मेष मनामध्ये अनेक सुप्त इच्छा-आकांक्षा तरळत असतील त्या पूर्ण करण्यासाठी स्वत:च्या मर्यादा काय आहेत याचा विचार करा. व्यापार उद्योगातील घडामोडी आणि काळाची गरज यामुळे तुमची कार्यपद्धती बदलणे क्रमप्राप्त होईल. नोकरीमध्ये बदल करू इच्छिणाऱ्यांनी सावधतेने आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावा. घरामधल्या जबाबदाऱ्यांसाठी वेळ आणि पैसे हातात राखून ठेवा. तरुणांनी महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी घरातील अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. कलाकार/ खेळाडूंनी सवंग प्रसिद्धीकरिता प्रयत्न करू नका.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वृषभ सभोवतालच्या व्यक्ती तुम्हाला खूश ठेवण्याचा प्रयत्न करतील. या संधीचा फायदा घेऊन तुम्ही तुमचा मतलब साध्य कराल. ग्रहमान तुम्हाला सतत उद्योगात ठेवेल. प्रकृती आणि स्वत:च्या मर्यादा या दोन गोष्टींचा विचार केल्याशिवाय कोणताही कार्यक्रम ठरवू नका. व्यापार उद्योगात नियोजनाला महत्त्व द्या. नोकरीमध्ये महत्त्वाच्या बदलांची नांदी होण्याची शक्यता आहे. घरामध्ये सगळ्यांची मोट बांधण्याचे अवघड काम तुम्हाला करावे लागेल. कलाकार आणि खेळाडूंना नवीन आव्हाने स्वीकारण्यात मजा वाटेल.

मिथुन एकंदरीत कार्यपद्धती आणि जीवनमान बदलून टाकावे असा तुमचा इरादा असेल. पण त्याची सुरुवात नेमकी कुठून आणि कशी करायची याविषयी मनामध्ये संभ्रम असेल. त्याकरिता एखाद्या बुजुर्ग व्यक्तीचे मार्गदर्शन तुम्हाला आवश्यक वाटेल. नोकरीमध्ये कामाच्या स्वरूपात बदल करण्याचे संकेत यापूर्वी मिळाले असतील तर त्याची कार्यवाही होईल. घरामध्ये तुमचे विचार इतरांना लगेच पटणार नाहीत, त्यांना विचार करायला वेळ द्या. वाहन चालविताना, मशीनवर काम करताना बेसावध राहू नका.

कर्क गुरूसारखा भाग्यवर्धक ग्रह तुम्हाला उत्तम मनोधैर्य आणि नशिबाची साथ द्यायला सज्ज आहे. त्यामुळे घरगुती प्रश्नातून आणि इतर अनेक विवंचनांतून तुमची मुक्तता झाली असेल. जीवनातील विविधतेचा आनंद तुम्हाला लुटावासा वाटेल. व्यापार उद्योगाच्या क्षेत्रात ज्या गोष्टी सध्या चालू आहेत त्यावर तुम्ही फारसे समाधानी नसाल. त्यामुळे कार्यपद्धतीत बदल करावासा वाटेल. नोकरीमध्ये भरपूर काम करायची इच्छा असली तरी वरिष्ठांच्या सूचनांमुळे कोणत्या कामाला महत्त्व द्यायचे याविषयी गोंधळ असेल.

सिंह तुमच्या नेहमीच्या स्वभावानुसार नाही हा शब्द तुम्हाला सहन होत नाही. तुमच्या मर्यादा काय आहेत, हे लक्षात घेतल्याशिवाय कोणतेच मोठे बेत करू नका. व्यापार उद्योगात माझे तेच खरे असा दृष्टिकोन न ठेवता प्रतिस्पध्र्याचा अंदाज घ्या. मोठी गुंतवणूक निष्णात व्यक्तीच्या सल्ल्यानुसार करा. नोकरीमध्ये वरिष्ठ तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवून तुमच्याकडून जास्त काम करून घेतील. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींच्या कुरबुरी चालू राहतील. त्यांना तरुणांचे विचार पटणार नाहीत. एखाद्या कार्यक्रमामुळे रंगत येईल.

कन्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपला फायदा झाला पाहिजे आणि वेगळेपण दिसून आले पाहिजे याकरिता तुम्ही प्रयत्नशील राहाल. मनामध्ये योजलेली कामे तडीस नेण्यासाठी वेळप्रसंगी धाडसी निर्णय घ्याल. व्यावसायिक कामामध्ये  आलेली शिथिलता घालवण्याकरता वेगळे उपाय योजाल. नवीन वर्षांकरता आखून ठेवलेले बेत कार्यान्वित करण्याची तुम्हाला घाई असेल. नोकरीमध्ये चांगल्या कामाकरता निवड होण्याचे संकेत तुम्हाला मिळतील. घरामध्ये आवडत्या व्यक्तीच्या जीवनातील एखादा शुभप्रसंग पार पडेल.

तूळ ग्रहमान असा संकेत देते की तुम्हाला कामाची नवीन पद्धत शोधून काढावी लागेल.  व्यवसाय उद्योगात आर्थिक बाबींवर तुमचे विशेष लक्ष असू द्या. ज्या कामातून तुम्हाला खूप फायदा होत नाही ते बंद करून त्याऐवजी दुसरे काम हातात घ्यावेसे वाटेल. या बाबतीत निष्णात व्यक्तीचा सल्ला घेणे चांगले. नवीन नोकरीकरता प्रयत्न करणाऱ्यांनी त्यांचा वेग वाढवायला हरकत नाही. घरामध्ये काही सुधारणा करून त्यात नीटनेटकेपणा आणावासा वाटेल. एखादा पूर्वी ठरलेला समारंभ थोडय़ा बदलानंतर पार पडेल.

वृश्चिक मोठय़ा धैर्याने आणि आशादायक पवित्रा ठेवलात तर तुम्ही चांगले काम करू शकाल. व्यवसाय उद्योगात कामाच्या पद्धतीत फेरफार करायचे तुम्ही ठरविले असेल तर त्या दिशेने वाटचाल सुरू होईल. नोकरीमध्ये तुमच्या संस्थेत ज्या घडामोडी घडत आहेत त्यावर बारकाईने लक्ष ठेवा. शक्यतो स्वत:हून बदल करायला जाऊ नका. घरामध्ये आवडत्या व्यक्तींकडून मिळालेल्या सल्ला किंवा सहकार्य उपयोगी पडेल. एखाद्या नवीन घरगुती जबाबदारीची नांदी होण्याची शक्यता आहे.

धनू मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी भविष्यातील प्रगतीविषयी थोडीफार चिंता असेल. तुमची रास नेहमीच आशावादी असते. सध्याच्या परिस्थितीत निराश न होता सावध पवित्रा ठेवलात तर तो तुम्हाला निश्चितपणे उपयोगी पडेल. व्यापार उद्योगात बाजारातील चढ उतारांनुसार तुमचे धोरण ठरवा. नोकरीमध्ये उसने अवसान आणून केलेल्या कामाचा फायदा तुमच्यापेक्षा वरिष्ठ जास्त घेण्याची शक्यता आहे.  घरामध्ये तुमच्या न टाळता येणाऱ्या जबाबदाऱ्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत हे लक्षात ठेवून आळस टाळा.

मकर तुमच्यातील जिद्द आणि महत्त्वाकांक्षा आधीच वाढलेली आहे. जे तुमच्या मनात आहे ते कृतीमध्ये आणण्याची तुम्हाला प्रचंड घाई असेल. व्यापार उद्योगात मात्र एकंदरीत बाजारातील परिस्थितीचा अंदाज घेऊन तुम्ही तुमचे ध्येयधोरण अचानक बदलायचे ठरवाल. नोकरीच्या ठिकाणी चांगले काम करून वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. घरामध्ये सगळ्यांना खूश ठेवण्याचे तुम्ही आश्वासन द्याल खरे, पण पैशाचे गणित कागदावर मांडल्यानंतर त्यात काटछाट करायचे ठरवाल. त्यावरून तुमच्यावर टीका होईल.

कुंभ ग्रहमान संमिश्र आहे. तुम्हाला एखादी नवीन गोष्ट करायची असते त्या वेळेला तुम्ही वैचारिकदृष्टय़ा अगोदर तयार असता आणि योग्य संधी मिळाली की त्या कामाला प्रारंभ करता. आताही तुमची विचारधारा अशीच असेल.  व्यापार उद्योगात सध्याचे काम चालू ठेवून एखादा नवीन बेत आखाल. नोकरीमध्ये तुमची बुद्धिमत्ता आणि कौशल्य या दोन्हीला चांगला वाव मिळेल. घरामधील व्यक्तींना एखाद्या गोष्टीकरता तुम्ही आग्रह धराल किंवा वेळप्रसंगी रागवालसुद्धा. पण त्यात एक प्रकारचे प्रेम असेल.

मीन ज्या कामामध्ये तुम्हाला अपयश आले होते त्याची कसर भरून काढायची असे तुम्ही ठरवाल. व्यावसायिक कामामध्ये काही आशादायक बदल नजरेच्या टप्प्यात येतील. नोकरीमध्ये संस्थेतील धोरणांमुळे किंवा तुमच्या स्वत:च्या चुकांमुळे जी गैरसोय झाली होती त्याबाबत वरिष्ठांकडून मदतीचे आश्वासन मिळेल. घरामध्ये एखाद्या प्रश्नात गुंतागुंत झाली असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी सर्वानुमते तोडगा शोधला जाईल.