सुनिता कुलकर्णी

‘टाइम’ या जगप्रसिद्ध मासिकाने ‘नव्या पिढीचं नेतृत्त्व’ असा गौरव करत आपल्या मानसी जोशीचं छायाचित्र ताज्या अंकाच्या मुखपृष्ठावर (१९ ऑक्टोबर २०२०) प्रसिद्ध केलं आहे. गेल्या वर्षीच डब्ल्यूएफ पॅरा बॅडमिंटन जगज्जेता स्पर्धेत वयाच्या तिसाव्या वर्षी सुवर्णपदक मिळवणारी मानसी खरोखरच दुर्दम्य आशावादाचं प्रतीक आहे.

youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Raja Ranichi Ga jodi Fame Actress Kelvan
फिश फ्राय, सोलकढी, गोडाचे पदार्थ अन्…; ‘राजा राणीची गं जोडी’ फेम अभिनेत्रीचं ‘असं’ पार पडलं केळवण, फोटोंनी वेधलं लक्ष
aai kuthe kay karte fame actress kaumudi walokar grahmakh photos viral
लगीनघाई! ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्रीचा ग्रहमख विधी पार पडला, फोटो आले समोर
Marathi Actress Pooja Sawant Dance On radha song with Cousins watch video
Video: पूजा सावंतने भावाच्या संगीत सोहळ्यात धरला ठेका, भावंडांसह केला जबरदस्त डान्स
elvish yadav reacts on video with hardik pandya ex wife Natasa Stankovic
हार्दिक पंड्याच्या वाढदिवशी नताशाबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ जाणूनबुजून टाकला? एल्विश यादव म्हणाला, “मी त्यादिवशी…”
‘या’ अभिनेत्याची एक चूक मनोज बाजपेयी यांच्या जीवावर बेतली असती; स्वतः खुलासा करत म्हणाले, “आमची जीप एका मोठ्या…”
Maharashtrachi Hasyajatra fame Namrata Sambherao share fan moment
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेराव अमेरिकेतील चाहतीचं ‘ते’ कृत्य पाहून भारावली, किस्सा सांगत म्हणाली, “तिने माझ्या हातात…”

चारचौघांसारखं सगळं आयुष्य सुरू असताना दुचाकीला झालेल्या अपघातानंतर एक पाय कापावा लागला आणि तिचं सगळं आयुष्यच बदलून गेलं. पण आपण अपंग आहोत हे मनातून झटकून टाकत मानसीने जगायला सुरूवात केली. प्रोस्थेटिक म्हणजेच कृत्रिम पाय वापरायला शिकली. त्याच्यावर प्रचंड सराव करत लहानपणापासूनचा आवडता बॅडमिंटनचा खेळ पुन्हा सुरू केला. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत तिने गेल्या वर्षी जगज्जेतेपदापर्यंत तर या वर्षी ‘टाइम’ मासिकाच्या मुखपृष्ठापर्यंत मजल मारली आहे.

ऐकता-वाचताना वाटतं तितकं हे सगळं सोपं अजिबात नाही. या सगळ्यासाठी जितकी कठोर शारीरिक मेहनत आहे त्याहूनही प्रचंड अशी मानसिक ताकद आहे. शारीरिक पातळीवर सगळ्या गोष्टी नीट असताना मनाला ढकलत पुढे नेताना भल्याभल्यांची वाट लागत असते. पण या जिद्दी मुलीने रोजचा सराव, योगाभ्यास आणि टोकाची प्रचंड म्हणता येईल अशी सकारात्मक वृत्ती या तिन्हीच्या बळावर स्वत:चं नशीब पूर्ण पालटून दाखवलं आहे. पॅरा स्पोर्ट्स, कृत्रिम पायांचा वापर, त्यासंदर्भातले प्रश्न या सगळ्याबद्दल मिळेल त्या व्यासपीठावरून बोलून ती या प्रश्नांकडे जगाचं लक्ष वेधण्याचा सतत प्रयत्न करते.

लहानपणापासूनचं बॅडमिंटन, सॉफ्टवेअर इंजिनियरिंगची पदवी, नोकरी हे सगळं सुरू असताना २०११ मध्ये झालेल्या अपघाताने मानसीचं आयुष्य कसं बदललं, त्यानंतरचा तिचा जिद्दीचा प्रवास हे सगळे तपशील इंटरनेटवर उपलब्ध आहेत. ‘ऑर्डिनरी मी’ या तिच्या ब्लॉगवरही तिचा हा प्रवास वाचायला मिळतो. पण ते वाचूनही एखाद्याला प्रश्न पडूच शकतो की सगळीकडून अंधारून आलेलं असताना इतकी सकारात्मक वृत्ती आणायची असते कुठून आणि कशी?

त्यासाठीच मानसीला, तिला प्रेरणादायी ठरलेल्या तिच्या स्फूर्तीस्थानांना, तिच्यासाठी उभं राहणाऱ्यांना, आपापल्या अशा पद्धतीच्या कमतरतांवर जिद्दीने मात करणाऱ्या प्रत्येकाला सलाम. तुम्हीच सगळेजण आजच्या आणि उद्याच्या जगाचे खरे नेते, खरे हिरो आहात.

Story img Loader