नवरात्रीचे नऊ दिवस स्त्रिया स्वत: नटतातच शिवाय देवीलाही सजवतात. त्यासाठी साडय़ांइतकंच प्राधान्य असतं दागिन्यांना. यंदा त्यात प्रेशिअस मेटल आणि स्टोनचा ट्रेण्ड आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दसऱ्याच्या सणाला आपटय़ाची पाने देऊ न सोनं लुटण्याची प्रथा आहे. खऱ्या सोन्याचे भाव मात्र गगनाला भिडले आहेत, परंतु तरीदेखील आपल्या लाडक्या देवीला सोन्याने मढवल्याशिवाय भाविकांचं मन भरत नाही. आपल्या देवीच्या अंगावर चढवण्यात येणारे अलंकार कोणत्या धातूचे असायला हवेत, त्याचं डिझाइन कसं असावं, कोणत्या सोनाराकडून ते घडवून घ्यावं याची सगळी आखणी भक्तगण महिनाभर अगोदरपासूनच करतात. नवरात्रीलाही देवीच्या साजशंृगारात वैविध्यता आढळते. मग ती देवी स्वत:च्या घरातील असो किंवा सार्वजनिक मंडळातील, तिचं नखापासून केसांपर्यंतचं सुंदर रूप भाविकांच्या डोळ्यांचं पारणं फेडतं. महालक्ष्मी असो, दुर्गा असो किंवा पार्वती. देवीला बघता क्षणी मन प्रसन्न होतं. कोरीव डोळे, लांबसडक केस, त्यावर नक्षीदार मुकुट, भरजरी साडी, हिरवा चुडा आणि मुख्य म्हणजे विविध प्रकारचे तिचे अलंकार बघून मंत्रमुग्ध व्हायला होतं.

आजकाल नवरात्रीच्या नऊ  दिवसांत प्रत्येक दिवशी त्या दिवशीच्या रंगाप्रमाणेच देवीला साडी नेसवली जाते. जसे सध्याची पिढी नऊ  दिवसाचे नऊ  रंग जरा हटके मानते त्याचप्रमाणे देवीच्या दागिन्यांमध्येही या नव्या पिढीला वैविध्य हवे असते. नव्या नवरीच्या देखण्या रूपाप्रमाणे देवीलाही नटवायचं सजवायचं असतं. मंगळसूत्रापासून ते पायातल्या जोडव्यांपर्यंत मिळणाऱ्या दागिन्यांमध्ये दरवर्षी नवनव्या डिझाइन्स मार्केटमध्ये उपलब्ध असतात. भक्तांना देखील त्याच त्याच डिझाइन्स तेच तेच दागिने देवीला घालायचे नसतात. दरवर्षी आपण स्वत:साठी नवे कपडे खरेदी करतो त्याचप्रमाणे देवीलादेखील नवी वस्त्रे नवे दागिने घेतले जातात.

मागच्या वर्षी म्हाळसा आणि बानूच्या दागिन्यांची फॅशन नवरात्रीमध्ये जास्त प्रमाणात दिसून येत होती. यंदा मात्र प्रेशिअस मेटल, स्टोनचं प्रमाण नवरात्रात जास्त आहे. मेटॅलिक एलिमेंटपासून निर्माण होणाऱ्या या प्रेशिअस मेटलच्या दागिन्यांची किंमत जास्त असली तरी ग्राहकांच्या ते नेहमीच पसंतीत उतरतात. प्रेशिअस मेटलचा इतिहास पाहता त्याचा वापर पूर्वी चलनासाठी केला जाई, परंतु आता त्याचा वापर गुंतवणुकीसाठी किंवा औद्योगिक वस्तू म्हणून केला जातो. प्रेशिअस मेटल आपण नाण्यांच्या किंवा विटांच्या स्वरूपात विकत घेऊ  शकतो आणि त्याची घडणावळ करू शकतो. विविध प्रेशिअस मेटलपासून बनवण्यात येणारे दागिनेदेखील तयार स्वरूपात आपण विकत घेऊ  शकतो. यंदा नवरात्रीमध्ये प्रेशिअस मेटलच्या दागिन्यांची मागणी जास्त आहे. गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, प्यालेडिअम, रुथेनिअम, रेडिअम, इरिडीअम, ऑसमिअम इत्यादी प्रेशियअस मेटलची उदाहरणे आहेत. प्रेशिअस मेटलच्या तुलनेत बेस मेटलची किंमत कमी असते, परंतु प्रेशिअस मेटलमुळे येणारी दागिन्यांमधील चमक, त्यांचा लक्षवेधीपणा बेस मेटलमध्ये दिसून येत नाही. अल्युमिनिअम, कॉपर, लीड, निकेल, टीन, िझक इत्यादी बेस मेटलची उदाहरणे आहेत.

प्रेशिअस मेटलसोबतच या झगमगटाच्या दुनियेत प्रेशिअस स्टोनची मागणीही वाढत जाताना दिसतेय. प्राचीन काळापासून वापरात असणारे जेमस्टोन, त्यांचा रंग, चमक, आकार, दुर्मीळ असणं यामुळे बाकीच्या खनिज क्रिस्टलपेक्षा ते वेगळे भासतात. याशिवाय प्रत्येक स्टोनमागे उपचाराची शक्ती असते अशी श्रद्धा असल्यामुळे ग्राहक  असे स्टोन खरेदी करायला प्रवृत्त होतात.  रामायण-महाभारत यांसारख्या पौराणिक मालिकांमध्येदेखील देवदेवतांच्या अंगावर अशा प्रकारच्या जेमस्टोनचे दागिने दिसून येतात. त्या दागिन्यांचा लुक श्रीमंती दर्शवत असल्यामुळे नवरात्रात देवीच्या अंगावर असे दागिने चढवल्याने मूर्तीमध्ये भरीवता, प्रसन्नता भासते. बहुतेक जेमस्टोन हे कठीण स्वरूपात असतात; परंतु काही मृदू खनिजांपासून जेमस्टोनचे दागिने बनवता येतात. ज्या स्टोन्सचा साठा भरपूर प्रमाणात आहे आणि ते सहज उपलब्ध होतात अशा स्टोन्सला सेमी प्रेशिअस स्टोन्स म्हणतात. तर जे स्टोन्स दुर्मीळ असतात त्यांना प्रेशिअस स्टोन्स म्हणतात व त्याची किंमतही जास्त असते. डायमंड, रुबी, सफायर, एमरल्ड हे प्रेशिअस स्टोन अतिशय मौल्यवान आणि किमती असतात. माणिक, नीलम, पन्ना, मोती, पुष्कराज, बेरुज, फिरोझा इत्यादी सेमी प्रेशिअस स्टोन्सची उदाहरणे आहेत.

प्रेशिअस मेटल आणि प्रेशिअस स्टोनचे दागिने महाग असले तरी आजकालची पिढी दर्जा आणि नावीन्याला महत्त्व देते. खिशाला थोडी कात्री लागली तरी चालेल, पण वस्तू उत्तम असली पाहिजे, असं त्यांना वाटत असतं. गुजराती-मारवाडी स्त्रिया नवरात्रीच्या काळात गरबा दांडिया खेळताना हेवी ऑक्सिडाइझची ज्वेलरी परिधान केलेल्या दिसतात. त्यांच्या वर्क, एम्ब्रॉयडरीवाल्या घागरा-चोळीसोबत अशी ऑक्सिडाइझची किंवा मेटल, टेम्पल ज्वेलरी भाव खाऊन जाते. पारंपरिक राजस्थानी ज्वेलरीनेसुद्धा आता बदलत्या काळानुसार मॉडर्न रूप घेतलेले दिसते. मिरर वर्कचा दुप्पटा आणि त्यावर मिरर वर्क ज्वेलरी हे कॉम्बिनेशन नेहमीच चांगले दिसते आणि त्यात आता वेगवेगळे पॅटर्न बघायला मिळतात. नवरात्रीत घुंगरांचादेखील मोठय़ा प्रमाणात वापर होतो. घुंगरांचे नेकलेस, कानातले, पैंजण तर असतातच परंतु जॅकेट, घागरा इत्यादीलासुद्धा घुंगरू जोडून वेगवेगळ्या डिझाइन्स सध्या खास नवरात्रीसाठी उपलब्ध असलेल्या बाजारात बघायला मिळाल्या. असेच दर वर्षी नवनवीन प्रकारचे नवरात्री स्पेशल दागिने व त्यांच्यातील वैविध्य या उत्सवात दिसून येते. त्यासाठीच प्रत्येक नवरात्रोत्सवात स्त्रिया देवीसाठी व स्वत:साठी आपल्या पसंतीचे दागदागिने खरेदी करताना दिसतात.
अमृता अरुण
response.lokprabha@expressindia.com