भूकंपाने तयार झालेलं तळं, ज्वालामुखीच्या क्रेटरमधलं जीवविश्व, पांढरं रण, बर्फोचं हॉटेल, नॉर्दर्न लाइट, तयार व्हायलाच ४० वषर्र् लागणारे लिव्हिंग रूट ब्रिज, लडाखची आईस हॉकी, व्हिएतनाममधलं कंदिलांचं शहर, न्यूझिलंडमध्ये जमिनीखालच्या गुहांमधील काजव्यांची गर्दी अशी जगभरातील अनोखी  दहा ठिकाणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नॉर्दर्न लाइट पाहायला जाणाऱ्यांची संख्या हल्ली बरीच वाढली असली तरी ही भटकंती केवळ नॉर्दर्न लाइटपुरती मर्यादित नाही. नॉर्दर्न लाइट ठरावीक भागात, ठरावीक काळात, ठरावीक वातावरणातच दृष्टीस पडतो. तो पाहणं, अनुभवणं हे आनंददायी आहे. नॉर्दर्न लाइटच्या अनुषंगाने पर्यटनाची रचना विकसित झाली आहे.

उणे पाच ते पंचवीस अंश तापमानात तेथील हिवाळी पर्यटनाला चांगलाच बहर आला आहे. ताशी ३०-४० किलोमीटर वेगाने केले जाणारे डॉग स्लेडिंग, रमतगमत फिरावे असे रेनिडिअर स्लेडिंग आणि तारुण्याच्या धुंदीत मस्तीत अनुभवावी असे स्नो मोबिल म्हणजेच स्नो स्कूटर. हे तिन्ही प्रकार संपूर्ण नॉर्दर्न एरियात अगदी सहजपणे अनुभवता येतात आणि तेथे येणारा प्रत्येक पर्यटक त्याचा अनुभव घेत असतो. याच काळात नॉर्थ अटालांटिकमधून अनेक मासे अंडी घालण्यासाठी नॉर्वेच्या वरच्या किनाऱ्यावर येतात. अनेकविध प्रकारचे मासे या काळात पाहता येतात. त्याच वेळी मोठय़ा प्रमाणात सुरू असणारी मासेमारीदेखील सुरू असते.

संपूर्ण नॉर्दर्न परिसरात अतिशय पद्धतशीरपणे येथे अनेक गोष्टी तयार केल्या आहेत. रोवानियामध्ये आर्टिक सर्कलमध्ये आढळणाऱ्या यच्चयावत जिऑलॉजिकल आश्चर्याचे ‘आर्टिकम’ नावाचे संग्रहालय आवर्जून पाहण्यासारखे आहे. येथेच असणारे सांताक्लॉजचे गाव, सांताक्लॉज पार्क हे सारं जरुर पहावं. उन्हाळ्यातही येथे जाता येते, पण वर्षांखेरच्या दिवसात नाताळच्या काळातला जो माहोल असतो तो काही औरच.

आणखी एक धम्माल गोष्टीची निर्मिती या लोकांनी केली आहे. ते म्हणजे आईस हॉटेल आणि आइस चर्च. किरुनापासून वीस किलोमीटरवर असलेले हे हॉटेल स्नो आणि आइस यांच्या संयुगातून तयार झालेल्या ‘स्नाइस’पासून तयार केले जाते. या स्नाइसचे मोठमोठे ब्लॉक तयार केले जातात, त्यावर जगभरातील उत्कृष्ट शिल्पी दोन महिने काम करीत असतात. प्रत्येक खोलीची संकल्पना वेगळी असते. अशा अनोखी कोरीवकाम असणाऱ्या ३५ खोल्या येथे आहेत. बेडवर चार पाच रेनडिअरची कातडी अंथरलेली असतात. पांघरण्यासदेखील रेनडिअरचे कातडे दिले जाते. अर्थात एक दिवस राहण्यासाठी किमान वीस हजार रुपये खर्चाची तयार हवी. नुसते पाहायचे असेल तरी पाहता येते.

जवळच आइस चर्च आहे. या चर्चमध्ये लग्न करायचे असेल तर २०२० पर्यंतची प्रतीक्षा यादी आहे. डिसेंबर-फेब्रुवारी या काळातच हे चर्च आणि हॉटेल सुरू असते. त्यानंतर ते वितळू लागते आणि जूनमध्ये पूर्ण नामशेष होते.

हा सारा भूभाग ६५ ते ७१ अक्षांशामध्ये येत असल्यामुळे येथे सूर्यप्रकाश कमीच. ट्रॉम्सोमध्ये तर केवळ दोनच तास संधिप्रकाशच असतो. त्यामुळे नॉर्दर्न लाइट दिसण्याची शक्यता सर्वाधिक असते. गडद अंधार आणि स्वच्छ आकाश ही मुख्य गरज पूर्ण होत असेल तर नॉर्दर्न लाइटचे स्वप्न पूर्ण करता येईल. त्यासाठी खास नॉर्दर्न लाइट हंट नावाची रात्रीची सफर आयोजित केली जाते. एक स्वतंत्र गाडी, त्यामध्ये असणारी अनेक तंत्रसामग्री, आणि शूज ते कानटोपी असा संपूर्ण विंटर गिअर असणारा पोशाख करून ही मोहीम सुरू होते. (हा खास पोशाख सफरीच्या खर्चात तुम्हाला वापरायला मिळतो). शहरापासून दूर, निरभ्र जागा शोधून नॉर्दर्न लाइटचा मागोवा घेतला जातो. एका हंटला १५ हजार खर्च होतो. नॉर्दर्न लाइट दिसला तर पैसे वसूल. किरुनामध्येच अतिउंचावर बांधलेला काचेचे छत असलेला अ‍ॅबिस्को स्काय टॉवर आहे. येथे बसून आरामात खात पित नॉर्दर्न लाइट पाहण्याची सुविधा आहे.

थोडक्यात काय तर अत्यंत व्यावसायिक पद्धतीने नॉर्दर्न लाइटसारख्या घटकाचा वापर करून एक  संपूर्ण व्यवस्था उभी करण्यात आली आहे.

केव्हा जाल : वर्षांअखेरीस नाताळचा काळात येथे भरपूर धम्माल असते.
कसे जाल : सर्वात सोपा मार्ग – मुंबई – हेलसिन्की – रोवानियामी – किरुना – टॉमसो – ओस्लो – मुंबई हेलसिन्की हे केवळ उतरण्यासाठी. रोवानियामीपासून टूरची सुरुवात होते.
आत्माराम परब – response.lokprabha@expressindia.com