आरोग्य विमा ही आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अत्यावश्यक गोष्ट आहे. म्हणूनच आरोग्य विम्याची खरेदी करताना काही गोष्टी आपल्याला माहीत असायलाच हव्यात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या सेलच्या जाहिराती बऱ्याचदा आपण वाचतो, उदाहरणार्थ एखादा फ्रिज अगर टीव्ही घ्यायचा झाला तर तो घरात येईपर्यंत घराची सध्याची गरज, वस्तूंचे दीर्घ मुदतीत फायदे किंवा घराच्या रंगसंगतीस साजेसे असणे इतका सूक्ष्म विचारही केला जातो. घराची शोभा वाढावी, नवीन तंत्रज्ञानाने जीवनातील वेळेचा, श्रमांचा अपव्यय टाळावा, अगदी शेजाऱ्यांकडे आहे म्हणूनही खरेदी करतो. कमीत कमी दोन-तीन तास ऊहापोह करून वेगवेगळ्या शंकांचे निरसन करून शेवटी कमीत कमी ३५ ते ५० हजारांची खरेदी केली जाते. वस्तू घरात आल्यावरही पंधरा ते वीस दिवस ती अपेक्षित आनंद, सोयी देते आहे का, त्याचे वॉरंटीकार्ड आहे का, ते जपून ठेवले का अशा तांत्रिक बाबींतही लक्ष घालतो. लेखिकेने ग्राहकांच्या मानसिकतेची केलेली निरीक्षणेही ‘आरोग्य विमा’ या विषयांशी असंबंध वाटतील. परंतु आजही भारतीय गुंतवणूकदार ‘आजीवन’ काही लाखांची सेवा खरेदी करताना प्रत्येक वर्षी किमान दहा हजार किंमत मोजूनही घरातल्या टीव्ही, फ्रिज, एअरकन्डिशन तत्सम वस्तूंच्या खरेदी इतपतही गांभीर्याने अभ्यासपूर्वक करत नाही, ही खेदाची बाब आहे. आरोग्य विमा प्रत्येक कुटुंबाचा वैद्यकीय आणीबाणीत एकमेव आधार आहे. सुदैवाने केवळ आरोग्य विमा पॉलीसींचे वितरण करणाऱ्या सात कंपन्या भारतात उपलब्ध आहेत. परंतु कुटुंबाच्या समग्र आरोग्यविषयक संरक्षणाचे जाणीवपूर्वक नियोजन मात्र आजही कुटुंबप्रमुख करत नाही. आज प्रत्येक कुटुंबातील सदस्याकडे मोबाइल फोन आलेला आहे. चार मोबाइल धारकातील एक मोबाइल स्मार्टफोन आहे. या फोनमधील सर्च केलेले विषयही खरेदी, स्मार्टफोन, पर्यटन या विषयांतील जास्त नोंदले आहे. सारांश भारतीय गुंतवणूकदाराने आरोग्य विमाचे संरक्षण व्यक्तिगत आíथक नियोजन अपेक्षित गांभीर्याने, विचारपूर्वक निर्णय घेऊन करणे काळाची गरज आहे.
आरोग्य विम्याच्या विविध पर्यायांचा, विविध सोयींचा आपण सदर लेखाद्वारे अभ्यास करू या.
आरोग्य विमा किंवा मेडिक्लेम पॉलिसी दोन प्रकारांत मोडते.
१) इंडेम्निटी (नुकसानभरपाई)
२) लम्पसम बेनेफिट- (एकदम एक रकमी फायदा)
भारतीय बाजारपेठेतील आरोग्य विमा किंवा मेडिक्लेमचे पर्याय हॉस्पिटल भरतीशी निगडित झालेल्या खर्चाची भरपाई करून देणारे आहेत. कमीत कमी २४ तासांपेक्षा जास्त काळ रुग्ण आजारपणामुळे जर रुग्णालयात दाखल झाला रुग्णालयात भरती होण्यापूर्वीचा कालावधी (Pre – hospitalisation) आणि रुग्णालयातून घरी परतल्यावरचा संपूर्ण बरे होण्याकरिता लागणारा कालावधी (Post hospitalisation) या कालावधीतील वैद्यकीय खर्च कॅशलेस किंवा रिअॅम्बरेसमेंट या दोन क्लेम पद्धतींनुसार ग्राहकास भरपाईद्वारे मिळवता येतो. लम्पसम किंवा एकरकमी फायद्याद्वारे मिळणारा विमादावा हा डिफाईन्ड बेनिफिट अर्थात पूर्वनियोजित लाभ रक्कम वैद्यकीय आपत्ती किंवा व्याधी उद्भवल्यास ग्राहकास एकरकमी भरपाई दिली जाते.
होलिस्टिक हेल्थ इन्शुरन्स प्लानिंग म्हणजेच सर्वसमावेशक आरोग्य विम्याचे नियोजन करताना ग्राहकाने दोन्ही सेवांचे संरक्षण घेणे गरजेचे ठरते. वय वष्रे ३५ ते ५५ या वयोगटातील प्रत्येक गुंतवणूकदाराची आíथक नियोजनाची मांडणी करताना इन्डेम्निटी आणि लम्पसम या दोन्ही आरोग्य विम्यांचा समावेश करणे काळाची गरज आहे.
दोन्ही प्रकारचे दावे देणारे बाजारात पर्याय उपलब्ध आहेत.
१. इन्डेम्निटी नुकसानभरपाई
इस्पितळातील खोलीचे भाडे, वैद्यकीय सेवा, औषधांचा खर्च, ऑपरेशनचा खर्च, डॉक्टरची फी, रक्त चाचण्यांचा खर्च, इतर तपासण्यांचा खर्च, रुग्णवाहिकेचा खर्च, अवयव प्रत्यारोपणाचा खर्च यांचा ठरावीक विमित रकमेपर्यंत (Sum Assured) दावा करता येतो. तसेच वेगवेगळ्या वैद्यकीय चिकित्सा पद्धतींचाही रुग्ण अवलंब करत असेल तर त्यांचाही दाव्यांद्वारे लाभ घेता येतो. मेडिक्लेम पॉलिसी विकत घेताना भरलेला प्रीमिअम हा व्यय किंवा अपव्यय नसून ती एक अत्यावश्यक गुंतवणूक आहे, हे जोपर्यंत ग्राहक आत्मसात करत नाही तोपर्यंत केवळ प्रीमिअमचा दर बघून निर्णय घेण्याची मानसिकता बदलली जाणार नाही. ज्या प्रकारे दरवर्षी तंत्रज्ञानातील बदलानुसार नवीन स्मार्टफोन सहज विकत घेणारा ग्राहक किमतीपेक्षा फायद्यांना जास्त महत्त्व देतो त्याचप्रमाणे आरोग्य विमा विकत घेताना गुंतवणूकदाराने प्रीमिअमचा दर बघण्यापेक्षा वैद्यकीय आणीबाणीत कमाल नुकसानाचे अंदाजपत्रक बनवून विमीत संरक्षणाचा जास्त विचार करणे हितावह आहे.
शहरांतील वैद्यकीय सेवांची चलनवाढ सरासरी २० टक्के नोंदवली आहे. पंचतारांकित रुग्णालयांतील एक दिवसांची रुग्ण भरती किमान दहा ते ५० हजार इतकी असून ती दरवर्षी वाढतच असते. आधुनिक वैद्यकशास्त्रातील उपलब्ध सुखसोयींचा आपल्या कुटुंबास फायदा व्हावा असे जर कुटुंबप्रमुखाचे धोरण असेल तर योग्य आरोग्य विमा घेणे सहजसाध्य माध्यम आहे.
२. लम्पसम बेनेफिट हा एकरकमी नुकसानभरपाई देणारा आरोग्यविम्याचा पर्याय आहे. क्रिटिकल इलनेस पॉलिसी, हॉस्पिटल कॅश बेनेफिट प्लान हे त्याचे दोन प्रकार आहेत.
अ) जीवघेण्या आजारांसाठी वेगळी क्रिटिकल इलनेस पॉलिसी घेणे सर्वसमावेशक आरोग्य विमा नियोजन करताना अत्यंत महत्त्वाची गुंतवणूक ठरते. गेल्या दशकांतील हृदरोग, कर्करोग, मधुमेह, रक्तदाब या जीवनशैलीशी निगडित विकारांचे प्रमाण लक्षात घेतले तर सध्या हे आजार दैनंदिन सर्दी-पडशांसारखे कोणत्याही वयोगटात आढळू लागले आहेत. आनुवंशिक लक्षणे, आहार विहाराच्या सवयी, व्यसने अशा परिस्थितीजन्य कारणांमुळे हे प्रमाण भारतात इतर देशांपेक्षा जास्त प्रमाणात आढळत आहे. भारत मधुमेही रुग्णांच्या यादीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. कर्करोगाचेही प्रमाण गेल्या पाच वर्षांत लक्षणीय वाढले आहे. अशा परिस्थितीत सुदैवाने देशात अद्ययावत उपचार पद्धती उपलब्ध आहे. परंतु केवळ मेडिक्लेमद्वारे उपचारांवरील खर्च परत मिळवून जीवघेण्या आजारांवरील खर्चाची दरी बुजवता येत नाही. सदर व्याधी दीर्घमुदतीत काही लाखांच्या वैद्यकीय सुविधांद्वारे बऱ्या करता येतात. या काळात रुग्णाचे अर्थाजन कमी होणे, किंवा परूणत: थांबणे सुद्धा अपेक्षित असते. कुंटुंबातील मुख्य आíथक आधारच अशा आजारांचा बळी ठरला तर प्रचंड आíथक तणाव निर्माण होऊन संपूर्ण कुटुंबाची आíथक घडी विस्कटली जाऊ शकते. त्यामुळेच मेडिक्लेम इतकेच क्रिटिकल इलनेस पॉलिसीचे महत्त्व ग्राहकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. भविष्यात होऊ घातलेल्या मोठय़ा खर्चाची आगाऊ तजवीज प्रीमिअमच्या माध्यमांनी आपण करत असतो. आजीवन निरोगी शरीर ग्राहक गृहीत धरू शकत नाही. त्यामुळेच प्लान फॉर द वर्स्ट या धोरणानुसार दीर्घ मुदतीत आपणही अशा मोठय़ा आजारांचे बळी होऊ अशा तर्कशुद्ध विचारांवर आधारित ‘आíथक संरक्षण तंत्र’ प्रत्येक गुंतवणूकदाराने अबलंबणे गरजेचे ठरते.
ब) हॉस्पिटल कॅश बेनेफिट – रुग्णालयात भरती केल्यावर होणाऱ्या खर्चात काही अनपेक्षित प्रासंगिक खर्चाची भर पडते. जसे प्रवासखर्च, आहारावरील वाढीव खर्च, मोबाइल सेवेवरील खर्च, कौटुंबिक सदस्यांवरील प्रासंगिक खर्च जे साधारण मेडिक्लेम पॉलिसीद्वारे भरपाई करून परत मिळवता येत नाहीत. म्हणूनच हॉस्पिटल कॅश बेनेफिटद्वारे ठरावीक निश्चित रक्कम हॉस्पिटल भरतीच्या दिवसांनुसार निश्चित रकमेद्वारे एकरकमी मिळवता येते. रुग्णालयातून घरी परतल्यावर किती दिवस रुग्ण हॉस्पिटलमध्ये भरती होता त्यानुसार ठरावीक रक्कम रुग्णाला दाव्याद्वारे मिळवता येते.
आरोग्य विम्याचे सदस्य संख्येनुसार वैयक्तिक (इन्डिविज्युएल प्लान)आणि कौटुंबिक (फॅमिली फ्लोटर प्लान) असे दोन प्रकार आहेत.
वैयक्तिक आरोग्य विमा पर्यायाद्वारे वय वष्रे १८ पूर्ण व्यक्ती आरोग्य विमा घेऊ शकते.
कौटुंबिक आरोग्य विम्याद्वारे संपूर्ण कुटुंब ठरावीक विमित रक्कम संपूर्ण कुटुंबात सामायिक असते. उदा. पाच लाखांचा फॅमिली फ्लोटर प्लॅन जर एकूण चार कुटुंब सदस्यांसाठी घेतला तर पाच लाख ही विमा राशी एका वर्षांत चारही कुटुंब सदस्य उदा. पती-पत्नी, मुले, पालक यांमध्ये विभागली जाते. कोणताही एक सदस्य एका वर्षी कमाल पाच लाख रुपये इतका विमा दावा सादर करू शकतो. परंतु दुर्दैवाने जर कुटुंबातील इतर विमित सदस्य आजारी पडला तर त्याच्या आजारपणाचा दावा मात्र सादर करता येऊ शकत नाही. अपघाती आपत्तीतही याचा आíथक फटका बसू शकतो. ग्राहक जर कर्मचारी विम्याद्वारे नोकरीच्या ठिकाणी विमाछत्राने सुरक्षित असेल तर फॅमिली फ्लोटर पर्याय निवडून आपली विमित राशी ग्राहक वाढवू शकतो. वरिष्ठ नागरिकांनी विमा राशी ठरवताना नेहमी ‘व्यक्तिगत विमा’ हा पर्याय निवडणे हिताचे ठरते. कारण जोडीदाराची आणि स्वत:ची आजारी पडण्याची शक्यता वाढल्यामुळे एकाच वेळी, एकाच वर्षी व्याधीग्रस्त होण्याची शक्यता जास्त असते.
आरोग्य विम्यांचे मुख्य बेसिक पॉलिसी आणि टॉप अप पॉलिसी असेही वर्गीकरण करून घेता येते.
कर्मचारी समूह विम्याद्वारे बहुंशी नोकरदार कार्यालयांतून आरोग्य विमा सेवा उपभोगत असतो. कर्मचाऱ्यांच्या हुद्दय़ांनुसार विमाराशींची निवड मनुष्यबळ विभागाने केलेली असते. त्यामुळे व्यक्तीच्या अपेक्षित विमाराशींचा विचार न करता केवळ विमा प्रीमिअमच्या दरांचा तौलनिक अभ्यास करून असे पर्याय कार्यालय निवडत असते. आरोग्य चाचण्यांशिवाय मंजूर झाल्याने एका वर्षांत समूह विम्याद्वारे जास्त विमा दावे नोंदवले गेले तर पुढील वर्षीच्या विमादरांत किंवा विमित राशीत फरक पडू शकतो. अशा वेळी ग्राहकांनी स्वत:च्या कुटुंबाकरिता स्वतंत्र विमाछत्र घेणे गरजेचे ठरते. टॉप अप किंवा सुपर टॉप अप पॉलिसीद्वारे कर्मचारी विमा छत्रांपेक्षा पाच ते दहा लाख रुपयांपयर्र्तचे विमाछत्र अत्यंत माफक दरात सुपर टॉपअप पर्यायाने निवडणे जास्त सयुक्तिक ठरते. वय वष्रे ५० नंतर मात्र कर्मचारी विम्यापेक्षा स्वतंत्र विमाछत्र घेणे अत्यावश्यक ठरते.
आरोग्य विम्याची खरेदी करताना खालील मुद्दय़ांचा विचार करणे अनिवार्य ठरते :
विमाराशी ठरवणे – किती विमाराशी निवडावी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णयच बरेच ग्राहक चुकीचा घेतात. त्याचा परिणाम दीर्घ मुदतीत वयोमानानुसार विमाराशी कमी पडल्यावर, प्रत्यक्ष प्रसंग उद्भवल्यावर भोगावा लागतो. सध्या हॉस्पिटल भरतीचा खर्च, वैद्यकीय सेवांचा खर्च, औषधे, शल्यचिकित्सा यांवरील खर्च गगनाला भिडला आहे. मोठय़ा दीर्घ मुदतीतील खर्च कमीत कमी दहा लाखांच्या घरात आहे, अशा परिस्थितीत एक ते पाच लाखांपर्यंतची आरोग्य विम्याची राशी अपुरी आहे. दर वर्षी २० टक्के दराने हे खर्च वाढतच राहतील असे गृहीत धरले तर २०२० सालापर्यंत हा खर्च सहज २५ लाखांच्या घरात जाईल. म्हणजेच प्रसंगात २५ लाखांचा आजारपणाचा खर्च उद्भवला तर संपूर्ण कुंटुंबाचे दीर्घकालीन आíथक आरोग्य जमीनदोस्त होईल. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन गुंतवणूकदाराने किमान सात ते दहा लाखांचा आरोग्य विमा घेणे सयुक्तिक आहे.
आरोग्य विमा करारातील अटी-सुविधांचा अभ्यास करणे.
जवळजवळ ९० टक्के ग्राहक कधीच आरोग्य विमा करार घरपोच मिळाल्यावर तो वाचण्याचे किंवा समजावून घेण्याचे कष्ट घेत नाहीत. आरोग्य विम्यात बऱ्याच तांत्रिक संज्ञांचा उल्लेख असतो. ते समजून घेणे फार गरजेचे असते. प्रत्यक्ष दावा उभा राहिला की, आपण फसवले गेलो किंवा आपण इतकी र्वष अज्ञानात होतो याची जाणीव त्याला होते. वेळ निघून गेलेली असते आणि मानसिक ताणाशिवाय काहीच हाती लागत नाही.
को पे, सब लिमिट्स, वेटिंग पिरयिड् आणि नो क्लेम बोनस या चारही अत्यंत महत्त्वाच्या तांत्रिक बाबींच्या माहितीशिवाय ग्राहकांनी विमा घेऊ नये.
आरोग्य विम्याच्या अर्जामधील प्रत्येक माहितीचा आणि दाव्यांचा संबंध असतो :-
ग्राहक आरोग्य विम्याचा अर्ज सादर करताना हेतुपूर्वक किंवा अजाणता काही माहिती लपवतो. अशा माहितीचा त्याच्या दाव्यांवर किंवा विमाहप्त्यांवर परिणाम होतो. आरोग्य विम्याचा अर्ज हा आजीवन दाव्यांच्या टप्प्यांवर एकमेव खात्रीशीर दस्तऐवज असतो. अर्जदार स्वत:च्या आरोग्यविषयक तपशिलाचा उल्लेख करून जोखमांचे सादरीकरण करतो. वजन, उंची, आनुवंशिकता, चालू उपचार-औषधे, आजारपणाचा इतिहास अशी अति महत्त्वाची माहिती आरोग्य विमा कंपनीला कळवतो. छोटीशी चूक ही ग्राहकास मोठा आíथक फटका बसवू शकते. काही गुंतवणूकदार आरोग्यचाचणीशिवाय विमा पॉलिसी खरेदी करतात. प्रत्यक्ष संकटात स्वत:च्या आरोग्याची तपशीलवार माहिती जेव्हा डॉक्टर विचारतो तेव्हा त्याने दिलेली माहिती आरोग्य विम्याच्या अर्जावर नमूद नाही हे लक्षात आल्याने विमा दावा रद्द होतो.
आरोग्य विमा अपघाती उपचारांतही उपयोगी पडतो.
वैद्यकीय आणीबाणी अपघाती असू शकते. गुंतवणूकदार अपघाती रुग्णालयभरती या संभाव्य जोखमीचा फार कमी विचार करतो. अपघात मग तो जीवनात कधीही, के व्हाही होऊ शकतो. वय, वेळ, ठिकाण बघून अपघात घडत नाही. म्हणजेच कितीही मोठा आíथक बोजा अपघातामुळे अकस्मात ओढवू शकतो. अशा प्रसंगी आरोग्य विमा असणे जीवनदान ठरू शकते. कॅशलेस क्लेम प्रणालीमुळे अपघाती उपचारांतील खर्च विनासायास पार पडू शकतो.
आरोग्य विम्यासाठी तज्ज्ञांशी सल्लामसलत करणे.
आíथक साक्षरतेचे भारतातील प्रमाण अत्यंत निराशाजनक आहे. शालेय जीवनापासून ते निवृत्त जीवनापर्यंत कुठेही आíथक निर्णयक्षमता वाढेल असे प्रशिक्षण उपलब्ध नसल्याने भारतात फक्त आयकर वाचवणे म्हणजेच आíथक नियोजन असा भ्रम रुजलेला आहे. आरोग्य विमाचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन तज्ज्ञ मार्गदर्शकाकडून सल्ला घेणे जास्त सुज्ञपणाचे ठरते.
(लेखिका मुंबईस्थित प्रमाणित आर्थिक नियोजनकार आहेत.)
भक्ती रसाळ – response.lokprabha@expressindia.com