हनिमूनला आस्ट्रेलियाला जायचा तुमचा निर्णय एकदम भारी आहे. तिथं जोडीने गेल्यावर तुम्हाला एकमेकांसोबत काय अनुभवू आणि काय नको असं होऊन जाणार आहे. पर्याय तर इतके आहेत की काय काय निवडायचं असंच वाटेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सिडनीचा तो हार्बर ब्रीज आपण अनेकदा सिनेमांमधून, फोटोंमधून पाहिलेला असतो. इंजिनीयिरगच्या क्षेत्रातलं ते एक आश्चर्य आहे. एकमेकांच्या हातात हात घालून रमतगमत तो ब्रीज चढत जाणं हे किती रोमॅण्टिक आहे. अनेकजण त्या ब्रीजवर गेल्यावर पुन्हा प्रपोज करतात म्हणे. हृदयाच्या आकाराचा हार्ट रीफ हा ब्रीज रोमॅण्टिक कपल्समध्ये खूप लोकप्रिय आहे. तिथल्या रुपेरी वाळूत सनबाथ घ्या. समुद्रात डुंबा.
साऊंड्स ऑफ सायलेन्स डायनर हा आस्ट्रलियातला आगळावेगळा अनुभव. ऑस्ट्रेलियन बाब्रेक्यू झाल्यावर उघडय़ा आकाशाखाली एकमेकांसोबत रात्रीचं भव्यदिव्य आकाश, तारे, तारका पहायच्या ही किती रम्य कल्पना आहे ना. आस्ट्रेलियामधली हंटर व्हॅली एकदम फेमस आहे. घोडय़ाच्या बग्गीतून फिरण्यासाठी तिथे जायलाच हवं. पश्चिम आस्ट्रेलियाच्या किंबल्रे मध्ये एक २२ किलोमीटरचा सुंदर बीच आहे. तिथे सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी कॅमल राइड करता येते. तर बरोसा व्हॅलीमध्ये असलेल्या द लुईझमध्ये ही ब्रेकफास्ट विथ कांगारू ही अनोखी संधी मिळते. निळाशार समुद्राची खरी प्रचीती येते, व्हाइटसंडेजला. हा ७४ बेटांचा समूह प्रेमीजनांसाठी परफेक्ट आहे.
तुम्हाला फक्त एकमेकांच्या मिठीतच वेळ घालवायचा नसेल, वेगळं काहीतरी अनुभवायचं असेल तर अमाप गोष्टी आहेत करण्यासारख्या. थेट मगरींनाच भेटायचं धाडस तुम्हाला जोडीनं करायचंय? मग चला केज ऑफ डेथमध्ये. इथे तुम्ही समुद्रात एका मोठय़ा काचेच्या खोलीत असता. तुमच्या त्या खोलीच्या आसपास प्रचंड मगरी येतात. तुम्ही त्यांना अगदी जवळून बघू शकता.
अशाच पद्धतीने तुमची शार्कची भेट घडवून आणली जाते ती दक्षिण ऑस्ट्रेलियामधल्या इयरे पेनिनसुला इथं. तिथे असलेल्या शार्क केज डायिव्हगमुळे. इथे तुम्ही एका जाळीच्या खोलीत असता. ती समुद्रात सोडली जाते आणि ऑस्ट्रेलियामधले वैशिष्टय़पूर्ण व्हाइट शार्क तुम्हाला अगदी जवळून बघता येतात. दक्षिण ऑस्ट्रेलियामधल्या निगांलू रीफ इथं व्हेल माशाबरोबर पोहण्याचा अविस्मरणीय आनंद घेऊ शकता. मिट्टा मिट्टा, मुरे, स्नोई, मुरुमब्रिजी या नद्यांवर रािफ्टग करू शकता.
बरोसा व्हॅलीत आपण जुन्या काळात जातो. १८४२ मध्ये ती इथे आलेल्या युरोपीयन स्थलांतरितांनी वसवली. तिथे तो काळ अनुभवता येतो. तिथे आजही भरपूर वायनरीज आहेत. अनेकजण आपल्या वायनरी आणि इस्टेटसाठी टूर ठेवतात. त्या बघायच्या आणि सुंदर वाइनचा आस्वाद घ्यायचा. पुढे अनेक वर्षांनंतर आयुष्याच्या संध्याकाळी मुलानातवंडांना सांगायला तुमच्याजवळ आठवणींचा किती रम्य खजिना असेल नाही?
न्यू साऊथ वेल्समधली हंटर व्हॅली ही ऑस्ट्रेलियातलं वाइन उत्पादन करणारं सगळ्यात जुनं ठिकाण आहे. गोल्फ कोर्स, हेल्थ स्पा, गॅलरीज, कूकिंग स्कूल्स, डायिनग स्कूल्ससाठी ते प्रसिद्ध आहे. इथं तुम्हाला स्थानिक चीज, घरगुती चॉकोलेट्स, डेअरी उत्पादनं, ऑलिव्ह ऑइल हे सगळं घेता येतं.
मेलबोर्नहून तासाभराच्या अंतरावर असलेल्या यारा व्हॅलीत वाइनची सगळी गुपितं तुम्ही समजून घेऊ शकता. पर्थहून कारने तीन तासांच्या अंतरावर असलेल्या दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट रिव्हर परिसरात वाइन टूर, गुंफा आणि लाइटहाऊसची टूर, घोडदौड, व्हेल मासे बघणं हे सगळं अनुभवू शकता. तामर व्हॅलीत फिरतानाही अतिशय सुंदर वाइनयार्डस पहायला मिळतात. इथल्या समुद्रात सìफग करणं हा एक नितांतसुंदर, अविस्मरणीय अनुभव आहे. इथल्या समुद्रात निर्माण होणाऱ्या उंचउंच लाटांवर स्वार होत त्यातला थरार अनुभवा. प्रत्येक बीचवर ट्रेनर असतात. हां, पण एक गडबड आहे, तुम्ही सìफग मात्र जोडीनं करू शकणार नाही. तेव्हा एकानं करायचं आणि दुसऱ्यानं कौतुकाने बघायचं. तसंच बंजी जंिपग आणि स्काय डायिव्हगचं. त्यातलं साहस अनुभवायचा एकटय़ानंच. पण हे इथले अविस्मरणीय अनुभव आहेत. तेव्हा आपलं माणूस कौतुकाने बघत असताना आपण ते घ्यायलाच हवेत.
केव्हा जाल : वर्षभरात केव्हाही कसे जाल : भारतातील प्रमुख सर्व प्रमुख शहरातून विमानसेवा उपलब्ध आहे.
(छायाचित्र सौजन्य – टुरिझम ऑस्ट्रेलिया)
रमेश पाटील – response.lokprabha@expressindia.com