गेली ५४ वर्षे सुरू असलेली राज्य नाटय़ स्पर्धा म्हणजे नाटय़क्षेत्रातलं एकेकाळचं मानाचं पान. आता मात्र त्यांचं महत्त्व पूर्वीइतकं उरलेलं नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बऱ्याच महिन्यानंतरची निवांत सुट्टी. भरपेट आणि गोडा-धोडासहित जेवण झालं. अशा जेवणानंतर वर्तमानपत्र वाचण्याच्या निष्फळ प्रयत्नात मी होते. अर्थातच तो असफल झाला. थोडय़ाच वेळात समोरची सगळी अक्षरं धुरकट झाली. डोक्यावरती फिरणारा पंखा, नुकत्याच धुवून वाळत घातलेल्या कपडय़ांचा वास, घडय़ाळाची टीक टीक आणि समोरच्या बिल्डिंगमध्ये काम सुरू असल्याने तिथून येणारा ड्रील मशीनचा आवाज सगळं एकात एक गुंतलं आणि डोळे आपोआप बंद झाले. हातातल्या वर्तमानपत्राने मीच माझं तोंड झाकलं. काळोख. कीर्र काळोख.
अचानक एक दृश्य डोळ्यासमोर आलं. एका टेबलाभोवती नऊ खुच्र्या आणि नऊ फुलं. जणू काही राऊंड टेबल कॉन्फरन्स. थोडासाच प्रकाश. जणू ती खोली कुणाची तरी वाट पाहत होती. थोडय़ा वेळाने नऊ वेगवेगळ्या चेहऱ्यांचं आगमन झालं. नऊ चेहऱ्यांवर वेगवेगळे भाव होते. बरं, कुणालाच हात, पाय असे अवयव नव्हते. नुसता पिवळा गोल. व्हॉट्सअॅपच्या इमोटिकॉन्ससारखा. बाकी काही नसलं तरी प्रत्येक चेहऱ्याला तोंड होतं. नाकी डोळी एकदम ठणठणीत. त्यांना हात लावला तरी फुटून जातील असे गोळे. ताडगोळ्यासारखे बुळबुळीत. पण फिकट पिवळ्या रंगामुळे अतिशय लोभसवाणे दिसणारे. सगळे खुच्र्यामध्ये टुणूकन् येऊन बसले. मी संभ्रमात. हे असे हात पाय नसलेले, फक्त चेहरा असलेले आहेत तरी कोण? हळूहळू एक एक गोल पुन्हा टुणूकन् उडी मारून त्या गोल टेबलावर येत होता. सगळंच गोल गोल होतं. एक एक जण येताना दिसला तेव्हा कळलं की हे ‘नवरस’ आहेत. एक सुटकेचा नि:श्वास. कोण आहेत याचा साक्षात्कार तरी झाला. तर हे नवरस (शृंगार, हास्य, रौद्र, करुण, वीर, अद्भुत, बीभत्स, भयानक, शांत) एकमेकांसोबत दिलखुलासपणे गप्पा मारण्यासाठी एकत्र जमले होते. त्यांना पुस्तकांमध्ये राहून राहून अतिशय कंटाळा आला होता. पुस्तकातसुद्धा ते सगळे एकत्र कधीच भेटत नव्हते. लेखक तगडा असेल तर त्यांची एकत्र भेट. म्हणून मग ते ठरवून भेटायला लागले आणि मग करायचं काय? तर प्रत्येकाने काहीतरी नवीन माहिती उरलेल्या सगळ्यांना द्यायची. (त्यांच्या एकंदर संभाषणावरून मला हे लक्षात आलं) प्रत्येकाच्या गळा भेटी झाल्यावर वीर रस खणखणीत आवाजात शांत रसाला म्हणाला, ‘‘शांत रसा, आज तुझ्यावर राज्य आहे. आज तू आम्हाला काही सांगायचं आहेस. चल उचल ते फूल आणि लाग बोलायला.’’ फुल पण कसलं तर गोकर्णीचं. सगळंच अगदी शाही थाटात. वीर रस उडय़ा मारत आपल्या जागेवर गेला आणि शांत रस शांतपणे पुढे आला. हात नसल्याने त्याने दातांनी फूल उचललं पुन्हा खाली ठेवलं आणि बोलायला लागला.
‘‘ नमस्कार. नवरसहो! आपला वापर जसा लेखकांनी केला तसा तो रंगकर्मीनीसुद्धा केला. आपण उगीच कंटाळलो आहोत.’’
रौद्र रसाने आपला अवतार दाखवलाच, ‘‘ए..आमच्या चुका दाखवू नकोस. काम दिलंय ते कर गुपचूप.’’
शांत रस त्याच्या स्वभावानुसार बोलतच राहिला. ‘‘ हो. रे. मला असं म्हणायचं..की.. आपलं रंगमंचावरचं स्थान हे फार मोलाचं ठरत आलेलं आहे. आपल्याशिवाय कुठल्याच भावना प्रेक्षकांपर्यंत पोहचू शकत नाहीत आणि म्हणूनच आज मी तुम्हाला अशी एक नाटय़ स्पर्धा सांगणारे की जी गेली ५४ वष्रे आपल्याला सोबत घेऊन महाराष्ट्रावर राज्य करते आहे. आपल्या धकाधकीच्या जीवनात माणूस सुखावतो कधी तर जेव्हा तो कलेत दंग होतो तेव्हा. कला म्हणजेच आपला नऊ जणांचा आविष्कार.’’ सगळे रस अगदी कान टवकारून ऐकत होते. आपल्याला कुणीतरी इतकं महत्त्वाचं मानतं हे त्यांच्यासाठी जरा नवीन होतं. असं सदसद्विवेकबुद्धीने त्यांच्याशी कुणीतरी पहिल्यांदाच संवाद साधत होतं. शांत रसाला मिळालेल्या अनेक देणग्यांपकी एक. शांत रस सगळ्या रसांना मंत्रमुग्ध करत पुन्हा बोलू लागला.
‘‘महाराष्ट्र राज्याच्या स्थापने सोबतच म्हणजे १९६० मध्ये या स्पध्रेची मुहूर्तमेढ रोवली गेली. खरंतर १९५४-५५ सालीच या स्पध्रेला सुरुवात झाली होती, पण ‘महाराष्ट्र’ राज्य नाटय़ स्पर्धा असं कोरलं गेलं ते मात्र १९६० साली. तर तेव्हापासून आपल्यामुळे श्रीमंत झालेली ही स्पर्धा. मराठी रंगभूमीचं एक मानाचं पान. महाराष्ट्रातल्या १९ ठिकाणी ही स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये पार पडते. मराठी सोबत िहदी, संगीत, संस्कृत या विभागातसुद्धा ही स्पर्धा होते; पण मराठी हौशी नाटय़ स्पर्धा हा यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग.
‘‘आपल्याला माहितीच आहे की १९६०चा काळ हा सामाजिक स्थित्यंतराचा काळ होता. हास्य रस तर या काळात गायबच झाला होता. ही अशी स्थित्यंतरं कलावंतांना कधी अस्वस्थ करीत होती तर कधी नवीन उमेदही देत होती. या सगळ्या बदलांना एका व्यासपीठाची गरज होती आणि ती गरज रंगभूमीचे चाहते आणि रसिकाग्रणी असणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी जाणली आणि शासनातर्फे महाराष्ट्र राज्य नाटय़ स्पध्रेचं बीज रोवलं गेलं. आज त्याचाच वटवृक्ष होऊ पाहतो आहे. ज्याला अनेक नामवंत लेखकांनी, दिग्दर्शकांनी खतपाणी घातलं आणि आपुलकीने वाढवलं. पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या ‘चंद्र नभीचा ढळला’पासून ते मुकुंद कुलकर्णी यांनी दिग्दíशत केलेल्या ‘न हि वैरेन वैरानी’’ इथपर्यंत स्पध्रेचा प्रवास आहे. या प्रवासात अनेक कलाकार घडले. विजया मेहता, जब्बार पटेल, भक्ती बर्वे, अमोल पालेकर, दिलीप प्रभावळकर आणि बरेच. सांगत बसलो तर माझी वेळ संपून जाईल. तर या स्पध्रेने अनेक कलावंत मराठी रंगभूमीला दिले. जब्बार पटेल म्हणतात, ‘‘ या स्पध्रेने मला रंगभूमीचं सामथ्र्य तर जाणून घ्यायला मदत केलीच; पण मी मला दिग्दर्शक म्हणून ओळखायला लागलो. स्वतला शोधण्याच्या प्रक्रियेतसुद्धा राज्यनाटय़ स्पध्रेचं फार मोठं योगदान आहे.’’ या स्पध्रेतून कलाकारावर अभिनयाचे संस्कार व्हावे म्हणून स्वत: विजया मेहतांनी शिबिरं घेतली. अभिनयाच्या संस्कारांची प्रयोग शाळा म्हणून ही स्पर्धा नावारूपाला येऊ लागली. यात काही अडचणी आल्या नाही तर नवलच. ५४ वर्षांचा प्रवास काही सोपा नाही. आपण १५ मिनिटं या मुंबईच्या रस्त्यांवरून प्रवास केला तर आपल्याला वाटलं आपण आता फुटून जाऊ. तर ५४ वर्षांत या स्पध्रेला कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागलं असेल.’’
तेवढय़ात सगळ्यांनी स्वतकडे एक ओझरती नजर टाकली. आपलं अस्तित्व टिकवण्याची भीती सगळ्यांनाच असते. त्याच भीतीने ‘करुण’ रसाने विचारलं, ‘‘ या स्पध्रेत माझा शिरकाव झालाय का? स्पध्रेची ‘करुण’ अवस्था झालीये का?’’
शांत रस उत्तरला, ‘‘ नाही रे. मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा ठिकाणी प्रेक्षक पोहोचत नाहीये. जी गंभीर बाब आहे.’’
रौद्र रसाला जाग आली ‘‘ माझा शिरकाव गरजेचा आहे बहुधा’’
‘‘अजिबात नाही. तुझ्या शिरकावाने काहीही होणार नाही. काहीतरी संपुष्टात आणायचं असेल तर तुझा शिरकाव गरजेचा आहे. आपल्याला आपलं अस्तित्व अबाधित ठेवायचंय.’’
हास्यरसाने न राहून विचारलं, ‘‘मग काय करायचं? कारणं काय आहेत याची? इतकी मोठी, मानाची स्पर्धा आणि मुंबई, पुणे यांसारख्या ठिकाणी तिची अशी अवस्था व्हावी म्हणजे हास्यास्पद नाही का?’’
‘‘हास्यापद कशासाठी? मुळीच नाही. कसं आहे ना.. मुंबई काय किंवा पुणे काय माणसाची व्यवधानं फार वाढली आहेत. त्यांना जर पुन्हा राज्य नाटय़ स्पध्रेकडे वळवायचं असेल तर त्याची प्रसिद्धी जोरदार व्हायला हवी. म्हणजे बघ ना आपलं महत्त्वसुद्धा लोकांना व्हॉट्सअॅपवर आपला वापर करताना समजलं. ग्लॅमर ही बाब फार महत्त्वाची आहे. या वर्षीसुद्धा मुंबईपेक्षा मुंबईच्या बाहेर स्पर्धा गाजली. १९६०च्या काळात कसं होतं की व्यासपीठ उपलब्ध करून देणं महत्त्वाचं होतं; पण आता ते महत्त्वाचं राहिलेलेच नाही. असंख्य व्यासपीठं उपलब्ध झाल्यामुळे या पारंपरिक व्यापीठांकडे दुर्लक्ष होत आहे. मुंबईमधल्या माणसाची सहनशीलतासुद्धा कमी झालीय. म्हणजे दोन अंकी नाटकांपेक्षा एक अंकी नाटक बघणं, करणं माणसाला सोपं वाटतंय. टेस्ट मॅचपेक्षा ट्वेंटी-ट्वेंटीचा टीआरपी कसा जास्त असतो अगदी तसंच. असं जरी असलं तरी स्पध्रेचा दर्जा मात्र तसाच टिकून आहे. मी हा विषय तुमच्याशी बोलायला आज निवडला कारण नुकत्याच या स्पर्धा पार पडल्यात आणि ताज्या आहेत; पण कुठल्याच कॉलेजच्या नाक्यावर या स्पर्धाची चर्चा नाही ज्याची मनाला खंत वाटते. पण जर आपण याला हास्यास्पद म्हटलं तर आपण काहीच करू शकणार नाही. रौद्र, वीर झालो तरी काही नाही होणार. नाटकांमधले रस शोधायलाही कुणाला वेळ नाहीये त्यामुळे मला असं वाटतं ही रंगभूमी सदा समृद्ध ठेवायची असेल तर आपण माणसांमध्ये शिरकाव केला पाहिजे. शांतपणे. तर आपण त्यांच्या बुद्धीत उतरू आणि बऱ्याच गोष्टी घडतील. पुन्हा नाटय़स्पध्रेचं राज्य येईल. सगळ्याच स्पर्धा या रंगभूमीला समृद्ध करण्याच्या हेतूने पुढे येतात तो हेतू सफल होणं महत्त्वाचं आहे; पण त्यासाठी फक्त सगळ्यांनी योग्य प्रमाणात एकत्र यायला हवं.’’
सगळ्यांनी आपापली प्रमाणं ठरवून घेतली. शांत रसाने आपलं प्रमाण सगळ्यात जास्त ठेवलं तर बीभत्स, रौद्र यांनी सगळ्यात कमी. थोडय़ाच वेळात सगळ्यांचा मिळून एक मोठा गोळा तयार झाला आणि उंच आकाशात त्या गोळ्याने झेप घेतली. जणू ‘कुणाच्या आत शिरकाव करायचा?’ हे तो मोठा गोळा आकाशातून शोधत होता. माझ्यावरच तो गोळा येऊन फुटला की काय या भीतीने मी दचकून जागी झाले. बघते तर आईने जवळजवळ एक भांडंभर पाणी माझ्यावर िशपडलं होतं. मी भानावर आले. या स्वप्नाने मला बरंच काही शिकवलं. एका नवीन विचाराने माझ्या मनावर एका वेगळ्याच ढंगात राज्य केलं होतं.
ऋतुजा फडके –