नवीन स्मार्टफोन घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल आपण गेल्या आठवडय़ात माहिती घेतली. त्यानंतर अनेकांनी नवीन कॅमेरा घेताना कोणत्या गोष्टी डोक्यात ठेवाव्यात याबद्दल विचारलं होतं. सध्या अमेझॉनवर नवीन डीएसएलआय कॅमेऱ्यांवर खास ऑफर्स सुरू आहेत, शिवाय लग्नसराई, घरगुती समारंभ छोटय़ा स्वरूपात होत असल्याने अनेकांचा कल स्वत:च्या कॅमेऱ्यात हे क्षण टिपण्याकडे दिसतो. या निमित्ताने खास तुमच्यासाठी या स्पेशल टिप्स..
हल्ली कॅमेरा हा माणसाचा जिवाभावाचा सखा मानला जातो. घराघरांत छायाचित्रणाची आवड असणारे लोक पाहायला मिळतात. काही जण मोबाइलवर छायाचित्रण करतात, तर काही जण वेगवेगळ्या प्रकारच्या कॅमेऱ्यांचा वापर करतात. अनेकदा पर्यटनाला जाताना नवीन कॅमेरा विकत घेतला जातो किंवा बऱ्याचदा कॉलेज प्रोजेक्ट्स, असाइनमेंट किंवा कामांसाठी कॅमेरा घेण्याचा विचार असतो. पण नवीन कॅमेरा म्हटला की १०० फीचर्स, ब्रॅण्डस आणि इतर तांत्रिक गोष्टी बघून आपण संभ्रमात पडतो. साधारणत: नवीन कॅमेरा घेताना लोक संभ्रमात पडतात की, नक्की कोणता कॅमेरा घ्यावा, पॉइंट-टू-शूट की प्रोफेशनल डी-एसएलआर? हल्लीच्या काळात एसएलआर कॅमेरा स्वस्त होत असल्याचं दिसून येत आहे; पण त्या बरोबरच पॉइंट-टू-शूटची नवनवीन मॉडेल्स बाजारात येत आहेत. त्यामुळे नेमका कोणता कॅमेरा घ्यायचा, दोन्ही प्रकारांचे फायदे-तोटे काय आणि त्यातून उत्तम निवड कशी करावी यासाठी काही खास टिप्स-
पॉइंट-टू-शूट
छोटय़ा डिजिटल कॅमेऱ्यांना पॉइंट-टू-शूट कॅमेरा म्हणून ओळखलं जातं. यामध्ये फोटोसंबंधित फीचर्स आपोआप हाताळली जातात केवळ योग्य अँगल आणि हवा तसा सीन बघून फोटो क्लिक करावा लागतो. यामध्ये फोटोग्राफरला स्वत:ला कोणतंही तांत्रिक सेटिंग करावं लागत नाही. फोटोग्राफी करण्याची आवड असणारे बरेच शिकाऊ फोटोग्राफर या कॅमेऱ्याची निवड करतात.
पॉइंट-टू-शूटचे फायदे
- आकाराने लहान आणि कॅरी करण्यास सोपा : मुळात पॉइंट-टू-शूटचे कॅमेरे कॅरी करायला सर्वात सोपे असतात. काही कॅमेरे तर आपण अगदी आपल्या खिशातही ठेवू शकतो. ते आपल्या बॅगेत अगदी सहज मावतात. त्यामुळे कुठेही गेलं की आपल्या आठवणी चटकन कॅमेऱ्यात साठवणं सोपं होतं.
- वजनाने हलके : सर्वसाधारणपणे पॉइंट-टू-शूट कॅमेरे वजनाने हलके असतात. त्यासाठी इतर कोणत्याही अॅक्सेसरीज घेऊन जाव्या लागत नसल्यामुळे सामानाचं ओझं होत नाही आणि त्रास बऱ्याच प्रमाणात वाचतो.
- फिक्स लेन्स : या कॅमेऱ्याच्या लेन्स फिक्स असल्याने ते हाताळताना कमी काळजी घ्यावी लागते. तसेच लेन्स पुन:पुन्हा काढून लावण्याचा त्रास वाचतो.
- उत्तम व्हिडीओ रेकॉर्डिग : पॉइंट-टू-शूट कॅमेऱ्यांमध्ये हल्ली उत्तम दर्जाचं व्हिडीओ रेकॉर्डिग होतं. ज्यामध्ये १०८० पिक्सल, ७२० पिक्सल रेकॉर्डिगचा समावेश होतो.
- किंमत : हा कॅमेरा सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत उपलब्ध आहे. कमी किमतीत जास्त फीचर्स मिळतात. हे कॅमेरे साधारणपणे आठ ते २५ हजारांच्या दरम्यान उपलब्ध आहेत.
पॉइंट-टू-शूटचे तोटे
- दर्जा : कमी किमतीत जास्त फीचर्स मिळत असले तरी, लो-कॅमेरा सेन्सरमुळे कॅमेऱ्याच्या दर्जामध्ये फरक पडतो. एसएलआरच्या तुलनेत छायाचित्राचा दर्जा, कॅमेरा मेगापिक्सल यात फरक असतो.
- फोकस डिफरन्स : डीएसएलआर कॅमेऱ्यामध्ये ऑटो फोकस फीचर असतं, ज्यामुळे आपल्याला फोटोतील मुख्य विषय फोकस करता येतो; परंतु पॉइंट-टू-शूटमध्ये अशा प्रकारचं फोकसिंग करता येत नाही, त्यामुळे फोटोला नंतर मॅन्युअल एडिटिंग करावं लागतं. त्यात अधिक वेळ खर्च होतो.
- नॉन अपग्रेडेबल : फिक्स लेन्समुळे पॉइंट-टू-शूट कॅमेरे अपग्रेड करता येत नाहीत. त्यामुळे अपग्रेड करायचे झाल्यास नवीन कॅमेरा घेण्याशिवाय पर्याय नसतो.
- नाईट फोटोग्राफी : पॉइंट-टू-शूट कॅमेऱ्यामध्ये काळोखात छायाचित्रणाला वाव नाही. रात्री चित्रीकरण करायचं असेल, तर लाईट आणि इतर सेटिंग करावं लागतं. त्यासाठीचा पर्याय यामध्ये उपलब्ध असला तरी चांगले फोटो मिळत नाहीत. पॉइंट-टू-शूट कॅमेरे हे क्रीडा प्रकारांच्या चित्रणासाठी किंवा जलद छायाचित्रणासाठी उपयुक्त नसतात.
डीएसएलआर
डिजिटल सिंगल लेन्स रिप्लेक्स कॅमेरा म्हणजे डीएसएलआर. या कॅमेऱ्यामध्ये फोटोग्राफर्सना स्वत:ची क्रिएटीव्हीटी वापरण्यासाठी अनेक पर्याय असतात. शिवाय स्वतंत्र लेन्स आणि कॅमेऱ्याचे अधिक आधुनिक फीचर्स यामुळे जास्त चांगले फोटो काढणे शक्य होऊ शकते. यामध्ये फोटोग्राफरला आपल्या अनुभवाचा वापर करून फोटो काढताना लाइट इतर सेटिंग ठरवावी लागतात.
डीएसएलआरचे फायदे :
- चित्रणाचा उत्तम दर्जा : उत्तम इमेज सेन्सर आणि मेगा पिक्सल यामुळे डीएसएलआर कॅमेरे हे नेहमीच उत्तम दर्जाचं छायाचित्र मिळवून देतात. हल्लीच्या डीएसएलआरमध्ये एचडी फोटो व्हिडीओजचा ऑप्शन तर असतोच शिवाय इतर आधुनिक फीचर्समुळे तुम्हाला उत्तम दर्जाचे फोटो मिळतात जे पॉइंट टु शूटमध्ये मिळतीलच असं नाही.
- लो लाइट सेन्सिटिव्ह : काही वेळा कमी प्रकाशात फोटो काढण्यात अडचणी येतात, परंतु डीएसएलआर कॅम्सच्या लो लाइट सेन्सिटिव्ह टेक्नोलॉजीमुळे कमी प्रकाशातही सुंदर फोटो टिपता येतात.
- शटर स्पीड आणि फोकस स्पीड : एखादा छोटय़ात छोटा किडा असो वा उडणारं फुलपाखरू डीएसएलआरच्या उत्तम फोकस स्पीडमुळे ते चटकन टिपलं जातं आणि आपल्याला कमीतकमी वेळात छान फोटो मिळू शकतात.
- उत्तम गुंतवणूक : तुम्ही सात-आठ र्वष टिकेल आणि नंतर अपग्रेडसुद्धा करता येईल असा कॅमेरा शोधत असाल, तर त्यासाठी डीएसएलआर हा उत्तम पर्याय आहे. लेन्स किट आणि बाय बॅक यामुळे डीएसएलआरला आयुष्य जास्त असतं, शिवाय त्यामध्ये तुम्हाला विविध पर्यायही उपलब्ध होतात.
- मजबूत आणि टिकाऊ : डीएसएलआर कॅमेरे बराच काळ टिकतात आणि सर्व प्रकारच्या हवामानात साथ देतात.
- बदलण्यायोग्य लेन्स : डीएसएलआरचं सर्वात मोठं वैशिष्टय़ म्हणजे त्याच्या लेन्स. त्या आपल्या बजेटप्रमाणे आणि गरजेप्रमाणे उपलब्ध असतात. अपग्रेडेशनच्या दृष्टीने हे फीचर फायद्याचं ठरतं.
डीएसएलआरचे तोटे :
- हाय प्राइज टॅग :- नुसतीच आवड म्हणून कॅमेरा घ्यायचा असेल आणि खिशाला फारशी कात्री लागू द्यायची नसेल, तर डीएसएलआर हा योग्य पर्याय नाही. लेन्स किटमुळे कॅमेऱ्याची किंमत वाढते.
- किचकट ऑपरेशन्स :डीएसएलआरमध्ये अनेक फीचर्स असली, तरी तो वापरण्यास अत्यंत किचकट आहे. ज्यांना त्याच्या हाताळणीविषयी फारशी माहिती नाही अशांसाठी आणि लहान मुलांना वापरायला देण्यासाठी हा योग्य पर्याय नाही.
- काळजी घेण्याची गरज : डीएसएलआर कॅमेरा अत्यंत काळजीपूर्वक वापरावा लागतो. काही वेळा सेन्सर खराब होतो, लेन्सवर धूळ साचते, त्यामुळे अधिक काळजी घ्यावी लागते. या कॅमेराच्या दुरुस्तीचा खर्चसुद्धा खूप जास्त असतो.
- आकारमान आणि वजन : डीएसएलआर कॅमेरे जड असतात, त्यांच्या लेन्स वेगळ्या कॅरी कराव्या लागतात. त्यामुळे सामानात वाढ होते. डीएसएलआर कॅमेराही आकाराने मोठा असल्यामुळे तो अधिक जागा व्यापतो.
थोडक्यात सांगायचं झालं तर डीएसएलआर काय किंवा पॉइंट टु शूट काय दोन्हीमध्ये उत्तम कॅमेरे उपलब्ध आहेतच, मात्र वापरानुसार त्यातील योग्य कॅमेऱ्याची निवड करावी. छायाचित्रण ही एक कला असल्याने कॅमेरा कोणताही असो, ज्याला योग्य फ्रेम कळते आणि ज्याला नजर कळते तो उत्तम फोटोग्राफर होऊ शकतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. प्रत्येकाचं बजेट, त्याचा वापर आणि कामाचं स्वरूप यानुसार कॅमेरा निवडणं आवश्यक आहे.
(छायाचित्र सौजन्य : विकिपीडिया)