‘गाजर का हलवा’ करणारी आई व्हिडीओ कॉलिंग करते; तर नवऱ्याची वाट बघणारी बायको नोकरीसाठी बाहेर पडते; हे बदलतं चित्र आहे हिंदी सिनेमांचं. या सिनेमांनी विशिष्ट चौकटीतून स्त्री-व्यक्तिरेखांना मुक्त केलंय. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री-व्यक्तिरेखा कणखर बनवणाऱ्या सिनेमांवर टाकलेली एक नजर.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
घर कितीही सामान्य किंवा गरीब असलं तरी त्यातला मुलगा हा ‘हिरो’ दिसायलाच हवा. काही वर्षांपूर्वी असा पण होता सिनेमावाल्यांचा. आर्थिक स्थिती कितीही बेताची, हलाखीची असली तरी तो देखणा, कर्तबगार, सगळ्यातलं सगळं येणारा असायला हवा हा त्याच्यापुढचा नियम. पण सिनेमाला ‘हिरो’ असायलाच हवा. सिनेमा पुरुषप्रधान माध्यम मानलं जायचं. पण आता या मानण्याला काही काळ लोटला. काही अपवाद वगळता पूर्वीचे सिनेमे पुरुषप्रधान सिनेमांमध्ये मोडतात. आता मात्र यात बदल होतोय. स्त्रीप्रधान सिनेमे येण्याचं प्रमाण तर वाढलंच आहे; त्याशिवाय इतर विषयांच्या सिनेमांमधल्या स्त्री व्यक्तिरेखांच्या छटाही बदलताना दिसताहेत. प्रत्येक वेळी महिला सक्षमीकरणाचा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी स्त्रीप्रधान सिनेमे बनवण्याची गरज नसते तर इतर सिनेमांमधूनही आजच्या स्त्रीचं व्यक्तिमत्त्व दाखवता येऊ शकतं हे काही सिनेमांनी दाखवून दिलंय. सिनेमातलं हे चित्रण सहजतेने स्वीकारायला हवं; हे प्रेक्षकांनीही दाखवून दिलंय. म्हणूनच ‘क्वीन’मधली रानी सगळ्यांना भावली, ‘इंग्लिश विंग्लिश’मधल्या शशी गोडबोलेने प्रेक्षकांना भावुक केलं तर ‘मर्दानी’मधल्या इन्स्पेक्टर शिवानीने अनेकींना हिंमत दिली. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गेल्या दोनेक वर्षांमध्ये आलेल्या हिंदी सिनेमांवर नजर टाकल्यास असं लक्षात येईल की, स्त्रीप्रधान सिनेमांव्यतिरिक्त इतरही काही सिनेमांमध्ये स्त्री व्यक्तिरेखांनी आजच्या स्त्रीची स्वभाववैशिष्टय़े, छटा, पैलू दाखवले आहेत. काही वेळा सिनेमातली स्त्री बंडखोरही झाली आहे. पण तीही प्रेक्षकांनी स्वीकारली. रडूबाई, फक्त चवीपुरतं, सोशीक, सात्त्विक अशा चौकटीतून तिला काही सिनेमांनी मुक्त केलं.
सिनेमांमधली स्त्री-व्यक्तिरेखा या विषयावर चर्चा आधीही व्हायची. ती वारंवार होऊ लागली ती साधारण दोन-तीन वर्षांपासून. स्त्रीप्रधान सिनेमे पूर्वीच्या काळातही होऊन गेले. पण त्यांचे विषय बहुंताशी एखाद्या नायिकेला कसं संकटांना सामोरं जावं लागतं, तिच्यावर अन्याय कसा झालाय, ती त्यावर मात कशी करते वगैरे विषय हाताळले जायचे. महिला सक्षमीकरणाची यात काही यशस्वी उदाहरणंही आहेत. पण कणखर, धैर्यशील याशिवायही तिच्यात विविध स्वभाव-पैलू आहेत. ते आता सिनेमांमधून दिसू लागले आहेत. बिनधास्त, मनमोकळी, मुक्त, बंडखोर, खंबीर, प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी, हवं ते करणारी अशी असंख्य विशेषणं तिच्यात आहेत. ‘जब वुई मेट’मधली गीत म्हणजे करिना कपूर आठवते? ‘मैं अपनी फेवरेट हूँ’ असं सांगणारी. आवडली सगळ्यांना. त्या-त्या क्षणी हवं ते करणाऱ्या गीतसारखं कितीजणी प्रत्यक्षात करत असतील माहीत नाही, पण प्रेक्षकांनी तिला सहज स्वीकारलं हे नसे थोडकं. असंच ‘क्वीन’मधल्या रानी म्हणजे कंगणा रणोटचं. लग्नाच्या दोन दिवस आधी नवरा लग्नाला नकार देतो आणि म्हणून ती एकटीच हनिमूनला पॅरिसला जाते, ही गोष्टचं किती कौतुकास्पद आहे. म्हणजे यात कुठेही अहंकार न आणता ‘एका गोष्टीमुळे पॅरिसला जाण्याचं स्वप्नं मी का गुंडाळून ठेवू?’ असा प्रॅक्टिकल विचार त्यात आहे. लग्न मोडण्याचे प्रकार अनेकींबाबत घडले असतील, घडतही असतील, पण त्यातून योग्य तो आणि विचारपूर्वक मार्ग काढायला हवा. या सिनेमातही कुठेही ती किती बिचारी, अबला नारी वगैरे दाखवण्याच्या भानगडीत दिग्दर्शक पडला नाही. त्यामुळे ती कथा चांगलीच फुलत गेली. सिनेमाजगताचं हे बदलतं चित्र उल्लेखनीय आहे.
अलिया भट या अवखळ अभिनेत्रीच्या बऱ्याच सिनेमांमधली नायिका एकदम बिनधास्त दाखवली आहे. मग तो सिनेमा ‘हायवे’ असो ‘टू स्टेट्स’ असो ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ असो किंवा ‘शानदार’ असो. सगळ्या सिनेमांमध्ये तिचं खुलं जगणं दाखवलं आहे. हम्प्टी शर्मामधली तिचं प्रेम स्पष्टपणे कबूल करणारी बिनधास्त मुलगी, हायवेमध्ये न घाबरता अपहरणकर्त्यांसोबत मनसोक्त हिंडणारी तरुणी, ‘टू स्टेट्स’मध्ये पालकांना तिचं प्रेम पटवून देणारी आणि वेळ आल्यावर त्यांचीच बाजू घेणारी समजूतदार मुलगी अशा अनेक छटा यात दाखवल्या गेल्या. प्रेक्षकांना त्या आवडल्या आणि त्या चांगल्या प्रकारे स्वीकारल्याही गेल्या. तो सिनेमा आहे त्यात सगळं स्वप्नवत दाखवलं जातं, असं सर्रास म्हटलं जातं. पण सिनेमा हा समाजाचंच प्रतिबिंब असतो हेही लक्षात घ्यायला हवं. या सिनेमातल्या स्त्री व्यक्तिरेखा काहीशा बंडखोर वाटतील, पण आजच्या तरुणींचंच प्रतिनिधित्व करणारं ते चित्र आहे.
स्त्री-व्यक्तिरेखा बघून महिलाप्रेक्षक वर्ग सुखावला. ‘पिकू’मधली पिकूची मावशीसुद्धा एकदम ‘कुल’ दाखवली आहे. ‘हसी तो फसी’मधली परिणीती चोप्राच्या मोठय़ा बहिणीची व्यक्तिरेखा एकदम वेगळी आहे. प्रॅक्टिकल असणाऱ्या तिला आयुष्यात काय हवं त्याबाबत ती एकदम स्पष्ट आहे. अशी बहीण, मावशी, आई आपल्या आजूबाजूला असतात. ज्या तशा नाहीत त्यांना असं वागायला आवडेलही. पण त्या प्रत्यक्षात तशा वागतील की नाही हा पुढचा मुद्दा. मात्र अशा स्वभावाच्या स्त्री-व्यक्तिरेखांना प्रेक्षकांकडून स्वीकारलं जातंय.
आगामी ‘की अॅण्ड का’ या सिनेमात करिना कपूर आणि अर्जुन कपूर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. घरातली स्त्री नोकरी करणारी आणि पुरुष घरकाम करणारा असं यात आहे. आज अनेक जोडपी अशा तऱ्हेने जगतात. आर बाल्की या वेगळ्या विचारसरणीच्या दिग्दर्शकाचा तो सिनेमा आहे. त्यामुळे त्याकडून अपेक्षा करायला हरकत नाही. सिनेमाचा विषयही आजचा आहे. त्यामुळे त्यातली नायिकाही
सिनेमातलं स्त्रीचं हे बदलतं रूप सकारात्मक आहे. नेहमीच्या विशिष्ट चौकटीतून बाहेर काढत तिचं वेगळं रूप दाखवलंय सिनेमाने. ती बंडखोर आहे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी आहे. ती मनमोकळी, मुक्त आहे. ती कुटुंबाला सांभाळत नोकरी करणारी आहे. असं सगळं असलं, ती स्वतंत्र दाखवली जात असली तरी ती स्वैराचार करत नाही हेही ठळकपणे दाखवलं जातंय. सिनेमात दाखवत असलेल्या गोष्टींचं प्रत्यक्ष आयुष्यात अनुकरण केलं जातं असं म्हटलं जातं. असं असलं तरी प्रत्येक वेळी ते शक्य असतंच असं नाही. सिनेमांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या या
स्त्री-व्यक्तिरेखांचं अनुकरण महिलावर्ग प्रत्यक्ष आयुष्यात करत असतीलच असं नाही. पण ते त्यांच्यासाठी मनोरंजनाचं ठरतंय आणि ते बघून त्यांना आनंद मिळतोय म्हणजेच त्यांनी ते स्वीकारलं आहे. येणाऱ्या काळात याचं प्रमाण वाढताना दिसेल. प्रत्यक्ष आयुष्यात जसं महिला पुरुषांची बरोबरी करताना दिसताहेत. प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवताना दिसताहेत तसंच सिनेमांमध्येही स्त्री व्यक्तिरेखा आपला ठसा उमटवताना दिसताहेत. एकटय़ा नायिकेच्या खांद्यावर संपूर्ण सिनेमाची जबाबदारी पेलण्याइतकी कणखर स्त्री-व्यक्तिरेखा सिनेमातून दिसू लागली आहे. म्हणूनच आता खऱ्या अर्थाने हिरॉइनसुद्धा सिनेमाची ‘हिरो’ झाली आहे!
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com, twitter – @chaijoshi11