प्रत्येक कुटुंबाची एक जीवनशैली ठरलेली असते. घर खरेदी करताना आर्थिक गणित जितके महत्त्वाचे तितकेच महत्त्व या जीवनशैलीलादेखील देणे गरजेचे आहे.

रोटी, कपडा और मकान. माणसाच्या या मूलभूत गरजा. यातील मकान- घरामध्ये तर पशाबरोबर भावनिक गुंतवणूकपण असते. पण जसे लग्न करताना भावी जोडीदाराला आपण सर्व बाजूंनी पारखून घेतो तशीच पारख आपण आपले घर निवडताना करतो का? जसे लग्नानंतर जोडीदाराची आयुष्यभर साथ आपण गृहीत धरतो, तशीच साथ आयुष्यभर हे घरसुद्धा आपल्याला देते. तेव्हा कोणाच्या आग्रहावरून, स्वस्तात मिळतंय म्हणून घर खरेदी करणे चुकीचे आहे. इथे सर्व बाजूंनी विचार केल्यास वर्तमानाबरोबर भविष्यसुद्धा सुखा-समाधानात जाईल हे नक्की. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा घर खरेदीच्या वेळी विचार करणे आवश्यक आहे?

Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
house Ravet , Ravet Pradhan Mantri Awas,
पिंपरी : घरांची सर्वाधिक मागणी असलेल्या रावेतमधील ‘पंतप्रधान आवास’चा गृहप्रकल्प रद्द; नेमके कारण काय?
loksatta readers feedback
लोकमानस: मारकडवाडीतील दडपशाही असमर्थनीय
amdar niwas Nagpur , Amol Mitkari Grievance ,
आमदार निवासातील गरम पाण्याचे गिझर बंद; आमदार म्हणतात, “अंघोळ करायची कशी?”
loksatta readers feedback
लोकमानस: तात्कालिक स्वार्थाचा विचार हेच कारण
Common people will get MHADA houses of public representatives and government officials Mumbai news
लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकाऱ्यांची ‘म्हाडा’ घरे सामान्यांना मिळणार?

आजकाल रेडिओ, टिव्ही व वर्तमानपत्रांमध्ये भरभरून घरासंबंधीच्या जाहिराती येत असतात. त्यात भुरळ घालणारी अनेक आकर्षणे दिली जातात. जसे स्टेशनपासून दहा मिनिटांच्या अंतरावर, निसर्गाच्या कुशीत, सर्व सोयींनी भरपूर वगरे वगरे. याने हुरळून न जाता कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन विचार करणे गरजेचे आहे. जसे घर सजवताना प्रत्येकाची आवड लक्षात घेतली जाते, त्याच्या किती तरी पटींनी जास्त विचार घर खरेदी करताना करावा. या लेखात आपण नेहमीच्या राहायच्या किंवा प्रथम घराबद्दलच बोलणार आहोत. कारण सेकंड होमच्या गरजा आणि त्याचे नियोजन सर्वस्वी वेगळे आहे. तर सुरुवात करू या घराच्या मालक-मालकिणीपासून.

23-lp-kitchenआजकाल नवरा-बायको दोघे काम करत असतात. अशा वेळी त्यांच्या कामाचे स्वरूप काय आहे हे समजून घ्यावे. जसे, दोघे रोज प्रवास करून कामाच्या ठिकाणी जातात का घरून काम करतात? बायको गृहिणी आहे का घरातच छोटा व्यवसाय करते? नवरा फिरतीवर असतो का या गोष्टी विचारात घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला कशाला प्राधान्य द्यायचे आहे ते ठरवणेदेखील महत्त्वाचे. उदाहरणार्थ, दोघांनाही कामानिमित्ताने रोज लोकलचा प्रवास करावा लागत असेल तर साहजिकच स्टेशनजवळचे घर निवडणे श्रेयस्कर. पण बऱ्याच लोकांना स्टेशनजवळची गर्दी, गोंगाट नको असतो. अशा वेळी तुम्ही शांततेला प्राधान्य देऊन थोडे लांबचे घर निवडू शकता. तो सर्वस्वी तुमचा निर्णय असतो. फक्त अशा वेळी कोणा एकाचीच इच्छा बाकीच्या सदस्यांवर लादली जात नाहीयेना हे बघावे. नवरा-बायकोप्रमाणेच मुलांचे वय, शाळा-कॉलेज याचापण विचार करावा. घर बदलले म्हणून शाळा-कॉलेज आपण बदलू शकत नाही. अशा वेळी स्कूलबसची सोय, मुलांचा प्रवासात खर्च होणारा वेळ व मुख्य म्हणजे त्यांची सुरक्षितता लक्षात घ्यावी. बऱ्याच वेळा इमारती उभ्या राहतात, पण आजूबाजूच्या परिसराचा विकास व्हायला वेळ लागतो. त्यामुळे तिथे राहायला जाण्यापूर्वी रस्त्यांची अवस्था, गरजेच्या गोष्टी व मुख्य म्हणजे पाण्याची व विजेची जोडणी नीट झाली नसेल तर तिथे राहायला जाणे थोडे लांबणीवर टाकणेच श्रेयस्कर.

प्रत्येक कुटुंबाची जगण्याची पद्धत (लाइफ स्टाइल) वेगवेगळी असते. कोणाला स्वत:च्या कुटुंबाबरोबर रमायला आवडते, कोणाला मित्र- मत्रिणींना जमवून गप्पा मारायला आवडते; तर कोणाला ऑफिसच्या लोकांना बोलवून पाटर्य़ा करायला. आपल्या राहणीमानानुसार आपले घर निवडावे.

आमच्या एका शेजाऱ्यांचे कुटुंब मोठ्ठे होते. नवरा-बायको, सासू सासरे व  दोन मुले. जागा कमी पडते म्हणून चार बीएचकेमध्ये गेले. पण तिथे फक्त खोल्या जास्त मिळाल्या, त्यांच्या घरातल्या वर्षांनुवर्षांच्या परंपरेला मात्र खीळ बसली. दर वर्षी त्यांच्याकडे होणारी साग्रसंगीत सत्यनारायणाची पूजा व त्यानिमित्ताने बोलावलेले ५०-६० पाहुणे या घरातल्या छोटय़ा दिवाणखान्यात मावेनासे झाले. ज्या दिवसाची घरातला प्रत्येक माणूस उत्सुकतेने वाट बघायचा, तो दिवस हळूहळू करत पूर्ण थांबला. कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला स्वत:ची खोली मिळाली पण या आनंदाला सगळा परिवार मुकला. अशा वेळी कुटुंबाने आधीच एकत्रितपणे विचार करायला हवा होता की एखादी खोली कमी झाली तरी चालेल, पण सगळ्या कुटुंबाचा आनंद ज्यात आहे असे मोठ्ठय़ा दिवाणखान्याचे घर घेतले पाहिजे.

24-lp-kitchen

आपल्या राहणीमानाप्रमाणेच आपले व मुलांचे छंद लक्षात घ्यावेत. नाचाचा छंद असेल तर भरपूर मोकळी जागा हवी. लिखाण किंवा वाचनाचा छंद असल्यास पुस्तकांसाठी व शांतपणे लिहिण्यासाठी एकांत असावा. झाडांची आवड असल्यास बाल्कनी किंवा गच्ची असावी. बऱ्याच जणी सध्या घरून काम करतात किंवा घरी ब्युटीपार्लर चालवतात. अशा वेळी घर असे निवडावे जेणे करून बाहेरच्या लोकांचा घरातील लोकांना त्रास होणार नाही. घराचा पुढचा भाग या कामासाठी वापरता येईल असे बघावे. जर का या भागाला वेगळा दरवाजा करू शकलो तर उत्तमच.

घरातील लोकांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी घरात भरपूर प्रकाश व हवा खेळती राहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे इमारत अशी निवडावी ज्याच्या आजूबाजूला भरपूर जागा सोडली आहे. जेणेकरून भविष्यात नवीन इमारत जवळ उभी राहिल्यास प्रकाश व वारा अडणार नाही. बरेचदा लोक एखाद्या व्ह्य़ूसाठी जास्त पसे देऊन घर नक्की करतात. बिल्डरसुद्धा मलोन् मल इथे काहीही येणार नाही, असे छातीठोकपणे सांगतो आणि राहायला गेल्यावर वर्षभरात समोर टोलेजंग इमारत उभी राहते. समोर दिसणारा अथांग समुद्र बाजूच्या खिडकीतून वाकून वाकून बघावा लागतो.अशा वेळी पसे वाया गेल्याची आणि फसवले गेलो याची टोचणी लागते. पण दुर्दैवाने आपण काहीच करू शकत नाही. तेव्हा घर घेते वेळीच या गोष्टींची खात्री करून पुढील पाऊल टाकावे.

25-lp-kitchen

घर घेताना बांधकामाची गुणवत्ता नीट पारखून घेणे गरजेचे आहे. अन्यथा यामुळे होणारे नुकसान फार मोठ्ठे व त्रासदायक असते. घराचा मुख्य शत्रू म्हणजे ओल. त्यासाठी आतून-बाहेरून िभतींचे नीट प्लॅस्टर झाले आहे की नाही, दारे-खिडक्यांच्या चौकटीत फटी नाहीयेत ना, बाथरूमचे प्लिम्बग-वॉटरप्रूिफग नीट आहे ना हे बघावे. वेडय़ावाकडय़ा पावसाचा त्रास टाळण्यासाठी इमारतीच्या खिडक्यांना छज्जे असलेले चांगले. त्याचप्रमाणे खिडक्या चांगल्या प्रतीच्या आहेत का हे बघून घ्यावे. जेणेकरून बाहेरच्या आवाजाचा, प्रदूषणाचा त्रास कमी होईल. बरेच लोक स्वत:च्या इलेक्ट्रिशियनकडून गृहसजावट करून घेतात. तेव्हा विजेच्या वायरी व स्विचेसची गुणवत्ता आपण राखू शकतो. पण जर का बिल्डरने दिलेल्या वायरी वापरणार असाल तर कोणा तज्ज्ञ व्यक्तीकडून सर्व तपासून घेणे आवश्यक आहे. अशाने भविष्यात काही हानी होणार नाही. घराला ड्राय एरिया, बाल्कनी असलेली उत्तम. ही जागा धुण्याचे मशीन ठेवायला, कपडे वाळत घालायला उपयोगी पडते. त्याचबरोबर इमारतीत चांगल्या कंपनीची लिफ्ट असणे अत्यंत गरजेचे आहे. लिफ्टमध्ये सुरक्षा बटण असणे, जनरेटरची सोय असणे महत्त्वाचे. आपल्या सगळ्यांनाच वाटते की, आपण अमरपट्टा घेऊन जन्माला आलो आहोत, आपल्याला काहीही होणार नाही. पण आपत्कालीन परिस्थितीत इमारतीच्या बाहेर पडायला जिन्यांची रुंदी चांगली असणे गरजेचे आहे. चिंचोळे जिने असलेल्या इमारती टाळाव्यात. त्याचबरोबर मोठय़ा इमारतीत प्रत्येक मजल्यावर फायर एक्झिट आहे का हे बघावे.

वरील सर्व गोष्टींबरोबर कायदेशीर बाबींची नीट जाचपडताळणी करून घ्यावी. शक्य असेल तर सगळी कागदपत्रे कोणा तज्ज्ञ व्यक्तीकडून तपासून घ्यावीत. पाìकग, सिक्युरिटी कॅमेरा यांची सोय आहे का नाही हे बघावे. सध्या पाण्याची चणचण सगळीकडेच जाणवते. अशा वेळी बोअरवेल असलेले घर निवडल्यास भविष्यात बराच त्रास वाचू शकतो.

26-lp-kitchen

गृहप्रवेश करण्याआधीच बरेच लोक गृहसजावटीचे काम पूर्ण करतात. ही सजावट अशी करावी की जेणेकरून पुढील दहा-बारा वर्षे तरी रंगकामाव्यतिरिक्त पुन्हा काम करावे लागणार नाही. प्रथमच चांगल्या प्रतीच्या टाइल्स, उत्तम प्रतीचे फíनचर वापरल्यास राहत्या घरामध्ये तोडफोड व आवाजाचे काम टाळू शकतो व घरातल्या लोकांना होणारा त्रास वाचू शकतो. लोक त्यांचा दहा वर्षांचा मुलगा कायम दहा वर्षांचाच राहणार असे पकडून चालतात. त्याच्यासाठी बंकबेड करतात व कपाटावर स्पायडर मॅनचा लॅमिनेट लावतात. पुढील तीन वर्षांत बंकबेड छोटा पडू लागतो आणि स्पायडर मॅनऐवजी आलिया भट आवडू लागते. अशा वेळी सजावटीचे काम पुन्हा काढणे शक्य नसते. त्यामुळे अगोदरच भविष्याच्या गरजांचा विचार करून सजावट करावी. अन्यथा वेळ आणि पसा दोन्ही खर्च होतो.

‘प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते’, पण घराच्या बाबतीत म्हणावे लागेल- ‘घर म्हणजे घर असते, तुमचे आमचे सेम नसते.’ प्रत्येकाच्या गरजा, कुटुंब सदस्य, राहणीमान, छंद आणि अर्थातच लागणारा पसा हा प्रत्येकाचा वेगळा. म्हणूनच प्रत्येक घर वेगळे असते. प्रत्येक घर युनिक असते!
वैशाली आर्चिक – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader