महत्त्वाच्या घडामोडी, विविध क्षेत्र, व्यक्ती, संस्था आणि उपक्रमांचे वेगळे पलू समोर आणणारे साप्ताहिक म्हणून ‘लोकप्रभा’ गेली चार दशकं मराठी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. काळासोबत चालणाऱ्या या नियतकालिकाने केवळ आपल्या आंतरबा रूपात बदल केला नाही, तर भविष्याची पावले ओळखून समाजमाध्यमांनाही आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडले आहे. नुकतंच ‘लोकप्रभा’ साप्ताहिकाच्या फेसबुक पेजने एक लाख वाचकांच्या पसंतीचा टप्पा पार केला. नियतकालिकांचे वाचक कमी होत आहेत, अशी चर्चा होत असण्याच्या काळात हा पल्ला पार करणारं ‘लोकप्रभा’ हे एकमेव मराठी साप्ताहिक ठरलं आहे. ‘लोकप्रभा’ला हा बहुमान प्राप्त करून दिल्याबद्दल सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार. केवळ आकडेवारी नाही, तर दर्जेदार मजकुराच्याच माध्यमातून वाचकांना स्वत:सोबत बांधून ठेवण्यातही ‘लोकप्रभा’ यशस्वी झाले आहे. त्यामुळेच फेसबुक पेजवरून लेख वाचणे, ते इतरांसोबत शेअर करणे आणि त्यावर प्रतिक्रिया देणाऱ्यांचा आकडा हा एकूण लाइक्सच्या सत्तर टक्के आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा