देशातील प्राणीसंपदेच्या सर्वागीण अभ्यासासाठी कार्यरत असलेल्या ‘भारतीय प्राणी सर्वेक्षण’ या संस्थेने १ जुलै २०१५ या दिवशी आपल्या यशस्वी वाटचालीची ९९ वर्षे पूर्ण करून शंभराव्या वर्षांत पदार्पण केले आहे. जगातील महावैविध्य असलेल्या बारा देशांत आपल्या देशाचा समावेश आहे. यात दोन टोकांचे वैविध्य असलेले पूर्व हिमालय आणि पश्चिम घाट हे आहेत. अशा या वैविध्य नसíगक संपदा असलेल्या आपल्या देशात या संपदेचा सर्वागीण अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश शासनाने स्थापन केल्या आहेत त्या भारतीय प्राणी सर्वेक्षण (Zoology Survey of India),भारतीय वनस्पती सर्वेक्षण (Botanical Survey of India) आणि भारतीय भूगर्भ सर्वेक्षण (Geological Survey of India). या तिन्ही संस्थांची पश्चिम विभागीय कार्यालये पुण्यात आहे. जगात एकूण ज्ञात असलेल्या सत्तर लाखांच्या वर जीवसृष्टीय आहेत. याशिवाय पंधरा दशलक्ष प्राण्यांना अजून ओळख द्यायची आहे. आपल्या देशात नव्वद हजार प्राण्यांची माहिती मिळाली आहे. तरी अजूनही माणसाला बऱ्याच प्राणिसृष्टीची पुरेशी माहिती झालेली नाही. प्राणी सर्वेक्षणातील वैज्ञानिक या नवीन प्राणीजगताचा शोध, त्याचे नामकरण, वर्णन, वर्गीकरण आणि त्या सर्वाची नोंद ठेवण्यात कार्यरत आहेत, परंतु अजून बरेच काही करावयाचे शिल्लक आहे. ‘भारतीय प्राणी सर्वेक्षण’ या संस्थेची स्थापना १ जुल १९१६ या दिवशी झाली. संस्थेचे उद्दिष्ट होते सर्वेक्षण, शोध आणि संशोधन. त्या काळच्या ब्रिटिशशासित भारतीय राज्यांमधील प्राणिसंपदेची सर्वागीण माहिती संकलित करण्याचे. ‘भारतीय प्राणी सर्वेक्षणा’च्या स्थापनेचे मूळ आहे ते १८७५ साली कोलकत्ता येथे स्थापन झालेल्या ‘इंडिया म्युझियम’च्या प्राणिशास्त्र विभागात. अल्फ्रेड विल्यम अलकॉक यांनी भारतात प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या स्थापनेची मागणी पत्राद्वारे केली होती. एशियाटिक सोसायटी, बेंगॉलने १८१४ ते १८७५ या काळात संग्रहित केलेला प्राणिशास्त्रीय माहिती जी पुढे इंडिया म्युझियमच्या प्राणिशास्त्र विभागात होती, तेथील विविध नमुने आणि विशेष संग्रह १९४१ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात डेहराडून येथील वनसंशोधन संस्थेत हलविले. बाकीचा संग्रह वाराणशी येथील कैसर कॅसलमध्ये १९४२ला हलविला. हळूहळू वाढते संशोधन प्रकल्प आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ वाढवून भविष्यातील मागण्यांना तोंड देण्यास तयार झाले ते आपल्या सुरुवातीपासूनच्या उद्दिष्टांपासून जराही बाजूस न होता. ‘भारतीय प्राणी सर्वेक्षण’ कोणतेही अभ्यासक्रम राबवीत नाही, पण परिसंवाद, प्रशिक्षण, कार्यशाळा आणि चर्चासत्रांचे आयोजन करते. संशोधन प्रक्रियेतील अनुमान, निरीक्षण यांच्या प्रकाशनासाठी संस्थेचा प्रकाशन विभाग कार्यरत आहे.
* भारतीय प्राणी सर्वेक्षणा’ची मूलभूत उद्दिष्टे आहेत-
* भारताच्या म्हणजे त्या काळच्या इंडियातील विविध राज्यांतील संरक्षित क्षेत्र आणि इकोसिस्टममधील प्राणी शोध, सर्वेक्षण आणि मोजदाद करून प्राणी वैविध्यावर नियंत्रण ठेवणे.
* सर्व प्राणिमात्रांचा टॅक्सोनॉमिकल अभ्यास.
* नामशेष होण्याच्या धोक्याजवळ असलेल्या प्राण्यांचा मागोवा घेणे.
* भारतातील आणि राज्यांतील प्राणी जीवनावरचे रेड डाटा बुक तयार करणे
* नोंद झालेल्या प्राणीवर्गाचा एक माहितीसंच बनविणे
*विकास आणि देखभाल करणे
*विकासांतर्गत प्रशिक्षण, क्षमतावृद्धी यांसारखे उपक्रम राबविणे.
* ग्रंथालय सल्लागार आणि
प्राण्यांचे वर्गीकरण
* देशातील आणि राज्यातील प्राणीसंपदेच्या संकलित केलेली माहिती आणि निरीक्षणांवर आधारित माहिती नियमित प्रसिद्ध करणे
* प्राणिसृष्टीवर झालेल्या प्रदूषित पर्यावरणाच्या परिणामांचा अभ्यास करणे.
* मुख्यालय आणि विभागीय कार्यालयात संग्रहालयांचा विकास आणि संवर्धन.
* एन्व्हीस (ENVIS – Environmental Information Service)  आणि साइटेस (CITES – Convention of International Trade and Endangered Species) केंद्रांची मदत घेणे
* संशोधन शिष्यवृत्ती आणि असोसिएटशिप व मानद शास्त्रज्ञ कार्यक्रमाची अंमलबजावणी.
*संस्थांबरोबर बायोडायव्हर्सिटी प्रकल्प राबविणे
* जीआयएस (GIS – Geographical Information System) आणि रिमोट सेिन्सग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्राणीवैविध्य आणि नामशेष होण्याच्या मार्गावरील प्राण्यांचा अभ्यास.
* क्रोमोसोनल मॅिपग आणि डी.एन.ए. िपट्रिंग.
या उद्दिष्टांनुसार ‘भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थे’ने गेल्या दहा दशकांत वाटचाल केली आहे. त्यांच्या एकूण कामाच्या आवाक्यानुसार त्यांची आठ विभागीय आणि आठ फिल्ड स्टेशन्स आहेत. मुख्यालय कोलकत्ता येथे आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झव्‍‌र्हेशन ऑफ नेचर (आय.यू.सी.एन.)च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार १९८३ मध्ये बी. के. टिकादर यांनी ‘थ्रेट्न्ड अ‍ॅनिमल्स ऑफ इंडियाचे’ संपादन केले. १९९३ मध्ये याची सुधारित आवृत्ती ‘द रेड डाटा बुक ऑफ इंडियन अ‍ॅनिमल्स’ ए. के. घोष संचालक, भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था यांनी संपादित केली. भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या वैज्ञानिक भारताच्या अंटाकर्ि्टक संशोधन मोहिमेत प्रथमपासून (१८९८) सहभागी झाले आहेत. १९९५-९६च्या १५व्या मोहिमेत त्यांनी २९ प्रजातींचा शोध लावला. जैववैविध्य संकेताच्या (बायोडायव्हर्सटिी कन्व्हेन्शन) कलम ५- १०, १३, १४, १७ आणि १८ मुळे प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या कार्यात व्यापकत आली आहे. या संस्थेचे पश्चिम विभागीय कार्यालय पुण्यात आहे.
विजय देवधर – response.lokprabha@expressindia.com

mauled dog in Chikhli bitten many causing fear among residents
चिखलीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस; ३० जणांना चावा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Golden fox and stray dogs coexist in Kharghar Mumbai print news
खारघरमध्ये सोनेरी कोल्हा आणि भटक्या कुत्र्यांचा एकत्र वावर
Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
top 10 search on google in 2024
Google Search: भारतीय गुगलवर गेल्या वर्षभरात काय शोधत होते माहितीये? गुगल सर्च रिपोर्टची माहिती आली समोर!
tigress latest marathi news
महाराष्ट्रातून ओडिशात सोडलेली वाघीण झारखंडमध्ये
UPSC CSE Mains Result 2024 : यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर; ‘येथे’ ऑनलाइन पाहा निकाल
What is the National Health Claim Exchange health insurance
आरोग्य विम्याची प्रक्रिया आता जलद? काय आहे ‘नॅशनल हेल्थ क्लेम एक्स्चेंज’?
Story img Loader