मुस्लीम आता भावनिकतेला भुलत नाहीत हे ‘आयडिया एक्स्चेंज’ (लोकप्रभा- ९ ऑक्टो.) वाचले. मुस्लिमांनी भावनिकतेला भुलावे असा त्यांचा स्वभावच नाही हे ओवेसी विसरतात. पाकिस्तान-बांगलादेश घेऊन मुस्लिमांची किती प्रगती झाली ते सारा मुस्लीम समाज पाहातच आहे. मुसलमान खासदार किंवा आमदार कमी निवडून आले म्हणून त्यांना अन्य पक्षांकडून त्रास होईल- हा एमआयएमचा प्रचार! तर दुसऱ्या बाजूने ‘एमआयएम’ म्हणजे जणू लीग वा जीना असा अन्य पक्षीयांचा प्रचार. सारा संशयकल्लोळ! पण एक निश्चित, जिथे मुस्लीम लोकसंख्या निर्विवाद आहे तिथे एमआयएम आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहे. इथे तर ओवेसी बंधूच ‘भावनिकतेचा’ खुला मारा मुसलमानांवर करतात. जातीयवादाचा संशय नको म्हणून दलितांना बरोबर घेण्यास ओवेसी विसरत नाहीत. ओवेसी आपल्याला शिडीप्रमाणे वापरणार हे दलित थोडेच विसरतात? मुस्लीम काय, दलित काय किंवा आपली तमाम जनता, सर्व राजकीय पक्षांकडून उपेक्षितच आहे, कारण पक्षनेत्यांचा- नोकरशाहीचा स्वार्थ संपण्याचे नावच नाही. शासन चालविणारे पक्ष काय किंवा विरोधी पक्ष, यांची जनतेशी काही एक नाळच नाही. असली तर निवडणुकीपुरती- सत्तेवर येण्यापुरती. त्यामुळे ‘राष्ट्रउभारणी’ झालीच (पुरेशी) नाही, हाच एक अंतिम निष्कर्ष.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा