निपुण धर्माधिकारी म्हणजे ‘फोर्ब्स इंडिया’च्या ‘थर्टी अंडर थर्टी’ या यादीत ज्याचं नाव समाविष्ट झालं आहे, असा तरुण नाटककार. त्याच्याशी बातचीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘फोर्ब्स इंडिया’ या मासिकामध्ये ‘थर्टी अंडर थर्टी’ (30 under 30) च्या यादीत संपूर्ण भारतातूनच नव्हे तर या वर्षी संपूर्ण आशिया खंडातून निपुण धर्माधिकारी या तरुण नाटककाराचं नाव अंतर्भूत करण्यात आलं आहे. ‘फोर्ब्स इंडिया’ ही फोर्ब्स या मूळ अमेरिकन साप्ताहिकाची भारतीय शाखा. एक प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित व्यावसायिक मासिक म्हणून या मासिकाची ओळख आहे. हे मासिक त्यांच्या विविध याद्या आणि रेटिंगसाठी प्रसिद्ध आहे. तशीच एक यादी ‘थर्टी अंडर थर्टी’ (30 under 30) या नावाने दरवर्षी प्रसिद्ध होते. ज्यात कला आणि संस्कृती, वित्त, माध्यमं, क्रीडा, कायदा आणि धोरणं अशा क्षेत्रात अवघ्या तिशीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांची नावं अंतर्भूत होतात. त्यात कला आणि संस्कृती या यादीत नाटय़ क्षेत्रातल्या कामगिरीसाठी निपुणचं नाव समाविष्ट करण्यात आलं आहे.
वास्तविक फोर्ब्समध्ये नाव येण्यासाठी तीन पद्धती आहेत. एक म्हणजे आपण स्वत:हून अर्ज भरायचा, दुसरं म्हणजे काही लोकांनी नामनिर्देशन करायचं आणि तिसरं म्हणजे ते स्वत: लोकांना शोधणार. निपुणने अर्ज न देता, कोणीही त्याचं नामनिर्देशन न करता त्याचं काम बघून त्यांचा आपणहून निपुणला तो या यादीत येण्यायोग्य आहे अशा अर्थाचा मेल आला. नंतर कला आणि संस्कृतीच्या पॅनलमधील लोकांनी येऊन त्याची मुलाखत घेतली आणि त्याचं नाव ‘थर्टी अंडर थर्टी’च्या यादीत अंतर्भूत करण्यात आलं.
निपुणचं शिक्षण कॉन्व्हेन्ट शाळेमध्ये झालं. वयाच्या आठव्या वर्षांपासून त्याने शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली. तो म्हणतो ‘तसा मी बरा गायचो. पण मी त्याची मजा नाही घेऊ शकायचो. घरातले जेव्हा मला सांगायचे की बाबा रे म्हणून दाखव तेव्हा मी फार कंटाळा करायचो. मग मला आई बाबा नाटकांना घेऊन जायला लागले. ती नाटकं बघताना मला थोडं थोडं जाणवायला लागलं की हे मला आवडतंय. नंतर महाविद्यालयीन शिक्षण सुरू झालं आणि मी वेगवेगळ्या आंतर महाविद्यालयीन स्पध्रेत भाग घ्यायला सुरुवात झाली. माझ्याच नकळत मी दिग्दर्शनाकडे वळलो आणि माझी नाटकाबद्दलची ओढ इथून वृिद्धगत होत गेली.
महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर नाटक सोडायचं नाही असं ठरवलं; पण त्यासाठी कुठल्या तरी बॅनरची गरज होती. तिथेच ‘नाटक कंपनी’ची स्थापना झाली. इथून निपुणचा खरा प्रवास सुरू झाला. त्याने प्रायोगिक रंगभूमीवर बरेच प्रयोग केले जे वाखाणण्याजोगे आहेत. हे सगळे प्रयोग करताना लेखक, दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता या सगळ्या भूमिका तो समर्थपणे पेलत होता. पण तरीही प्रायोगिक रंगभूमीबद्दल तो म्हणतो की, मी रंगभूमीमध्ये फरक करू इच्छित नाही. मी नाटकाकडे एक नाटक म्हणून पाहतो आणि म्हणूनच ‘नाटक कंपनी’ची स्थापना आम्ही केली.
नाटक कंपनी चालवणं म्हणजे आर्थिक गणितं आली. त्याबद्दल तो म्हणतो, एका प्रयोगाला मिळालेला पसा आम्ही दुसऱ्या प्रयोगासाठी वापरतो. तो नाटक कंपनीमध्येच फिरता राहतो आणि आम्ही लोकशाही मार्गाने काम करत असल्यामुळे गणितं पटापट सुटत जातात.
या व्यतिरिक्त निपुण बऱ्याच सिनेमांसाठी लेखनही करतो. त्याचा एक गाजलेला िहदी सिनेमा म्हणजे ‘नौटंकी साला’; ज्याचं त्याने संहिता लेखनही केलेलं आहे आणि त्यात अभिनयही केलेला आहे. याबद्दल तो म्हणतो की बॉलिवूडमध्येही काम करताना खूप मजा आली आणि तशी व्यावसायिकता आपण मराठीतही हळूहळू साधतो आहोत याचा त्याला आनंद आहे.
निपुणचा अतिशय जवळचा मित्र अमेय वाघ म्हणतो की, निपुण त्याच्या कामामध्ये कितीही व्यावसायिक (professional’) असला तरीही तो कलाकाराला एक कलाकार म्हणून खूप किंमत देतो. निपुणकडे माणसं जपण्याची खूप छान कला आहे. त्यामुळेच ‘नाटक कंपनी’ इतकी वर्ष सातत्याने काम करते आहे. जोखीम घेण्याचं धाडस त्याच्याकडे आहे. वेगवेगळे प्रयोग सतत त्याला करायला आवडतात आणि त्याची जबाबदारीही तो घेतो. निपुण सगळ्या गोष्टीचं व्यवस्थापन उत्तम प्रकारे करतो आणि म्हणून सगळ्या गोष्टी तो व्यवस्थित हाताळू शकतो.
पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट असताना तू नाटय़ क्षेत्राकडे कसा वळलास, असं विचारल्यावर तो म्हणतो की, मी माझ्या सीए मित्रांना बघायचो ते अकाऊंटिंग, टॅक्सेशन, ऑडिट आणि एकंदर सगळंच मन लावून करायचे आणि त्यातले काही असे असायचे की त्यांना यात काही फार रस नसायचा. त्यांच्यातला मी होईन असं मला वाटायला लागलं आणि मग मी शोध घ्यायला सुरुवात केली की मला काय आवडतंय तर मनात नाटक हे एकमेव उत्तरं आलं. लेखन, दिग्दर्शन, निर्मिती, अभिनय यातलं जास्त काय करायला आवडतं याचं उत्तरं क्षणाचाही विलंब न करता त्याने दिग्दर्शन असं दिलं.
फोर्ब्सने निपुणची ओळख ‘एक असा माणूस ज्याच्यासाठी संपूर्ण जग म्हणजे जणू एक रंगमंच आहे.’ अशी करून दिली आहे. ही उक्ती सार्थ ठरणारी आहे. त्याची कुठलीही नाटय़कृती असो ती जगभर पोहोचतेच. तोही म्हणतो की काम करताना मी कधीच मला हे मिळावं म्हणून काम केलं नाही; पण तरीही जेव्हा त्याची दाखल घेतली जाते तेव्हा खूप बरं वाटतं आणि आणखीन काम करण्याचा उत्साह येतो. त्याचं फोर्ब्सच्या यादीत आलेलं नाव म्हणजे त्याची वाढलेली जबाबदारी आहे असं त्याला वाटतं. प्रत्येक गोष्टीत निपुणता हे त्याचं वैशिष्टय़ आहे. असे निपुण कलाकार नाटय़सृष्टीला लाभले तर तिचं भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे यात काही शंकाच नाही.
ऋतुजा फडके – response.lokprabha@expressindia.com