१. रामूकडे पाच गायी आहेत. एक गाय एका दिवसाला पाच लीटर दूध देते. तर दोन गायी दिवसाला प्रत्येकी तीनच लीटर दूध देतात आणि दोन गायी दररोज प्रत्येकी चार लीटर दूध देतात. रामू दूध ३२ रुपये लीटर दराने विकत असेल, तर महिन्याअखेरीस रामूचे उत्पन्न किती?
२. गणित या विषयातील २८ विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी ५० आहे. त्यापकी ८ जणांनी शाळा सोडली. त्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांच्या सरासरी गुणांमध्ये पाचने वाढ झाली, तर शाळा सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण किती?
३. तीन वर्षांपूर्वी अनय आणि राहुल यांच्या वयाची सरासरी १८ वष्रे होती. आता त्यांच्या गटात राजश्रीचाही समावेश झाला. त्यामुळे त्यांचे सरासरी वय २२ झाले, तर राजश्रीचे वय किती?
४. एका संख्येची पाऊणपट ही त्या संख्येपेक्षा १९ ने लहान आहे. तर ती मूळ संख्या कोणती?
५. दोन संख्यांमधील फरक ८ आहे. आणि त्यांच्या बेरजेची एकअष्टमांश ३५ आहे, तर ती संख्या कोणती?

उत्तरे :
१. महिनाअखेरीस रामूचे उत्पन्न १८,२४० रुपये.
२. ३७.५
३. २४ वष्रे
४. ७६
५. १३६,१४४

Story img Loader