‘‘चित्रकला म्हणजे बाजार. विकावीकच सगळी. लाख आणि कोटी रुपयांच्या किमती. ज्याचा माल जास्त विकला जातोय तो मोठा चित्रकार..’’ असा एक निरीक्षणवजा सूर अनेक जणांचा असतो. त्याशिवाय, ‘‘राजकीय किंवा सामाजिक आशयाबिशयाची कला याला काही अर्थ नाही. चित्रकारानं त्याचं काम नीट करावं की! कार्यकर्त्यांसारखे कसले वागता? जे काही राजकीय/ सामाजिक आशयाची कला म्हणून डोक्यावर घेतलं जातं, त्यात कलात्मकता असायला हवी की नाही?’’ असा आणखी एक सूर, तोही अनेक जणांचा असतो. यापैकी पहिला सूरवाले अनेक जण आणि दुसरा सूरवाले अनेक जण हे काही वेळा निरनिराळे नसतात! एकच माणूस हे दोन्ही सूर लावतो आणि त्याचा-त्याचा व्हॉट्सअॅप समूह किंवा त्याचे फेसबुकमित्र हे सारे, ही दोन मतं एकमेकांशी केवढी परस्परविरोधी आहेत, याचा विचार न करता दोन्ही मतं अंगठय़ानंच ‘लाइक’ करत असतात. राजकीय कलेला अर्थ नाही, कलेनं ‘कलात्मक’च असायला हवं- म्हणजेच ‘कलात्मक’ कशाला म्हणावं हे अगोदरच ठरलेलं असल्यानं त्याचं पालन करायला हवं, असं एकदा ठरल्यावर विकाविकीला विरोध का म्हणून? यावर उत्तर म्हणून ‘मानवी मूल्यांचा आविष्कार हेच कलेचं कार्य असायला हवं’ असं एक विधान केलं जातं. कलेनं नेहमी ‘शाश्वत मानवी मूल्यं’च आविष्कृत करावी, ही अपेक्षा असते. ती योग्यच आहे. पण म्हणून ‘शाश्वत मूल्यां’चा पुनशरेध घेणंसुद्धा थांबवायचं आणि ‘कलात्मकतेच्या आधीच ठरलेल्या व्याख्या पाळायच्या’ असंच जर असेल, तर कला पुढे कशी जाणार? आपल्याकडे आधुनिक काळातलीच अख्खी बंगाल-शैली या व्याख्यापालनामुळे आणि मूल्य-शाश्वततेचा वारंवार शोध न घेण्यामुळे पडून-झडून गेली आणि केवळ विकाविकीपुरती उरली, हे उदाहरण जवळचं आहेच.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा