हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गणेशोत्सवांनंतर नवरात्री, दसरा, दिवाळी अशी सणांची रांगंच लागते. सण म्हटलं की आकर्षक कपडे आणि त्याला साजेसे दागिने असं समीकरण तरुणाईमध्ये ठरलेलंच आहे. सध्या नवरात्री आणि येणाऱ्या दसऱ्याचा उत्साह तरुणींमध्ये दिसून येतोय. दसऱ्याला आपटय़ाची पाने सोन्याचं किंवा संपत्तीचं प्रतीक म्हणून एकमेकांना देण्याघेण्याची रीत आहे. नवनवीन ट्रेण्ड्स, सध्याची फॅशन यावर तरुणाई विशेष लक्ष ठेवून असते. कपडय़ांसोबत येतात ते दागिने. या दागिन्यांमध्येही आता अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. सोन्या-चांदीच्या दागिन्यांना आता पर्याय आहे तो इमिटेशन ज्वेलरीचा. पण काही तरुण मंडळींचा खऱ्या दागिन्यांकडे कल आहे तर काहींचा इमिटेशन ज्वेलरीकडे.
नवरात्री, दसरा हे सण तरुणाईसाठी खास असतात. रंगबेरंगी कपडे घालून, दागिन्यांचा साज चढवत नटूनथटून गरबा किंवा दांडिया खेळायला जाण्याची लगबग तरुणाईमध्ये सुरू असते. अशा वेळी आपल्या कपडय़ांवर कोणते दागिने शोभून दिसतील याचा विचार ते नक्कीच करतात. सोन्याच्या दागिन्यांपेक्षा सध्या बाजारात ट्रेण्डमध्ये असलेल्या ऑक्सिडाइज किंवा ब्लॅक गोल्डचे दागिन्यांना तरुणाई अधिक पसंती देते.
सण-समारंभाच्या वेळी मोठमोठय़ा दागिन्यांच्या दुकानांमध्ये नवनवीन कलेक्शन बघायला मिळतं; परंतु तरुणाई अशा दागिन्यांच्या दुकानात शिरण्याऐवजी, मॉल, रस्ते किंवा मोठमोठय़ा इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानांमध्ये शिरते.
कपडे ट्रेण्डी होत चालले आहेत. तसे दागिन्यांचे ट्रेण्डसुद्धा दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. आजच्या काळाशी जुळून घेण्यासाठी नवनवीन ट्रेण्ड्स तरुणाई आत्मसात करू लागली आहे. सोने, चांदी, हिरे, मोती या मौल्यवान वस्तूंचे दागिने त्यांना हव्या असलेल्या पद्धतीने इमिटेशन ज्वेलरीच्या रूपाने त्यांना बाजारात सहज उपलब्ध होत आहेत. त्याच्या किमतीसुद्धा किती तरी पटीने कमी आहेत. त्यामुळे तरुणाई अगदी आवडीने या दागिन्यांना आपलंसं करताना दिसते.
खऱ्या दागिन्यांमध्ये ट्रेण्ड्स बदलण्याचं प्रमाण इमिटेशन ज्वेलरीपेक्षा खूप पटीने कमी आहे. याउलट इमिटेशन ज्वेलरीचे ट्रेण्ड्स दिवसागणिक बदलत जातात. त्यांचे रंगरूप, आकारउकार तसंच कधी ब्लॅक गोल्ड, कधी ऑक्सडाइज किंवा गोल्डन, सिल्वर, कधी हिरे, मोती तरुणाईला हव्या असलेल्या प्रकारे घालायला मिळतात. पारंपरिक कपडय़ांसह वेस्टर्न कपडय़ांवरहीहे दागिने शोभून दिसतात. त्यामुळे इमिटेशन ज्वेलरी वापरण्याकडे तरुणाईचा कल दिसतो. हल्ली लग्नसमारंभातसुद्धा महत्त्वाचे विधी झाल्यानंतर बरेचदा इमिटेशन ज्वेलरी घातलेली जोडपी दिसून येतात.
बोहेमिअनचा ट्रेण्ड
सोने, चांदी, हिरे, मोती अशा मौल्यवान धातूंपासून बनविलेले अत्यंत नाजूक, सुंदर कलाकुसर केलेले दागिने म्हणजे ‘खरे’ दागिने अशीच दागिन्यांबद्दल सर्वसामान्य संज्ञा प्रचलित आहे. पण या साचेबद्ध संज्ञेपलीकडे जाऊन काळपट दिसणारे, भरगच्च, लांबीला, जोडीला मोठाले दिसतील असे, रंगीबेरंगी स्टोन्स, चिवटेबावटे गोंडे यांनी सजलेली ज्वेलरीला सध्या खूपच मागणी आहे. या दागिन्यांना बोहेमिअन ज्वेलरी म्हटले जाते. पारंपरिक दागिन्यांना बोहेमिअन ज्वेलरीने पर्याय उपलब्ध झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या लॅक्मे फॅशन वीक िवटर फेस्टिव्ह २०१६ मध्ये अनेक डिझायनर्सनी बोहेमिअन पद्धतीची ज्वेलरी डिझाइन केली होती. डिझायनर सुहानी पारेख यांनी आपल्या मिषो या लेबल अंतर्गत भौमितिक आकारांचा वापर करून ज्वेलरी डिझाइन केली होती. आल्केमी हे त्यांच्या कलेक्शनचं नाव होतं. चौकोनी एअर कफ्स, नोस काम हेड पिसेस, मेटॅलिक कॉस्रेट्स, भौमितिक आकारांच्या रिंग्स, आर्म बँड्स ही ज्वेलरी त्यांनी सादर केली. सिल्वर आणि व्हाइट गोल्ड यांपासून ज्वेलरी तयार केली होती. हे सर्व दागिने मॉडर्न वेयर बरोबरीनेच सुरू असलेल्या नवरात्रीसाठीसुद्धा हमखास वापरता येतील.
बोहेमिअन पद्धतीची ज्वेलरी मिळण्याची अनेक ऑनलाइन वेब पोर्टल्स उपलब्ध आहेत, अनेक एथनिक वस्तूंच्या ऑनलाइन वेब साइट्सवर बोहेमिअन पद्धतीची ज्वेलरी उपलब्ध असते. पुण्याच्या अस्मिता जावडेकर यांचं आत्मान हे ऑनलाइन ज्वेलरी शॉिपग वेब पोर्टल आहे त्या म्हणतात, ‘‘भारतीय संस्कृतीतील पारंपरिक दागिन्यांना मॉडर्न टच देऊन आम्ही ज्वेलरी डिझाइन करतो. दागिन्यांचं पारंपरिक स्वरूप हे नक्कीच चांगलं आहे; परंतु आजकालच्या तरुण पिढीला आपलंसं करता येईल अशा पद्धतीने दागिने आम्ही तयार करतो.’’ फ्युजन, हॅन्डक्राफ्ट सिल्वर, हॅण्डमेड ट्रायबल आणि पार्वथी कलेक्शन असे काही कलेक्शन्स हे मॉडर्न आहेत. वेस्टर्न आऊटफिट्स तसेच ट्रॅडीशनल वेयर या दोन्हीवरही हे दागिने उठून दिसतील.
कापडी ज्वेलरी
कापडापासून तयार केलेली ज्वेलरी सध्या तरुणाईमध्ये इन आहे. डिझायनर अदिती होलानी चांडक यांनीही कपडे रिसायकल करून त्यापासून ज्वेलरी बनवली होती, त्या सांगतात, ‘मी कपडे रिसायकल करून ज्वेलरी डिझाइन केली आहे, त्यामुळे ही ज्वेलरी रंगीबेरंगी बनली आहे. पानं, फुलं, फळं अशा नसíगक गोष्टींना विचारात घेऊन मी ज्वेलरी डिझाइन केली. ट्रेडिशनल किंवा वेस्टर्न कोणत्याही प्रकारच्या आउटफिट्ससाठी ही ज्वेलरी चांगली दिसेल.’ कापडी चोकर्स, नेक पिसेस, इअरिरग्स, ब्रेसलेट्स, अँकलेट्स इत्यादी दागिने सध्या फॅशन इन आहेत.
गोंडेदार ज्वेलरी
वेगवेगळ्या ब्राइट कलर्सचे गोंडे ज्वेलरीमध्ये वापरले जातात. थोडय़ा मोठय़ा आकाराच्या गोंडय़ाचे इअिरग्स, त्याचबरोबर ब्रेसलेट्स, नेकपीसेस, गोंडेदार चप्पल्स सध्या ट्रेण्डमध्ये आहेत. या ज्वेलरीचे वैशिष्टय़ म्हणजे फॉर्मल शर्टस्वरही गोंडय़ांची ज्वेलरी खूप क्लासी दिसते. याखेरीज कुर्तीज, पलाझो पँट्स, डंगरी, स्कर्ट्स, साडी किंवा अगदी अनारकली अशा वेगळ्या प्रकारच्या ट्रेडिशनल किंवा इंडो वेस्टर्न आऊटफिट्सवर ही ज्वेलरी खूप उठून दिसते.
नवरात्रीसाठी ही ज्वेलरी अतिशय सुटेबल आहे. ज्वेलरी बरोबरीनेच गोंडे जडावलेल्या कुर्तीज, ओढण्या, स्कार्फ असे आऊटफिट्ससुद्धा सध्या ट्रेण्डमध्ये आहेत. यंदाच्या लॅक्मे फॅशन वीक िवटर फेस्टिव्ह २०१६ मध्ये डिझायनर तरुण तहिलियानी यांनी आपल्या कलेक्शनमध्ये गोंडेदार इअिरग्सचा वापर केला होता. डिझायनर शिवांगी सहानी हिने आपले संपूर्ण कलेक्शनमध्ये गोंडय़ाचा वापर केला होता. अगदी अॅक्सेसरीज, कपडे ते फूटवायपर्यंत तिने गोंडे वापरले होते.
- फॉर्मल शर्टबरोबर गोंडेदार नेकपीस वापरायचा असेल तर गोंडय़ांचा रंग पेस्टल किंवा लाइट निवडा. कॉलरच्या मागून हा नेकपीस घाला, आणि शर्टचे कॉलर बटनसुद्धा लावा. खूपच ट्रेण्डी तरीही फॉर्मल लुक मिळेल. इअिरग्स घेणार असाल तर त्याचा आकार लहान असू द्यावा.
- एका वेळी गोंडेदार इअिरग्स किंवा नेकपीस यातलं एकच अॅक्सेसरी आऊटफिटवर वापरा.
- हॅण्ड वर्क केलेली गोंडेदार ओढणी वापरणार असाल तर प्लेन कुर्ती घाला. जेणेकरून ती ओढणी उठून दिसेल.
सध्या दागिन्यांचे बरेच ट्रेण्ड्स उपलब्ध असल्यामुळे तरुणाईचा कल त्याकडेच जास्त दिसून येत आहे. तरीही काही तरुण मंडळींना पारंपरिक दागिनेच आपलेसे वाटत आहेत.
तरुणाईची पसंती कशाला? खरे दागिने की इमिटेशन ज्वेलरी..
परीक्षित शर्मा
मुलींच्या दागिन्यांइतके मुलांचे दागिने नसतात. कधी कधी ब्रेसलेट्स, गळ्यातील चेन, अंगठी किंवा ब्रोच आम्ही वापरतो. हे दागिने कधीतरीच वापरले जात असल्यामुळे ते खरे असणं मला आवडतात. शिवाय असे दागिने एकदाच घेऊन ते खूपदा वापरात येतात. त्यामुळे ते सोन्याचेच वापरायला मला आवडतात.
निकिता ननावरे
मला इमिटेशन ज्वेलरी जास्त आवडते, खरे दागिने घातल्याचा आभास तयार करता येतो. तसंच त्यामध्ये भरपूर पॅटर्न्स असतात. वेस्टर्न आणि ट्रेडिशनल अशा दोन्ही प्रकारच्या कपडय़ांवर ते शोभून दिसतात. असे दागिने घातल्यामुळे क्लासी लुक मिळतो. सोन्यापेक्षा इमिटेशन ज्वेलरी स्वस्त असते. म्हणून मी त्यालाच जास्त पसंती देते.
सानिका ओक
मला इमिटेशन ज्वेलरी आवडते. खऱ्या दागिन्यांमध्ये तोचतोचपणा दिसून येतो आणि सर्व प्रकारच्या कपडय़ांवर ते शोभून दिसत नाहीत. इमिटेशन ज्वेलरी सोन्यापेक्षा कमी पशांत वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये उपलब्ध असून अतिशय उठावदार आणि एलिगंट दिसते. तसंच सोन्यापेक्षा स्वस्त असल्याने इमिटेशन ज्वेलरीमध्ये गळ्यातलं, कानातलं बांगडय़ा, िबदी असा पूर्ण सेट एका वेळी विकत घेता येतो.
मधुरा गोडबोले
मला सणासुदीला पारंपरिक सोन्याचे दागिने घालायला आवडतात. पण सध्याच्या काळात सहजरीत्या सोन्याचे दागिने घालून बाहेर जाणं खूपच कठीण झालं आहे. त्यामुळे पर्याय म्हणून मी इमिटेशन ज्वेलरी वापरीन. इमिटेशन ज्वेलरीसुद्धा खऱ्या दागिन्यांप्रमाणेच दिसते आणि तसाच उठावदारपणा त्यात दिसून येतो. परंतु सोन्याचे दागिने मनापासून घालायला आवडतील. पारंपरिक कपडय़ांवर सोन्याचे दागिने जास्त छान दिसतात.
प्रणव मोघे
मुळातच मुलांचे दागिने खूप मर्यादित असतात त्यामुळे सोन्याचेच दागिने घालण्याला मी प्राधान्य देईन, सोन्याची चेन किंवा अंगठी फॉर्मल किंवा ट्रेडिशनल कोणत्याही आऊटफिटवर शोभून दिसतात. तसंच सोन्याचे दागिने नेहमीच लक्षवेधी ठरतात. त्यामुळे सोन्याचे दागिने घालायला मला आवडतील.
प्राची परांजपे – response.lokprabha@expressindia.com
(छायाचित्र : निर्मल हरींद्रन)