मुंबईतील अनेक कलादालनांनी एकत्र येऊ न सुरू केलेल्या छायाचित्रविषयक प्रदर्शनांपैकी एक भाग केमोल्ड प्रिस्कॉट कलादालनात सध्या सुरू आहे. कलावंतांच्या मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यातून प्रतििबंबित होतो.
कलावंताची जडणघडण नेमकी होते कशी? तो काय व कसा विचार करीत मोठा होतो? इतर कलावंतांशी त्याचे संबंध कसे असतात? कलावंत एकमेकांशी बोलतात का? बोलतात, तर मग त्यांचे विषय काय असतात? ते स्वत:च्या कलाकृतीबद्दल बोलतात? इतरांच्या कलाकृतींबद्दल बोलतात, की केवळ हवापाण्याच्याच गप्पा करतात? कलावंतांच्यात मैत्री असते का? असेलच तर तिचे स्वरूप काय असते? त्यात कलेवरची चर्चा किती होते? एकमेकांना प्रोत्साहन देणारा भाग त्यात किती असतो? कलेच्या नवविचारांचे पडसाद त्यांच्या या मैत्रीत किंवा नातेसंबंधांमध्ये कितपत उमटतात? या व अशा अनेक प्रश्नांबद्दल रसिक आणि सामान्यजनांमध्ये प्रचंड कुतूहल असते. मुळात चित्रकार-रसिकांचा फारसा संवाद होताना दिसत नाही. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यातच राहतात. शिवाय कलावंतांच्या बाबतीत किंवा एकूणच कलेच्याही बाबतीत आपल्याकडे प्रदर्शन वगळता फारशा चर्चा- कार्यक्रम होत नाहीत. दस्तावेजीकरणाच्या बाबतीत तर आपल्याकडे आनंदच मानायला हवा अशी स्थिती आहे. मग या प्रश्नांना उत्तरे मिळणार कुठे? पण सध्या काही कलावंतांच्या बाबतीत तरी या प्रश्नांचा शोध घेत येईल, असे एक प्रदर्शन केमोल्ड प्रिस्कॉट कलादालनात सुरू आहे. सध्या मुंबईतील अनेक कलादालनांनी एकत्र येऊ न सुरू केलेल्या छायाचित्रविषयक प्रदर्शनांपैकी एक भाग इथे सुरू आहे. त्या एका भागातही तीन वेगवेगळी प्रदर्शने पाहता येतात. त्यातील एक महत्त्वाचे ‘दॅट फोटो वी नेव्हर गॉट’ हे प्रदर्शन प्रसिद्ध कलावंत शिल्पा गुप्ता आणि एशिया आर्ट आर्काइव्ह यांनी सादर केले आहे. या प्रदर्शनातून रसिकांना पडलेल्या काही प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेतला जाऊ शकतो.
हाँगकाँगस्थित ‘एशिया आर्ट आर्काइव्ह’ या संस्थेचे सबीह अहमद यांच्याकडे अनेक चित्रकारांनी फोटो, पुस्तके, पत्रे, कागदांवर केलेल्या नोंदी, दैनंदिनी आदी सोपविल्यानंतर त्या संग्रहातून काही महत्त्वाची कागदपत्रे-छायाचित्रे यांची निवड करून या कलावंतांच्या आंतरसंबंधांवर प्रकाश पडेल अशा प्रकारे त्याला शिल्पा गुप्ता यांनी दृश्यरूप दिले आहे. हे एक प्रकारचे मांडणीशिल्पच ठरावे. हे सारे वाचत पुढे सरकताना थोडा नव्हे तर चांगलाच संयम आपल्याकडे असायला हवा. कारण प्रदर्शनाच्या मांडणीतील लिखाण हे अतिशय लहान आकारातील फॉण्टमध्ये करण्यात आले आहे. शिवाय अनेक ठिकाणी ते वाकून वाचावे लागते, डोळ्यांवरही ताण येतो. शिवाय त्यात पाहण्या-बघण्यासारखे बरेच काही आहे. करण्यात आलेले लिखाण आणि बाजूला ठेवलेल्या वस्तू कदाचित त्यातील नोंदीसह ठेवलेली पुस्तके, प्रदर्शित केलेली छायाचित्रे, मासिकांची पाने, त्यातील नोंदी, त्यांची मुखपृष्ठे यांच्याशी त्याचा घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे निरीक्षण वाचून पुढे सरकताना पुन्हा एकदा दृश्यरूप आणि मांडणी व्यवस्थित पाहावी लागते, अन्यथा घाईत काही निसटण्याची भीती वाटते. पण संयम असेल तर अनेक गोष्टींचा उलगडा व्यवस्थित होईल. किंवा प्रयोग म्हणून २२ एप्रिलपर्यंत हे प्रदर्शन पुन्हा पुन्हा पाहण्यासही हरकत नाही. कारण दर खेपेस काही नवीन हाती लागण्याची पूर्ण क्षमता प्रदर्शनात आहे.
उदाहरणच घ्यायचे तर १८९० या कलावंतांच्या गटामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचा संवाद झालेला दिसतो. हा वेगवेगळ्या पातळ्यांवरचाही संवाद आहे. १८९० अचानक कुठून आले. तर ज्यांनी या गटाला जागा दिली, त्या कलावंताच्या घराचा हा क्रमांक होता. कलावंतांनी एकमेकांबरोबर साधलेल्या संवादाबरोबरच त्यांच्या नोंदींमधून त्यांच्या अनेकपदरी नात्यांचा उलगडा होता. या गटाच्या संवादात एके ठिकाणी नोंद वाचायला मिळते, त्यात आजच्या अनेक आघाडीच्या कलावंतांचा उल्लेख आहे आणि त्यांच्यातीलच एक कलावंत म्हणतो, एकदा आमच्या लक्षात आले की, आमच्यापैकी जवळपास प्रत्येकालाच गुलामने (गुलाम मोहम्मद शेख) कधी ना कधी शिकवलेले आहे.. मग पुन्हा एकदा संवादाची दिशा बदलताना रसिकाला जाणवते. एखाद्या गोष्टीची जाणीवही कशी विचारांची दिशा बदलते, ते इथे जाणवते.
प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर बरवे यांचा एक वेगळा फोटो आहे. त्याखाली असलेल्या नोंदीमध्ये प्रसिद्ध चित्रकार सुधीर पटवर्धन, नलिनी मलानी, दिलीप रानडे, शकुंतला कुलकर्णी, माधव इमारते यांचा उल्लेख येतो. त्यांच्यातील मैत्रबंध उलगडत जातात. संवेदनशील चित्रकार नसरीन मोहम्मदी आणि जेराम पटेल यांच्याशी भावबंधही काही ठिकाणी हळुवार उलगडताना दिसतात. नलिनी मलानी, गीव्ह पटेल व सुधीर पटवर्धन यांनी यादी करून एकत्र वाचलेली पुस्तके, दुसऱ्या एका ठिकाणी प्रत्यक्ष यादी, पुस्तकांवर केलेल्या नोंदी हे सारे इथे पाहता येते आणि कलावंत कसा घडत गेला त्याचा वेगळा प्रत्ययही येतो. गुजराती नियतकालीक ‘वृश्चिक’ने यात महत्त्वाची भूमिका बजावलेली दिसते. त्यात अनेक चित्रकार लिखाण करीत. चित्रकारांची वैचारिक चळवळच जणू. सहज आपल्या मनात ‘मौज’, ‘अभिरुची’, ‘माणूस’, ‘सत्यकथे’चा कालखंड नजरेसमोरून पुढे सरकतो. तो कालखंडही तसाच असावा..
याच प्रदर्शनाला जोडून फोटोइंक या कलादालनाच्या संग्रहातील छायाचित्रकारांनी टिपलेल्या अनेक कलावंतांच्या व्यक्तिचित्रांचे एक स्वतंत्र दालन इथे आहे. याच्यासोबत त्या व्यक्तिचित्रांचाही आस्वाद घ्यायला हरकत नाही. त्यातील काही छायाचित्रे पाहून व्यक्तिचित्र म्हणजे सरळसोट चेहरा दिसेल असे टिपलेले छायाचित्र या समजाला यशस्वी छेद जायला मदतच होईल!
विनायक परब – response.lokprabha@expressindia.com
@vinayakparab