राजस्थानात नेहमीच्या पर्यटनस्थळांजवळ काही प्रसिद्ध तर काही अप्रसिद्ध पण पाहण्यालायक देवीची मंदिरे आहेत, त्याबद्दल..

अंबिकामाता मंदिर,  जगत
राजस्थानातील उदयपूरपासून ५५ किलोमीटर अंतरावर जगत गाव आहे. या गावात दुर्गा देवीचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरातील सिंहावर आरूढ असलेल्या दुर्गा देवीला अंबिका या नावाने ओळखले जाते. महिषासुर मर्दिनीच्या रूपात असलेल्या या देवीला शक्तीचे रूप म्हणून पुजले जाते. जगतमधील हे मंदिर नवव्या शतकात बांधलेले आहे. सभामंडपातील शिलालेखात ११ व्या शतकात मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे. स्थानिक दगडात बांधलेल्या या पूर्वाभिमुख मंदिराच्या बाहेरच्या िभतीवर आणि आतल्या बाजूस अप्रतिम कोरीवकाम केलेले आहे. मंदिराच्या िभतीवर असलेल्या मथुन शिल्पामुळे या मंदिराला मेवाडचे खजुराहो या नावानेही ओळखले जाते. मंदिराच्या अधिष्ठानाच्या वर तीन शिल्पपट्टय़ा आहेत. सर्वात खालच्या शिल्पपट्टीवर व्याल कोरलेले आहेत. मधल्या शिल्पपट्टीवर हत्ती कोरलेले आहेत. तर सर्वात वरच्या शिल्पपट्टीवर वादन करणारे गंधर्व, किम्न्नर कोरलेले आहेत. मंदिराच्या बा िभतींवर विविध केशभूषा, वेशभूषा केलेल्या सूरसुंदरी कोरलेल्या आहेत. त्यांच्या बाजूला विविध रूपांतले व्याल कोरलेले आहेत. गाभाऱ्याच्या मागील देवकोष्टकात महिषासुर मर्दनिीची अप्रतिम मूर्ती आहे. आपल्या हातातील त्रिशूळाने देवीने महिषासुराच्या पाठीवर वार केलेला आहे. महिषासुराच्या मागच्या भागावर सिंहाने हल्ला केलेला आहे आणि महिषासुर मानवरूपात प्रकट होऊन देवीची करुणा भाकत आहे असे सुंदर शिल्प कोरलेले आहे. उत्तर आणि दक्षिणेकडे असलेल्या देवकोष्टकात चामुंडा आणि सरस्वती ही देवीची रूपे साकारलेली आहेत. देवकोष्टकाच्या वरच्या बाजूस वादक विविध वाद्य्ो वाजवताना दाखवलेले आहेत. इतर देवकोष्टकात देवीची विविध रूपे साकारलेली आहेत. उत्तरेला कुबेर आणि ईशान्य दिशेला वायू देवकोष्टकात विराजमान झालेले पाहायला मिळतात.

Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
Vishwa Hindu Parishad on temple and mosque row
“…म्हणून मशिदीच्या जागेवरील दावे वाढत आहेत”, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यानं सांगितलं कारण
raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ
Should a divorced wife receive maintenance under any circumstances
घटस्फोटीत पत्नीला कोणत्याही परिस्थितीत निर्वाहनिधी मिळालाच पाहिजे का?

कमंडलू, कमळ हातात घेतलेले आणि तीन मस्तके असलेले ब्रह्माचे स्त्रीरूप ब्राह्मणी, विष्णूचे स्त्री रूप वैष्णवी आणि शिवाची मूर्ती देवकोष्टकात पाहायला मिळते. मंदिराच्या बाहेरच्या िभतीवर नृत्य करणाऱ्या गणेशाची सुंदर मूर्ती आहे. मंदिराच्या प्रवेशव्दारावर सप्तमातृका आणि समुद्रमंथनाचे दृष्य कोरलेले आहे. मंदिराच्या सभा मंडपातील खांब, छत यावर केलेले कोरीवकाम अप्रतिम आहे. मंदिर पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित आहे.
जाण्यासाठी :- उदयपूरपासून ५५ किमीवर जगत गाव आहे. राजस्थान परिवहन मंडळाच्या बसने किंवा खासगी वाहनाने जगतला जाता येते.

 सच्चियामाता मंदिर, ओसियॉ
राजस्थानातील जोधपूरपासून ६० किमी अंतरावर ओसियॉ गाव आहे. गावातील टेकडीवर सच्चियामातेचं मंदिर आहे. ओसिया हे थर वाळवंटाच्या सीमेवर असलेले गाव प्राचीन काळापासून व्यापारी मार्गावरचे महत्त्वाचे स्थान होते. आठव्या शतकात या ठिकाणी प्रतिहार घराण्याची सत्ता होती. त्यांनी ८ ते १२ शतकांच्या दरम्यान या ठिकाणी अनेक िहदू आणि जैन मंदिरे बांधली. ओसवाल जैनांचे हे महत्त्वाचे धार्मिक क्षेत्र आहे. ओसियॉ गावात पोहोचल्यावर गावाच्या बाहेरच रस्त्यालगत दगडात बांधलेली तीन अप्रतिम मंदिरे दिसतात. त्यातील एका मंदिराचा गजपृष्ठाकृती सभा मंडप वैशिष्टय़पूर्ण आहे. दगडांत केलेले हे काम पाहण्यासारखे आहे. छतावर आणि खांबांवर कोरीव काम आहे. गर्भगृहात मूर्ती नाही. दुसरे हरिहरचे मंदिर हे शिल्पकामाचा अप्रतिम नमुना आहे. शैव आणि वैष्णव पंथातील वाद पराकोटीला पोहोचला होता तेव्हा तो मिटवण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या पातळीवर केला गेला. त्यातूनच मूर्तीशास्त्रात हरिहर या कल्पनेचा उदय झाला. यात एकाच मूर्तीत उजव्या बाजूला शिव आणि डाव्या बाजूला विष्णू त्याच्या आयुध, अलंकार आणि वाहनांसह कोरलेला असतो. उजवीकडे शंकराच्या जटा, गळ्यातील रुंडमाळा, हातात डमरू, त्रिशूळ, पायाशी गण आणि नंदी दाखवलेले असतात, तर डाव्या बाजूला विष्णूचा मुकुट, गळ्यात वैजयंती माळा, हातात शंख, चक्र आणि पायाशी गरुड दाखवलेला असतो. या मंदिराच्याही गर्भगृहात मूर्ती नाही. पण मंदिराच्या सभा मंडपातील खांब, छत यावर केलेले कोरीवकाम अप्रतिम आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला हरीहर, त्रिविक्रम अवतार, नरसिंहावतार, शंकराची केवलमूर्ती, गणपती, महिषासुर मर्दनिीची मूर्ती आणि इतर मूर्ती कोरलेल्या आहेत. मूर्तीच्या वरच्या शिल्प पटावर रामायण, महाभारत, पुराणातील कथा आणि काही मथुन शिल्प कोरलेली आहेत. तिसरे मंदिर शंकराचे आहे ते सध्या पूजेत आहे. या मंदिराच्या पुढे एक सुंदर पुष्कर्णी बांधलेली आहे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सूर्य मंदिर आहे. त्यावरील कोरीवकामही सुंदर आहे. ही तीन मंदिरे पाहून छोटय़ा टेकडीवर असलेल्या सच्चियामाता मंदिराकडे जाताना आजुबाजूला हाराची, प्रसादाची दुकानं, हॉटेल्स दिसतात. सच्चियामाता म्हणजे इंद्राची पत्नी इंद्राणी. एका कथेनुसार या ठिकाणी चामुंडामातेचे मंदिर होते. तिला रेडय़ाचा बळी दिला जात असे. देवीच्या नावाखाली चाललेल्या या प्रकाराला आचार्य रत्नप्रभा सुरी यांनी विरोध केला. त्यामुळे देवी त्यांच्यावर कोपली आणि तिने त्यांना दृष्टिहीन केले. तरी त्यांची भक्ती तसूभरही कमी झाली नाही. त्यामुळे संतुष्ट झालेल्या देवीने यापुढे आपल्या मंदिरात बळी दिलेला चालणार नाही. एवढंच नव्हे तर रक्ताच्या रंगाची लाल रंगाची फुले स्वीकारणार नाही असे सांगितले. त्या दिवसापासून चामुंडामाता सच्चियामाता या नावाने ओळखली जाऊ लागली. या ठिकाणी मुख्य मंदिरात सच्चियामाता व त्याच्या बाजूला चंडी देवी आणि अंबामातेची मंदिरे आहेत. ही मूळ मंदिरे आठव्या शतकात बांधली असली तरी आज असलेली मंदिरे १२ व्या शतकात बांधलेली आहेत. मंदिराच्या सभामंडपात आणि अंतराळाच्या छतावर केलेले कोरीवकाम सुंदर आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस दशावतारातले काही अवतार कोरलेले आहेत. येथे अनेक रूपांत कोरलेले व्याल ठळक आणि वैशिष्टय़पूर्ण आहेत. सच्चियामाता मंदिराशेजारी असलेले महावीर मंदिर आठव्या शतकात बांधलेले आहे.
जाण्यासाठी :- जोधपूरपासून ६० किमीवर ओसियॉ गाव आहे. राजस्थान राज्य परिवहनच्या बसने किंवा खासगी वाहनाने ओसियॉला जाता येते.

कालिकामाता मंदिर, चितोडगड
चितोडगड किल्ल्यावर राणी पद्मिनी महाल आणि विजय स्तंभ यांच्यामध्ये कालिका मंदिर आहे. आठव्या-नवव्या शतकात गुहिल वंशाच्या राजांनी या ठिकाणी सूर्य मंदिर उभारले होते. अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात ते नष्ट झाले. त्यानंतर चौदाव्या शतकात राणा हमिर सिंगने या ठिकाणी वैशाख शुद्ध अष्टमीला कालिकामातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. हे मुळात सूर्य मंदिर असल्याने मंदिराच्या प्रवेशद्वारावर आणि आतील बाजूस सूर्य, चंद्र प्रतिमा कोरलेल्या आढळतात. या ठिकाणी नवरात्र आणि दिवाळीला जत्रा भरते.
जाण्यासाठी :- उदयपूरहून चितोडगडला जाण्यासाठी बस आणि ट्रेनचा पर्याय आहे.

मणिबंध शक्तिपीठ, पुष्कर
राजस्थानातील ब्रह्मदेवाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या पुष्करपासून ११ किलोमीटर अंतरावर मणीबंध नावाचे गाव आहे. या गावातील गायत्री टेकडीवर ५१ शक्तिपीठांपकी एक असलेले गायत्री देवीचे प्राचीन मंदिर आहे. पुराणातील कथेनुसार राजा प्रजापती दक्षाच्या घरात पार्वतीने (सती) जन्म घेतला. तिचे लग्न शिवाशी झाले. राजा दक्षाने एका यज्ञाचे आयोजन केले होते. त्यासाठी त्याने सर्व देवतांना आमंत्रण दिले पण आपल्या जावयाला आणि मुलीला बोलावले नाही. त्यामुळे रागावलेली सती आपल्या पित्याकडे जाब विचारायला गेली. तेव्हा त्याने शिवाची यथेच्छ िनदा केली. या अपमानाने क्रोधित झालेल्या सतीने यज्ञकुंडात उडी मारून प्राण त्याग केला. ही गोष्ट शिवाला कळल्यावर त्याने तिसरे नेत्र उघडले आणि प्रचंड संहार चालू केला. सतीचे पार्थिव उचलून त्याने भारतभ्रमणाला सुरुवात केली. शिवाचे हे रूप पाहून सर्वजण विष्णूला शरण गेले. विष्णूने आपल्या चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले. ते भारतात ज्या ज्या ठिकाणी पडले तेथे शक्तिपीठे तयार झाली. वेगवेगळ्या पुराणात शक्तिपीठांची संख्या वेगवेगळी आहे. देवी भागवतात १०८, देवी गीतामध्ये ७२, तंत्रचुडामणीमध्ये ५२ तर देवी पुराणात ५१ शक्तिपीठे आहेत. सद्य परिस्थितीत भारतात ४२, पाकिस्तानात १, बांगलादेशात ४, नेपाळमध्ये २, श्रीलंकेत १ आणि तिबेटमध्ये १ अशी शक्तिपीठे आहेत.

मणीबंध येथे सतीचे मनगट पडले होते त्या ठिकाणी शक्तिपीठ तयार झाले. दुर्गादेवीच्या येथील रूपाला गायत्री या नावाने ओळखले जाते. गायत्री मत्रांचा जप करून या शक्तीची उपासना केली जाते. मंदिर साधेच असून गाभाऱ्यात सती, गायत्री आणि कुंडलिनीमातेची अशा तीन मूर्ती आहेत.
जाण्यासाठी :- पुष्करपासून ११ किमीवर मणीबंध गाव आहे. राजस्थान स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसने किंवा खासगी वाहनाने मणीबंधला जाता येते.

करणीमाता मंदिर, देशनोक, बिकानेर
बिकानेरपासून ३० किलोमीटरवर असलेल्या देशनोक गावात करणीमातेचे प्रसिद्ध मंदिर आहे. भक्तांमध्ये आणि पर्यटकांमध्ये उंदरांचे मंदिर म्हणून हे प्रसिद्ध आहे. या ठिकाणी २० ते २५ हजार उंदीर असून त्यांना देवी पुत्र मानले जाते. त्यांना काबा म्हणतात. उंदरांनी उष्टावलेला प्रसाद येथे खाल्ला जातो. या ठिकाणी काळे उंदिर आहेत त्याचप्रमाणे काही सफेद उंदीरही आहेत. सफेद उंदरांचे दर्शन भाग्याचे मानले जाते. सकाळी ५ वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता होणाऱ्या आरतीला सर्वात जास्त उंदीर हजेरी लावतात.

इसवी सन १३८७ मध्ये चारण परिवारात रिघुबाईचा जन्म झाला होता. कालांतराने तिचे लग्न साठिया गावातील किपोजी चारण यांच्याशी झाले. पण तिचे मन संसारात रमले नाही. त्यामुळे तिने आपली बहीण गुलाब हिचे आपल्या नवऱ्याशी लग्न लावले आणि ती स्वत: देवीची भक्ती करू लागली. तिला लोक करणीमातेच्या नावाने ओळखू लागले. ज्या ठिकाणी ती देवीच्या भक्तीत रममाण झाली त्याच ठिकाणी बिकानेरचे राजा गंगासिंह यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मंदिर बांधले. मंदिराच्या संगमरवरी प्रवेशव्दारावर केलेली कलाकुसर पाहण्यासारखी आहे.

मंदिरात असणाऱ्या उंदरांच्या मुक्त वावराविषयी दोन दंतकथा आहेत. पहिल्या कथेनुसार करणीमातेचा सावत्र पुत्र लक्ष्मण हा तळ्यावर पाणी प्यायला गेला असताना तळ्यात बुडून मेला. करणीमातेने त्याला जिवंत करावे यासाठी यमाची प्रार्थना केली. यमाने लक्ष्मणाला जिवंत करण्यास असमर्थता दर्शवली. त्यावेळी करणीमातेने आपल्या तपसामर्थ्यांने त्याला उंदराच्या रूपात पुनर्जीवित केले. दुसऱ्या दंतकथेनुसार एकदा २० हजार सनिक देशनोकवर चालून आले. करणीमातेने सर्वाना उंदीर बनवून आपल्या सेवेत ठेवले.
जाण्यासाठी :- बिकानेरपासून ३० किमीवर देशनोक गाव आहे. राजस्थान स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसने किंवा खासगी वाहनाने देशनोकला जाता येते.

विराट शक्तिपीठ, भरतपूर
राजस्थानातील जयपूरपासून ९० किलोमीटर अंतरावर, केवलादेव पक्षी अभयारण्यासाठी आणि किल्ल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भरतपूरपासून १८० किमीवर आणि सरिस्का व्याघ्र प्रकल्पापासून २५ किमीवर विराटपूर नावाचे गाव आहे. या गावात वर ५१ शक्तिपीठांपकी एक असलेले गायत्री देवीचे प्राचीन मंदिर आहे. पुराणातील कथेनुसार या ठिकाणी सतीचा डावा पाय पडला होता. मंदिर साधेच असून त्यात अंबिकामातेची मूर्ती आहे.
जाण्यासाठी :- जयपूरहून ९० किमीवर विराटपूर नावाचे गाव आहे. खासगी वाहनाने जयपूरहून विराटपूरला जाता येते. भरतपूरहून ट्रेनने आणि खासगी वाहनाने विराटपूरला जाता येते.
अमित सामंत – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader