भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास १९४६ साली झालेल्या नौसनिकांच्या या उठावाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. १९४६ साली फेब्रुवारी महिन्यात झालेल्या या नाविकांच्या उठावाला यंदा तब्बल ७० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने जागविलेल्या या आठवणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ऐ रहबर-ए-मुलक व कौम जरा
आँखे तो उठा, नजरे तो मिला
कुछ हम भी सुने, हम को भी बता
यह किस का लहू है, कौन मरा?

या आलंकारिक शब्दांमध्ये प्रसिद्ध उर्दू कवी ‘साहीर लुधीयानवी’ यांनी आपल्या स्वत:च्या आणि भारतीयांच्या भावना १९४६ च्या नाविक बंडात शहीद झालेल्या नौसनिकांसाठी व्यक्त केल्या आहेत. १९४६ साली मुंबई आणि कराची येथे झालेला नौसनिक उठाव हा भारताच्या स्वातंत्र्ययुद्धातील एक मलाचा दगड ठरला. भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास नौसनिकांच्या या उठावाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. किंबहुना भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या-ज्या घटना महत्त्वाचे कारण ठरल्या त्यातील ही एक महत्त्वपूर्ण घटना.

१९६७ साली भारताने आपला  विसावा स्वातंत्र्य सोहळा साजरा केला. त्या वेळेस तत्कालीन ब्रिटिश राजदूत ‘जौन फ्रिमन’ यांना विचारण्यात आले की, ब्रिटिशांसाठी असा कुठला निर्णायक क्षण होता की, भारताला स्वातंत्र्य देण्याशिवाय पर्याय नाही असे लक्षात आले. त्यावेळेस ब्रिटिश राजदूतांनी नि:संदिग्ध आणि अतिशय स्पष्ट शब्दांत सांगितले की, १९४६च्या नौसनिक उठावामुळे भारताला स्वातंत्र्य देण्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात आले.

भारतीय स्वातंत्र्ययुद्धातील अनेक लहान-मोठय़ा घटनांची आठवण वर्षभर विविध कार्यक्रमांद्वारे, वृत्तपत्रांतील लेखाद्वारे, शाळा/कॉलेज तसेच राजकीय भाषणांद्वारे, भारतीय स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्यांच्या जयंती व पुण्यतिथीद्वारे उजळविण्यात येते. पण ब्रिटिश राजदूतांनी म्हटल्याप्रमाणे भारताला स्वातंत्र्य देण्याशिवाय पर्याय नाही, असे ब्रिटिशांना लक्षात आणून देणाऱ्या या घटनेची आठवण गेल्या ६९ वर्षांत फारशी कधीच, कशी कुणालाच झाली नाही? किंवा भारतीय स्वातंत्र्ययुद्धांच्या इतिहासातील महत्त्वाची अशी ही घटना अनुल्लेखानेच का मारण्यात आली?

१९४६च्या नौसनिकांच्या उठावात भाग घेणारे नौसनिक व सामान्य जनता यांच्या बलिदानाचे स्मरण करणारा कार्यक्रम झाल्याचे ऐकिवात नाही. नवीन पिढीला अशा प्रकारची कुठली घटना घडली होती, याची गंध वार्ताही नाही.

त्याकरिताच १९४६च्या नाविक उठावाची ही चरित कहाणी..

आझाद िहद सेनेची स्थापना, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्फूर्तिदायी नेतृत्वाखाली भारतीय सनिकांनी स्वातंत्र्यासाठी केलेला असीम त्याग, आझाद िहद सेनेतील अधिकाऱ्यांवरील लष्करी कोर्टात चाललेले हे खटले, त्या खटल्यांमध्ये भुलाभाई देसाई यांच्यासारख्या निष्णात कायदेपंडितांनी स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या भारतीय सनिकांच्या जन्मसिद्ध हक्काचे केलेले बिनतोड समर्थन, भारतीय जनतेने व इथल्या राजकीय पक्षांनीही आझाद िहद सनिकांवर व अधिकाऱ्यांवर केलेला अभिनंदनाचा प्रचंड वर्षांव या सर्व घटनांचा आजवर ब्रिटिशांच्या हुकमतीखाली दबले जावून काम करणाऱ्या भारतीय सेनादलांवर फार खोल परिणाम झाला. त्यांचा स्वत:कडे पाहण्याचा दृष्टिकोनच एकदम पालटून गेला. कलकत्ता येथील रॉयल इंडियन एअरफोर्समधील अधिकाऱ्यांनी व सनिकांनी आय. एन. ए.मधील अधिकाऱ्यांवरील खटल्यांना अगदी उघडपणाने विरोध केला. खटल्यांमध्ये वकील देण्याकरिता लागणाऱ्या पशांसाठी, एअरफोर्समधील अधिकाऱ्यांनी वर्गणी गोळा करून पंडित नेहरूंकडे ती रक्कम पाठविली आणि त्यासोबत पाठविलेल्या पत्रात आय.एन.ए.मधील हे अधिकारी भारतमातेवर नितांत प्रेम करणारे थोर सुपुत्र आहेत, असे खंबीरपणाने व स्पष्ट शब्दांत लिहिले.

त्या वेळी मौलाना आझाद काँग्रेसचे अध्यक्ष हाते. ते कराचीला गेले असताना तेथे नौदलातील काही अधिकारी त्यांना भेटण्यासाठी आले आणि मोठय़ा खंबीर शब्दांत त्यांना म्हणाले, ‘ब्रिटिश सरकार व काँग्रेस यांच्यामध्ये संघर्ष उभा राहिल्यास, त्या वेळी आम्ही काँग्रेसचीच बाजू घेऊन अगदी प्राणपणाने लढू.’

भारतीय सेनेच्या तीनही दलांमध्ये अशा प्रकारे वादळ सुरू झाले होते. गोरे ब्रिटिश अधिकारी आणि भारतीय अधिकारी आणि सनिक यांच्यामधला ताणतणाव वाढतच चालला होता. अखेर १९४७ च्या फेब्रुवारीत या धुमसणाऱ्या असंतोषाचा स्फोट झाला. बी. सी. दत्त हे नौसनिकांच्या ह्या बंडाच्या नेत्यांपकी एक होते. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून या उठावाची पाश्र्वभूमी पूर्णपणे समजून येते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दत्त हे रॉयल इंडियन नेव्हीमध्ये दाखल झाले. त्यांनी युद्धामधील स्वत:चे अनुभव त्या पुस्तकात कथन केले आहेत. भारतीय नौसनिक ब्रिटिशांच्या हिताखातर प्राणपणाने लढत असतानाही या सनिकांना, ब्रिटिश अधिकारी मात्र किती अपमानास्पद व उर्मट वागणूक देत असत याचे त्यांनी वर्णन केले आहे. युद्धाच्या अखेरीस विजयी झालेल्या ब्रिटिश नौदलात, आपणास कसलेच स्थान नाही. भारतातील ब्रिटिश राजसत्ता टिकविण्यासाठीच केवळ एक प्यादे म्हणून आपला उपयोग करून घेण्यात आला, ह्यची दत्त यांना तीव्रतेने खंत वाटली. दत्त व त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना वेळोवेळी सहन कराव्या लागणाऱ्या अपमानांमुळे ते सगळे जणच संतप्त झाले होते. त्या सर्वाना ब्रिटिशांनी केवळ बळीचे बकरे म्हणून युद्धात वापरले होते. हे लक्षात आल्यावर त्यांचा संताप शिगेला पोहोचला. या अन्यायाचा प्रतिकार करावा, असे त्यांना तीव्रतेने वाढू लागले आणि सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालील आय. एम. ए.ने चोखाळलेल्या मार्गानेच जाणे प्राप्त आहे, असा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. ‘चलेजाव’ चळवळीत भाग घेतलेले काही जहाल कार्यकत्रेही दत्त आणि त्यांचे सहकारी यांना मार्गदर्शन करीत होतेच.

१ डिसेंबर १९४५ हा दिवस सर्व प्रमुख नाविकतळांवर नौसेना-दिवस म्हणून साजरा करण्याचे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ठरविले हाते आणि त्या दिवशी नागरिकांनाही काही युद्धनौका दाखविल्या जाणार होत्या. मुंबईत ‘तलवार’ ही युद्धनौका दाखविली जाणार होती. १ डिसेंबरला सकाळी अधिकारी ‘तलवार’ जहाजाची तपासणी करण्यात आली. त्या वेळी त्या नौकेच्या सर्व भिंतींवर एक एक फूट उंचीच्या रंगीत अक्षरांमध्ये राजकीय घोषणा लिहिलेल्या त्यांना आढळून आल्या. ‘क्विट इंडिया’ (चले जाव), ‘डाऊन वुईन इम्पिरिअ‍ॅलिस्ट्स’ (साम्राज्यवाद्यांचा धिक्कार असो), ‘रिव्होल्ट नाऊ’ (आताच बंड करा), ‘किल द ब्रिटिश’ (ब्रिटिशांना मारून टाका) अशा त्या घोषणा होत्या. या घोषणा वाचून नौसेनेतील ब्रिटिश अधिकारी खवळून उठले. परंतु या घोषणा कोणी लिहिल्या याचा पत्ता मात्र त्यांना लागला नाही.

२ फेब्रुवारी १९४६ला ‘तलवार’ या बोटीस सरसेनापती भेट देणार होते. सरसेनापती ज्या प्लॅटफॉर्मवर उभे राहून सलामी घेणार होते त्या लाकडी प्लॅटफॉर्मवर ‘जय िहद’ आणि ‘क्विट इंडिया’ या घोषणा कोणी तरी रंगविलेल्या होत्या. अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केल्यावर हे रंगवण्यात मुख्यत: बी. सी. दत्त यांचाच पुढाकार आहे असे त्यांना आढळून आले. दत्त यांना अटक करून कोठडीत डांबण्यात आले. परंतु या तरुण, शूर नौसनिकाने इतक्या कुशलतेने सर्व यंत्रणा उभारली होती की, त्याच्या अटकेची वार्ता क्षणार्धात सर्व सनिकांत वाऱ्यासारखी फैलावली.

१८ फेब्रुवारी १९४६ला सकाळी सर्व नौसनिक ‘तलवार’वर सकाळच्या नाश्त्यासाठी एकत्र आले व त्यांनी आम्ही नाश्ता करणार नाही असे एका आवाजात सांगितले, ‘‘हमें अच्छा नाश्ता और भोजन चाहिये, हमें पुरा राशन चाहिये, गाली देनेवाले कमांडर किंग को सजा मिलनी चाहिये। हमारे साथ वैसा ही व्यवहार किया जाय जैसा की, गोरों के साथ होता है।’’ या घोषणा ते देत होते. त्यांचा आक्रोश पाहून गोरे अधिकारी हैराण झाले. कुठलाच अधिकारी त्यांच्याशी बोलण्यास पुढे येत नव्हता. लवकरच ‘तलवार’ जहाजावर हरताळ पुकारला गेला. याची माहिती इतर जहाजांवर कार्यरत सनिकांनादेखील मिळाली. विद्रोहाची माहिती बॅरेक्समध्येदेखील पसरली. इतर जहाजांवरील सनिक व बॅरेक्समधील सनिकदेखील विद्रोहात सामील झाले.

तलवार जहाज ब्रिटिशांचे सगळ्यात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे नसíगक सिग्नल ट्रेिनग स्कूल जहाज होते. याचा संचालक ब्रिटिश अधिकारी होता. चांगल्या प्रतीच्या जेवणाची मागणी केल्यावर याचा ब्रिटिश अधिकारी कमांडर किंगने सनिकांना शिव्या दिल्या होत्या. सनिक इतके प्रक्षुब्ध झाले होते की, ते कुठल्याच िहदी अधिकाऱ्यांसोबतदेखील बोलायला तयार नव्हते.

परिस्थितीची गंभीरता बघून मुंबई नौसेनेचा सगळ्यात मोठा अधिकारी, फ्लॅग ऑफिसर रियर अ‍ॅडमिरल रेटरे स्वत: तलवारवर आला. त्याने सनिकांना नाश्ता करण्याची विनंती केली व कामावर परत जाण्यास सांगितले. परंतु त्याचे सर्व प्रयत्न फसले. सनिकांनी प्रतिनिधी पाठवण्यास मनाई केली. फक्त काँग्रेस, कम्युनिस्ट किंवा मुस्लीम लीगचा कोणी नेता आमच्या वतीने बोलणार असेल तर आम्हाला आपत्ती नाही असे कळविले. परंतु रेटरेने हा प्रस्ताव फेटाळला. १८ फेब्रुवारीच्या संध्याकाळपर्यंत दावानलासारखी विद्रोहाची बातमी सगळीकडे पसरली. वर्तमानपत्रांतील बातम्यांमुळे उत्तेजना आणखी वाढली. तलवारची प्रतिक्रिया सर्वप्रथम ‘पंजाब’ नावाच्या जहाजावर झाली. त्यांनी इतर सनिकांना आंदोलनात सामील करून नारा दिला की आझाद िहद सेनेच्या सर्व सनिकांना विनाअट सोडण्यात यावे. याच वेळेस ‘एच. एम. आय. एस. हिज मॅजेस्टी आर्मी इंडियन सíव्हसेस बडोदा’ जहाज कोलम्बो येथे होते. माहिती मिळताच तेदेखील बंडात सामील झाले. १९ फेब्रुवारीला विद्रोह करणाऱ्यांची संख्या २०,००० होती.

मुंबई, कलकत्ता, कराची आणि अन्य ठिकाणच्या एकूण अठ्ठय़ाहत्तर युद्धनौकांवरील नौसनिकांनी बंड केले. हे बंड मुंबईत सहा दिवस, कलकत्त्यात सात दिवस, कराचीत दोन दिवस आणि मद्रासमध्ये एक दिवस चालू होते. मुंबईमध्ये एस. एस. खान, मदन आणि दत्त हे तिघेजण बंडाचे नेतृत्व करीत होते. खानहे ‘नेव्हल कंट्रोल स्ट्राइक कमिटीचे’ अध्यक्ष होते. ह्य समितीचे कार्यालय ‘तलवार’ या बोटीवर होते आणि बिनतारी यंत्राच्या साहाय्याने तेथून अन्य युद्ध नौकांवरील बंड करून उठलेल्या नाविकांबरोबर संबंध प्रस्थापित करण्यात आले होते. ‘स्ट्राइक कमिटीने रॉयल इंडियन नेव्हीचे’ नाव बदलून ‘इंडियन नॅशनल नेव्ही’ केले. ‘तलवार’ ही युद्धनौका नाविकांनी ताब्यात घेतल्याची वार्ता भारतातील सर्व लोकांना तात्काळ कळली. अनेक नाविक आपल्या नौका सोडून ‘तलवार’च्या दिशेने कूच करू लागले. मुंबईच्या प्रमुख रस्त्यांवरून हे नाविक फिरत होते. त्यांच्या ‘इन्किलाब जिंदाबाद’ व ‘हिंदुस्तान एक हो’ या घोषणांनी सारे मुंबई शहर दुमदुमून उठले होते. नौसनिकांच्या मागण्या खालीलप्रमाणे होत्या.

१)     सर्व राजकीय कैद्यांची तुरुंगातून सुटका व्हावी.
२)     नौसनिकांना शिव्या देणाऱ्या अधिकाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे.
३)     ब्रिटिश सनिकांसारखी बरोबरीची वागणूक व पगार मिळाला पाहिजे.

मागण्या तशा विशेष महत्त्वाच्या नव्हत्या, पण त्या मागण्यांसाठी नाविकांनी ब्रिटिश सत्ताधाऱ्यांविरुद्ध बंड पुकारले होते ही खरी महत्त्वाची गोष्ट होती.

पांढराशुभ्र पोषाख घातलेले तरणेबांड नौसनिक मुंबईच्या रस्त्यारस्त्यातून बंडाचा पुकारा करणाऱ्या घोषणा देत चाललेले पाहून, मुंबईतील नागरिकांची मने देशप्रेमाने उफाळून आली आणि हजारो लोक या नाविकांच्या उठावात आपणहून सामील झाले. हा अनपेक्षित उठाव दडपून टाकण्यासाठी सरकारने सन्य बोलविले. मुंबईच्या रस्त्यांतून रणगाडे धडधडू लागले. पण लोक मुळीच दबले नाहीत की घाबरले नाहीत. एका बाजूला पोलीस दल व सशस्त्र सन्य आणि दुसऱ्या बाजूला नि:शस्त्र परंतु निर्भय बनलेले व पेटून उठलेले नागरिक अशी धुमश्चक्री सतत चार दिवस सुरू होती. सन्य जेव्हा गोळीबार करत असे, तेव्हा लोक जवळच्या गल्लीबोळांत लपत असत आणि तेथून रणगाडय़ांवर व सशस्त्र सनिकांवर दगडविटांचा वर्षांव करीत. या चार दिवसांत एकूण दोनशे अठ्ठावीस जण मारले गेले. परंतु लोकांचा कडवा प्रतिकार चालूच होता. २१ फेब्रुवारीला ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन बंडाचा बीमोड करावयाचे योजिले. संप कमिटीचे अध्यक्ष खान आणि अन्य सदस्य यांनी ‘तलवार’ ही नौका सोडून ‘नर्मदा’ या फ्लॅग-शिपवर जाण्याचे ठरविले. सन्याने कॅसल या बराकीला वेढा घातला त्या वेळी भूदल सनिक आणि बंडखोर नौसनिक यांनी एकमेकांवर गोळ्या झाडल्या. सन्याने नाविकांच्या बराकीभोवती सशस्त्र पहारा उभारून त्यांची रसद तोडण्याचे ठरविले. ज्या वेळी अशा रीतीने नाविकांची उपासमार करून त्यांना शरण यायला भाग पाडण्याचा ब्रिटिश अधिकाऱ्यांचा इरादा आहे असे मुंबईतील लोकांना समजले, त्या वेळी लोक अतिशय प्रक्षुब्ध झाले. सरकारच्या या दुष्ट डावास प्रत्युत्तर म्हणून मुंबईतील सर्व थरांतील अनेक लोक खाद्यपदार्थाचे पुडे घेऊन गेट वे ऑफ इंडियाकडे झपाटय़ाने चालू लागले. दत्त यांनी आपल्या पुस्तकात त्या वेळचे दृश्य पुढील शब्दांत अत्यंत प्रभावीपणे रेखाटले आहे. ‘‘मुंबई बंदर हे नेहमीपेक्षा अगदी वेगळे दिसत होते. भारतीय सनिकांचा फिरता पहारा सतत चालूच होता आणि जवळ ब्रिटिश सोल्जर्सही बंदुका रोखून उभे होते. भारतीय सनिकांनी पाठीवर बंदुका अडकवून ठेवून नागरिकांनी आणलेले खाद्यपदार्थ छोटय़ा-छोटय़ा बोटींमधून नाविकांच्या जहाजाकडे पाठविले. पहारा करणारे सनिकच असे नागरिकांना सामील होऊन बंडखोर नाविकांना रसद पोचवू लागले. त्या वेळी मात्र ब्रिटिश अधिकारी व सोल्जर्स हताशपणे बाजूला उभे राहून हे आक्रित पाहात राहिले. ‘तलवार’वर आम्हाला इतके खाद्यपुडे मिळाले की, नंतर काही दिवस तरी ते आम्हाला सहज पुरले असते. ‘तलवार’च्या मुख्य दरवाजातूनच हे खाद्यपदार्थ आम्हाला देण्यात आले आणि तेथे पहाऱ्यासाठी ठेवलेल्या भारतीय सनिकांनी कोणताही अडथळा न आणता हे सर्व होऊ दिले. तलवारवर आम्ही पंधराशे नौसनिक होतो आणि मुंबईतील नागरिक आम्हाला मदत करण्यास एका पायावर तयार होते.’’ या वर्णनावरून हे स्पष्टपणे समजते की, भारतीय भूदल सनिकांच्यातही प्रक्षोभ निर्माण झाला होता आणि त्यांना बंड करून उठलेल्या नाविकांना मदत द्यावयाची होती.

जेव्हा ही बातमी संपूर्ण देशात पोहोचली की, नौदलाच्या सर्व जहाजांवर नौसनिक स्ट्राइक कमिटीचा कब्जा आहे तेव्हा सर्व देश त्यांच्या या साहसाची प्रशंसा करीत होता. नौसनिकांची इच्छा होती की, कोणी राष्ट्रीय नेत्याने त्यांचे मार्गदर्शन करायला पुढे यावे. परंतु बंडाचे नेतृत्व करायला कोणीही नेता पुढे आला नाही. सर्व बंड संपवण्याचाच परामर्श देत होते. नाविकांनी अरुणा असफअलींसोबत बोलणी केली. अरुणा असफअलींनी राजकीय मागण्या सोडून फक्त आपल्याच मागण्या ठेवण्याचा सल्ला दिला. नेत्यांऐवजी मुंबईचे नागरिक नाविकांना जास्त मदत करीत होते. नेते ‘ट्रान्सफर ऑफ पॉवर’वर विचार करीत हाते.

कराची बंदरातील ‘हिंदुस्तान’ जहाज ओहोटीमुळे उथळ समुद्रात रेतीत फसले. जहाज बसलेले असताना बर्माच्या इंग्रजी फौजेने त्यावर आक्रमण केले. या अवस्थेत त्यांना आत्मसमर्पण करावे लागले. याची सूचना मिळाल्यावर नौसनिकांमध्ये निराशा पसरली. गांधीजी या वेळी पुण्यात होते. सुरुवातीपासूनच ते या बंडाच्या विरोधात होते, कारण ते बंडाला िहसक मानत हाते आणि नौसनिक बंडामुळे शक्ती हस्तांतरण चर्चेत बाधा आली होती. त्यांनी सरदार पटेल यांना हस्तक्षेप करून बंड संपवण्याची सूचना केली. सरदार पटेल मुंबईत आले. त्यांनी याप्रकरणी लक्ष घालून हस्तक्षेप केला. कोणाही नाविकाला शिक्षा होणार नाही व बंड करून उठल्याबद्दल त्यांच्यावर कोणताही सूड उठविला जाणार नाही असे त्यांना वचन दिले आणि नाविकांना बंड मागे घेण्यास सांगितले. अशा रीतीने रॉयल इंडियन नेव्हीतील नाविकांचे बंड तारीख २३ फेब्रुवारी १९४६ला अखेर शांत झाले.

नौसनिक व सामान्य जनता यांनी मिळून केलेल्या या आंदोलनात फक्त ७ दिवसांच्या कालावधीत ३०० लोक मृत्युमुखी पडले व जवळपास १५०० लोक जखमी झाले. पोलिसांच्या अहवालाप्रमाणे १९ फेब्रुवारी १९४६ ते २४ फेब्रुवारी १९४६ दरम्यान एकूण जखमींची संख्या १०५८, शवागार व दवाखान्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २३६ आणि २२ पोलीस अधिकारी व १०० कर्मचारी जखमी झाले.

मुंबईच्या जनतेला नौसनिकांच्या उठावात सहभागी होण्याची किंमत २५० पुरुष, स्त्रिया, मुले, कामगार व विद्यार्थी यांच्या बलिदानाने द्यावी लागली.

नाविकांचे बंड हे आझाद िहद सेनेच्या कृतीचेच पुढचे पाऊल होते. आझाद िहद सेना भारताच्या सरहद्दीकडे कूच करीत असताना ज्या वेळी त्या सेनेचा भारतात प्रवेश होईल, त्या क्षणीच भारतातील स्वातंत्र्य आंदोलनाचा प्रवाह त्या सेनेला येऊन मिळाला पाहिजे, अशी सुभाषचंद्र बोस यांची अपेक्षा होती. १९४३ मध्ये चले जाव चळवळीत भूमिगत कार्यकर्त्यांचे आझाद दस्ते तयार झाले. त्या वेळी या आझाद दस्त्यांनी भारतीय सरहद्दीजवळ जावे आणि ब्रह्मदेशातून येणाऱ्या आझाद िहद सेनेशी त्यांनी हातमिळवणी करावी, असे जयप्रकाश नारायण यांना वाटत होते. दुर्दैवाने भूमिगत चळवळ अल्पकाळात संपुष्टात आली आणि त्यानंतर बराच काळ लोटल्यावर आझाद िहद सेना भारताकडे कूच करू लागली. अंतर्गत उठाव आणि सरहद्द ओलांडून येणाऱ्या आझाद िहद सेनेचा भारतातील प्रवेश यांची सांगड जमू शकली नाही. त्यामुळे स्वातंत्र्यलढय़ाची ही दोन्ही पर्वे अयशस्वी झाली. परंतु नाविक बंडाच्या वेळी मात्र लोक रस्त्यात आले आणि त्यांनी नाविकांना साहाय्य करुन, ब्रिटिश सन्याबरोबर दोन हातही केले. नाविक बंडाचे खरे महत्त्व हे की, या बंडामध्ये लोकशक्ती आणि बंडखोर नाविकांची शक्ती यांचा संगम होऊन त्यांनी ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध दंड थोपटले. सुभाषचंद्र बोस यांनी सुरू केलेल्या लढय़ाचेच हे पुढचे युद्धकांड होते.

नाविक बंडाची सुरुवात १८ फेब्रुवारी १९४६ला झाली आणि १५ मार्च १९४६ला ब्रिटनचे पंतप्रधान अ‍ॅटली आणि पार्लमेंटमध्ये जाहीर केली की, मंत्रिमंडळाचे एक खास त्रिसदस्य शिष्टमंडळ भारताकडे धाडले जाईल आणि हे शिष्टमंडळ घटनात्मक प्रश्नावर भारताच्या नेत्यांबरोबर चर्चा करील. लॉर्ड पेथिक लॉरेन्स, सर स्ट्रफर्ड क्रिप्स आणि ए. व्ही. अलेक्झ्ॉण्डर हे तिघे जण या शिष्टमंडळाचे सदस्य असतील. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बोलताना अ‍ॅटली म्हणाले, ‘‘िहदुस्थानात सध्या राष्ट्रीय आकांक्षेला भलतेच उधाण आलेले असल्यामुळे ही आकांक्षा प्रत्यक्षात यावी या दृष्टीने निश्चित आणि नि:संदिग्ध स्वरूपाची कृती करणे आवश्यक झालेले आहे. आमचे तिघे मंत्री अत्यंत खुल्या मनाने दिल्लीला जात आहेत. १९२० किंवा १९३० किंवा १९४२ मध्ये िहदुस्थानात जे तापमान होते ते १९४६ मध्ये राहिलेले नाही. ते किती तरी वर चढले आहे. िहदुस्थानला शक्य तितक्या लवकर आणि जास्तीत जास्त प्रमाणात स्वातंत्र्य कसे देता येईल या दृष्टीने हे तीन मंत्री आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतील, अशी मी ग्वाही देतो. िहदुस्थानात कोणत्या प्रकारची शासनप्रणाली निर्माण करायची हे तिथल्या लोकांनी ठरवायचे आहे. मात्र स्वतंत्र िहदुस्थान ब्रिटिश राष्ट्रकुलात राहील, असा मला विश्वास वाटतो.’’

इंग्लंडला यापुढे भारतात राज्य करणे शक्य होणार नाही. ही तीव्रतेने जाणीव झाल्यामुळेच  ब्रिटनच्या पंतप्रधानांनी मंत्रिमंडळाचे त्रिसदस्य शिष्टमंडळ भारतात पाठविण्याचा निर्णय घेतला. १९४१ साली ज्या वेळी भारतात सर स्ट्रफोर्डेक्रिप्स यांना एक राजकीय योजना घेऊन पाठविण्यात आले होते. तेव्हा इंग्लंडमध्ये संमिश्र मंत्रिमंडळ होते आणि कॉन्झरव्हेटिव्ह पक्षाचे चíचल हे पंतप्रधान पदावर होते. चíचल हे कट्टर साम्राज्यवादी होते आणि त्यांना भारतातील नेत्यांशी कसलाही समझोता करावयाचा नव्हता. रुझवेल्ट यांच्या दबावामुळे आणि मंत्रिमंडळातील मजूर पक्ष सदस्यांच्या आग्रहामुळे चíचल यांनी क्रिप्स यांना पाठविण्यास कशीबशी संमती दिली होती. परंतु प्रत्यक्ष बोलणी सुरू झाल्यावर मात्र आडमुठे व ताठर धोरण स्वीकारून चíचल यांनीच तडजोडीचा डाव उधळून लावला. १९४६ साली मात्र परिस्थिती आमूलाग्र पालटली होती. १९४१ साली ब्रिटन युद्धात हरत असले तरी, भारतात स्वातंत्र्यलढा सुरू झालेला नव्हता. १९४६ साली ब्रिटिश विजयी झालेले होते. परंतु चले जावचा लढा, आझाद िहद सेना आणि नाविक बंड या तीन प्रचंड आंदोलनामुळे भारतीय जनतेची स्वातंत्र्याची आकांक्षा अतिशय प्रखर झाली होती आणि ब्रिटिशांचे भारतातील आसन पूर्ण डळमळीत झाले होते. स्वातंत्र्याच्या मागणीमध्ये भारताची जनशक्ती खंबीरपणे उभी राहिली होती आणि सन्य व नोकरशाही हे साम्राज्याचे दोन आधारही ब्रिटिशांना आता भरवशाचे वाटत नव्हते. अशा या अवघड परिस्थितीत चíचललादेखील भारताच्या नेत्यांबरोबर तडजोड करावी लागलीच असती.

१९२९ साली कांग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारा ठराव केला होता. परंतु स्वातंत्र्य हे ‘मागून’ मिळत नसते. स्वातंत्र्य द्यावयास राज्यकर्त्यांना भाग पाडले पाहिजे अशी परिस्थिती निर्माण करावी लागते. १९४६ साली भारतात  अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अर्थात हे एकाएकी घडले नाही. जनतेने दीर्घकाल ब्रिटिशविरोधी संघर्ष करताना जो त्याग केला, क्रांतिकारकांनी आत्मबलिदान करून लोकांमध्ये ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधी जे वातावरण निर्माण केले, सुभाषबाबूंनी आझाद िहद फौज उभारून ब्रिटिश साम्राज्याचा मुख्य आधारच डळमळीत केला आणि नाविक दल व विमान दल यांनी साम्राज्यविरोधी पवित्रा घेतला. अशा ह्य़ा सर्व घटनांमधून निर्माण झालेल्या परिस्थितीच्या कोंडीत सापडल्यामुळेच केवळ भारताची स्वातंत्र्याची मागणी मान्य करणे ब्रिटनला भाग पडले. भारताचे स्वातंत्र्य अटळ बनले.

१५ ऑगस्ट १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. सरदार पटेल यांनी लोकसभेत घोषित केले, १९४६ साली नवीन बंडात सहभागी झाल्याबद्दल बडतर्फ करण्यात आलेल्या नौसनिकांना त्यांची इच्छा असल्यास नौसेनेत सामावून घेतले जाईल. प्रत्यक्षात एकाही नौसनिकाला नौसेनेत परत घेतले गेले नाही.

यह किसका लहू है।
ऐ रहबर-ए-मुलक् व कौम जरा
आँखे तो उठा, नजरे तो मिला
कुछ हम भी सुने, हम को भी बता
यह किस का लहू है, कौन मरा?
धरती की सुलगती छाती के बेचन शरारे पुछते है
तुम लोग जिन्हें अपना ना सके, वह खून के धरे पुछते हैं
सडको की जबां चिल्लाती है, सागर के किनारे पुछते हैं
यह किस का लहू है कौन मरा?
ऐ रहबर-ए-मुलक् व कौम जरा
आँखे तो उठा, नजरे तो मिला
कुछ हम भी सुने, हम को भी बता
यह किस का लहू है, कौन मरा?
वह कौन सा जझबा था जिस से फर्सुदा निजामें जीस्त हिला
झुलते हुऐ विरां गुलशन मे एक आस उम्मीद का फूल खिला
जनता का लहू फौजो से मिला, फौंजो का लहू जनता से मिला
यह किस का लहू है कौन मरा?
ऐ रहबर-ए-मुलक् व कौम जरा
आँखे तो उठा, नजरे तो मिला
कुछ हम भी सुने, हम को भी बता
यह किस का लहू है, कौन मरा?
क्या कौम व वतन की जय गाकर, मरते हुये राही गुंड्डे थे?
जो देश का परचम लेकर उठे, वह शोख सिपाही गुंड्डे थे?
जो बारे गुलामी सह ना सके, वह मुजरिक-ए-शाही गुंड्डे थे?
यह किस का लहू है कौन मरा?
ऐ रहबर-ए-मुलक् व कौम जरा
आँखे तो उठा, नजरे तो मिला
कुछ हम भी सुने, हम को भी बता
यह किस का लहू है, कौन मरा?
ऐ अज्मे फना देने वालो, पगाम-ए-बका देने वालो!
अब आग से क्यों कतराते हो? शोलों को हवा देने वालो!
तुफान से अब डरते क्यों हो? मौजो को सदा देने वालो!
क्या भुल गए अपना नारा?
ऐ रहबर-ए-मुलक् व कौम बता
यह किस का लहू है कौन मरा?
समझौते की उम्मीद सही, सरकार के वादे ठीक सही
हां मश्के सितम अफसाना सही, हां प्यार के वादे ठीक सही
अपनों के कलेजे मत छेदो, अगयार के बादे ठीक सही
जमहूर से यों दामन ना छुडा
ऐ रहबर-ए-मुलक् व कौम बता
हम ठान चुके अब जी में, हर जालिम से टकराऐंगे
तुम समझौते की आस रखो हम आगे बढते जाऐंगे
हर मंजिल-ए आजादी की कसम, हर मंजिल पर दोहराएंगे
यह किस का लहू है कौन मरा?
ऐ रहबर-ए-मुलक् व कौम जरा
आँखे तो उठा, नजरे तो मिला
कुछ हम भी सुने, हम को भी बता
यह किस का लहू है, कौन मरा?

भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी इंग्रजांच्या नाकी नऊ आणणाऱ्या नौसनिकांना स्वतंत्र भारतामध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सनिक’ असं प्रशस्तिपत्रकही मिळाले नाही, हा दैवदुर्विलासच म्हणायला हवा.
प्रवीण योगी – response.lokprabha@expressindia.com