न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या सुविद्य पत्नी रमाबाई यांच्या जन्माला गतवर्षी दीडशे वर्षे झाली. त्यानिमित्ताने विलास खोले यांनी ‘रमाबाई महादेव रानडे : व्यक्तित्व आणि कर्तृत्व’ या नावाचे नवे चरित्र लिहिले आहे. त्यांनीच नमूद केल्यानुसार, हे चरित्र रमाबाईंच्या आत्मचरित्रावर आधारित आहे. आधीची सर्व चरित्रं, त्यांच्या संबंधातले लेख आणि अन्य संदर्भ साधनांचा आधार घेत हे पुस्तक आकाराला आलेले आहे. रमाबाईंचा लौकिक त्या केवळ न्या. रानडे यांच्या पत्नी होत्या, एवढय़ापुरताच सीमित नसून त्यापलीकडेही बराच आहे. त्यांनी महाराष्ट्रातील स्त्रियांसंदर्भात केलेले काम कौतुकास्पद म्हणावे असे आहे. म्हणूनच विलास खोले यांनी लिहिले आहे की, ‘महादेव गोविंद रानडे यांच्याशी लग्न झाल्यापासून रमाबाईंचे चरित्र खऱ्या अर्थाने सुरू होत असले तरी रानडय़ांच्या मृत्यूपाशी ते संपत नाही. रानडे यांच्या निधनानंतर रमाबाईंनी ‘धर्मपर व्याख्याने’ आणि ‘व्यापारविषयक व्याख्याने’ ही रानडय़ांची महत्त्वाची पुस्तके प्रकाशित केली. शिवाय रानडय़ांचे साधार आणि तपशीलवार चरित्र लिहिण्यास     न. र. फाटक यांना त्यांनी उद्युक्त केले. याखेरीज भारत महिला परिषद, सेवासदन या संस्थांची निर्मिती करून त्यांनी महिलांच्या शिक्षणाची सोय केली आणि त्यांना आत्मविश्वासही दिला. मुलींना सक्तीचे प्राथमिक शिक्षण दिले जावे यासाठीही रमाबाईंनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. महिलांच्या मताधिकाराच्या चळीवळीत त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. न्या. रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखीखाली रमाबाईंचा शैक्षणिक आणि सामाजिक कामाचा पिंड तयार झाला होता. त्यातून त्यांनी रानडय़ांचा रचनात्मक कार्याचा वारसा आपल्यापरीने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. तो वारसा नेमका काय आहे, याची माहिती या चरित्रातून जाणून घेता येते.
‘रमाबाई महादेव रानडे : व्यक्तित्व आणि कर्तृत्व’- विलास खोले, मॅजेस्टिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सायनाची प्रसन्न गोष्ट
तेवीस वर्षीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालविषयी क्रीडाप्रेमींना नव्याने काही सांगायची गरज नाही. पण तिच्याविषयी तिने स्वत:च काही सांगितले असेल तर ते मात्र आवडीने वाचले जाण्याची दाट शक्यता आहे. तिच्या या चाहत्यांची उत्सुकता  ‘ध्यास जिंकण्याचा..’ हे पुस्तक काही अंशी भागवेल. मात्र हे काही सायनाचे आत्मचरित्र नाही किंवा तिच्या यशाचा फॉम्र्युलाही यात सांगितलेला नाही. सायनाने या आपल्या छोटय़ाशा पुस्तकात आपले बालपण, आपली खेळाची आवड, जिल्हापातळी ते ऑलिम्पिकमधील अनेक सामन्यांत मिळवलेले यश तसेच आपल्या जवळच्या व्यक्तींबद्दल लिहिले आहे. बॅडमिंटन कोर्टवर जोरकस फटके मारणारी सायना आपल्या खेळावर एकाग्रचित्त कसे करते, त्यासाठी जीव तोडून मेहनत कशी करते आणि तरीही नेहमी प्रसन्न कशी असते, याचे चित्र तिचे हे पुस्तक रेखाटते. साध्या, सोप्या आणि खेळकर शैलीत तिने ते लिहिले आहे. त्याचा हा मराठी अनुवादही चांगला आहे.
‘ध्यास जिंकण्याचा’- सायना नेहवाल, अनुवाद- अतुल कहाते, रोहन प्रकाशन, पुणे, पृष्ठे- १२६,
मूल्य- १२५ रुपये.

पब्लिशिंग हाऊस, ठाणे, पृष्ठे- २४६, मूल्य- २८० रुपये.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A book on ramabai ranade
Show comments