स्वप्निल घंगाळे – response.lokprabha@expressindia.com
काही दिवसांपूर्वीच बंगळूरुमध्ये एक अनोखा प्रयोग यशस्वी झाला. माहिती तंत्रज्ञान नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात ड्रोन्सच्या साहाय्याने औषधे पोहोचती करण्यात आली. विशेष म्हणजे दृष्टीच्या टप्प्यापलीकडील अंतरावर म्हणजेच दृष्यमानतेहून अधिक अंतरावर स्वयंचलित ड्रोनच्या साहाय्याने औषधे पोहोचवण्यात आल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने म्हटलं आहे. यासंदर्भात माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ट्विटर हॅण्डलवरही माहिती देण्यात आली. २० ऑगस्ट रोजी यशस्वी ठरलेला हा प्रयोग भारतातील ड्रोन उद्योगासाठी मैलाचा दगड ठरू शकतो, असं मानलं जात आहे. पण भारतातील या प्रयोगाकडे आशेने पाहण्यामागे अन्यही अनेक कारणं आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘थ्रोटेली एअरोस्पेस सिस्टीम्स’ आणि ‘उडान’ (यूडीएएन म्हणजेच उडे देश का आम नागरिक) या केंद्र सरकारच्या मोहिमेअंतर्गत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या निर्देशकांच्या देखरेखीखाली बंगळूरुमध्ये या डिलिव्हरीचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. १५ किलोमीटर व्यास असणाऱ्या परिसरामध्ये हा प्रयोग यशस्वी ठरल्याचं मंत्रालयाने म्हटलं आहे. ड्रोनच्या मदतीने औषधं यशस्वीपणे पोहचवण्यात आली. यामध्ये ‘मिडकॉप्टर एक्स-४’ आणि ‘मिडकॉप्टर एक्स-८’ अशी दोन वेगळी मॉडेल्स वापरण्यात आली. पोहोचवलेल्या औषधांचं वजन दोन किलो होतं. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे भारतातील ड्रोनवापराच्या कक्षा रुंदावतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भारतीय आणि ड्रोन
भारतामध्ये १ डिसेंबर २०१८ पासून ड्रोनसंदर्भातील नियम अधिकृतरीत्या लागू करण्यात आले. तेव्हापासून सर्वसामान्यांना ड्रोन उडवण्याची परवानगी मिळाली. १५ जुलै २०२१ रोजी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली. त्यात ड्रोनसाठी लागणाऱ्या परवानग्यांची संख्या कमी करण्यात आली. ड्रोन हे एक प्रकारचे मानवरहित विमानच असते. ते रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने उडवले आणि नियंत्रित केले जाते. काही ड्रोन हे कमी म्हणजेच साध्या डोळ्यांनी पाहता येतील एवढय़ा अंतरावर उडणारे तर काही अगदी कुठूनही नियंत्रित करता येतील अशा प्रकारचे असतात. आपल्याकडे ड्रोन हे केवळ आकाशातून छायाचित्र टिपण्यासाठी किंवा चित्रीकरणासाठीच वापरले जातात, असा समज आहे. याला यूटय़ूबवरील व्हायरल व्हिडीओ आणि अनेककार्यक्रमांत ड्रोनच्या साहाय्याने केलं जाणारं चित्रीकरण कारणीभूत आहे.
आपल्याकडे अगदी एक-दोन वर्षांपूर्वीपर्यंत ड्रोन वापरण्याची परवानगी केवळ सरकारी संस्थांनाच होती. अर्थात नियमांमध्ये राहून काही स्टार्टअप कंपन्यांनी या क्षेत्रात उडी घेतली खरी पण त्यांना अगदी अलीकडच्या काळात चांगले दिवस आले आहेत. तरीही सर्वसामान्यांच्या मनात ड्रोनची प्रतिमा आजही केवळ मनोरंजन क्षेत्राशी संबंधित साधन अशीच आहे. चित्रीकरण, छायाचित्रण, ड्रोनची शर्यत, ड्रोन तयार करण्याच्या स्पर्धा एवढय़ावरच त्याचा उपयोग संपतो, असं अनेकांना वाटतं.
पहिली ओळख चित्रपटांतून
२००९ साली प्रदर्शित झालेल्या ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटातील एका प्रसंगामुळे ड्रोन म्हणजे रिमोटवर चालणारे चार कोपऱ्यांवर चार पंखे असणारे, कॅमेऱ्याच्या माध्यमातून व्हिडीओ रेकॉर्डिग करणारे आणि उडू शकणारे यंत्र अशी तोंडओळख अनेकांना झाली. तरी सरकारी यंत्रणा किंवा संरक्षण खाते वगळता ड्रोनचा भारतातील प्रवास हा खऱ्या अर्थाने २०१३ पासून सुरू झाला. सामान्यपणे जगभरातल्या अनेक देशांमध्ये लष्कराकडून हेरगिरी किंवा हल्ले करण्यासाठी ड्रोन्सचा वापर होतो. मात्र या लष्करी वापराच्या ड्रोन्सचा आकार आणि बांधणी ही छोटय़ा ड्रोन्ससारखी नसते तर ती एखाद्या छोटय़ा विमानासारखी असते. गेल्या दोन वर्षांत ट्रॅव्हल ब्लॉगर्स, छायाचित्रकार, चित्रपट निर्माते आणि तरुणांमध्ये ड्रोन लोकप्रिय झाले आहेत आणि विविध संकेतस्थळांवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
कामाचे क्षेत्र विस्तारले
आता ड्रोन वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जातात. एअरपिक्स (एरियल फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीसाठी काम करणारी कंपनी), सोशल ड्रोन्स (या कंपनीच्या ड्रोन्सनी २०१३ साली उत्तराखंड येथे आलेल्या पुरात गरजूंपर्यंत औषधे आणि आवश्यक साहित्य पोहोचवले.), इडल सिस्टीम्स, आयडीयाफ्रोज, गरुडा रोबोटिक्स (ड्रोन्सच्या मदतीने डेटाचं विश्लेषण करणारी कंपनी) या भारतात ड्रोन्सची निर्मिती करणाऱ्या प्रमुख स्टार्टअप कंपन्या आहेत. २०१८ मध्ये अधिकृत नियमावली जाहीर झाल्यानंतर आणि सरकारी स्तरावर नियंत्रण आल्यानंतर या कंपन्यांचे कार्यक्षेत्र विस्तारले. या कंपन्यांकडून सेवा घेणाऱ्या ग्राहकांची संख्याही वाढली.
ड्रोनचा वापर
सरकारी यंत्रणा ड्रोनचा वापर करतात. त्याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने मोठय़ा भूभागावर लक्ष ठेवण्यासाठी, ड्रोन-रेसिंग, ड्रोन-मेकिंग, हेरगिरी, मोर्चे-आंदोलनांवर नजर ठेवण्यासाठी, मोठय़ा सोहळ्यांच्या चित्रीकरणासाठी, छायाचित्रण, चित्रीकरणासाठी, शेती, रेल्वे, सार्वजनिक बांधकाम, रस्ते निर्माण, सर्वेक्षण, मॅपिंग, डेटा अॅनालिसिस, ऑनलाइन डिलिव्हरी, आपत्कालीन स्थितीत मदत पोहोचवणे, मनोरंजन क्षेत्र इत्यादींत ड्रोनचा वापर वाढला आहे.
किती मोठा उद्योग?
बीआयएस या जागतिक स्तरावरील कंपनीने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार सध्या अमेरिका, चीन आणि इस्रायलची मत्तेदारी असणारी ड्रोन उद्योगाची बाजारपेठ या वर्षांच्या अखेरीस २८.४७ अब्ज डॉलर्सपर्यंत झेप घेणार आहे. यामध्ये भारताचा वाटा ४.२५ टक्के इतका असेल. भारतामधील ड्रोनचा उद्योग हा १.२१ अब्जांपर्यंत जाईल असा अंदाज या संस्थेने वर्तवल्याचं ‘द प्रिंट’ने म्हटलं आहे. २०२१ मधील नवीन नियम आणि ड्रोनसंदर्भातील वाढत्या संस्था यामुळे भविष्यात या उद्योगाला भारतामध्ये मोठा वाव आहे, असं सांगितलं जात आहे. अर्थात ही आकडेवारी केवळ संरक्षण क्षेत्रातील ड्रोनशी संबंधित नसून सर्वासमावेशक आहे. बाकी १९९९ साली भारतीय लष्कराने ड्रोनच्या प्रथमच केलेल्या वापरापासून अगदी आजपर्यंतचा ड्रोन्सचा प्रवास, त्यांच्या किमती, ते विकत घेताना कोणती काळजी घ्यावी, या संदर्भातील सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. सांगायचा मुद्दा इतकाच की, आजपर्यंत अडखळत प्रवास करणाऱ्या या कंपन्या नियमावली लागू झाल्यापासून मुख्य प्रवाहात आल्या आहेत.