण झाले. हा भाग त्यांनी पुढे प्रगत केला, त्याला फ्रेंच रिव्हिएरा हे नाव दिले. त्यानंतर रेल्वे आली आणि तेव्हापासून हा प्रांत युरोपिअन लोकांचे आवडीचे ठिकाण बनले.

नीस ही फ्रेंच रिव्हिएरा या भागाची राजधानी. फ्रान्समधील पॅरिस, लिआँ, टुलुस, बोडोनंतरचे हे मोठे शहर आहे. या ठिकाणी आपल्याला ओल्ड व न्यू सिटी असे दोन विभाग पाहायला मिळतात. जुना विभाग हा पाय्लन नदीकिनारी असलेल्या दणकट सिटी वॉलच्या मागे होता. २०व्या शतकात पर्यटकांचा ओघ वाढल्यावर नदीचे पात्र झाकून त्यावर रहदारीचा रस्ता केला. व हा भाग नव्या भागाशी जोडला. ओल्ड सिटीमध्ये कासल हिल् येथे ग्रीक काळातला किल्ला होता. फ्रेंचांनी तो काबीज केल्यावर इंग्लंडचा राजा चौथा लुई ह्यने स्वारी करून किल्ला उद्ध्वस्त केला. आता त्याचे अवशेष पाहायला मिळतात. एका भिंतीवर तोफेच्या गोळ्याने खड्डे झालेले दिसतात.

जुन्या भागात सिटी गेटवर ठेवलेल्या तोफेतून दुपारी बारा वाजता बार सोडतात. त्याविषयी अशी आख्यायिका आहे की, फार पूर्वी कुण्या मोठय़ा पदाधिकाऱ्याच्या पत्नीला निसर्गरम्य वातावरणात फिरताना वेळेचे भान राहत नसे. तिला शोधण्यासाठी कुणाला तरी पाठवावे लागत असे. ही रोजची कटकट नको म्हणून बारा वाजता तोफ डागण्यास सुरुवात केली. ती पत्नी बरोबर वेळेवर येऊ लागली. त्यामुळे तोफ डागण्याची प्रथा सुरूच राहिली.

येथे फिरायचे तर पायीच. नव्या भागात हमरस्त्यावर ग्रीक देवतांचे पुतळे असलेले कारंजे, शेकडो वर्षांपूर्वीचे घडय़ाळ, मध्यभागी कारंजे त्यातूनच ट्रामची ये-जा. मध्यभागी सात उंच खांबांवर संगमरवरी पुतळे वेगवेगळ्या दिशांकडे तोंड करून ठेवलेले आहेत. रस्त्यावरील बोळात ओपन मार्केट्स. तिथे विक्रीसाठी रोजचे खाद्यपदार्थ म्हणजे, भाज्या, सॉसेस्, वेगवेगळ्या प्रकारचे मासे, मांस, बिस्किटं. शोभेच्या, कलाकुसरीच्या वस्तू, फुलांचे स्टॉल्स, अनेक वस्तूंची दुकाने काही विचारूच नका. पाहताना आपण चक्रावून जातो. हे सर्व पाहताना पोटात कावळे ओरडायला सुरुवात होते. काळजी करू नका. अवतीभवती भरपूर स्थानिक पदार्थासाठी ठेले आहेत.  मॅकडोनाल्ड, के एफ सी, सबवे हेही आहेच.

फिरताफिरता एके ठिकाणी आपले लक्ष अचानक एका विक्षिप्त इमारतीकडे जाते. माणसाचा खांदा व मान हा पाया धरून हनुवटीवरील भाग हा काळ्या काचेचा चौकोनी खोक्यासम आहे. ही आहे तिथली ल् टेट् कारे लायब्ररी. मला काही फ्रेंच भाषेचे ज्ञान नसल्याने त्यांची नावे लिहिताना चूक होत असेल तर क्षमस्व. वेगवेगळ्या विषयांच्या पुस्तकांनी भरलेले तीन मजले आहेत. काळ्या काचांमुळे दिवसा दिसत नाहीत, पण रात्री दिव्यांच्या प्रकाशात हे मजले दिसतात.

येथील कार्लटन हे पंचतारांकित हॉटेल प्रॉमिनाडपासून जवळच आहे. व्हिक्टोरिआ राणी व सातवा प्रिन्स एडवर्ड यांचे उन्हाळ्यातील विश्रांतीचे स्थान होते. व्हिक्टोरिआ राणी आपल्या लवाजम्यासकट इथे येत असे तेव्हा हॉटेलचा एक भाग संपूर्णपणे तिच्यासाठी राखीव असे. बसमधून फिरताना तिची खोली दाखवण्यात येते. त्या खोलीत राहायचे असेल तर ३५ हजार युरो मोजण्याची तयारी पाहिजे. पण आहेही तसेच. गेल्यावर लगेच रेड कार्पेट वेलकम. दिमतीला खास माणूस. प्रत्येक खोलीतून समुद्र, कॅसल हिलचा नजारा शिवाय खोल्याही साउंड प्रूफ.

नीसच्या आसपासच मोनॅको, अँतीब, ला जाँ पा, प्रोव्हान्स, ट्रोपेझ, केन्स अशी ठिकाणं तास दोन तासांच्या प्रवासावर आहेत. प्रोव्हान्स येथे लव्हेंडर, गुलाबं अशा सुवासिक फुलझाडांची नैसर्गिकरीत्या पैदास होते. ती फुलं वेगवेगळ्या भागांत नेऊन त्यापासून अत्तर, साबण, तेलं वगैरे तयार करतात. लव्हेंडरचा मोसम नसल्याने आम्ही तिथे गेलो नाही. पण नीसच्या जवळच चार हजार वर्षांपूर्वी वसलेल्या एहा या गावी फॅगोनार्ड कारखान्याला भेट दिली. म्हणतात ना, मूर्ती लहान पण कीर्ती थोर. तसंच काहीसं एहाचं आहे.

एहा हे जगभरात अत्तराच्या उत्पादनासाठी माहीर आहे. या ठिकाणी अत्तर बनवलं जातं ते फुलं, पानं, फळं, खोड मुळापासूनदेखील. वरील जिनसांच्या चिप्सना १५० किलो वजनाच्या डिस्टिलरमध्ये जमा करून १०० अंश सेल्सिअल्स उष्णता देतात. तयार वाफेचे शेजारच्या कंन्डेंसरमध्ये द्रवात रूपांतर होते ते अत्तर. ते खोबरेल तेल किंवा सुगंधी तेलात मिसळून अत्तर होते. तर क्रीम स्वरूपातील अत्तरासाठी व्हॅसलीन, मधमाश्यांचे मेण घालून तयार करतात. साबणासाठी फुले जनावरांच्या चरबीत घालून सुकवतात. ती सुकल्यावर जुन्यांच्या जागी नवी फुले येतात. बाकी अन्य पदार्थ घालून, व साच्यात घालून वेगवेगळ्या आकाराचे साबण बनवले जातात. अत्तरांचे वेगवेगळे सुगंध ओळखण्यासाठी प्रशिक्षक तयार करण्यासाठी त्यांच्या संस्था आहेत. तेथे त्यांना सहा वर्षे शिक्षण घ्यावे लागते. त्यांची क्षमता कमी होऊ नये याकरिता त्यांना मद्यपान, चहा, कॉफी घेण्यावर तसंच खाण्यावर बंधने असतात. त्यांना नोहा असे म्हणतात. प्रत्येक कारखान्यात दोन नोहा तर नक्कीच असतात.

मोनॅको हे शहर रोम येथील व्हॅटिकन सिटीप्रमाणेच दुसऱ्या क्रमांकाचे, पण रिव्हिएरामधील स्वतंत्र राज्य आहे. सर्व कारभार स्वतंत्र आहे. येथील चलन, शैक्षणिक, आरोग्य व्यवस्था, पोलीस खाते येथे अन्य कुणाचीही ढवळाढवळ नाही. येथील माँटेकालरे हा भाग जगातील श्रीमंत नगरांपैकी एक आहे. हे महागडे शहर आहे. येथे घरांच्या किमतीवर किती शून्य येतात त्याचा आपण विचारही न केलेला बरा. प्रत्येक शहरात नवे, जुने विभाग आहेत. नव्या भागात ३५ कि. मी. लांबीचा सर्व परिचित ग्राँ प्री कार रेसचा ट्रॅक आहे. हा ट्रॅक वेगळा नसल्याने शहरातच आहे. रेसच्या दिवशी त्या भागातील वाहतूक पूर्णपणे बंद असते. त्यामुळे आम्ही ह्य ग्रेट रेसचे स्पर्धक नसलो तरीही ट्रॅकवरून चक्कर मारल्याची मजा घेतली.

आम्ही मोनॅको येथून ट्रेनने ला जाँ प्ला येथे आलो. हा प्रवास समुद्राला समांतर, पठारी व डोंगराळ भागातून होत असल्याने छान झाला. फ्रान्स हा देश संप पुकारण्यात अग्रेसर आहे असे म्हणतात. नेहमीच कुणी ना कुणी संपावर असतेच म्हणा. आमच्या वेळी रेल्वेचा संप होता. पण वाहतूक ठप्प नव्हती. ठरावीक गाडय़ा ठरावीक वेळेलाच सुटत होत्या. सकाळी तिकीटघर उघडे नव्हते. आणि तिकीट देणारे यंत्रही चालत नव्हते. काय करावे म्हणून तेथील कर्मचाऱ्याला विचारले, तर म्हणाला की गाडीत बसा, व तपासनीस आला तर तुमची अडचण सांगा. तुम्हाला दंड भरावा लागणार नाही. पण संपामुळे कुणीही फिरकले नाही, आमचा मोनॅको ते ला जाँ प्लापर्यंतचा प्रवास फुकटात झाला.

ला जाँ प्ला हे फिशरमन्स व्हिलेज होते. रम्य किनारा सोडून इथे विशेष काही नाही. अँतीब हे कान् व नीस हे रिव्हिएराच्या लहान शहरांमधील एक. १९व्या शतकात नेपोलिअन अल्बा आयलंड येथून येत असताना त्याला समोरच हे पिटुकले गाव दिसले. समोरचं ठिकाण म्हणून त्याने त्याला अँतीब हे नाव दिले. त्याच्या नावे प्रवेशद्वार उभारले गेले. व्यापारी गलबते प्रवास करताना कर्मचारी येथे विश्रांती घेत. फ्रेंच रिव्हिएरा हा प्रांतच प्रथमपासून सुपीक जमीन, चांगली हवा, रम्य निसर्ग ह्यकरिता प्रसिद्ध. इंग्रजांनी येऊन भाग विकसित करताना बगीचे, बोटॅनिकल गार्डन्स उभारली. प्रत्येक शहरात आपल्याला हेच दृश्य दिसते. बगीच्यांमध्ये खजुराच्या झाडासारखे स्पाईक पाम हे पसरलेल्या फांद्यांमुळे अंब्रेला ट्री म्हणूनही प्रसिद्ध आहे. पूर्वी आजूबाजूच्या शहरांतून लोक सहलीसाठी येत व जाताना जळणासाठी लाकूडफाटा नेत.

नैसर्गिकरीत्या सुंदर अशा ह्य शहरामध्ये नामवंत कलाकारांचे वास्तव्य होते. असं म्हणतात त्या वेळच्या राजाने थोडय़ा वेळासाठी दिलेल्या सवलतीतून कायम वास्तव्य करणाऱ्या पिकासोकडून तैलचित्रे, मातीकाम, टेपेस्ट्री अशा त्याने केलेल्या वेगवेगळ्या वस्तू कराच्या स्वरूपात ठेवून घेतल्या. त्याचे एक संग्रहालयसुद्धा आहे. दोन हजार वर्षांपूर्वीचे चर्च अजूनही आतल्या भित्तिचित्रांसमवेत आहे. उत्खननात ग्रीक वसाहतींचे अवशेष तेथे आहेत.

अँतीब येथून कान येथे येताना वाटेत अर्ध गोलाकार अशा दोन इमारती समोरासमोर उभ्या दिसल्या. काय म्हणून विचारले तर तेथे येणाऱ्या श्रीमंत शौकिनांसाठीचे हॉटेल आहे हे कळलं. हे हॉटेलच नसून पूर्ण शहरच त्यात आहे असं म्हणतात. इतकंच काय पण तिथे येणाऱ्या यॉट्स ठेवण्याची जागाही कँपसमधे आहे. कान हेही समुद्रकिनारीच आहे. ही सगळी लॉस एंजेलीस येथील हॉलीवूड भागासारखीच रचना आहे. कान् हे आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. त्याकरिता आपल्या सिनेतारका एकापेक्षा एक फॅशनेबल कपडे करून जातात हे आपल्याला माहिती आहेच. थिएटर बादर्शनी काही खास वाटले नाही. बंद असल्याने बाहेरूनच दर्शन घ्यावे लागले. पण हॉलीवूड येथील डॉल्बी डिजिटल थिएटरची तुलना केली तर येथे विशेष वाटले नाही.

सर्वच ठिकाणं समुद्रकिनारी असल्याने संध्याकाळची फेरी किनाऱ्यावर झालीच पाहिजे. स्वच्छ, टापटीप किनारी फिरताना प्रसन्न वाटतेच. नीसच्या प्रॉमिनाडवर आल्यावर अँतीबपर्यंत नजारा दिसतो. आपल्यासारख्यांना येथे रेल्वेने प्रवास करण्याची सुविधा चांगली आहे. बस किंवा टॅक्सीचे महागडे भाडे देण्यापेक्षा रेल्वे स्वस्त आहे. फक्त हमालांची सोय नसल्याने आपला बोजा आपणच उचलून हॉटेलपर्यंत न्यावा व आणावा लागतो. पण रस्ते चांगले असल्याने ढकलगाडी करत नेण्यात विशेष त्रास नाही. मला वाटतं प्रत्येकाने एकदा तरी फ्रेंच रिव्हिएराला भेट द्यावी आणि या सर्व गोष्टींचा अनुभव घ्यावा.

काय पाहाल, कसे पाहाल?

‘पर्यटन म्हणजे तीर्थयात्रा’ हा एकेकाळचा आपल्याकडचा समज कधीच मागे पडला आहे. आता अनेकजण पर्यटनासाठी घराबाहेर पडतात ते स्वत:च्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा विस्तारण्यासाठी. पण म्हणूनच मंदिरं पाहायची असोत की लेणी, संग्रहालयं पाहायची असोत की गडकिल्ले.. कि ंवा अगदी निसर्गाचं अद्भुत अनुभवण्यासाठी अभयारण्यातली भ्रमंती असो, आधी गरज असते ती मनाच्या मशागतीची. अशा सगळ्या ठिकाणी जाऊन नेमकं काय पाहायचं, कसं पाहायचं याचा नीट गृहपाठ केला असेल तर आपली भ्रमंती अधिक अर्थपूर्ण होऊ शकते..
गौरी बोरकर