स्वयंपाकघर हा निव्वळ स्त्रियांचा प्रांत समजण्याचे दिवस आता गेले. पुरुषही आता तिथे आपली अदाकारी दाखवताना दिसतात. स्वयंपाकघरात विविध प्रयोग करणाऱ्या एका पुरुषाचे हे मनोगत-
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सध्या समानतेचे युग आहे. समसमान अधिकार, हक्क वगैरे. घरकामातसुद्धा समानता असावी असा एक विचारप्रवाह आहे. नवरा-बायको दोघेही कमावते असले की हा प्रश्न प्रामुख्याने चर्चिला जातो. मध्ये एका अमेरिकन मासिकात चर्चा आणि आकडेवारी- अमेरिकन लोकांना आकडेवारीचे भारी वेड- आली होती. ती अशी की ज्याची कमाई कमी ती व्यक्ती घरकाम जास्त करते. माझी कमाई कमी होती आणि आहे, हे जाता जाता मी घरात काय करतो त्याचा आठ दिवसांचा आढावा घेतला आहे.
रविवार…
सुरुवात रविवारपासून करतो. आमच्या घरात रविवारची न्याहरी मी म्हणजे डॉ. अरुण रामचंद्र करतो. म्हणजे तसा अलिखित नियमच आहे. आजचा रविवार इडली- सांबार करण्याचा होता. काल सकाळी तांदूळ आणि उडीद डाळ वेगवेगळे भिजवून संध्याकाळी वाटून एकत्र केली आणि हो त्यात ‘यीस्ट’ म्हणजे खमीर घातले. सकाळी ते छान फुगून आले आणि त्याला ताज्या पावाला जसा एक सुंदर खमंग वास येतो तसा येऊ लागला. हे पीठ नंतर बिलकूल ढवळायचे नाही. वरच्या वर डावाने घेऊन इडली पात्रे भरायची आणि वाफवण्याच्या भांडय़ात किंवा कुकरमध्ये शिट्टी न लावता १० मिनिटे वाफवून घेतले. अशा या इडल्या तुम्ही करून पाहाच.
संध्याकाळीच सांबार करण्यासाठी तूर आणि मूग डाळ ३-१ अशी भिजत घातली होती. मूग डाळीने सांबार जाडसर घट्ट होते. सकाळी मी नेहमीप्रमाणेच ५॥ वाजता उठलो, आणि कुकर लावून डाळी शिजवून घेतल्या. सांबार केले. ओल्या खोबऱ्याची चटणी केली. ७-७॥ वाजता सगळे उठले. इडली-सांबार तयार होतेच वाऽऽ छान हे शब्द ऐकून समाधान पावलो.
संध्याकाळी रोजच्याप्रमाणे टी.व्ही. समोर बसून भाज्या निवडायला घेतल्या. असतील त्याप्रमाणे गवार- घेवडा यांच्या शिरा काढून ठेवल्या. पालेभाज्यांचे देठ टाकून न देता त्यांचे बारीक तुकडे करून ठेवले. सूप करण्यासाठी.
सोमवार..
आज सोमवार. सकाळी व्यायाम झाल्यावर नेहमीप्रमाणे भाज्या चिरून ठेवल्या. कोशिंबीर केली. कणीक मळली.
काल संध्याकाळी फिरून येताना एक लिंबू विक्रेता आवराआवर करत होता. त्याच्याकडून सोयीच्या किमतीला मिळाली म्हणून लिंबे घेतली होती. संध्याकाळी टी.व्ही.समोर भाजी निवडून झाल्यावर त्यांचा रस काढला. भारंभार साखर घालून, विरघळवून बाटली भरून शीतकपाटात ठेवली. रस-सरबत करायला कामी येतोच. शिवाय भाजी-आमटीत चिंचगुळाप्रमाणे कामी येतो. रस काढून घेतलेली चांगली साले निवडून त्यांचे बारीक तुकडे केले. त्यात चवीप्रमाणे साखर-मीठ-काळा मसाला कालवून बाटली भरून उन्हात ठेवले. ५-६ दिवसांनी ते सर्व वाटण यंत्रातून बारीक करून घेतले. छान लिंबू सॉस तयार झाला.
मंगळवार…
आज मंगळवार. सकाळचा नेहमीप्रमाणे कार्यक्रम म्हणजे भाजी चिरणे- कोशिंबीर करणे कणीक मळणे उरकले. भाजीला फोडणी आणि चपात्या लाटणे बाईसाहेब करतात.
संध्याकाळी टी.व्ही.समोरचा कार्यक्रम म्हणजे उद्याच्या भाजीची तयारी केली. आता भडंगाचा चिवडा करायचा होता. हा चिवडा मला वडिलांनी शिकवला किंबहुना सर्वच स्वयंपाक वडिलांनीच शिकवला. १०-१२ वर्षांचा असताना आई गेल्याने वडील स्वयंपाकघरातील सर्व कामे करत. त्यामुळे हे काम बायकांचे, हे पुरुषांचे हा भेदभाव शिकलो नव्हतो.
तर भडंगाचा चिवडा. भडंग म्हणजे चुरमुरे. गोलसर आकाराचे, ढब्बू असे दिसणारे ते भडंग. लालसर, बारीक आकाराचे ते चुरमुरे. हे भेळीत वापरतात. तर चिवडा करायचा म्हणजे प्रथम ते भडंग घोळून म्हणजे बघा सुपात आसडून त्यातील बारीक, चेपट भडंग वेगळे करायचे. किलोमागे चांगले पेलाभर निघतात. हे वेगळे ठेवायचे. पुढे डोसे करताना उपयोगी येतात. आता शेंगदाणे निवडायला घ्यायचे. त्यातील बारीक, पोचट फटाके, तुटके वेगळे करायचे. त्यांचा उपयोग चटणी किंवा कूट – जो भाजीत, साबुदाणा खिचडीत वापरतात त्यासाठी करायचा. आता शेंगदाणा-चटणी हा सोलापुरी पदार्थ आहे. ‘‘श्येंगा च्यटणी’’ असं म्हणायचं बरं का!
भडंगाच्या आकाराच्या दुप्पट आकाराचे भांडे घ्यायचे. त्यात तेल घ्यायचे. नंतर हवे तेवढे शेंगदाणे घ्यायचो. त्यात ५-६ सोललेले म्हणजे बिनसालीचे असावेत. त्यांचा बदलता रंग पाहून कितपत तळले गेले आहेत ते कळते. आता गॅस बारीक करून ठेचलेला लसूण, कढीपत्ता मिरचीचे तुकडे टाकायचे व नंतर सर्व भडंग घालायचे व सारखे ढवळत राहायचे. सर्व भडंगांना तेल लागले अशी खात्री झाल्यावर आधी करून ठेवलेले साखर, मीठ, हळद, काळा मसाला, सायट्रिक अॅसिड यांचे वाटलेले मिश्रण घालायचे. गॅस किंचित मोठा करून उत्तम प्रकारे सर्व मिश्रण ढवळत राहायचे. सर्व मिश्रित झाल्यावर गॅस बंद करायचा व भांडे घेऊन टी.व्ही.समोर बसायचे व वर-खाली ढवळत राहायचे, पूर्ण गार होईपर्यंत. झाला भडंगाचा कुरकुरीत, चवदार चिवडा तयार! आता कुणीतरी- वाऽऽऽ मस्त झालाय असे म्हणायची वाट पाहायची!
आता ‘श्येंगा च्यटणी’ची रीत सांगतो. निवडून ठेवलेले टपोरे नाही- तर चेपट, बारीक, तुटके फुटके शेंगदाणे जे बाजूला काढून ठेवलेले आहेत ते घ्यायचे. म्हणजे अगदी असेच काही नाही. पण माझी एक पद्धत सांगितली. तर असे हे शेंगदाणे खरपूस भाजून गार करून सोलून घ्यावेत. लसूण सोलून घ्यावा. वाटण यंत्रात हा लसूण, मूठभर शेंगदाणे, तिखट, मीठ घालायचे व हलकेसे वाटून घ्यायचे. नंतर त्यात सर्व शेंगदाणे घालायचे. आता वर गोडेतेल घालायचे, तेल बुडाला पोहोचायच्या आत यंत्र सुरू करायचे व भरडसर वाटून घ्यायचे. झाली ‘श्येंगाची मुद्दा चटणी’ तयार. अनुभवाने सर्व उत्तम जमते.
बुधवार…
आज बुधवार. आजचा सकाळचा कार्यक्रम भाजी, कोशिंबीर, कणीक मळणे झाले. आजचा कार्यक्रम म्हणजे ‘डिंकाचे लाडू’ करणे हा होता. म्हणून संध्याकाळी फिरून आल्यानंतर प्रथम वेलदोडे, जायफळ, बडीशेप यांची पूड करून घेतली. नंतर तीळ, खसखस यांची पूड केली. खारीक बारीक वाटून घेतली. गोडांबी, काजू, बदाम, चारोळी यांची भरड केली. डिंक बारीक करून घेतला. सर्व पदार्थ तुपात परतून घेतले. नंतर कढईत तूप गरम करून त्यात गूळ पातळ करून घेतला. नंतर त्यात हे सर्व पदार्थ घालून चांगले मिश्रित झाल्यावर कढई उतरून खूप ढवळावे. हे चांगले ताकदीचे व कष्टाचे काम आहे. कोमट झाल्यावर बदाम, काजू, बेदाणे लावून लाडू वळले.
गुरुवार…
आज गुरुवार. सकाळचा चहा व्यायाम झाल्यावर नेहमीप्रमाणे भाजीची तयारी कोशिंबीर, कणीक मळणे झाले. संध्याकाळी टी.व्ही.समोर बसून भाजी निवडणे, लसूण सोलणे झाले. आज संध्याकाळचा कार्यक्रम म्हणजे बागेला पाणी देणे. आमच्याकडे दोन जोड घरे आहेत, त्यामुळे दोन गच्च्या! तिथे बाईसाहेबांनी १५०-२०० कुंडय़ा ठेवल्या आहेत लहान-मोठय़ा. त्यांना पाणी देणे हा एक दीड-दोन तासांचा कार्यक्रम असतो. तो केला.
शुक्रवार…
आज शुक्रवार. काल एक कोहळा, म्हणजे बघा ज्याची पेठा नावाची मिठाई करतात तो भोपळा. त्याची आग्य्राचा पेठा म्हणून प्रसिद्धी आहे तो मिळाला होता. तर ते करण्याचे ठरविले. याचीही पूर्वतयारी करावी लागते. सकाळीच भाजी चिरताना कोहळाही घेतला. त्याची साले काढली. मधला बियांचा मऊ भाग काढला. तुकडे चोपवून काटय़ा-चमच्याने घेतले व योग्य आकाराचे तुकडे करून चुन्याच्या पाण्यात भिजत टाकले. याने त्यांचा चिकटपणा जातो व टणकही होतात.
संध्याकाळचा भाजी निवडण्याचा कार्यक्रम झाल्यावर पेठा करायला घेतला. कोहळ्याच्या वजनाची साखर व कोहळा एका मोठय़ा कढईत घेऊन गॅसवर ठेवला. साखर विरघळून पाक झाल्यावर कोहळ्याचे तुकडे काढून बाजूला ठेवले व पाक घट्ट केला. व नंतर परत तुकडे घालून परत पातळ झालेला पाक घट्ट होऊन बाजूने साखरेचे कण दिसेपर्यंत हलवत राहिलो. झाला पेठा तयार. एका काचेच्या बरणीत गार झाल्यावर भरून ठेवला.
शनिवार…
आज शनिवार. सकाळचे कार्यक्रम म्हणजेच भाजी चिरणे, कोशिंबीर करणे, कणीक मळणे उरकले. वाचनालयात जाण्यासाठी निघालो. बरोबर नारळ घेतला. वाटेत मारुती मंदिर आहे. तिथे आणखी एक नारळ मिळाला. चला आज ‘सोलकढी’, ‘कोफ्ते’ आणि ‘बर्फी’ असा बेत योजला. वाचनालयातून आल्यावर खोबरे सुटे करून घेतले. त्याचे बारीक तुकडे करून वाटणयंत्रातून वाटून घेतले. गरम पाणी घालून थोडा वेळ ठेवून गाळणीतून घालून घट्ट पिळून जाडसर दूध वेगळे केले. ह्य़ात आमसुलाचे आगळ, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, साखर सर्व वाटून घातले, गाळून घेतले. झाली सोलकढी तयार.
घट्ट पिळून घेतलेला अर्धा कीस घेतला. त्यात हळद, लालतिखट, मीठ, गोडामसाला, बेसन घालून मळून घेतले व त्याचे बेतशीर गोळे केले व ‘मायक्रो’मध्ये भाजून घेतले. हे जेवताना भज्यासारखे खाता येतात किंवा त्याची ‘कोफ्ता’ करी करता येते किंवा आमटीत भजीतही घालता येतात. उरलेल्या अध्र्या किसात साखर घालून त्याची ‘बर्फी’ केली.
रविवार…
आज रविवार. आज सकाळच्या कामाला सुट्टी आहे, कारण आज ‘फिशटँक’ धुणे आहे. हे एक कष्टाचे काम असते व करून देणारे लोकही असतात. २००-३०० रुपये घेतात. त्यांना हे काम करताना पाहिले होते. तेव्हा एकदा निश्चय करून हे काम सुरू केले. प्रथममासे एका बादलीत पाणी घेऊन तित काढून घेतले. टँकमधील उपकरणे फिल्टर, एअरेटर, हिटर बाहेर काढून स्वच्छ केले. नंतर शोभेच्या वस्तू, वाळू काढल्या आणि स्वच्छ केल्या. आता टँकमधील पाणी काढून टँक स्वच्छ केला. नंतर परत या वस्तू जागच्या जागी ठेवून टँक पाण्याने भरला. मासे घातले आणि केलेले काम चहा घेत पाहात बसलो. ह्य़ात चांगला दीड-दोन तास गेला.
रविवार ते रविवार ८ दिवस झाले. उरले २५८ दिवस. त्याबाबतीत असाच ८-८ दिवसांचा कार्यक्रम लिहून तयार आहे. त्यात दरदिवशी वेगळा कार्यक्रम असेलच असे नाही. पुनरावृत्ती होईलही.
आता या लेखाचा शेवट एका मनोरंजक गोष्टीने करतो. मी माझी सर्व कामे स्वत:च करतो. आतले, बाहेरचे कपडे धुणे, इस्त्री करणे, इतकेच काय डोक्याचे केसही मीच कापतो. अमेरिकेत याबाबत घडलेली ही गोष्ट. मी रोज सकाळी-संध्याकाळी पायी फिरायला जातो. सकाळी उजाडता-उजाडता मी बाहेर पडतो. अमेरिकेत मी ज्या रस्त्याने फिरायला जायचो त्यावर बरीच दुकाने होती. पण इतक्या सकाळी ती बंद असायची. पण एकच केस कापण्याचे दुकान उघडे असायचे. त्यातही ४-५ खुच्र्या होत्या, पण इतक्या सकाळी फक्त मालक एकटाच वर्तमानपत्र वाचत बसलेला असायचा. इतक्या सकाळी हा कोण माणूस फिरत असतो म्हणून पाहात राहायचा. एके दिवशी त्याने मला आत बोलावले. थोडे बोलणे झाल्यावर त्याने विचारले, तू केस कुठे कापलेस. कारण मी नुकतेच केस कापलेले होते, हे त्याच्या लक्षात आलेले होते. मी म्हणालो, मी डॉक्टर आहे. पण स्वत:चे केस गेली ३५-४० वर्षे मीच कापतो. त्यावर त्याने नीट पाहिले व म्हणाला, वा! छान! पण मी थोडेसे ट्रिमिंग करू का? आता त्याच्या कारागिरीनंतर किती पैसे द्यावे लागतील असा विचार मनात साहजिकच आला. पण मी म्हणालो हरकत नाही कर. ते झाल्यावर त्याने आरसा दाखवला व विचारले आता कसे दिसले. छानच दिसत होते. थोडय़ा गप्पा झाल्यावर निघताना मी विचारले, हाऊ मच इज द चार्ज? त्यावर तो म्हणाला, नो चार्ज! मी विचारलं, व्हाय? त्यावर तो म्हणाला, प्लीज टेल मी डू द पीपल ऑफ द सेम प्रोफेशन चार्ज इच अदर बॅक देअर इन युअर कंट्री? काही व्यवसायधर्म बिझनेस एथिक्स आहे की नाही? माझ्या केशकर्तन कलेने त्याने मला त्याचा ‘व्यवसाय बंधू’ मानले याचा मला खरोखरच खूप आनंद झाला.
डॉ. अ. रा. गोडसे – response.lokprabha@expressindia.com