हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वृषभ तुमच्यातील कल्पकता आणि व्यवहारदक्षता याला भरपूर वाव मिळाल्यामुळे तुम्ही आता खूश असाल. अनेक पर्याय असल्यामुळे नेमके कशाला महत्त्व द्यायचे याविषयी गोंधळ उडेल. व्यापार-धंद्याच्या नवीन क्षेत्रात विस्तार करावासा वाटेल. उत्पन्न वाढविणे हाच त्याचा उद्देश असेल. कारखानदार देशात किंवा परदेशात नवीन शाखा उघडतील. नोकरीमध्ये तुमच्या गुणांना बराच वाव मिळेल. तुम्हाला विशेष सवलत बहाल केली जाईल. घरामध्ये खर्च बजेटबाहेर जाईल.
मिथुन तुमच्या कर्तृत्वाला झळाळी देणारे ग्रहमान आहे. मात्र चांगले काम होण्यासाठी तुम्हाला कोणाच्या तरी मार्गदर्शनाची नितांत गरज लागेल. व्यवसाय-उद्योगामध्ये आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे सिद्ध करणारी एखादी नवीन कल्पना अमलात आणण्यापूर्वी त्यातील जमा-खर्चाचे गणित नीट मांडून बघा. पशाची आवक चांगली राहील. ज्यांना नोकरीमध्ये कामाच्या स्वरूपामध्ये बदल हवा असेल त्यांनी वरिष्ठांसमोर आपली मागणी ठेवावी. पण घाई करू नये. ज्यांचा जोडधंदा आहे त्यांना त्या माध्यमातून काही प्रमाणात पसे मिळतील. घरामध्ये आवडत्या व्यक्तींचा तुमच्याभोवती गराडा असेल.
कर्क वारा वाहील तशी पाठ फिरवण्याची कला तुम्हाला अवगत आहे. त्याचा तुम्हाला उपयोग होईल. एखाद्या प्रश्नामुळे सुरुवातीला तुम्ही कोडय़ात पडाल. पण नंतर हिकमतीच्या जोरावर तुम्ही त्यावर मार्ग शोधून काढाल. व्यापार-उद्योगामध्ये एखादी धाडसी योजना तुमचे लक्ष आकर्षति करेल. मात्र त्यातील पशाचे गणित मांडल्यावर नफ्याचे प्रमाण फारसे नाही असे लक्षात येईल. जोडधंदा असणाऱ्यांनी नेहमीच्या कामात दुर्लक्ष करून चालणार नाही. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमची खुशामत करून जास्त काम करून घेतील. त्या मानाने आíथक फायदा कमी देतील. घरात वरिष्ठांच्या वागण्यामुळे तुम्ही कोडय़ात पडाल.
सिंह तुम्ही भव्य-दिव्य कल्पनांनी भारावून जाणारे आहात. एखादे स्वप्न तुमच्या पुढे असते त्या वेळेला तुम्हाला इतर सर्व गोष्टींचा विसर पडतो. उद्योग-व्यवसायामध्ये पशाचा ओघ चालू झाल्यामुळे तुमच्या मनामध्ये अनेक तरंग उठतील. नोकरीमध्ये ज्या गोष्टी मागून मिळत नव्हत्या त्या मिळाल्यामुळे अधिकार गाजवण्याकडे तुमचा कल राहील. घरामध्ये कुटुंबीयांसह लांबच्या प्रवासाचे स्वप्न साकार झाल्यामुळे सगळ्यांना छान वाटेल. तरुणांचे विवाह जमतील अथवा पार पडतील.
कन्या बराच मोठा चढ चढून आल्यानंतर उतार दिसतो त्या वेळी आपण सुटकेचा नि:श्वास टाकतो, तशी तुमची स्थिती होईल. तुमच्या नियोजनाला आणि प्रावीण्याला भरपूर वाव मिळाल्यामुळे तुम्ही उत्साही बनाल. व्यापार-उद्योगात एके काळी ज्यांनी तुमच्याकडे पाठ फिरवली होती त्यांच्याकडून सहकार्याची भाषा ऐकू येईल. नोकरीमध्ये लांबलेल्या प्रोजेक्टची सुरुवात होईल. कदाचित परदेशात जाण्याची संधी मिळेल. घरामध्ये शुभ समारंभांच्या निमित्ताने सगळ्यांचा खरेदीचा मूड असेल.
तूळ वाळवंटात मृगजळ दिसावे आणि तरी मनाला बरे वाटावे, तशी आता तुमची स्थिती आहे. गुंतागुंतीच्या प्रश्नांमध्ये काहीतरी मार्ग निघण्याची आशा दिसू लागेल. व्यवसाय-उद्योगामध्ये पूर्वी ज्यांनी तुम्हाला डावलले होते त्यांच्याकडून मदतीचा हात येईल. अजूनही आíथक स्थिती फारशी सुधारणार नाही. नोकरीव्यतिरिक्त जादा काम करावेसे वाटेल. चालू नोकरीत कंटाळवाणे काम संपण्याची लक्षणे दिसू लागतील. घरामध्ये मुलांच्या करिअरसंबंधी विचारविनिमय होईल. सजावट, फेरबदल करून घर सजवावेसे वाटेल. समारंभाच्या निमित्ताने आप्तेष्ट नातेवाईक यांची गाठभेट होईल.
वृश्चिक ज्या वेळेला एखादी गोष्ट तुम्हाला मनोमन पाहिजे असते त्या वेळेला त्याकरिता काहीही करण्याची तुमची तयारी असते. असा उत्साह तुमच्यामध्ये सळसळताना दिसेल. व्यापार- धंद्यात नेहमीपेक्षा जास्त कमाई करण्याची संधी नजरेच्या टप्प्यात येईल. त्याचा फायदा उठवण्यासाठी तुम्ही जिवाचे रान कराल. जोडधंदा असणाऱ्यांना एखादे चांगले काम मिळेल. त्यामध्ये त्यांनी आळस करू नये. नोकरीमध्ये तुम्ही थोडे स्वार्थी बनाल. आपला फायदा करून घेण्यासाठी वरिष्ठांची खुशामत कराल. घरामध्ये एखादा शुभ समारंभ पार पडेल. पूर्वी ठरलेले प्रवासाचे बेत निश्चित होतील.
धनू गेल्या काही दिवसांत इच्छा असूनही काही कामांमध्ये तुम्हाला प्रगती करता आली नव्हती त्याची कसर भरून काढणे हे तुमच्या पुढील मुख्य उद्दिष्ट असेल, त्या नादात भलताच धोका पत्करू नका. व्यापार वाढवावासा वाटेल. परदेशात उद्योग असेल तर तेथे धावता प्रवास होईल. स्वत:ची चीजवस्तू सांभाळा. नवीन करार करण्यापूर्वी त्यातील अटींचा अभ्यास करा. नोकरीमध्ये तुमच्या उत्साही स्वभावाचा गरफायदा घेतला जाईल. नवीन नोकरीच्या कामात गती येईल. घरामध्ये पाहुण्यांची हजेरी लागेल.
मकर जीवनामध्ये फक्त कर्तव्यालाच महत्त्व नसते तर कधी कधी त्याचा खुल्या दिलाने आस्वाद घ्यावा लागतो. याचे महत्त्व प्रिय व्यक्ती तुम्हाला समजून सांगतील आणि मौजमजा करायला भाग पाडतील. व्यापार-उद्योगामध्ये काम थोडे झाले तरी आíथकदृष्टय़ा ते चांगले असेल. नोकरीमध्ये तुमचे प्रावीण्य आणि अक्कलहुशारी दाखविल्यामुळे वरिष्ठ खूश होतील. राहत्या जागेचे सुशोभीकरण, गावी घर असल्यास तेथे फेरफटका मारणे, छोटा मेळावा अशा गोष्टींमध्ये तुम्ही वेळ घालवाल.
कुंभ प्रत्येक माणसाची अशी इच्छा असते की आपल्या कामाची कोणीतरी दखल घ्यावी. ती घेतली गेल्याने अंगावर मूठभर मांस चढेल. व्यवसाय-उद्योगात भविष्यातील स्वप्नांचे नियोजन करून ठेवाल. योगायोगाने संबंधित व्यक्तीकडून त्याला प्रतिसाद मिळेल. नोकरीमध्ये वरिष्ठांपुढे तुमच्या सूचना चांगल्या शब्दांत मांडा म्हणजे त्या मान्य होतील. लांबलेली एखादी मागणी पूर्ण करण्याचे त्यांच्याकडून आश्वासन मिळेल. घरामधील मोठय़ा व्यक्तीच्या कल्पना सुरुवातीला जरी पटल्या नाहीत तरी त्या बरोबर होत्या असे नंतर तुम्ही मान्य कराल. तरुणांचे विवाह जमतील.
मीन तुमच्यातील स्वप्नाळू वृत्ती आणि महत्त्वाकांक्षा वाढविणारे ग्रहमान आहे. तुम्ही आशावादी आणि सक्रिय बनाल. व्यापार-उद्योगात नवीन ऑर्डर मिळविण्याच्या आशेने बरीच धडपड कराल. एखादे काम संपविण्याकरिता तातडीने प्रवास करावा लागेल. बेकार व्यक्तींनी तडजोड केली तर काम मिळू शकेल. नोकरीमध्ये वरिष्ठ चांगल्या कामाकरिता किंवा परदेशातील कामासाठी तुमची निवड करतील. घरामध्ये आवडत्या व्यक्तींच्या गराडय़ात तुम्ही राहाल. त्यांच्यासमवेत खरेदी, मनोरंजन आणि इतर कार्यक्रम ठरतील.