मुस्लीम आता भावनिकतेला भुलत नाहीत हे ‘आयडिया एक्स्चेंज’ (लोकप्रभा- ९ ऑक्टो.) वाचले. मुस्लिमांनी भावनिकतेला भुलावे असा त्यांचा स्वभावच नाही हे ओवेसी विसरतात. पाकिस्तान-बांगलादेश घेऊन मुस्लिमांची किती प्रगती झाली ते सारा मुस्लीम समाज पाहातच आहे. मुसलमान खासदार किंवा आमदार कमी निवडून आले म्हणून त्यांना अन्य पक्षांकडून त्रास होईल- हा एमआयएमचा प्रचार! तर दुसऱ्या बाजूने ‘एमआयएम’ म्हणजे जणू लीग वा जीना असा अन्य पक्षीयांचा प्रचार. सारा संशयकल्लोळ! पण एक निश्चित, जिथे मुस्लीम लोकसंख्या निर्विवाद आहे तिथे एमआयएम आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहे. इथे तर ओवेसी बंधूच ‘भावनिकतेचा’ खुला मारा मुसलमानांवर करतात. जातीयवादाचा संशय नको म्हणून दलितांना बरोबर घेण्यास ओवेसी विसरत नाहीत. ओवेसी आपल्याला शिडीप्रमाणे वापरणार हे दलित थोडेच विसरतात? मुस्लीम काय, दलित काय किंवा आपली तमाम जनता, सर्व राजकीय पक्षांकडून उपेक्षितच आहे, कारण पक्षनेत्यांचा- नोकरशाहीचा स्वार्थ संपण्याचे नावच नाही. शासन चालविणारे पक्ष काय किंवा विरोधी पक्ष, यांची जनतेशी काही एक नाळच नाही. असली तर निवडणुकीपुरती- सत्तेवर येण्यापुरती. त्यामुळे ‘राष्ट्रउभारणी’ झालीच (पुरेशी) नाही, हाच एक अंतिम निष्कर्ष.

नितीशकुमार सेक्युलर नाहीत, तर ओवेसी आणि त्यांचा एमआयएम सेक्युलर कुठे आहे? भागलपूर दंगलीला अन्सारी-सुलतान जबाबदार याचे पुरावेच दिले गेलेत. मोदी- अडवाणी- संघ- भाजप यांत फरक नाही, तर ओवेसींच्या दृष्टीने अन्य पक्षांबाबत तरी त्यांना फरक कोठे आहे? त्याकरिताच त्यांनी ‘एमआयएम’ काढला नाही काय? ओवेसींचे बंधू जी कुप्रसिद्ध भाषणे करतात त्यांचा निकाल न्यायालयात लागो, असे ओवेसी म्हणतात; पण प्रत्यक्षात त्यांना मागून खुले समर्थन देणारे ओवेसीच आहेत. मुसलमानांना रोजगार मिळायला हवा. प्रतिनिधित्व (योग्य) मिळायला हवे याकरिता विषारी भाषणे करावी लागतात? आज मुस्लीम मागास असेल, तर त्याला कोणताही पक्ष वा हिंदू जबाबदार नसून त्यांचा काफीरवादच जबाबदार आहे. ज्या समस्या मुस्लिमांमध्ये आहेत त्या हिंदू- ख्रिस्ती- दलितांसह तमाम जनतेत आहेत. म्हणून यांच्याप्रमाणे कुणी आक्रस्ताळी भाषणे करताना दिसत नाहीत.

उपराष्ट्रपती हमीद अन्सारींना कुणीही एकटे पाडलेले नाही. ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ज्या मजलिस मुशावराच्या व्यासपीठावर अन्सारी गेले त्यांचे धोरण अखंड पाकिस्तानवादी आहे. शिवाय मुस्लीम बहुसंख्य म्हणून काश्मीर पाकला द्या,  भारतातील मुस्लिमांच्या प्रश्नाला उत्तर ‘इस्लामी राज्य’, संसदेला भारतीय मुसलमानांसंदर्भात कायदा करायचा अधिकार नसावा, भारताच्या प्रत्येक राज्याच्या अंतर्गत एक वेगळे मुस्लीम राज्य असावे अशी मते असणाऱ्या पक्षाच्या व्यासपीठावर  उपराष्ट्रपती अन्सारी मुस्लीम असुरक्षित असल्याचा ओरडा करत आहेत, हे त्यांच्या पदाला, ज्ञानाला शोभत नाही.

कुराण-बायबल या देशाचा आत्मा नाही हे खरेच आहे, कारण हे दोन्ही पवित्र ग्रंथ धर्म आणि निधर्मवादाचे समर्थन करत नाहीत, हे आम्ही ओवेसींना सांगायचे? पंतप्रधान मोदी लोकसभेत बाराशे वर्षांच्या गुलामीनंतर सत्ता मिळाली, असे म्हणत असतील तर ते साफ चूक आहे. धर्मनिरपेक्ष नसलेल्या इसाई-इस्लामी तत्त्वज्ञानाच्या उदात्तीकरणाने देशाला आज इथे आणून ठेवले गेले आहे आणि आज मोदी जे गांधी-नेहरू-पटेल-काँग्रेसने केले तेच करत आहेत. संघ-भाजपच्या ज्येष्ठ-श्रेष्ठ नेत्यांनी जे आज इसाई-इस्लामी तत्त्वज्ञानाचे उदात्तीकरण चालविले आहे त्यातूनच ‘धर्मनिरपेक्षता’ धोक्यात येत आहे. हिंदूंनी- बहुसंख्याकांनी इसाई-इस्लामीपेक्षा एकही अधिकार अधिक मागितलेला नाही.

इराक-सीरियात अमेरिकेने घोळ घातलाय, असे ओवेसी म्हणतात. त्याला बोलावणारे मुस्लीमच होते ना? आता तर त्यांनी देश कधीच सोडलेत. मग शिया-सुन्नीत एकमत का होत नाही? इसिस काही वेगळं मागत नाही- करत नाही. जे कासीम- गझनी- घोरी- बाबर- अकबर- औरंगजेब- टिपू सुलतान- पाकिस्तान यांनी जे हिंदूंचं केलं तेच इसिस आज ‘शरियतला’ नकार देणाऱ्यांचं करत आहेत. थोडक्यात पवित्र कुराणाची अंमलबजावणी. म्हणूनच इसिसला समर्थन मिळतंय. आजवर इस्लामी आक्रमकांनी अल्लाचा इस्लाम काफरांना दिला आणि स्वत:ला स्वत:च्या सोयीचा. आता हे चालणार नाही, असे इसिस सांगते आहे, तर सौदीसह तमाम इस्लामी राष्ट्रे चूप राहात आहेत. इसिस जर मोठा धोका, तर ‘एमआयएम’ पुढाकार का घेत नाही? निवडणुका का महत्त्वाच्या?

मुळात सॉफ्ट हिंदुत्व- स्ट्राँग हिंदुत्व असा काही एक प्रकारच नाही. पाकिस्तान देणारी काँग्रेस (साम्यवादी- समाजवादीही) पाकमध्ये कुठे शिल्लक राहिली? इतरांना काफीर मानून मुस्लिमांना आपली प्रगती करता येईल? खरे दुखणे इथेच आहे. यावर ओवेसीच काय कुणीच बोलत नाही. राज्यातले ९० टक्के मुस्लीम दारिद्रय़रेषेखालील जीवन जगतात. ही कुठली आकडेवारी? असे जर आहे, तर ४५ साली साडेतीन कोटी असणारे आज अठरा कोटी कसे झाले? हिंदू वा कुणीही मुस्लीम मागास-दरिद्री राहावेत असे कधीही म्हणत नाही. उलट हिंदू मुस्लीम समाजाचा काफीरवाद नाकारूनही आधार आहे.

गेल्या तेरा शतकांत इस्लामला रशियाप्रमाणे एकही राष्ट्र उभे करता आले नाही. ते इसिस करू पाहाते, तर त्याला सारे हाणून पाडत आहेत. मग भारताचे इस्लामीकरण कशाला, हा प्रश्न ओवेसीकरताच! दुसरे कुराणाप्रमाणे हिंदू- ज्यू- ख्रिस्ती- पारशी- मूर्तिपूजक काफीर कसे ते एमआयएमने जाहीर केल्यास ‘सर्व प्रश्नांची डोकेदुखी’ एका क्षणात नष्ट होऊ शकते.

सूर्यकांत शानबाग – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader