स्वप्निल जोशी – response.lokprabha@expressindia.com
नव्या वर्षांत अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेला केंद्रस्थानी ठेवून चांगल्या दर्जाचे स्मार्टफोन उपलब्ध केले आहेत. या महिनाअखेपर्यंत अनेक नामांकित कंपन्यांचे स्मार्टफोन्स बाजारात पाहायला मिळू शकतात. मध्यम किमतीपासून ते फ्लॅगशिप सीरिजपर्यंत अनेक पर्याय ग्राहकांना उपलब्ध असल्यामुळे त्यांना त्यांच्या आवडीनुसार नवीन स्मार्टफोनची खरेदी करायला चांगला वाव आहे. काही निवडक स्मार्टफोनची माहिती घेऊ या..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सॅमसंग गॅलॅक्सी एस २१ एफई ५ जी
हा स्मार्टफोन याच आठवडय़ात भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आला आहे. एफई म्हणजेच फॅन एडिशनमधील हा स्मार्टफोन आहे. यात गॅलॅक्सी एस २१ प्रमाणेच सर्व फीचर्स आहेत. या स्मार्टफोनमध्ये आपल्याला वन यूआय ४.० – अँड्रॉइड १२ सहित देण्यात आला आहे. ऑप्टिकल िफगर िपट्र स्कॅनर, ट्रिपल कॅमेरा सेटअप, वायरलेस चार्जिग आणि ५ जी सपोर्टमुळे हा स्मार्टफोन फ्लॅगशिप डिव्हाईस ठरतो.
वैशिष्टय़े आणि किंमत
डिस्प्ले : ६.४ इंच एफएचडी
प्रोसेसर : एक्सीनॉस २१००
रॅम आणि स्टोरेज : ८ जीबी / १२८ जीबी किंवा २५६ जीबी
बॅटरी : ४५०० एमएएच, २५ वॉट चार्जिग
रिअर कॅमेरा : १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाईड, १२ मेगापिक्सल डय़ुअल पिक्सल, ८ मेगापिक्सल टेलीफोटो
फ्रंट कॅमेरा : पंच होल ३२ मेगापिक्सल
किंमत : १२८ जीबी स्टोरेजसाठी ५४ हजार ९९९ रुपये / २५६ जीबी स्टोरेजसाठी ५८,९९९
मोटोरोला जी ७१
२०२१ या वर्षांत मोटोरोलाने दणकून पुनरागमन केले आहे आणि भारतीय बाजारपेठ लक्षात घेऊन मध्यम किमतीत स्मार्टफोन्सची निर्मिती केली आहे. स्टोक अँड्रॉइड असल्यामुळे मोटोरोलाचे स्मार्टफोन एका वेगळय़ा उंचीवर आहेत. मोटोरोलाचा जी ७१ हा नवीन स्मार्टफोन या महिन्यात दाखल झाला असून १९ जानेवारीपासून फ्लिपकार्टवर खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनची किंमत पाहता डिस्प्ले आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत मोटोरोलाने बरेच चांगले काम केले आहे. तसेच ५जी चे १३ बॅण्ड्स यावर उपलब्ध आहेत. स्टोक अँड्रॉइड असल्यामुळे या स्मार्टफोनवर वेळोवेळी अपडेट्ससुद्धा मिळणार आहेत. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत याची मागणी अधिक राहू शकते.
वैशिष्टय़े आणि किंमत
डिस्प्ले : ६.४ इंच एफएचडी एमोलेड
प्रोसेसर : स्नॅपड्रॅगन ६९५; ५ जी
रॅम आणि स्टोरेज : ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज
बॅटरी : ५००० एमएएच, ३३ वॉट चार्जिग
रिअर कॅमेरा : ५० मेगापिक्सल वाईड, ०८ मेगापिक्सल अल्ट्रा
वाईड आणि डेप्थ, ०२ मेगापिक्सल मॅक्रो
फ्रंट कॅमेरा : पंच होल १६ मेगापिक्सल
किंमत : १८,९९९ रुपये.
क्षिओमी ११आय सीरिज
क्षिओमीकडून १२ जानेवारीपासून या सीरिजमधील ११आय ५ जी आणि ११आय हायपरचार्ज ५ जी हे दोन स्मार्टफोन्स भारतीय बाजारपेठेत दाखल करण्यात आले आहेत. यातील हायपरचार्ज मॉडेलचं सगळय़ात मोठं वैशिष्टय़ म्हणजे हा भारतातील आतापर्यंतचा सगळय़ात जलद गतीने चार्ज होणार स्मार्टफोन आहे. क्षिओमी ११आय हायपरचार्ज ५ जी या स्मार्टफोनबरोबर आपल्याला तब्बल १२० वॉटचा फास्ट चार्जर मिळतो, ज्याद्वारे हा स्मार्टफोन १५ मिनिटांत पूर्ण चार्ज होतो. तसेच यातील हायपरचार्ज नसलेल्या मॉडेलबरोबर आपल्याला ६७ वॉटचा चार्जर मिळतो. मीडियाटेक प्रोसेसर, फास्ट चार्जिग, चांगल्या दर्जाचा कॅमेरा सेटअप, अँड्रॉइड ११ आणि किफायतशीर किंमत यामुळे हा स्मार्टफोन नक्कीच आपले लक्ष वेधून घेतो.
वैशिष्टय़े आणि किंमत
डिस्प्ले : ६.६४ इंच एफएचडी एमोलेड
प्रोसेसर : मीडियाटेक डायमेन्सिटी ९२०; ५ जी
रॅम आणि स्टोरेज : ६ / ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी
एक्सपाण्डेबल स्टोरेज
बॅटरी : ५१६० एमएएच, ६७ वॉट चार्जिग / ४५०० एमएएच १२० वॉट चार्जिग
रिअर कॅमेरा : १०८ मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, ०८ मेगापिक्सल अल्ट्रा वाईड, ०२ मेगापिक्सल मॅक्रो
फ्रंट कॅमेरा : पंच होल १६ मेगापिक्सल
किंमत : २४,९९९ रुपयांपासून / हायपरचार्ज – २६,९९९ रुपयांपासून
विवो व्ही २३ प्रो
विवो व्ही सीरिजमधील हा स्मार्टफोन याच महिन्यात भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. या स्मार्टफोनचे मुख्य आकर्षण ‘कलर चेंजिंग बॅक’ हे असणार आहे. म्हणजेच स्मार्टफोनचा मागील भाग आपल्याला वेगवेगळय़ा दिशांतून वेगवेगळय़ा रंगांत दिसणार आहे. या स्मार्टफोनची दुसरी जमेची बाजू म्हणजे ५० मेगापिक्सलचा डय़ुअल सेल्फी कॅमेरा. हे दोन्ही फीचर्स असणारा हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे. त्यामुळे कॅमेरा आणि फोनच्या बाह्यरूपाला महत्त्व देणाऱ्या ग्राहकांसाठी हा स्मार्टफोन नक्कीच चांगला पर्याय आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा फ्लॅगशिप दर्जाचा प्रोसेसर आणि एमोलेड डिस्प्ले आहे. त्यामुळे परफॉर्मन्सच्या चांगला असण्याची शक्यता आहे.
वैशिष्टय़े आणि किंमत
डिस्प्ले : ६.५६ इंच एफएचडी एमोलेड
प्रोसेसर : मीडियाटेक डायमेन्सिटी १२००
रॅम आणि स्टोरेज : ८ / १२ जीबी रॅम आणि १२८ /
२५६ जीबी स्टोरेज
बॅटरी : ४३०० एमएएच, ४४ वॉट चार्जिग
रिअर कॅमेरा : १०८ मेगापिक्सल मुख्य कॅमेरा,
०८ मेगापिक्सल वाईड, ०२ मेगापिक्सल मॅक्रो
फ्रंट कॅमेरा : ५० मेगापिक्सल ०८ मेगापिक्सल वाईड
किंमत : ३८,९९९ रुपयांपासून
वन प्लस १० प्रो
वन प्लसकडून हा फ्लॅगशिप स्मार्टफोन याच महिन्यात भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. वनप्लसच्या या स्मार्टफोनकडून अपेक्षा असण्याचं मुख्य कारण म्हणजे, मधल्या काळात वनप्लस ७ किंवा ९ मध्ये सॉफ्टवेअर अपडेट्सबाबत बराच गोंधळ पाहायला मिळाला होता, तसेच अँड्रॉइड अपडेटनंतर स्मार्टफोनचा परफॉर्मन्स बिघडण्यासारख्या घटना घडल्या होत्या. अद्ययावत प्रोसेसर आणि अँड्रॉइड व्हर्जन व चांगला कॅमेरा यामुळे हा एक परिपूर्ण फ्लॅगशिप स्मार्टफोन ठरू शकतो.
वैशिष्टय़े आणि किंमत
डिस्प्ले : ६.७-इंच क्यूएचडी एलटीपीओ
प्रोसेसर : स्नॅपड्रॅगन ८ जेन १
बॅटरी : ५००० एमएएच, ८० वॉट चार्जिग
रिअर कॅमेरा : ४८ मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, ५० मेगापिक्सल अल्ट्रा वाईड, ०८ मेगापिक्सल टेलीफोटो
फ्रंट कॅमेरा : ३२ मेगापिक्सल
किंमत : उपलब्ध नाही
याचबरोबर जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत आयकु ९ प्रो हा फ्लॅगशिप स्मार्टफोन तसेच रियलमीकडून रियलमी ९ आय आणि रियलमी जीटी २ प्रो हे दोन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत चांगल्या स्पेसिफिकेशन्ससहित दाखल होत आहेत. त्यामुळे सध्या नवीन स्मार्टफोन घेणाऱ्यांसाठी आपल्या पसंतीनुसार ८ ते १० चांगले पर्याय उपलब्ध आहेत.