मानवी जीवनात प्रकाशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रकाश नसेल तर जीवन ठप्प होते. सूर्यप्रकाशावर अवलंबून असणारा मानव प्रकाशाच्या इतर साधनांकडे वळला. विसाव्या आणि एकविसाव्या शतकात प्रकाशाची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत. सौरप्रकाशाबरोबरच वीज हा सूर्यास्तानंतर प्रकाश देणारा एक महत्त्वाचा स्रोत आहे. याच्या निर्मितीसाठी सुअरशक्ती, पवनशक्ती जलशक्ती यांचा वापर केला जातो. जैविक ऊर्जा, अणुऊर्जा हे पण पर्याय आता वापरात आहेत. अशा या मानवाच्या दैनंदिन जीवनातील मूलभूत घटकासाठी २०१५ हे आंतरराष्ट्रीय प्रकाश वर्ष (इंटरनॅशनल इयर ऑफ लाईट) म्हणून संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केले आहे. २०१५ हे वर्ष निवडण्यामागेही तसेच सबळ कारण आहे. ईब्न अल हैथम (Ibn al Haytham) यांनी १०१५ मध्ये प्रकाशावर संशोधन केले. ते पुस्तक रुपात फ्रेसनेल (Fresnel) यांनी १८१५ मध्ये प्रकाश चिन्ह म्हणजे लहर हा सिद्धांत मांडला. मॅक्सवेल यांनी प्रकाश किरणाच्या प्रसाराचा विद्युतचुंबकीय सिद्धांत प्रथम मांडला तो १८६५ मध्ये. १९०५ मधील आइनस्टाईन यांचा फोटोइलेक्ट्रीक इफेक्ट आणि १९१५ मधील विश्वनिर्मितीत प्रकाशाचा सामान्य सापेक्षतावाद मांडला. पेन्झायस आणि विल्सन यांच्या कॉस्मिक मायक्रोवेव्ह या शोधाच्या पाश्र्वभूमीवर चार्ल्स काओ यांचे तंतूंमधून प्रकाशाच्या वहनाची परिणीती १९६५ मध्ये प्रकाशीय संदेश वहन या क्रांतिकारी शोधात झाल्याने संदेश वहनात आमूलाग्र बदल झाला आहे. या सर्व घटना
१५ च्या जवळपास असल्याने २०१५ ची निवड झाली आहे. यास आंतरराष्ट्रीय विज्ञान संघटनांनी पािठबा दिला आहे. या वर्षांचे प्रायोजक आहेत ते युरोपियन फिजिकल सोसायटी, ऑप्टिकल सोसायटी, आयइइ फोटोनिक्स सोसायटी आणि अमेरिकन फिजिकल सोसायटी यांचा सहभाग आहे हे वर्ष साजरे करण्यात. प्रकाश (ऑप्टिक्स) हा पदार्थविज्ञान शाखेखाली येतो. त्यामुळेच या संघटना सहभागी होत आहेत. पॅरिस (फ्रान्स) येथे १९-२० जानेवारी २०१५ ला या वर्षांचा शुभारंभ झाला. आंतरराष्ट्रीय प्रकाशवर्षांचा मुख्य हेतू ऊर्जा, शिक्षण, कृषी आणि आरोग्य या जगाला भेडसावणाऱ्या समस्यांवर समाधानकारक उपाययोजना आणि पायाभूत विकासास प्रकाशावरील तंत्रज्ञानांचा हातभार/ सहभाग मोलाचा असल्याची जाणीव आमजनतेस करून देणे हा आहे. प्रकाशाशिवाय संस्कृतीचे अस्तित्व ही कल्पनाच अशक्य कोटीतील आहे. सूर्यापासून मिळणारा प्रकाश आणि इतर साधनांपासून मिळणारा प्रकाश हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आंतरराष्ट्रीय प्रकाशवर्षांत प्रकाशाबद्दलच्या अनेक उपयुक्त शोधांची जाणीव करून देणे आणि सद्यस्थितीत प्रकाशाधारीत तंत्रज्ञानाच्या जागतिक बाजारपेठेस पायाभूत आणि महत्वाची आहेत. या वर्षांत अशा संशोधनांना चालना देणे आणि त्याचे उपायोजन करणे हा प्रकाशवर्ष साजरे करण्याचा एक उद्देश आहे. मानवाच्या भविष्यातील विकासासाठी, आधारभूत अशा आरोग्यदायी जीवनासाठी आणि जागतिक समस्यांवर उपाययोजना शोधण्यासाठी अशा रीतीने प्रकाशवर्ष साजरे केले जात आहे. मानवी जीवनातील प्रकाशाच्या केंद्रस्थानाची सगळ्यांना जाणीव करून देणे व तरुण संशोधकांना प्रकाशाच्या संशोधनाकडे आकृष्ट करणे, प्रकाशावर आधारीत अनेक उद्योग वाढवणे, हे आíथक उलाढालीत महत्त्वाचे स्थानी आहेत. औषधोपचार, संदेशवहन, संपर्क साधने दळणवळण, करमणूक आणि संस्कृती यावर प्रकाशातील शोधांमुळे मूलभूत फरक पडला आहे. मानवाच्या गरजांची पूर्तता यामुळे सत्वर होत आहे. माहितीस प्रवेश, आधारभूत विकासास उत्तेजन, जीवनमान उंचावणे आणि सुधारणे यास कारणीभूत आहे तो प्रकाश. याचे रोजच्या वापरातील उदाहरण म्हणजे सौर ऊर्जेवर आधारीत प्रकाश व्यवस्था. यामुळे प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या इंधनाच्या वापरास आळा बसला आहे. दूरस्थ टेहळणी (रिमोट सेिन्सग) तंत्रज्ञानामुळे शेतीचे आरोग्य, वादळ आणि जमिनीखालील पाण्याचे स्रोत यात प्रामुख्याने वापर केला जात आहे. अनेक वैद्यकीय चाचण्यांत याचा झालेला वापर हे मानवास मिळालेले वरदानच आहे. हे सर्व प्रकाशाइतकेच स्वच्छ आणि स्पष्ट आहे.
विजय देवधर – response.lokprabha@expressindia.com