आदित्य बिवलकर – response.lokprabha@expressindia.com
एआय, व्हीआर, रोबोटिक्स यांचा वापर वाढला तर त्याचा फायदा ग्राहकांना मोठय़ा प्रमाणावर होऊ शकेल असा अंदाज गेल्या काही वर्षांत अनेक तंत्रज्ञांनी वर्तवला होता. यंदाच्या सीईएस शोमध्ये याचीच झलक आपल्याला पाहायला मिळते.

कोविडचे संकट आणि त्यातच ओमायक्रॉनचे वाढते रुग्ण, यामुळे अनेक मोठय़ा कंपन्यांनी यंदाच्या शोमधून माघार घेतली. यामुळे प्रत्यक्षात यंदाचा कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो पार पडणार की नाही याबद्दलसुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. प्रत्यक्षात मात्र इतरांना बाजूला सारत एआय, व्हीआर, रोबोटिक्स यावर भर देणाऱ्या वेगवेगळय़ा कल्पनांनी आणि प्रत्यक्ष उत्पादनांनी यंदाच्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये बाजी मारली.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Monopole erection to keep power system running smoothly
वीजयंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी मोनोपोल
got elected four times through evms supriya sule on evm tampering allegations by congress
चार वेळा निवडून आले ईव्हीएमवर संशय कसा घेऊ? खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान

रोबोटिक्स आणि एआय  तसेच व्हीआर टेक्नोलॉजीच्या मदतीने घरातील कामे सोपी होणार आहेत. घरातल्या रोजच्या कामांमध्ये यंत्रांचा वापर वाढेल. यामध्ये रोबोटिक्सचा मोठा वाटा असणार आहे. घरातील कामे, मॉल तसेच फूड चेनमधील डिलिव्हरी यासाठी रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर भविष्यात वाढणार असल्याचे यंदाच्या शोमध्ये अधोरेखित झाले.

माणसाच्या विचारांचा वेध घेऊन त्यानुसार कृती करणारी वेगवेगळी उपकरणे यंदाच्या प्रदर्शनात पाहायला मिळाली. वैद्यकीय क्षेत्राला या तंत्रज्ञानाचा मोठा फायदा होऊ शकतो. याचबरोबर गृहनिर्माण, डिझायिनग, लाइफस्टाइल, खाद्यपदार्थ निर्मिती आणि त्यासंबंधित इतर क्षेत्रांमध्ये याचा मोठा फायदा झालेला दिसेल.

रोबोटिक्सप्रमाणेच स्वयंचलित वाहने आणि एआय तंत्रज्ञान हे आपले भविष्य असेल असे सीईएस २०२२ च्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. पुढील १० वर्षांत जगभरात स्वयंचलित वाहनांचा वापर होताना दिसेल आणि एआय तंत्रज्ञान क्रांती घडवेल असे मत या शोमध्ये सहभागी झालेल्या जगभरातल्या तज्ज्ञांनी मांडले.

आपण एआयकडे स्मार्ट टेक्नोलॉजी म्हणून बघत आलो आहोत. यंदा सादर करण्यात आलेल्या कल्पना आणि नवीन उत्पादनांतूनही हाच मुद्दा अधोरेखित होताना दिसतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही नवीन मोबाईल फोन, लॅपटॉप , कॅमेरे याचबरोबर प्रोसेसर्स कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये पाहायला मिळत आहेत. मात्र त्यापलीकडे जाऊन या अगळय़ावेगळय़ा उत्पादनांची चांगलीच चर्चा होत आहे. अशाच काही भन्नाट कल्पना आणि हटके उत्पादनांविषयी जाणून घेऊ या..

स्मार्ट बेड आणि मोशन पिलो

स्मार्टफोन आणि स्मार्ट डिव्हायसेसच्या यादीमध्ये आता आपल्या बिछान्यानेसुद्धा स्थान पटकावले आहे. ‘स्लीप नंबर’ या कंपनीने हा आगळावेगळा बेड तयार केला आहे. प्रत्येक माणसाच्या झोपेबद्दलची माहिती साठवून त्यानुसार त्याच्या प्रकृतीबद्दल आणि त्याच्या झोपेसंदर्भातील तक्रारीबद्दल माहिती देण्याची सोय या बेडमध्ये आहे. याशिवाय प्रत्येकाला आपल्या बेडचे तापमान आपल्या सोयीनुसार ठेवता येणार आहे. यासाठी कोणत्याही रिमोट कंट्रोलची गरज भासणार नाही. बाहेरचे तापमान आणि झोपणाऱ्या व्यक्तीची गरज याचा योग्य अंदाज घेऊन त्यानुसार आपोआप हा बदल होईल. याशिवाय या बेडला डिस्प्ले आणि स्पीकर्सची सुविधा देण्यात आली आहे. आपल्या उठण्याची वेळा सेट करण्याचा पर्याय व्यक्तीला उपलब्ध असणार आहे.

एखाद्या व्यक्तीला घोरण्याची सवय असेल तर मोशन पिलो फायदेशीर ठरणार आहे. ‘१० माइंड्स’ कंपनीच्या या वेगळय़ा संकल्पनेला ‘सीईएस इनोव्हेशन अवॉर्ड’ने गौरवण्यात आले आहे. या उशीमध्ये खास सेन्सर्स आहेत. उशीवर डोकं ठेवल्यावर हे सेन्सर झोपणाऱ्या व्यक्तीची माहिती गोळा करतात. एखादी व्यक्ती घोरायला लागल्यावर त्या व्यक्तीची झोपमोड न होता उशीतील एअरबॅग हालचाल करते आणि त्यानुसार आपोआप व्यक्तीचे घोरणे कमी होते. घोरण्याचा आवाज अचूक ओळखण्यासाठी यामध्ये खास तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. एअर प्रेशर सेन्सर आणि एअर बॅगच्या मदतीने हे उपकरण माणसाच्या घोरण्याची समस्या आटोक्यात आणू शकते.

ओरल बी स्मार्ट टूथ ब्रश

भारतातील टूथ ब्रश कंपनी ‘ओरल बी’चे हे नवीन स्मार्ट उत्पादन आहे. खरें तर टूथ ब्रश एखाद्या मोबाइलशी जोडला जाऊ शकतो, ही कल्पना आत्तापर्यंत कोणी केली नव्हती. मात्र ओरल बीने आयफोन आणि आय ओएसला जोडले जाणारे टूथ ब्रश आणून सर्वाना थक्क केले आहे. या स्मार्ट ब्रशमुळे प्रत्येकाचा दात घासण्याची वेळ, दातातील समस्या, त्याने होणारे नुकसान याची माहिती वापर करणाऱ्याला मिळणार आहे. शिवाय मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून एका क्लिकवर कुठेही ही माहिती सहज मिळवणे शक्य आहे. दररोज कोणत्या प्रकारे दात घासावेत, दात घासताना किती दाब द्यावा याचे सेटिंग यामध्ये असणार आहे. याचबरोबर प्रत्येकाच्या गरजेनुसार आणि दाताच्या प्रकारानुसार ब्रशचा वापर करण्यासाठी वेगवेगळे मोड देण्यात आले आहेत. टंग क्लिक, सेन्सिटिव्ह केअर, टोटल केअर, इंटेन्स क्लीन यासारख्या वेगवेगळय़ा मोड्सचा त्यात समावेश आहे. हा ब्रश आयफोनला सहज कनेक्ट होऊ शकतो. याचबरोबर चार्ज करून कितीही वेळा त्याचा वापर करता येतो. आपण योग्य पद्धतीने दातांची निगा राखत आहोत का, त्याचबरोबर योग्य पद्धतीने दात घासत आहोत का हे जाणून घेण्यासाठी ब्रशमध्ये सेन्सर्स देण्यात आले आहेत. या सेन्सर्सच्या मदतीने दातांची योग्य निगा राखण्यास मदत होऊ शकते. दातांचा कोणता भाग स्वच्छ होत आहे, कोणत्या भागाकडे लक्ष देण्याची गरज आहे, अशी सर्व माहिती याद्वारे मिळते. हा ब्रश विविध रंगांमध्ये उपलब्ध आहे.

स्मार्ट बाथ

सुट्टीच्या दिवशी घरातल्या बाथ टबमध्ये बसून निवांत आनंद घेण्याची अनेकांची इच्छा असते. पण बाथ टब म्हटलं की गरम पाण्याची व्यवस्था करा, पाण्याचं तापमान नियंत्रित करा, पाणी भरेपर्यंत थांबा अशी मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते. याचाच अनेकांना कंटाळा येतो. स्मार्ट बाथच्या नव्या संकल्पनेमुळे ही सगळी प्रक्रिया सोपी होणार आहे. घरामध्ये कोणत्याही खोलीत बसून एका क्लिकवर आपल्याला आपल्या बाथटबचे तापमान, पाण्याची पातळी, आपली आंघोळीची वेळ या गोष्टी ठरवता येणार आहेत. वायरलेस तंत्रज्ञानाच्या मदतीने घरात कुठेही बसून आपल्याला ही सगळी तयारी करता येणार आहे. शिवाय यामध्ये व्हॉइस फीचरसुद्धा आहे, ज्याच्या मदतीने आपण कमांड्स देऊन आपली तयारी करू शकतो. त्याचबरोबर या स्मार्ट बाथमध्ये वेगवेगळे मोड्स आहेत. ज्यामध्ये आपण आपल्या आंघोळीच्या वेळा, पाण्याचे योग्य तापमान, आपल्या आवडीनिवडी सर्व गोष्टी सेव्ह करून ठेऊ शकतो. त्यामुळे परफेक्ट बाथचा आनंद आपल्याला नक्कीच मिळेल.

बर्ड बडी स्मार्ट फिडर

आपल्या घराच्या खिडकीत येणारे पक्षी पाहणे सर्वानाच आवडते. अनेकदा आपण या पक्ष्यांची छायाचित्र टिपायला जातो आणि पक्षी उडून जातात. काही वेळा पक्षी घाबरतात आणि परत खिडकीकडे येत नाहीत. अशा पक्षी निरीक्षकांसाठी बर्ड बडी स्मार्ट फिडर हे एक उपयुक्त उत्पादन ठरू शकेल. या स्मार्ट फिडरमध्ये पक्ष्यांसाठी खाद्य ठेवण्याची व्यवस्था तर आहेच, मात्र या माध्यमातून खिडकीत येणाऱ्या प्रत्येक पक्ष्याची माहिती आपल्याला आपल्या मोबाइल फोनवर मिळणार आहे. इतकेच नाही तर येणाऱ्या पक्ष्यांची उत्तम दर्जाची छायाचित्रे आणि व्हिडीओही टिपण्याची क्षमता त्यात आहे. त्यामुळे कुठेही बसून आपण आपल्या घराजवळ येणाऱ्या पक्ष्यांची माहिती मिळवू शकतो आणि त्यांचा अभ्यास करू शकतो. सध्या या स्मार्ट फिडरसाठी कंपनीकडून विक्रीपूर्व नोंदणी करून घेण्यास सुरुवात झाली आहे.

स्मार्ट लाइट बल्ब

आपल्या झोपेची माहिती सध्या स्मार्ट वॉचच्या मदतीने मिळते. मात्र आता स्मार्ट वॉच न वापरतासुद्धा ही माहिती मिळवणे सहज शक्य होणार आहे. ‘सेन्ग्लेड स्मार्ट लाइट बल्ब’च्या मदतीने झोपेतील हालचाली आणि शरीरात होणारे बदल टिपले जाणार आहेत. याचबरोबर हार्ट रेट, शरीराचे तापमान, रक्तदाब यांसारख्या गोष्टींची माहितीही हा बल्ब टिपणार आहे. याचबरोबर कंपनीच्या मते एकाच घरात वेगवेगळे बल्ब नेटवर्कमध्ये लावले तर घरातील व्यक्तीला मदतीची गरज भासल्यास तातडीने अलर्ट दिला जाऊ शकतो. यासाठी ब्ल्यू टूथ सेन्सर्सची मदत घेण्यात येते. त्या सेन्सर्सच्या मदतीने व्यक्तीच्या हालचाली टिपल्या जातात आणि त्यातून गरज भासल्यास अलर्ट मिळतो. याशिवाय या बल्बमध्ये इतर आरोग्यविषयक सुविधाही उपलब्ध आहेत. घरातील व्यक्तींच्या झोपेच्या वेळा आणि आरोग्यासंबंधीची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. सॅमसंग स्मार्ट िथग्ज, गूगल असिस्टंट, अ‍ॅलेक्सा यांच्यासाठी कनेक्टिव्हिटीचा पर्याय देण्यात आला आहे. याशिवाय वायरलेस तंत्रज्ञानावर चालणारे बल्ब्स आणि लाइट स्ट्रिप्स कंपनीने लॉन्च केल्या आहेत. विशेष बाब म्हणजे व्हॉइस कमांडच्या माध्यमातून ही उपकरणे वापरता येणार आहेत.

सॅमसंगचा आधुनिक प्रोजेक्टर

सॅमसंगने फ्रीस्टाइल हा नवा प्रोजेक्टर सादर करून सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. घरातल्या कोणत्याही िभतीचे रूपांतर एका भव्य स्मार्ट टीव्हीमध्ये करण्याची क्षमता या प्रोजेक्टरमध्ये आहे. नावाप्रमाणेच हा प्रोजेक्टर फ्रीस्टाइल आहे. कोणत्याही िभतीला किंवा पृष्ठभागाला स्मार्ट टीव्हीमध्ये रूपांतरित करण्याची क्षमता या प्रोजेक्टरमध्ये आहे. विशेष म्हणजे हा प्रोजेक्टर पोर्टेबल असून तो कोणाच्याही खिशातसुद्धा अगदी सहज मावू शकतो. सॅमसंगच्या स्मार्ट टीव्हीचे सर्व फीचर्स यात देण्यात आले आहेत. याचबरोबर स्ट्रीिमगचा पर्यायसुद्धा आहे. नेटफ्लिक्स तसेच इतर ओटीटीचेसुद्धा स्ट्रीिमग यामध्ये करता येणार आहे. यामध्ये सी टाइप कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे ज्याच्या मदतीने कोणत्याही प्लगशिवायसुद्धा हा प्रोजेक्टर काम करू शकेल. तसेच या प्रोजेक्टरच्या बेसला दिलेल्या पोर्टच्या मदतीने सॉकेटला कनेक्ट करून हा प्रोजेक्टर वापरता येऊ शकतो. हा प्रोजेक्टर अत्यंत हलका असून याचे वजन केवळ दोन पौंड आहे. यामध्ये एक स्टॅण्ड देण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने १०० इंचापर्यंतच्या कोणत्याही िभतीवर प्रोजेक्शन करता येणार आहे. याचबरोबर ऑटो फोकस, ऑटो स्टॅबिलायझेशन यांसह फोर के आणि फुल एचडी प्रोजेक्शनचा पर्याय यामध्ये आहे. भारतात अद्याप हा प्रोजेक्टर उपलब्ध नाहीत, मात्र अमेरिकेत यांची विक्रीपूर्व नोंदणी सुरू झाली आहे. लवकरच भारतातसुद्धा हा प्रोजेक्टर उपलब्ध होईल.

एएमडीचा सर्वात वेगवान प्रोसेसर

यंदाच्या शोमध्ये अधिक सक्षम तंत्रज्ञानाच्या दृष्टीने वेगवेगळे प्रोसेसर्स बघायला मिळाले. इंटेल, एएमडी, एनव्हीडिया यांच्यामध्ये चुरस आहे. इंटेलने यंदाच्या कॉन्फरन्समध्ये आपला १२व्या जनरेशनचा प्रोसेसर सादर केला. त्यामुळे आय ९ सीरिज ही सर्वात सक्षम सीरिज असल्याचा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे या स्पर्धेत एएमडीने रायझन ६००० सीरिजचे प्रोसेसर्स उपलब्ध केले आहेत. पहिल्यांदाच एएमडीद्वारे ३डी व्ही कॅचे या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यंदाच्या कॉन्फरन्समध्ये एएमडीच्या वतीने रायझन ७५८०० x३डी हा प्रोसेसर सादर करण्यात आला. गेमर्स आणि डेव्हलपर्ससाठी हा प्रोसेसर आकर्षक मानला जात आहेत. हा जगातला सर्वात जलद गेिमग प्रोसेसर असल्याचा दावा कंपनीकडून केला जात आहे. ३डी प्रोसेसिंगच्या फीचरमुळे इतर प्रोसेसर्सच्या तुलनेत चांगला परफॉर्मन्स आणि वेग यामध्ये मिळणार आहे. त्यामुळे या प्रोसेसरला गेमर्सची पसंती मिळू शकते.

टीव्हीला पर्याय

यंदाच्या कन्झ्युमर टेक शोमध्ये टीव्हीच्या तंत्रज्ञानासंदर्भात चांगलीच स्पर्धा पाहायला मिळाली. सोनी, एलजी, सॅमसंग, एसर या कंपन्यांनी विविध नवीन उत्पादने सादर केली. त्यामुळे एकंदरच या वर्गात बरेच पर्याय यंदा पाहायला मिळत आहेत. एलजीने यंदा ५५ इंच एलईडीपासून ते ९५ इंच लार्ज ओएलईडी टीव्हीपर्यंत विविध पर्याय या शोमध्ये सादर केले. सर्वाधिक ब्राइटनेसचा एलजी जी २ ओएलईडी या वेळी कंपनीने सादर केला. त्याचबरोबर सॅमसंगने मायक्रो एलईडी आणि ओएलईडी सेगमेंटमध्ये नवीन टीव्ही सादर केले आहेत. टीव्हीच्या वर्गात ‘बेस्ट इनोव्हेशन’चा पुरस्कार मिळवत सॅमसंगने क्यूडी एलईडी सादर केला आहे. यामध्ये पहिल्यांदाच आरजीबी तंत्रज्ञानावर आधारित ओएलईडीचा वापर करण्यात आला आहे. ६४ इंच तसेच ५५ इंचाच्या मॉडेल्समध्ये हा टीव्ही उपलब्ध आहे. सोनीने ब्राव्हियाची नवी सीरिज या शोमध्ये सादर केली. सॅमसंगला स्पर्धा म्हणून ४के ओएलईडी तसेच मिनी एलईडी सोनीद्वारे सादर करण्यात आले आहेत. सोनीने तब्बल १३ नवीन मॉडेल्स सादर केली आहेत.

सोनीचे एसयूव्ही प्रोटोटाइप

गेल्या वर्षीच्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये सोनीने इलेक्ट्रिक व्हेईकलवर काम करत असल्याची झलक दिली होती. या वर्षी थेट सात सीटर एसयूव्ही वाहनाचा प्रोटोटाइप सादर करत सोनीने सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. ‘सोनी मोबिलिटी’ या कंपनीच्या माध्यमातून सोनीने विजेवर चालणाऱ्या वाहनांवर संशोधन सुरू केले आहे. भविष्यात सोनीची इलेक्ट्रिक कार आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकेल. याचीच झलक व्हिजन एस २ या प्रोटोटाइपमध्ये दिसून येते. ७ सीटर एसयूव्ही गाडीचे मॉडेल सोनीने आपल्या प्रेझेंटेशनमध्ये सादर केले. या गाडीचे डिझाईन पोर्शेच्या धाटणीचे असून यामध्ये ५ जी कनेक्टिव्हिटी, ओटीए अपडेट्स, ३६० डिग्री ऑडिओ अशी भन्नाट फीचर्स देण्यात आली आहेत. भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांचे वाढणारे महत्त्व लक्षात घेता सोनीने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. मात्र प्रोटोटाइपचे रूपांतर प्रत्यक्ष उत्पादनात करण्याबद्दलची माहिती कंपनीने अद्याप जाहीर केलेली नाही. गाडीच्या टेस्ट ड्राइव्हबद्दल तसेच कनेक्टिव्हिटीबद्दल आणि संकल्पनेबद्दलचे वेगवेगळे व्हिडीओज सोनीद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

एकंदरच नवीन लॅपटॉप्स, मोबाइल फोन, कॅमेरा, प्रोसेसर्स, सॉफ्टवेअर्स आणि अभिनव कल्पना यांची झलक यंदाच्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये पाहायला मिळाली. साथीच्या संकटात हा शो प्रत्यक्षात पार पडेल का, याविषयी प्रश्नचिन्ह होते. एकंदरच हा शो अनेक नवीन कल्पना आणि उत्पादनांची नांदी असल्याचे दिसते. ही सर्व उत्पादने येत्या वर्षभरात निश्चितच बाजारात उपलब्ध होतील आणि दैनंदिन व्यवहार अधिक सोपे आणि वेगवान करतील.

Story img Loader