राधिका कुंटे – response.lokprabha@expressindia.com
निमित्त
१२ जानेवारी.. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त आजच्या तरुणाईनं स्वामी विवेकानंद यांना लिहिलेलं हे प्रातिनिधिक पत्र.

माननीय विवेकानंद,

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Premachi Goshta Fame Actress Amruta Bane
सासरे असावेत तर असे! ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्रीची सासरेबुवांसाठी खास पोस्ट; अभिनेता पती कमेंट करत म्हणाला…
badshah post on diljit dosanjh ap dhillon dispute
दिलजीत दोसांझ आणि एपी ढिल्लनच्या वादात बादशाहने घेतली उडी; पोस्ट शेअर करत म्हणाला, “आम्ही केलेल्या चुकांची…”
tharla tar mag can arjun sayali meets again madhubhau took strict decision
ठरलं तर मग : सायली-अर्जुनचं नातं कायमचं तुटणार? मधुभाऊंनी लेकीकडून घेतलं ‘हे’ वचन, तर दारात आलेला अर्जुन…; पाहा प्रोमो

स.न.वि.वि.

विषय : तुम्ही आणि आम्ही

अर्थातच तुम्ही ओळखलं असेल की, हा ‘स.न.वि.वि.’वाला मायना केवळ प्रेमळ आजोबांची आठवण जपण्यासाठी म्हणून लिहिला आहे. नाहीतर आजच्या भाषेत तसं काही लिहायचं शास्त्र नसतं.  आजोबांनी शिकवला होता म्हणून नाही तर काही नाही शास्त्र असते. आता पूर्वीच्या म्हणीप्रमाणं नमनाला घडाभर तेल न ओतता थेट मुद्दय़ावरच येतो. कारण आम्हाला थेट आणि मुद्देसूद बोलणं भलतंच आवडतं. कारण शास्त्र असते ते!

खरंतर अगदी स्पष्ट सांगायचं तर मला किंवा आमच्या ग्रूपमध्ये तुमचं नाव माहिती आहे. पण तुमचे विचार, कार्य आणि बाकीच्या गोष्टी यांचा तितका सखोल अभ्यास झालेला नाही. म्हणून मी त्या विषयावर काहीच बोलणार नाही. तसंही आपल्याकडं बोलायला, अभ्यास केलेला असतोच दरवेळी असंही काही नाही. त्याचं ढळढळीत उदाहरण तर अनेकदा जाणवतंच. विविध वृत्तवाहिन्यांवरच्या चर्चामध्ये किंवा समाजमाध्यमांवरच्या पोस्टमधून किंवा ट्वीटमधून. बहुमतांशी फॉरवर्ड्समधूनही तरीही अभ्यास ही एक करावीच लागणारी गोष्ट आहे, ती केली पाहिजे आणि हे आम्हाला ५० टक्के का होईना, मान्य आहे. कारण शास्त्र असते ते!

आता बघा, त्यात तज्ज्ञ मंडळींपेक्षाही कुठच्या कुठं भरकटत चाललो आहे मी. खरंतर असं भरकटणं हेदेखील आमच्या पिढीचं एक वैशिष्टय़ म्हणता येईल. तुमच्या वेळी असं होतं का हो? किंवा तुमचं असं काही व्हायचं का हो? हे सगळं लिहिताना मला आठवतंय की, माझ्या आजोबांनी ‘िबब-प्रतििबब‘ नावाचं एक पुस्तक वाचलं होतं मी लहान असताना. तेव्हा त्या पुस्तकाचं फक्त मुखपृष्ठ पाहिलं होतं येता-जाता नि खेळायला पळालो होतो. मात्र आत्ताही आठवते आहे, त्या मुखपृष्ठावरच्या चित्रातली तुमची भेदक नजर आणि चेहऱ्यावरची स्थिर वृत्ती. ते पुस्तक वाचून झाल्यावर आजोबांनी तुमची गोष्ट सांगितली होती. त्यात ‘तुम्हाला गुरू रामकृष्ण परमहंस यांनी मार्गदर्शन केलं होतं,’ असं आजोबांनी सांगितलं होतं. आता बघा, मला प्रश्न पडला आहे की, आमचे शिक्षक, आमचे प्राध्यापक हे आमचे गुरू? की एकाच वर्षी एका सर्चसरशी झटक्यात उत्तर देणारा ‘गुगलबाबा‘ आमचा गुरू? की आणखी कुणी आध्यात्मिक गुरू असायलाच हवेत? हेच नाही, पण तुमच्या काळानुसार काही ना काही प्रश्न तुम्हालाही पडले असतीलच ना? किंवा कदाचित नसतीलही, पण मला सांगा एकुणात प्रश्न पडायला हवेत की नको? बघा, हाही एक प्रश्न झालाच की तर बहुतांशी वेळा वाटतं की, प्रश्न हे पडायलाच हवे. कारण शास्त्र असते ते!

तर एकुणात आमची परिस्थिती जरा पुस्तकी भाषेत सांगायची तर इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. एक करायला जावं, तर भलतंच होऊन बसतं आणि ते निस्तरायला जावं तर आणखी तिसरंच काही उपटतं. मग घरच्यांची बोलणी खाणं ओघानं आलंच. तुमच्या वेळी असं काही होतं का हो? तुम्हाला कधी बोलणी खावी लागली होती का?आता कसं आहे सध्या की, आम्हाला फक्त अभ्यास किंवा फक्त एखादीच गोष्ट चांगली येऊन चालत नाही. आमचे पालक उपजत जणू ते सुपरमॉम आणि सुपरडॅड असल्यासारखं वागतात. निदान तसा प्रयत्न करतात. मग आम्हालाही सुपरचाइल्ड होणं भाग पडतं. पण त्यातही समजा, एखाद्यानं ठरवलं की, नाही व्हायचं सुपरचाइल्ड तर? तर मग काय विचारता? तोबा.. तोबा.. त्याच्या घरचे-दारचे, आतले-बाहेरचे, सगळे-सगळे नुसते तुटून पडतात त्याच्यावर. खरंतर त्यांनाही माहिती असतं की, असं सुपरचाइल्ड होणं असं नसतं काही किंवा नसावंच खरंतर, असं त्यांनाही वाटत असतं. ते चटकन राजी होत नाहीत या गोष्टीसाठी. ते त्यांच्यावर थोपवलेली भूमिका पार पाडू बघतातच. कारण शास्त्र असते ते!

युवकांनी ‘असं असं असावं‘ किंवा ‘असं असं असू नये’ अशी थेट काळ्या-पांढऱ्या दोन रंगांतली विभागणी तर अगदी ढोबळमानानं नि सर्रास केली जाते. पण काळ्या आणि पांढऱ्या रंगांच्यामध्ये करडा किंवा अन्य रंगांचं अस्तित्व असू शकतं, हेच मुळी भल्याभल्यांना माहिती नसतं. किंवा चुकून कळलं तर ते त्यांच्या पचनी पडत नाही. किंवा त्यांना ते माहिती करूनच घ्यायचं नसतं. सरधोपटपणं एक घाव दोन तुकडे करून एखाद्या समस्येची उकल होते, असं मानणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मग त्या समस्येच्या मुळाबिळाशी जाण्यात, तिची गंभीरपणं उकल करण्यात काय हशील? तितका वेळ आपण का दवडायचा आणि त्यानं काय साधणार असं घोकणारे अनेकजण असतातच आपल्या आजूबाजूला. त्यांचं तसं असणं, हेही एका परीनं स्वाभाविकच. कारण शास्त्र असते ते!

आता हा विषय लिहायला घेतला आहे, म्हणून ‘विवेकानंद’ हा सर्च दिला गुगलबाबावर. तर खूप सारे पर्याय आले समोर झटाझट. माहिती, कोटस्फोटो, व्हिडीओ वगरे वगरे. त्यातल्या त्यात यूटय़ूबचा पर्याय आम्हाला जास्त जवळचा वाटतो, ढीगभर पानांच्या पीडीएफ वाचण्यापेक्षा. त्यामुळं लगेच एक व्हिडीओ ऑन केला. तुमचं १८९३ रोजी केलेलं अमेरिकेतल्या सर्वधर्म परिषदेतील भाषण सुरू होतं. भाषणाच्या सुरुवातीलाच तुम्ही सभेला उद्देशून म्हणालात- ‘‘अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो..’’ राव, आपण तिथल्यातिथं खल्लास ना. त्या सभेसाठी जमलेल्या हजारो जणांच्या टाळ्यांचा कडकडाट दोन मिनिटं अखंड चालू होता. अजूनही तो कानात घुमतो आहे. त्या टाळ्या तशाच नि तेवढय़ा वाजणं ही अगदी स्वाभाविक गोष्ट होती. कारण शास्त्र असते ते!

एरवी आम्ही कॉलेजमधल्या वादविवाद स्पध्रेत पहिले आलो, तर स्वतचीच पाठ थोपटून घेतो. पण इथं तुम्ही जगाला बंधुत्वाची, समतेची शिकवण दिलीत. तीही केवळ पाच शब्दांत आणि अगदी सहजपणं. आपण काही एवढं करू शकत नाही. छे, छे. अजिबातच नाही. पण आमच्या आमच्या पातळीवर थोडसं असं काहीतरी नक्कीच करू शकतो. मग ते काही छोटंसं सामाजिक काम असेल, पर्यावरणाच्या संदर्भातला एखादा उपक्रम असेल किंवा असंच काहीसं असेल. ते तर आम्ही नक्कीच करत राहू. कारण शास्त्र असते ते!

आमच्यापकी अनेकांना आपल्या लिखाणातून संशोधनातून प्रेरणा देणारे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांनी एक स्वप्न पाहिलं होतं की, ‘‘२०२० मध्ये भारत महासत्ता होईल’’ महासत्ता वगरे खूप मोठय़ा गोष्टी झाल्या राव. आमच्या छोटय़ा खांद्यावर इतकं मोठं होईल की नाही हे माहिती नाही. तसं काहीच ठामपणे सांगता येणार नाही. हा सर्च करताना दिसलेल्या तुमचंच एक विधान होतं की, ‘राइज, अवेक युवर गोल इज नॉट अचिव्ह्ड’ अर्थात ‘‘उठा, जागे व्हा. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत थांबू नका.’’ हे वाचलं नि थोडा अस्वस्थच झालो खरंतर. खरंतर ‘अस्वस्थता’ हेही सध्याच्या तरुणाईचं एक अविभाज्य लक्षणच आहे. म्हणूनच वाटतं आहे की, तुमच्या या मतावर आम्ही नक्कीच विचार करू. खरंतर विचार करणं, ही नक्कीच महत्त्वाची गोष्ट आहे. ‘‘विचार, चिंतन, आचरण आणि कृती यातून माणूस घडतो,’’ असं आजोबांच्याा एका डायरीत मी वाचलं होतं. कसं आहे बॉस, आपण तर आजोबांना जामच फॉलो करतो. त्यामुळं आपण विचार करणारच. एकदा विचार केला की, मग काहीतरी बरं घडेल आणि त्यातून आणखी काहीतरी चांगलं नक्कीच घडेल. कारण शास्त्र असते ते!

असो. आता हे लांबलेलं पत्र थांबवतो. आजकाल इतकं मोठं पत्र, पत्रच काय, काहीही वाचायची सवय नाही राहिली कुणाला. कारण, कारण शास्त्र असते ते!

कळावे.

तुमची,
अस्वस्थ तरुणाई

Story img Loader