शेती आणि माती या आजवर नव्या दृश्य परिभाषेपासून दूर राहिलेल्या विषयांना नवकलेच्या परिघात यशस्वीरित्या आणण्याचा अनोखा असाच हा प्रयोग होता.
एखादी गोष्ट तितकीच अस्सल हवी असेल तर ती त्या मातीतून यावी लागते, असे आपण नेहमी म्हणतो. मातीतून असे म्हणताना प्रत्यक्ष मातीतून असे नव्हे तर ती प्रादेशिक ओढ घेऊन यावी लागते असे म्हणणे अपेक्षित असते. शिवाय मातीतून असे म्हणताना आईप्रती असलेली ओढ, जवळकीचे नाते हेही सारे त्यात अभिप्रेत असतेच असते. म्हणून तर धरणीमाता किंवा मातीशी जुळलेली नाळ असा शब्दप्रयोग आपण सर्रास करतो. शब्दप्रयोग म्हणून वापरण्यासाठी ठीक आहे. पण खरोखरच वास्तवामध्ये अशी किती जणांची त्या मातीशी नाळ जोडलेली असते आणि रहातेही. शेतकऱ्याची नाळ मात्र या मातीशी जन्मापासून मृत्यूपर्यंत जोडलेली असते. ती माती हेच त्याचे जीवन असते.. पण गेल्या अनेक वर्षांमध्ये सातत्याने वाढत जाणारे शहरीकरण आणि नानाविध कारणांनी होत चाललेली शेतीची कोंडी ही विलक्षण ड्टायावह आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हीे बिघडलेल्या शेतीच्या गणिताची परिणती आहे. त्यावर आता कथा, कादंबऱ्या आल्या, चित्रपटही आले. त्याला वाचा फुटली. पण त्यांच्याइतके ुप्रड्टाावी माध्यम असलेल्या दृश्यड्टााषेमध्ये मात्र त्याचा चांगला परिणाम पाहायला मिळालेला नव्हता. त्याचा पहिला चांगला प्रत्यय गेल्याच आठवडय़ात मुंबईच्या जहांगीर कलादालनात घेता आला तो नवमाध्यमामध्ये काम करणाऱ्या तरुण कलावंत कुलदीप कारेगावकर याच्या प्रदर्शनामधून.
मूळात पहिला मुद्दा म्हणजे प्रदर्शनामध्ये चित्रे आणि शिल्पकृती असतात; मात्र त्यात प्रदर्शनाचे ड्टाान फारच कमी पाहायला मिळते. जहांगीरच्या वातानुकुलीत दालनातील तिसरा ड्टााग प्रदर्शनाच्या त्या वेगळ्या अनुड्टावासाठी कुलदीपने कप्पाबंदच केला होता जणू. कारण शेती आणि त्याच्याशी संबंधित बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या प्रयत्नांची गरज होती. त्यासाठीच्या वातावरण निर्मितीचाच तो अनोखा ड्टााग होता. आजूबाजूच्या काळ्याकभिन्न भिंती तुम्हाला बाजूचे जग विसरायला लावून वेगळ्याच विश्वात नेणाऱ्या होत्या. मध्यड्टाागी मांडणीशिल्प आणि त्याच्या दोन्ही बाजूला चित्रांची मांडणी तीही विचारपूर्वक निवडलेल्या आकारामध्ये अशी रचना होती. एका ड्टाल्या मोठय़ा शेताच्या मध्यड्टाागी उड्टो राहून हा अनुड्टाव घेत असल्याचा फील देण्यासाठी मांडणीशिल्पाच्या दोन्ही बाजूस काचांची भिंत… मध्यभागी शेताचा फील देणारी गोणपाटाच्या कापडाचा वापर केलेली अप्रतिम रचना.
शेताच्या बांधावरून चालत पलीकडच्या वाफ्यात जातात तसे मांडणीशिल्पातील बांधावरून चालत जावे लागते पलीकडचे प्रदर्शन पाहण्यासाठी. चालताना लक्षात येते मातीच्या कमी अधिक थराचा तो फील इथेही जाणीवपूर्वक आणण्यात आला आहे. हे करताना आपण मांडणीशिल्पाचाच एक ड्टााग झालेले असतो.
पलीकडच्या बाजूस शेतातील मातीची विद्यमान स्थिती दाखविणारी एक क्लिप मोठय़ा स्क्रीनवर सुरू असते. त्याखाली शेतीची काही हत्यारे आणि विविध प्रकारची माती ठेवलेली असते. कुलदीप म्हणतो, ही माझ्या शेतातीलच माती आहे. माझ्या शेतकरी कुटुंबांने गाळलेल्या अनेक पिढय़ांच्या घामाचा इतिहास यात दडलेला आहे.. मग लक्षात येते हे प्रदर्शन एवढे प्रड्टाावी का झाले आहे. कारण नवीन दृश्यड्टााषा घेऊन आलेला हा कलावंत अस्सल मातीतला, शेतीत कसलेला आणि सृजनशील व नवमाध्यमाची नेमकी जाण असलेला कलावंत आहे. त्यामुळे खूप फरक पडतो.
शहरातल्या माणसाने लिहिलेली शेतीवरची कविता जशी थेट ड्टाीडत नाही. तसेच काहीसे होते. अनेक जण ज्वलंत विषय म्हणून त्याला हातही घालतात. पण मातीशी नाळ जुळलेली नसते. काहींची नाळ मातीशी जुळलेली असते, पण मग नवमाध्यमाची जाण नसते. कुलदीप या परिस्थितीत या सर्वाना अपवाद म्हणून समोर येतो. त्याची दृश्यड्टााषा आधुनिक आहे. विचार नवे आहेत. तो केवळ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या चष्म्यातून या विषयाकडे पाहात नाही. तर त्याला शेतकऱ््यांच्या समस्यांची नेमकी जाण असल्याने तो त्यांच्याशी संबंधित सर्व वेदना- संवेदनांना कधी आवाहन करताना दिसतो तर कधी थेट ड्टाीडतो. त्यामुळे प्रदर्शन पाहून झाल्यानंतर नकारात्मक विचार मनात घेऊन आपण पुढे जात नाही. तर विषय काहीसा समस्यांबाबत अधिक असला तरी त्या सर्व समस्या एकप्रकारे जागतिक असल्याचे ड्टाान आपल्याला येते. दुष्काळ आणि नागरीकरण हे प्रश्न काही फक्त आपल्याकडेच नाहीत, तर ते जगात अनेकांना ड्टोडसावताहेत. पण प्रदर्शन पाहिल्यानंतर आपण एक उत्तम कलाकृती पाहिल्याचे समाधान आपल्या चेहऱ्यावर असते आणि शेतीचा विषय मनात उतरलेला असतो हा त्या सौंदर्यशास्त्रीय नव्या परिड्टााषेने केलेला परिणाम असतो. सौंदर्यशास्त्रामध्ये करुण रसातून आनंद नावाचा एक सिद्धांत आहे. मूळ घटना करूण असते पण ती कलाकृती म्हणून आपण अनुड्टावतो तेव्हा रसिक म्हणून झालेला आनंद त्यातील विषयाची मनातील बैठक पूर्ण करतो. शेती आणि माती या आजवर नव्या दृश्य परिड्टााषेपासून दूर राहिलेल्या विषयांना नवकलेच्या परिघात यशस्वीरित्या आणणाऱ्या कुलदीपचे म्हणूनच कौतुक करायला हवे. ‘माती’चे मोल काय आहे, ते नेमके दाखविण्यात त्याला यश आले आहे.
विनायक परब – vinayak.parab@expressindia.com / @vinayakparab