जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या तंत्रज्ञान कंपन्यांचे लक्ष बाजारपेठा म्हणून सध्या भारतावर आहे. यामुळे २०१६ मध्ये भारतात अनेकविध गॅजेट्स येताहेत. चच्रेत असलेल्याया गॅजेट्सवर एक नजर.

२०१६ हे वर्ष तंत्रज्ञानाला एका नवीन वाटेवर घेऊन जाणार याची झलक सी-ई-एसमध्ये अख्या जगाला बघायला मिळाली. इंटरनेट ऑफ िथग्स (आयओटी) आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून अशक्य वाटणारी अनेक साधनं आणि उपकरणं बाजारात आणली गेली. जागतिक पातळीवर अव्वल दर्जाच्या मानल्या जाणाऱ्या सर्व तंत्रज्ञान कंपन्यांचे लक्ष बाजारपेठ म्हणून सध्या भारतावर आहे.

यामुळे २०१६ मध्ये स्मार्ट फोन्स, टॅबलेट्स आणि कॉम्प्युटर नवीन रंग-ढंगात, नवीन आकारात बघायला मिळणार आहेत. सॅमसंग दुमडता येणारे (फोल्डेबल स्क्रीन) फोन्स बाजारात आणण्यास सज्ज आहे. आय-फोन ७ इतर आय-फोन्सपेक्षा एक मिलीमीटरने स्लीम असल्याची चर्चा रंगायला लागली आहे. अर्थात हे सगळे बदल वेगाने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानामुळे होत आहेत.

या निमित्ताने भारतात सध्या चच्रेत असलेल्याहट के गॅजेट्सवर एक नजर टाकूया:

लिनोवो योगा ९०० :

लिनोवोचा योगा ९०० हा नवीन लॅपटॉप कंपनीच्या मते जगातला सर्वात स्लीम लॅपटॉप आहे. इंटेल सिक्स जनरेशन स्कायलेक प्रोसेसरवर चालणाऱ्या या लॅपटॉपची विशेष बाब म्हणजे तो लॅपटॉप, टॅब्लेट, स्टँड, टेंट अशा विविध आकारात फिरवता येते. यात ६ जेन इंटेल कोर आय ७ प्रोसेसरच्या जोडीला ८ जीबी रॅम आहे. १३.३ इंच एचडी डिस्प्ले असलेल्या या लॅपटॉप ५१२ जीबी स्टोरेजची क्षमता आहे. िवडोस १० वर चालणाऱ्या योगा ९००ची किंमत रु. १,२२,०९० इतकी आहे.

योगा ९००च्या जोडीला लिनोवोने टॅब थ्री प्रो हा टॅब्लेटसुद्धा बाजारात आणला आहे. हा स्प्लॅश प्रूफ असून तो प्रोजेक्टर म्हणूनही वापर करता येऊ शकतो. हा १०.२ इंची टॅब्लेट इंटेल अटोम झेड ८५०० प्रोसेसरवर चालत असून यात अ‍ॅन्ड्रॉइड लॉलिपॉप बरोबरच २ जीबी रॅम आणि ३२ जीबी मेमरी आहे. १०,२०० एमएएच एवढी बॅटरी असलेला हा टॅब रु. ३९,९९० मध्ये उपलब्ध आहे.

सॅमसंग:

मेक इन इंडियाच्या अंतर्गत सॅमसंग अनेक नवीन उत्पादने बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. सॅमसंगची भारतात दिल्ली, नोएडा आणि बेंगळुरू येथे तीन मोठे संशोधन केंद्रे आहेत.

कमीत कमी डेटाचा वापर : सॅमसंगच्या भारतातील संशोधन केंद्रामध्ये फोनमधील डेटा कमीत कमी वापरला जाण्यासाठी एक नवीन फिचर शोधून काढले आहे. ज्यामुळे विविध गोष्टींसाठी वापरला जाणारा डेटा ५० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.

गॅलेक्सी नवीन रूपात:

गॅलेक्सी ए सेव्हन आणि गॅलेक्सी ए फाइव्ह फोन सॅमसंग फिंगरिप्रिंट्र सेन्सरसह उपलब्ध करून देत आहेत. १३ मेगा पिक्सेल कॅमेरा असलेले हे फोन कमी उजेडात आणि अस्पष्ट न येणारे (ब्लर-फ्री) फोटो टिपण्यास उपयुक्त असल्याचा कंपनीचा दावा आहे.

कव्र्ड टीव्ही : फोरम २०१६ मध्ये सॅमसंगने एसयूएचडी टीव्ही जगासमोर आणला. टायझन ओएस असलेला हा टीव्ही क्वांटम डॉट डिस्प्ले या तंत्रज्ञानावर चालतो. टायझन ओएस मुळे लोकांना एकाच ठिकाणी सिनेमा, गेम्स आणि अ‍ॅप्सचा आनंद घेता येऊ शकतो.

स्मार्ट फ्रीज: स्मार्ट कन्वर्टर फ्रीज हा आपल्याला थंड करण्याच्या प्रक्रियेत बदल करण्याची मुभा देतो. यात फ्रीजरचे तापमान कमी करता येत असून भाज्या ठेवण्यासाठीही फ्रीजर वापरला जाऊ शकतो. जर तुम्ही फिरायला जाणार असाल तर यात असलेला व्हेकेशन मोड वापरून अन्न बऱ्याच दिवसांसाठी फ्रीजरमध्ये ठेवू शकता व फ्रीजचा उर्वरित भाग बंद करू शकता. तसेच काही वेळेला फ्रीजर बंद ठेवून फक्तफ्रीज वापरण्याची मुभा तुम्हाला मिळते. जंतू नष्ट करण्याचे कामसुद्धा स्मार्ट फ्रीज करतो. सॅमसंगच्या नवीन सिंगल डोअर फ्रीजमध्ये वातावरणातील बदलाप्रमाणे फ्रीजमधील तापमान अन्नासाठी अनुकूल बनवण्याची क्षमता आहे.

क्षिओमि रेडमी नोट ३

क्षिओमिने नुकताच रेडमी नोट ३ हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. या नवीन स्मार्टफोनचे मुख्य आकर्षण आहे याचा प्रोसेसर. हेक्झा कोर स्नॅपड्रॅगन ६५० प्रोसेसर असलेल्या या फोनमध्ये १.२ गिगाहर्टझच्या ४ कोर तर १.८ गिगाहर्टझच्या २ कोरचा समेळ आहे. ५.५ इंच एचडी डिस्प्ले असलेला हा फोन रॅममधील फरकामुळे दोन आवृत्त्यांमध्ये उपलब्ध आहे. एका आवृत्तीमध्ये २ जीबी रॅम आणि १६ जीबीअंतर्गत मेमरी आहे तर दुसऱ्या मध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबीअंतर्गत मेमरी आहे. हा एक भेद सोडला तर दोन्ही आवृत्त्यांमध्ये समान फीचर्स आहेत अ‍ॅन्ड्रॉॅॅइड लॉलिपॉपवर चालणारा हा  फोरजी फोन एका तासात ५०% चार्ज होऊ शकतो ज्याचे श्रेय या फोन मधील ४००० एमएएच बॅटरीला जाते. याच्या १६ मेगा पिक्सेलच्या कॅमेराचे वैशिष्टय़ म्हणजे फेझ डिटेकशन ऑटो फोकस आणि टू-टोन फ्लॅश. या जोडीला ५ मेगा पिक्सेल सेल्फी कॅमेरा आहेच!  4जी, ब्लुटूथ, जीपीआरएस, जीपीएस असे अनेक फीचर्स असलेला हा फोन रु.१०,००० च्या रेंजमध्ये उपलब्ध आहे.

नेटफ्लिक्स आणि बरंच काही:

नेटफ्लिक्सचे भारतात जोरदार स्वागत झाले आहे. रु. ५०० पासून सुरू होणारी ही नेटफ्लिक्सची सुविधा भारतीय तरुणांना भुरळ घालण्यास सज्ज होत आहे. नेटफ्लिक्स प्रमाणेच इतरही अनेक ई-सुविधांची माध्यमं भारताची कास धरत आहेत. अ‍ॅमझोन प्राइम व्हिडीओचे लवकरच भारतात आगमन होत आहे. याशिवाय सोनी, एनविडिया, पीएस ४, एक्सबॉक्स वन  भारतात ऑन-लाइन व्हिडीओ गेम्सचं जाळ निर्माण करण्याच्या तयारीत दिसत आहेत. थोडक्यात काय तर २०१६ ऑन-लाइन व्हिडीओ, गाणी, गेम्सने भारावलेलं असणार हे नक्की.

मायक्रोसॉफ्ट आणि गुगल:

िवडोज १०ची लोकप्रियता शिगेला पोचली आहे हे पाहता मायक्रोसॉफ्ट सतत नवनवीन अपडेट्स बाजारात आणत आहे. गुगलच्या क्रोम ओएसचे काही वेगळे नाही. पण विशेष म्हणजे हे अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्हाला सतत ऑन-लाइन राहण्याची गरज आहे. यातील बऱ्याच सुविधा इंटरनेटशी जोडल्या गेल्यामुळे सतत इंटरनेट वापरण्याची गरज निर्माण झाली आहे.

ऑफ-लाइन सुविधा काळाच्या पडद्यामागे जात असून सगळ्याच सेवा फक्त आणि फक्त ऑन-लाइन उपलब्ध करून दिल्या जात असताना सर्वात जास्त गरज भासत आहे ती वेगवान इंटरनेटची! यानिमित्ताने वाय-फाय, ब्रॉडबँड, ऑप्टिक फायबर, 4जी यांची मागणी या वर्षभरात कित्येक पटीने वाढणार यात शंका नाही.
तेजल शृंगारपुरे – response.lokprabha@expressindia.com