स्वत:च्या मालकीचे घर असणे हे  प्रत्येकाचे स्वप्न असते. आपल्या आयुष्यातील तो एक महत्त्वाचा निर्णयदेखील असतो, ज्यात बरीच मोठी गुंतवणूकदेखील असल्यामुळे तो प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल. गृह कर्ज देणाऱ्या कंपन्यांनी गृह कर्जाची रचना सोपी केली असली तरी ज्या वास्तूसाठी कर्ज घ्यायचे आहे त्याची निवड करणे हे मात्र आज आव्हानात्मक आहे असे म्हणावे लागेल.

घर खरेदी करणाऱ्यांसाठी सर्वात प्राथमिक मुद्दा हा त्या प्रॉपर्टीचे टायटल, किंमत आणि विकासकाचे ट्रॅक रेकॉर्ड हे असतात. अनेकजण त्यांचं स्वप्नातलं घर शोधण्यासाठी अनेकवेळा बरीच मोठी रक्कम आणि वेळ खर्च करतात. वेगवेगळ्या प्रकल्पांना भेट देणं, तज्ज्ञांशी चर्चा करणे, बांधकाम व्यावसायिकाचे ट्रॅक रेकॉर्ड तपासणे अशा अनेक गोष्टी त्यामध्ये येतात. पण अनेक वेळा नेमकं कोणाकडून गृहकर्ज घ्यायचं या मुद्दय़ांवर काहीसा गडबडीतच निर्णय घेतला जातो.

Anil Aggarwal Success Story
Success Story : तब्बल नऊ वेळा अपयश येऊनही न खचता प्रयत्नांची शिकस्त; आज करोडोच्या कंपनीचे मालक
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Credai , Pune Affordable House, grahak panchayat
पुण्यात यापुढे परवडणारी घरे शक्य नाहीत ! क्रेडाई अन् ग्राहक पंचायतीने मांडली कारणे
Strict rules for SME IPOs SEBI steps in to protect interests of small investors print eco news
‘एसएमई आयपीओ’संबंधी नियम कठोर; छोट्या गुंतवणूकदारांच्या हितरक्षणासाठी ‘सेबी’चे पाऊल
RIT INVITs allowed to invest in unlisted companies
रिट्स, इन्व्हिट्सना असूचिबद्ध कंपन्यांत गुंतवणुकीस मुभा
Chandrapur District Bank Recruitment,
चंद्रपूर जिल्हा बँक पदभरतीसाठी नाशिक, पुण्यात परीक्षा केंद्र; नव्या वादाला तोंड, मुख्यमंत्र्यांना साकडे
fraud by Police on pretext of doubling money in jalgaon
पैसे तिप्पट करण्याच्या बहाण्याने पोलिसांकडूनच फसवणूक
Mutual Fund Alternative for Investors What is Mutual Fund Lite
गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंडाचा नवीन पर्याय, म्युच्युअल फंड लाईट काय आहे?

गृह कर्ज देणाऱ्या कंपन्यांच्या मूलभूत अभ्यासाचा फायदा गृह कर्ज घेणाऱ्या ग्राहकाला होऊ  शकतो. अशा वेळी गृह कर्ज देणारी कंपनी घर खरेदीतल्या सर्व अडचणी दूर करेल हे प्राधान्याने पाहावे लागले. घराची निवड, त्या संदर्भातील सर्व दस्तावेज आणि कर्जाचे प्रोसेसिंग याला त्यात महत्त्व द्यावे लागेल.

गृह कर्जाचा व्याजदर हा कदाचित प्रथमदर्शनी तुम्हाला आकर्षित करू शकतो. पण जेव्हा तुमचे कर्ज हे १५-२० वर्षांसाठी असते तेव्हा कर्ज देणाऱ्या कंपनीची सेवा, बांधिलकी आणि पारदर्शकता या गोष्टीदेखील महत्त्वाच्या ठरतात.

कोणते घर घ्यायचे हे जर ठरले नसेल तर तुम्ही सुरुवातीपासूनच गृह कर्ज देणाऱ्या कंपन्यांचे साहाय्य घेऊ शकता. काही कंपन्या तुम्हाला योग्य प्रॉपर्टी शोधण्यातदेखील मदत करू शकतात. गृह कर्ज देणाऱ्या काही कंपन्या नियमितपणे विकासकांच्या संपर्कात असल्यामुळे तुमच्या बजेटनुसार आणि गरजेनुसार नव्याने येणाऱ्या प्रकल्पांबद्दल माहिती देऊ शकतात. अनेक गृह कर्ज देणाऱ्या कंपन्या तुम्ही घर निवडण्यापूर्वीच कर्ज मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करतात. जेणेकरून ग्राहकाला स्वत:कडे नेमका किती निधी उपलब्ध आहे हे कळलेले असल्यामुळे बजेटच्या मर्यादेत घर शोधणे सुकर होऊ  शकते. हल्ली बाजारात गृह कर्ज देणाऱ्या अनेक कंपन्या ग्राहकाला घर शोधण्यासाठी त्यांच्याच कंपन्यांच्या माध्यमातून मदत करत असतात. अशा कंपन्यांचे वेगवेगळ्या विकासकांच्या प्रकल्पांशी टायअप असते, त्यामुळे अशा प्रकल्पांमध्ये ग्राहकाला विशेष ट्रिटमेंट मिळू शकते.

तुम्ही कोणते घर घ्यायचे आहे हे नक्की केले असेल तर त्या प्रॉपर्टीचं नेमकं व्हॅल्यूएशन करू शकेल अशी कंपनी निवडावी. कागदपत्रांची पूर्तता आणि त्या विकासकाच्या इतर प्रकल्पांची माहीती अशा गोष्टी त्यांच्याकडून पूर्ण होणे अपेक्षित असते. काही कंपन्यांकडे यासाठी तज्ज्ञांची स्वत:ची अंतर्गत अशी रचना असते, जेणेकरुन ग्राहकाला आपण जी प्रॉपर्टी विकत घेत आहोत त्यांच्या मूल्याची पुनर्खात्री होते.

त्याचबरोबर गृह कर्ज देणाऱ्या कंपन्यांनी ग्राहकाला सोयीस्कर अशी रचना करणे गरजेचे असते, जेणेकरून कर्ज मिळवण्याची ग्राहकाची पात्रता आणखी वाढू शकेल. जेणेकरुन करामध्ये फायदा तर होईलच पण कर्ज चुकवण्याचे हप्ते सुलभ होतील. गृह कर्ज देणाऱ्या कंपन्या साधारण १५ ते २० वर्षांंसाठी कर्ज देत असतात, त्यामुळे गृह कर्ज विमा घेणे अत्यंत गरजेचे आहे.
रेणू सूद कर्नाड – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader