अनेकांना सध्या कॅण्डीक्रश या मोबाइल गेमने वेड लावलंय. या खेळाच्या विविध लेव्हल्स, त्या पूर्ण करण्याचे मार्ग, मोबाइलसह फेसबुकवरही खेळता येण्याची सोय, ऑनलाइन खेळण्याचा बोलबाला, मित्रपरिवारात सुरू असलेली चढाओढ या साऱ्यामुळे कॅण्डी क्रश प्रेमींनी याच्या लेव्हल्स पूर्ण करण्याचा जणू विडाच उचललाय. पण हे ध्येय पूर्ण करण्याच्या नादात शारीरिक आणि मानसिक विकारांना ते आमंत्रण देतायत याचा मात्र त्यांना विसर पडू लागलाय.
तनयच्या घरचे सगळे गप्पा मारत होते. काका ऑफिसमधले किस्से सांगत होता तर ताई ट्रेनमधल्या बायकांची भांडणं रंगवून सांगत होती. आजोबांच्या भूतकाळातल्या आठवणी अधेमधे डोकावत होत्या. काकूच्या कुकरी शोजचं कौतुकही मध्येच यायचं. पण या सगळ्या गोतावळ्यात तनयने मात्र घरातला एक कोपरा पकडला होता.
खेळत बसला यमुनातीरी कॅण्डीक्रश सागा’ हा लोकप्रिय मेसेज त्याच्या आईने सगळ्यांसमोर जोरात वाचून दाखवला आणि घरात सगळेच हसायला लागले. अखेर त्यांच्या हसण्यामुळे तनयचं लक्ष गेलं. जवळपास दोन तासांच्या गप्पांच्या मैफलीपासून तनय तिथे असूनही नसल्यासारखा झाला होता.
अॅडिक्ट आहात कसे ओळखाल?
तुम्ही कॅण्डीक्रश खेळताना तुमच्याशी कोणी बोलायला आलं आणि तुमचं लक्ष खेळातून विचलित झालं म्हणून जर तुमची चिडचिड झाली तर तुम्ही खेळात पूर्णत: गुंतलेले आहात असं समजा.
रोजच्या आयुष्यातली महत्त्वाची कामं बाजूला ठेवून तुम्ही हा खेळ खेळत असाल तर या खेळाचे तुम्ही अॅडिक्ट झालेलं आहेत.
जेवण कमी करून तो वेळ तुम्ही खेळात घालवताय म्हणजे त्या खेळाच्या तुम्ही अधीन झाला आहात.
मित्रपरिवार, कुटुंबातले सदस्य, नातेवाईक यांच्याशी संवाद न साधता त्यात गुंतले असाल म्हणजे या खेळाने तुम्हाला वेड लावलंय.
बोटं, पाठ, डोळे, डोकं हे कॅण्डीक्रश हा गेम खेळूनच दुखतंय हे तुम्हाला माहीत असूनही तुम्ही कॅण्डी क्रश खेळणं सुरूच ठेवलं तर याचा अर्थ स्पष्ट आहे की, तुम्हाला त्या खेळाचं अॅडिक्शन आहे.
हे चित्र एकटं तनयच्याच घरचं नाही. तर असे असंख्य तनय घराघरांत सापडतील. ‘कॅण्डीक्रश सागा’ हा मोबाइल गेम याचं कारण. ‘तुझी कोणती लेव्हल पूर्ण झाली’, ‘मला ही एवढी लेव्हल पूर्ण करून दे ना प्लीज’, ‘किती दिवस झाले यार मी त्याच लेव्हलवर अडकले आहे’, ‘मोबाइल दे रे जरा. गेम खेळायचाय’ अशा वाक्यांनी आता कट्टा, घर, ट्रेन, ऑफिस अशा सगळ्याच ठिकाणी कब्जा केला आहे. ‘सबवे सर्फ’, ‘टेंपल रन’ या गेम्सनंतर आता लोकप्रिय झालाय तो ‘कॅण्डीक्रश.’ ट्रेनमध्ये अनेकांच्या हातात मोबाइल असतो आणि त्यावर कॅण्डीक्रशची स्क्रीन ओपन असते. वेळ घालवणं हे या खेळामागचं प्रमुख कारण असलं तरी त्यामागेही अनेक कारणं दडली आहेत. एकाग्रता वाढवणं, समाधान मिळणं, ताण घालवणं अशी अनेक कारणं हा खेळ खेळणारे सांगतात. तर दुसरीकडे कॅण्डीक्रशच्या रिक्वेस्ट फेसबुकवर पाठवणाऱ्यांनी उच्छाद मांडलाय. रिक्वेस्ट्स पाठवू नका असा संदेश सूचित करणाऱ्या गोड, काही अति गोड तर काही उपहासात्मक गोड अशा स्टेट्सने फेसबुकवर गर्दी केली. असे स्टेट्स टाकूनही अनेक जण रिक्वेस्ट्स पाठवतच राहिले. त्यामुळे अशा रिक्वेस्ट्स प्रेमींना काहींनी त्यांच्या फ्रेंड लिस्टमधून जाहीरपणे बेदखलही केलं. एकूणच कॉलेज, ऑफिस, घरासोबतच आता सोशल साइट्सच्या कट्टय़ावरही कॅण्डीक्रशच्या चर्चानी उधाण आणलंय.
लोकप्रिय मोबाइल गेम्स
० कॅण्डीक्रश
० बबल शूट
० सब वे सर्फ
० टेंपल रन
० तीनपत्ती
० वर्ड सर्च
० डॉट्स
० २०४८
० अँग्री बर्ड
० फ्रुट निंजा
कॅण्डीक्रश असा खेळतात
या गेममध्ये एका लाइनमध्ये गोल, चौकोनी, अंडाकृती आकाराच्या वेगवेगळ्या रंगाच्या कॅण्डीज आणि चॉकलेट्स असतात.
एकाच रंगाच्या तीन कॅण्डीज, चॉकलेट्स एकत्र आडव्या किंवा उभ्या रेषेत आणाव्या लागतात. त्या एकत्र आल्या की त्या क्रश होतात आणि एकेक पायरी पुढे जात राहतो.
यामध्ये मॅजिक बॉल, बोनस पॉइंट, लाइफलाइन असे प्रकार आहेत.
मॅजिक बॉलचा वापर शक्यतो लगेच करू नये. एकाच रंगाच्या कॅण्डी एका बाजूला जमा करून मगच या मॅजिक बॉलचा वापर करावा. यामुळे पाँइंट्सची संख्या वाढते.
एकेक पायरी पुढे जाताना प्रत्येक लेव्हलमध्ये किती मुव्हस म्हणजे कॅण्डीजची अदलाबदल करण्याच्या किती संधी आहेत याची संख्या दिलेली असते. त्यामुळे लेव्हल पूर्ण करताना या संख्येकडे लक्ष असणं आवश्यक असतं.
जेली, फळं असे घटक लेव्हल्समध्ये असतात. ते संपवण्याचा कठीण टास्क असतो. अशा वेळी मूव्हची मर्यादित संख्या आणि जेली, फळं संपवणं अशी दुहेरी जबाबदारी असते.
प्रत्येक लेव्हल पूर्ण करण्याच्या पाच संधी संपल्या तरी फेसबुकच्या माध्यमातून खेळाडूला त्याच्या मित्रांना लाइफलाइनसाठी रिक्वेस्ट पाठवू शकतो.
कॅण्डीक्रशच्या आधी फार्मविले या गेमने भुरळ घातली होती. फेसबुकवरचा हा सर्वाधिक खेळला जाणारा खेळ होता. तेव्हाही याबाबत चर्चा होत होती. एकमेकांच्या शेतात काम करायचं, मग शेत पूर्ण झालं की ते विकत घ्यायचं अशा अनेक गोष्टी त्यामध्ये असतात. याचीही क्रेझ तितकीच होती. पण फरक इतकाच की तो फक्त फेसबुकवर खेळला जात होता. कॅण्डीक्रशप्रमाणे अँड्रॉइडवर तो गेम अजून आला नाही. मात्र कॅण्डीक्रश हा फेसबुक, अँड्रॉइड आणि आता विंडोज फोन अशा तिन्हीवर उपलब्ध असल्याने याची लोकप्रियता तुफान आहे. कॅण्डीक्रश हा गेम एकाग्रता वाढवण्यासाठी खेळला जातो असं अनेकांचं म्हणणं आहे. पण त्यावर मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी सांगतात, ‘कॅण्डीक्रश हा गेम खेळल्याने एकाग्रता वाढते हा समज पूर्णत: चुकीचा आहे. एकाग्रता वाढवण्याचे दुसरे अनेक चांगले पर्याय आहेत. एकाग्रता वाढवण्यासाठी योगा, मेडिटेशन, नृत्य असे पर्याय आहेत. तो खेळ खेळताना तुम्हाला आजूबाजूच्या गोष्टींचं भान राहात नाही याचा अर्थ तुमची एकाग्रता वाढतेय असा अजिबात होत नाही. याच मुद्दय़ाला डॉ. वाणी कुल्हळी हे मानसोपचारतज्ज्ञ दुजोरा देतात. त्या सांगतात, ‘‘कॅण्डीक्रश या गेमकडे केवळ विरंगुळा म्हणून बघायला हवं. एकाग्रता वाढवण्यासाठी याचा वापर करू नये. एकाग्रता वाढते असा समज करून तो गेम खेळला जातो. पण त्याचं प्रमाण वाढल्याने त्याचे दुष्परिणामच होतात.’’
वापरावर नियंत्रण असायलाच हवं
डॉ. हरीश शेट्टी, मानसोपचारतज्ज्ञ.
मुलांना गेम्सची भुरळ घालूच नका
डॉ. वाणी कुल्हळी, मानसोपचारतज्ज्ञ
कॅण्डीक्रश आवडणाऱ्यांमध्ये सगळ्या वयोगटातली मंडळी आहेत. पण काहीजण केवळ गंमत म्हणून या खेळाचा वापर करतात. ताण घालवण्यासाठी या खेळाचा उपयोग करू नये असं त्यांचं म्हणणं आहे. श्रद्धा देवधर या गृहिणी सांगतात, ‘‘केवळ गंमत म्हणून मी हा खेळ खेळते. रोजची महत्त्वाची कामं संपली आणि मोकळा वेळ असल्यास मी या खेळाचा विचार करते. आव्हानात्मक खेळ आहे या दृष्टीने मी विचारच करत नाही. इतका गांभीर्याने विचार करूही नये असं मला वाटतं.’’ असंच काहीसं म्हणणं आहे उदय जोग यांचं. ‘‘मोबाइलमधल्या कोणत्याच खेळात इतकं गुंतून जाऊ नये असं मला वाटतं. आपलं मनोरंजन होण्यासाठी त्याचा किती वापर करायचा हे आपल्या हातात असतं’’, असं ते म्हणतात. तर याउलट याचं अॅडिक्शन असल्याचं अनेक जण कबूलही करतात. एखादी लेव्हल पूर्ण होत नसल्याचा मनस्ताप होतो. तो मनस्ताप इतक्या टोकाला जातो की एखाद्याकडून जमेल तितक्या लवकर ती लेव्हल पूर्ण करून घेतली जाते. हा खेळ खेळून एकाग्रता वाढते असं अनेकांचं म्हणणं असलं तरी लेव्हल पूर्ण करण्यापर्यंत आवश्यक असलेली संयमी वृत्ती मात्र कमी होताना दिसते. ठरावीक लेव्हल पूर्ण झाल्यानंतर पुढचा टप्पा गाठण्यासाठी क्षणाचाही विलंब न करता एकाच वेळी अनेकांना ‘लाइफ’ची रिक्वेस्ट पाठवली जाते. यातून संयमी वृत्ती कमी होताना दिसते.
स्पर्धात्मक दृष्टिकोन तयार होतो
– किमया कुलकर्णी-पाध्ये, गृहिणी.
आनंद मिळतो!
– प्रतीक सराफ, नोकरी
बिझी राहायला आवडतं!
– रसिका वेंगुर्लेकर
आव्हानात्मक खेळ
– निखिल जोशी, सीएचा विद्यार्थी
सीएचं शिक्षण घेत असलेली अदिती वाळिंबे या खेळाच्या फायद्यांसह तोटय़ांबाबतही बोलते. ती म्हणते, ‘‘कॅण्डीक्रश खेळण्यासाठी बुद्धीला चालना द्यावी लागते. पण दोन मिनिटांचा ब्रेक मिळावा यासाठी खेळायला सुरुवात केलेला हा खेळ कधी दोन तासांवर जातो कळत नाही. एकाग्रता वाढत असली तरी इतर गोष्टींचा हा खेळ खेळताना विसर पडतो.’’ खेळण्याच्या कालमर्यादेवरही मानसोपचारतज्ज्ञांनी मत व्यक्त केलं. डॉ. शेट्टी सांगतात, ‘‘दिवसभरात फक्त अर्धा ते पाऊण तास हा गेम खेळायला हरकत नाही. तेही फ्रेश वाटण्यासाठी याहून अधिक वेळ त्यासाठी दिला तर त्याचा शारीरिक आणि मानसिक असा दोन्ही त्रास होण्याची शक्यता असते. टेक्नॉलॉजी हे अन्न नसून मिठासारखं आहे. गरजेपुरताच त्याचा वापर केला पाहिजे, हे लक्षात घ्यायला हवं.’’ तर डॉ. कुल्हळी सांगतात, ‘‘वास्तविक कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूचा एका तासापेक्षा जास्त वापर करू नये. पण आता काळानुरूप अनेक बदल झालेत. आता आयटी क्षेत्रासह इतर अनेक क्षेत्रांत कॉम्प्युटरचा वापर प्रमाणापेक्षा जास्त होतो. कालांतराने याचे दुष्परिणामही सगळेच बघतात. तरी कामाचं स्वरूप बदलत असल्यामुळे पद्धतीतही बदल करावे लागतात. दिवसभरातल्या काही नकारात्मक गोष्टींपासून लक्ष विचलित करण्यासाठी कॅण्डीक्रशमधून मिळणाऱ्या पॉझिटिव्हिटीचा काही वेळ विचार करणं चालू शकतं. पण तरी दिवसभरात फक्त पाऊण ते एक तास इतकाच वेळ खेळावं.’’
आम्ही का खेळतो?
केवळ गंमत म्हणून बघावं
– श्रद्धा देवधर, गृहिणी
उत्सुकता वाढत जाते
– स्वप्निल भाटवडेकर, नोकरी
सगळ्यांचा विसर पडतो
– अदिती वाळिंबे, सीएची विद्यार्थिनी
फक्त मनोरंजनाचं साधन
– उदय जोग, नोकरी
माझ्या अजून पाच लाइव्हज शिल्लक आहेत. त्या पास झाल्याशिवाय मी नाही उठणार..
५०० लेव्हल्स? माय गॉड! काय ग्रेट असणार ती व्यक्ती! मला तर अजून पन्नासदेखील लेव्हल्स् करता येत नाहीयेत.
कॅण्डीक्रश लोकप्रियतेची कारणे:
हा गेम आवडण्यामागचं पहिलं कारण म्हणजे यातल्या कॅण्डीज. अशा कॅण्डीज अनेकांनी त्यांच्या लहानपणी अनुभवल्या असतील. हा गेम खेळताना बालपणात हरवून जाण्याची मजा खेळणाऱ्यांना येते.
दैनंदिन आयुष्यातला तणाव या गेममुळे कमी होतो. ऑफिस, कॉलेज, प्रोजेक्ट्स या सगळ्याच्या ताणातून मुक्त होण्याचा कॅण्डीक्रश हा एक उत्तम पर्याय समजला जातो.
एकाग्रता वाढवण्यासाठी हा फायदेशीर ठरतो, असा खेळणाऱ्यांचा समज आहे.
विशिष्ट गोष्टीसाठी स्वत:ला प्रेरणा देण्यासाठी हा खेळ उपयुक्त ठरतो. या गेममध्ये असलेल्या लेव्हल्स काही वेळा पूर्ण होऊ शकत नाही. अशा वेळी ‘ट्राय ट्राय बट डोण्ट क्राय’ असं म्हणत स्वत:लाच धीर देऊन खेळ जिद्दीने पूर्ण केला जातो.
एखादी लेव्हल पूर्ण केल्याचा आनंद या खेळामुळे मिळतो. तर इतरांच्या तुलनेत या खेळाच्या लेव्हलमध्ये आपण खूप पुढे गेल्याची भावना सुखावणारी असते.
वॉव.. हेअर कट मस्त झालाय.. पण तो सुरू असताना मला माझा गेम थांबवावा लागला नाही हे जास्त मस्त..
ताण घालवण्यासाठी या खेळाचा वापर केला जातो असंही अनेकांचं म्हणणं असतं. पण ताण घालवण्याचे विविध पर्याय उपलब्ध असतात. त्यासाठी कॅण्डीक्रशचा वापर करणं चुकीचं आहे. डॉ. कुल्हळी एक उदाहरण सांगतात, ‘‘माझ्याकडे एक गृहिणी आली होती. मुलाला सांभाळण्यासाठी तिने नोकरी सोडली होती. पण तिला कॅण्डीक्रशचं इतकं वेड लागलं होतं की, हळूहळू तिचं तिच्या मुलाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. ‘मुलगा दूध पितोय, चला तोवर एक लेव्हल पूर्ण करू’’ असं ती करू लागली. यामुळे मुलाची रडरड वाढली आणि त्याचं संगोपन नीट होत नव्हतं. म्हणूनच महत्त्वाची कामं बाजूला ठेवून अशा खेळांच्या मागे कितपत धावायचं हे ज्याने-त्याने ठरवायला हवं. या खेळामुळे बोटं, पाठ, डोकं यांचे विकार उद्भवतात. असा शारीरिक त्रास व्हायला लागला की तेवढय़ापुरतं उपचार न घेता त्याच्या खोलवर जायला हवं. अशा शारीरिक त्रासांसह मानसिक त्रासही होतो. एकटं असल्यावर मनात या खेळाविषयीच विचार सुरू असतात. हा खेळ सुरू असलेली स्क्रीन सतत डोळ्यांसमोर येते. अमुक लेव्हल मित्राची पूर्ण झाली, पण माझी नाही या भावनेने इगोही दुखावतो.
‘ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये’ ही म्हण वारंवार वापरली जाते. हा ऊस सध्या ‘कॅण्डीक्रश’ या गेमच्या रूपात सगळ्यांच्या मोबाइलमध्ये उगवलाय. पण, तो ऊस मात्र मुळासकट खालला जातोय. आपल्याला काय आणि किती हवं हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. कशामुळे आपला फायदा आणि नुकसान याचंही भान ठेवणं आवश्यक आहे. कॅण्डीक्रशसारखा केवळ विरंगुळा म्हणून असलेल्या खेळाला अनेकांनी त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनवला आहे. सुरुवातीला वेळ घालवण्यासाठी आणि टाइमपास म्हणून खेळणारे अनेक जण आता या गेमचे अॅडिक्ट झाले आहेत. थोडा थोडा वेळ करतच अॅडिक्शनला सुरुवात होते हे लक्षात घ्यायला हवं. याचा शारीरिकच नाही तर मानसिकही परिणाम होतो. बोटं, पाठ, डोकं यांच्या विकारांसह स्मरणशक्ती कमी होणं, संयमी वृत्ती कमी होणं, अलिप्त रहाणं, अबोल होणं अशा मानसिक विकारांनी ग्रासले जातात. कोणतीही नवी गोष्ट आली की त्याबाबत कुतूहल वाटणं स्वाभाविक आहे. पण उत्सुकता, कुतूहल म्हणून एखाद्या गोष्टीच्या किती खोलात जायचं हे ठरवणं महत्त्वाचं आहे. आज कॅण्डीक्रश आहे उद्या आणखी वेगळा खेळ मोबाइलमध्ये येऊन हजर होईल. त्यामुळे हे जाळं आणखी वाढायच्या आतच कमी करायला हवं.