हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘झाडय़ा’ जमात ही जंबूद्वीपातील (भारत) प्राचीन जमात आहे. विदर्भाच्या चंद्रपूर गडचिरोली, आंध्रप्रदेश, छत्तीसगडलगतच्या प्रांतात ‘अब ओरिजन मायनर फॉरेस्ट ट्रायबल’ असा झाडय़ा किंवा झाडिया या अनुसूचित जमातीचा उल्लेख केलेला आढळतो. परंतु शासकीय दस्तऐवजामध्ये कुठलाही उल्लेख नाही. त्यामुळे ‘लोकशाही’ राष्ट्रात असूनही ही जमात सर्व सवलतीपासून व शिक्षणापासून वंचित आहे.
‘झाडय़ा’ जमातीचा विचार करताना, त्यासंबंधीच्या व्याख्या जाणून घेणे आवश्यक ठरते.
’ ‘झाडी-(स्त्री.) १. जंगली झाडाझुडपांनी व्यापलेला प्रदेश. राई, झाडांचा समुदाय २. झाडोरा, झाडाझुडपांनी व्याप्त अशी अवस्था, निबिडता. ३. झाडीपट्टी, वाट (स्त्री.) झाडी, जंगलातून जाणारी वाट.’ (प्र. न. जोशी- आदर्श मराठी शब्दकोश, पृ. क्र. ३८५)
’ ‘झाडी (स्त्री.)-झाडांचा दाट समूह, जंगल’ (कृ. पां. कुलकर्णी- मराठी व्युत्पत्तिकोश, पृ. क्र. ३५५)
’ ‘झाडी (स्त्री.) १. झाडाझुडपांनी व्यापलेला प्रदेश. २. राई ३. झाडेरा वृक्षानी व्यापलेला. ४. चांदा व भंडारा हे महाराष्ट्रातील जिल्ह.े’ (द. ह. अग्निहोत्री- अभिनव मराठी शब्दकोश, पृ. क्र. ५१६.)
’ ‘झाडी (खँं१्र)-मराठी की बोली वऱ्हाडी (दे.) का उत्तरी-दक्षिणी-चौदामे एक प्रमुख अन्य नाम। झाडी-जाडपी (दे.) या एक अन्य नाम।’’ (डॉ. भोलानाथ तिवारी-भाषा विज्ञानकोश, पृ. क्र. २३४)
’ ‘झाड – पु. कांबळ्याचे एक पट्टे, दोन्ही पट्टी एकत्र जोडून कांबळे होते.’ (दाते, कर्वे-महाराष्ट्र शब्दकोश, पृ. क्र. १००)
’ जी जमात झाडाच्या, झाडीच्या, झाडीपट्टीच्या प्रांतात राहते ती ‘झाडय़ा जमात’ होय.
झाडय़ा जमातीत आज दोन वंश आढळतात –
१. झाडय़ा किंवा झाडिया
२. मोऱ्या किंवा माडिया
हे दोन्ही वंश आदिवासी गोंड म्हणून मानल्या जातात. ‘चंद्रगुप्त मौर्य-सम्राट अशोक’ या जंबूद्वीपातील (भारत) थोर सम्राटाच्या कुलाशी या जमातीचा संबंध असू शकतो. बौद्ध धम्मग्रंथामधील महावंस हा गं्रथ इ.स. पूर्व ५व्या शतकात लिहिला गेला. या गं्रथात आलेला उल्लेख या प्रकारे –
‘‘मोरियानं खत्रियानं वसे जात सिरीधरं
चन्द्रगुप्तो ति पञ्ञात ब्राह्मणो ततो॥१६॥
नवमं घननन्दं तं घातेत्वा चण्डकोधवा
सकले जम्बुदीपरिंम रज्जे रूषभिसिधसो॥१७॥
फिर मौर्य वंश के क्षत्रियों में मूर्धन्य श्रीमान चन्द्रगुप्त राजा हुए, जिन्हे महाक्रोधी चाणक्य ब्राह्मण ने॥१६॥ नवम घननन्द राजाको मरवाकर (उस चन्द्रगुप्त को) सकल जम्बुद्वीप का सम्राट बनाया ॥१७॥ (महानाम स्कबीर-महावंस पृ.क्र.५६-५७)
अशा प्रकारे ‘झाडय़ा’ जमातीला वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. तसेच ‘बुड्डा बाप व बुड्डी माय’ या दोघांना आपल्या उत्पत्तीचे मूलाधार मानतात. हे दोघे नवरा-बायको असून बुड्डेपणी ते विलग झालेत. त्याचे जे अत्यल्प होते माय व बाप यांच्याकडे राहिलेत. पुढे जे बुड्डी मायचे वंशज ते ‘झाडय़ा’ व जे बुड्डाबापाचे वंशज ते ‘माडय़ा’ आज गोंड जमातीत ‘झाडिया-माडिया’ हे दोघेही आपले भाऊ-भाऊ मानतात. तसेच या दोघांचीही वेगवेगळी प्रतिमा नसलेल्या ठिकाणी अतिशय भक्तिभावाने पूजाअर्चा करतात.
लोकसंख्या :
वैनगंगा ते बस्तपर्यंत – ७० हजार
चंद्रपूर आणि गडचिरोली – ४० हजार
अशी लोकसंख्या आढळते.
सामाजिक जीवन :
झाडय़ा जमातीत ‘स्त्री’ला अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आहे. मातृसत्ताक पद्धती आजही अस्तित्वात आहे. स्त्रिया पुरुषांबरोबर सर्व कामे करताना आढळतात. गाव पंचायतीला अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आहे. पंचायतीमध्ये ‘पाच’ लोक मुख्य असतात. त्यामध्ये एक व्यक्ती प्रमुख असते. एखाद्या व्यक्तीने गुन्हा केल्यास त्यावर बहिष्कार टाकला जातो. हा बहिष्कार पंचायतीच्या नियमानुसार असतो. गाव सोडणे किंवा
वेशभूषा व केशभूषा :
स्त्री-पुरुषाची वेशभूषा साधी असते. स्त्रिया कमरेपर्यंत लुगडे नेसतात. चोळी परिधान करतात. पदर डाव्या खांद्यावरून घेऊन उजव्या बाजूच्या कमरेला खोचतात. पुरुष धोतर कमरेपर्यंत नेसतात. त्याचा एक शेला मानेवर घेतात. वरचे अंग उघडे ठेवतात. काही व्यक्ती-बॉडी (सदरा) घालतात.
पुरुष केस अतिशय आखूड ठेवतात. मध्यातून किंवा डाव्या बाजूने भांग पाडतात. स्त्रिया जुडा पाडतात. त्यावर चांदीच्या किंवा लाकडाच्या पिना लावतात. झेंडूची फुले, जास्वंदाची फुले व रानातील कोराटीची फुले जुडय़ाला लावली जातात.
स्त्रिया हातावर, कपाळावर, बोटावर, नाकापाशी, बाजूवर गोंदण करतात. चंद्र, गोल, ठिबके, बिंदू या प्रकारे गोंदविले जाते. विंचू हातावर काढला जातो. काम प्रतीकाचे ते लक्षण समजतात. स्त्रिया काजळ लावतात. नटणे, सजणे स्त्रियांना विशेष आवडते.
विवाह जीवन :
झाडय़ा जमातीत एका गोत्रामध्ये विवाह होत नाही. विषम गोत्रामध्ये विवाह होतात.
‘झाडय़ा’ जमात-गोत्रपद्धती
४ देव ५ देव ६ देव ७ देव १२ देव
तांबेला पेगोल पेदाकुल्ली चेदेबंदी शेंडे
(कासव) (पक्षी) (वाघ) (कासव) (वाघ)
लग्न ७, ५, ३ दिवस चालते. मुलीला खंडणी दिली जाते. कपडे, तांदूळ, दागदागिने, गाय, कोंबडे, बकरे इत्यादी असते. तांदूळ ७ पायल्या दिले जाते. तांदळाच्या पिठाची रांगोळी टाकतात. कलदाराची (मण्यांची) माळ विवाहित-अविवाहित स्त्रिया वापरतात. माळेत ५ ते ७ कलदार असतात. शिंदीचे बारशिंग बांधले जाते. कपडे कोणत्याही रंगाचे वापरतात. बहुतांश पांढऱ्या रंगाचा वापर करतात. लग्न वर किंवा वधूच्या घरी होते. स्त्री पुरुष सोयीनुसार एकमेकांच्या घरी आयुष्यभर राहू शकतात. लग्न अत्यंत साध्या पद्धतीने लागते. लग्नानंतर धेंडा केला जातो. ‘धेंडा’ म्हणजे डफावर सर्व वऱ्हाडी मंडळी नाचतात. तसेच तांदळाचे पीठ एकमेकांच्या चेहऱ्यावर लावले जाते. त्यानंतर गावजेवण दिले जाते. जेवण साधे किंवा कोंबडा वा बकऱ्याच्या मटणाचे असू शकते, सोबत मोहाची दारू असते. स्त्री-पुरुष समानता आढळते.
धार्मिक व शेतीविषयक जीवन :
‘झाडय़ा’ जमात मूर्तिपूजक नाही, त्यामुळे ते निसर्गपूजक आहेत. धार्मिकतेत शेतीजीवन एक अंग आहे. साकर देव (साखळादेव-बुडाबाप) व मारक्का (बुडीमाय) यांची पूजा केली जाते. ‘नागाचे’ अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे. नागपंचमीला नागाची पूजा करतात. भिंतीवर नाग काढला जातो. यावरून हे ‘नागवंशीय’ आहेत, हे लक्षात येते. जडीबुटीचा इलाज रोग्यावर केला जातो. शेतकऱ्यांना, शेतमजुरांना एक दिवस सामूहिक सुट्टी असते. त्याला ‘पोलो’ असे म्हणतात. पीक आल्यानंतर पारावर एक छोटी बंडी करतात. त्यावर कणकेचा शेतकरी ठेवतात. बंडीवर फुले टाकून पूजा केली जाते. ती बंडी खाली सोडतात. व त्यासोबतच एक कोंबडीचे पिल्लू (तलेग) जंगलात सोडतात. काळी-पांढरी जादू केली जाते. लोकांचा यावर विश्वास आहे. शेतीमध्ये
सांस्कृतिक-शैक्षणिक जीवन :
झाडय़ा जमातीत सांस्कृतिकतेला अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे. लग्नप्रसंगी किंवा पीक उत्पन्नानंतर ‘नृत्यगान’ किंवा ‘दंडार’ सादर केले जाते. रेवानृत्य पूर्वी स्त्री-पुरुष किंवा तरुण मुले-मुली दंडाला दंड पकडून सादर करीत असत. आज ते वेगवेगळ्या पद्धतीने सादर करतात. ‘रेवानृत्य’ हा दंडारनाटय़ाचा पहिला प्रकार होय.
दंडारनाटय़ फक्त पुरुषच सादर करतात. यामध्ये गद्य-पद्य असते. जास्तीतजास्त पद्य असते. ‘लावणी’ने अजूनही दंडारीत प्रवेश केलेला नाही हे विशेष. एकंदरीत मानवी सांस्कृतिकतेची उत्पत्तीच दंडारीतून झालेली आढळते. फक्त त्याचे स्वरूप वेगवेगळे आहे. उदा. दक्षिण अफ्रिका.
झाडय़ा जमातीची बोली :
तेलगू +गोंडी : ‘झाडय़ा’ किंवा ‘झाडी’ बोली.
शैक्षणिकता या जमातीत आढळत नाही. फक्त एक-दोन व्यक्ती ८-१०वी झालेले दिसतात.
शासनापुढे अजूनही ही जमात आलेली नाही. त्यांचे स्थान प्रस्थापित करण्याकरिता प्रस्तुत लेखिका व डॉ. सुशील कोहाड काही वर्षांपासून कार्यरत आहेत.
डॉ. विशाखा कांबळे – response.lokprabha@expressindia.com